The Infinite Loop of Love - 8 Shubham S Rokade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

The Infinite Loop of Love - 8



जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांचे हात-पाय खुर्चीला बांधले होते . तोंडावरती पट्टी होती . चौघेही अंजलीच्या घरी कैद झाले होते . त्यांचे नियोजन पुन्हा एकदा फसले होते . त्यांच्यासमोर तो विक्षिप्त माणुस उभा होता . त्याला पाहून प्रीती बोलायचा प्रयत्न करू लागली . पण तिच्या तोंडावरती पट्टी असल्याने तिला नीट बोलता येईना .
" थांब थांब आत्ताच काढतो तुझ्या तोंडावरची पट्टी . आणि त्यांने प्रीतीच्या तोंडावरची पट्टी काढली....
" का मला मारायच्या मागे लागलायास तू ..... अजून किती वेळा मारणार आहेस .....? कोण आहेस तरी कोण तू .....? आणि मी काय वाईट केलय तुझं....? "
" बास बास भरपूर बोलून झालं तुझं " आणि त्यांने पुन्हा एकदा तिच्या तोंडावर ती पट्टी बांधली .
" तू माझ्या आयुष्याच वाटोळ केलस तू नसतीस तर माझं आयुष्य काही वेगळं झालं असतं म्हणूनच तुला मारायला मी भूतकाळात झाले आत्ताच जर तू मेलीस तर माझं आयुष्य पूर्ण बदलेल....
अजूनही बराच वेळ प्रीतीने त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं याचाच गाणं गात बसला . कसं केलं कधी केलं हे मात्र त्यांना सांगितले नाही . स्वतःला महान समजत तो उपदेशाचे डोस पाजत होता...
" चला जास्त वेळ न घालवता काम करून टाकलेलं बरं.... त्याने बंदुक काढली आणि प्रीतीला तीन चार गोळ्या घातल्या . प्रीतीची तिची हालचाल बंद झाली.
" चला काम तर पुर्ण झालं .... मागच्या वेळी जो आला होता त्याला करता आले नाही पण मी करून दाखवलं ..... " त्याच्या आवाजातून आनंद ओसंडून वाहत होता . जणू काही हे अशक्य शक्य झाल्याप्रमाणे ओरडत तो निघूनही गेला .

यावेळेस तिचा मृत्यू होऊनही लूप रीसेट झाला नव्हता . ते तिघेही जागेलाच होते . रवी संकेत आणि अंजली अजूनही खुर्च्यांना बांधलेले होते . तिचा मृत्यू यावेळेस झाला होता आणि तो कायमसाठी झाला होता . संकेतच्या डोळ्यातून अश्रू नकळत वाहून गेले , पण त्यांची जागा लगेच प्रतिशोधाने घेतली . ते त्यांचं जीवन जगत होते . सुखात असो दुःखात असो , एकत्र असो वेगळं असो . प्रीती भलेही त्याचा राग राग करत असो पण लपून का असेना तिचा आनंदी चेहरा त्याला बघता येत होता . तिच्या सुखात तो सुख मानत होता . आता होतं ते थोडेफार सुखही कोणा भविष्यातल्या माणसाने येऊन हिरावून घेतलं . त्याचं मन पूर्णपणे रागाने भरले . तो खुर्चीची जोरात आदळआपट करू लागला . तो कसेतरी करून सुटला . पहिल्यांदा प्रीतीला सोडून तिला झोपवून , त्याने रवि व अंजलीला सोडवले. नंतर तो त्या माणसाच्या मागे गेला .


रविला तर काहीच कळत नव्हते . प्रीती विना आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हता . त्याने तिचे शीर त्याच्या मांडीवरती घेत तिच्या केसांवरून हात फिरवत तो रडत होता . " रवी रवी.... प्रीती अडळखत बोलली .... प्रीती अजून जिवंत होती . अंजलीचा एक विचित्र फॅशनेबल ड्रेस मेटल थ्रेडसने बनवलेला होता . तो तिने घातलेला असल्यामुळे गोळ्यांचा वेग कमी झाला होता ;पण गोळ्या लागल्या होत्या . " माझं ऐक ...." ती अडखळत अडखळत हळुवारपणे बोलत होती " मला नाही वाटत यावेळी लूप reset होईल , आय लव यु रवी... आणि संकेतला सॉरी म्हणून सांग . मी खूपच harsh वागले रे त्याच्याशी.... बोलताना तोंडातून रक्त येत होतं आणि शेवटी ती शांत झाली . आणि लूप पुन्हा एकदा रिसेट झाला ...

रवी आणि प्रीती त्यांच्या रूममध्ये होते . संकेत त्याच्या त्याच्या खोली शवरती होता . साऱ्यांना वाटलं होतं यावेळी लूप काही रीसेट होणार नाही , पण झाला होता . रवी आणि संकेतला सारं काही आठवत होतं . प्रीतीला अजूनही काही आठवत नव्हतं. रवीने तिला नेहमीप्रमाणे समजावून सांगितले . आतापर्यंत तिचा सात वेळा मृत्यू झाला होता . तोपर्यंत रवीला संकेतचा फोन आला ..
" हेलो , रवी मी मागच्यावेळेस त्याच्या मागोमाग गेलो होतो . त्याची टाईम मशीन , टाईम मशीन म्हणण्यापेक्षा टाईम पोर्टल पाहिले मी . जुना पूल आहे ना तिथं आहे . तुम्ही दोघेही अंजलीच्या तिथे या . आपण काय करायचं ते ठरवू तिथे .
ते सारे पुन्हा एकदा अंजलीच्या घरी जमले .
" मला वाटत आपण पोलिसात जाऊया..." अंजली म्हणाली
" वेडी आहेस का..? पोलिसांना काय सांगणार ? टाइम ट्रॅव्हल करून प्रीतीला मारायला भविष्यात अजून कोणीतरी आले आहे म्हणून ...." संकेत म्हणाला
" नाही , नाही , बरोबर बोलतेय ती , आपण सारं काही सांगायचं नाही . फक्त सांगायचं कोणीतरी मारायला मागे लागलाय आणि त्याचं वर्णन करायचं . जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच थांबू .....
" ठरलं तर मग तुम्ही दोघी पोलीस स्टेशनला जा आणि आम्ही दोघे त्या पोर्टल कडे जातो ...." रवी म्हणाला . त्या दोघीही पोलीस स्टेशन कडे जाण्यासाठी निघाल्या आणि रवी व संकेत त्या पोर्टलकडे कडे निघाले .

त्या दोघीही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या . दोघीही जरा दबकत दबकतच आत गेल्या .
" काय गं पोरींनो इकडे कुठे ...?
" काही नाही साहेब कंप्लेंट करायची होती ....."
अंजली म्हणाली
" कशाची कंप्लेंट करायची तुम्हाला ...? बापमाणूस नाही का बरोबर....?
" कंप्लेट आम्हाला करायचीय , फक्त आम्हाला करता येत नाही का ...? पुन्हा अंजली म्हणाली
" या या ... इकडे या.. बसा असं खुर्चीवर . सगळं खरं हाय , पण उठ सूट कंम्प्लीट करायला ही काय मोबाईल कंपनीचा ऑफिस नाही.... तुमची कुणी छेड काढली असेल तर सांगा . त्याला चांगलाच चोप देऊ. पुन्हा कोणी बघायची हिंमत पण करणार नाही....
" तसं काही नाही साहेब मला कोणीतरी मारायचा प्रयत्न करतोय... प्रीती म्हणाली ...
नंतर तिने ममागच्यावेळी अंजलीच्या घरात घडलेल्या घटनातून काही घटना वगळून जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या सांगितल्या .
" बरं बरं लिहू तुमची कंप्लेंट . दोन मिनीटं बसा जरा त्या बाकड्यावर . माझं हातातलं काम आटपल लिहून टाकू तुमची कंप्लेंट ....
त्या दोघीही बाकांवरती बसल्या तो बाक खिडकीला लागून होता . प्रीती व अंजली त्या ठिकाणी बसल्या . त्यांची पाठ खिडकीकडे होती . बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी अशा घडतात की त्यांना स्पष्टीकरणे नसतात . प्रीतीला जो मारायला आला होता , तो हुशार तर होताच पण अजून त्याला प्रीतीला मारता आले नव्हते . आताही त्यांचा पाठलाग करत तो पोलीस स्टेशन पर्यंत आला होता . पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूने आत शिरत ज्या खिडकीपाशी त्या दोघी बसल्या होत्या तिथे आला . सायलेन्सर बसवलेल्या बंदुकीने त्याने गोळी झाडली . त्याला वाटलं की गोळी तिला लागली म्हणून तो लगेचच पळाला . पण ती गोळी लागली एका पोलिसाला . जेव्हा त्याने गोळी झाडली त्याचवेळी प्रीती बाजुला झाली व ती गोळी त्या पोलिसाला लागली . पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ माजला . मारेकरी पळून जाताना प्रीती व अंजलीने पाहिला . त्याच्यापाठोपाठ दोन-चार पोलिसही गेले .
" कोणाची एवढी हिंमत झाली रे पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोळी झाडायची...
" साहेब तोच होता , जो आमच्या मागे लागलाय... प्रीती म्हणाली
" अगं पोरींनो तुम्ही केलंय तरी काय एवढं गुंड माग लागण्यासारखं ..... तो हवालदार म्हणाला .
" तेच सांगत होतो आम्ही , आम्ही काहीच केलं नाही आणि तो आमच्या का मागे लागलाय तेच आम्हाला कळत नाहीये... अंजली तावातावात म्हणाली
तोपर्यंत ॲम्बुलन्स आली होती जखमी पोलिसाला हलवलं होतं . त्याचं रक्त सर्वत्र पसरलं होतं .
" बर मला सांगा तुम्हाला मारायला जो कोणी मागे लागला त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..? म्हणजे तो कोण आहे...? कोण असू शकतो ...? तुमचं कोणा बरोबर भांडण वगैरे झाले का ....?
" साहेब प्रीतीचं कोणा बरोबर भांडण नाही ...? तिला मारायच्या मागे कोण लागले तेच आम्हाला कळेना....
तोवर तिथली वॉकी-टॉकी वाजली . त्या मारेकऱ्यालग पकडण्यात यश आलं होतं . त्याला घेऊन स्टेशन कडेच येत होते .
" तुम्ही थांबा थोडा वेळ इथेच...
पोलीस त्याला घेऊन आत आले . आल्या आल्या त्याला साहेबांनी पट्ट्याने चांगलाच चोप दिला . त्याचा कोट टोपी काढून बाजूला टाकले . जेव्हा त्याचा मास्क काढायला गेले , तेव्हा तो वेड्यासारखा करू लागला . पण सगळ्या पोलिसांपुढे त्याचा काही निभाव लागेना . शेवटी त्याचा मास्क काढलाच . त्याखालचा चेहरा पाहून प्रीती जागीच स्थिर झाली . तिच्या डोक्यात विचार येण्या अगोदर त्यानं पोलिसांच्या कमरेची पिस्तुल काढून प्रीती वरती गोळ्या झाडल्या . हा तिचा आठवा मृत्यू होता . आणि लूप पुन्हा एकदा रीसेट झाला ....
क्रमःश