The Infinite Loop of Love - Last Part books and stories free download online pdf in Marathi

The Infinite Loop of Love - Last Partविश्वास हा फार मोठा शब्द आहे . विश्वास घात हा आजकाल दैनंदिन वापरातील शब्द झाला आहे . कॉलेजचे दिवस . अकरावीत असताना रवी पहिल्यांदा त्याला भेटला होता . प्रीती व संकेत आनंदात होते पण महेंद्रने बोलेल्या गोष्टीमुळे संकेत आता विचार करू लागला होता . त्याने बोलली प्रत्येक गोष्ट खरी होती . शब्द न शब्द तंतोतंत लागू पडत होता . त्याचा एवढा जवळचा मित्र आणि त्यानेच एवढा मोठा डाव खेळला होता . त्याला आश्चर्य करावे की दुःख , रवीचं सत्य उघड झालं म्हणून आनंद व्यक्त करावा की प्रीतीला वाईट वाटेल म्हणून शोक काहीच कळत नव्हतं . टाईम लूप रिवांइड झाला होता . ही नववी वेळ होती . म्हणजे ही शेवटची संधी होती . फक्त अजून एकच वेळा लूप रिसेट होणार होता . संकेतने डोक्यातले विचार बाजूला सारत रवीला फोन केला
" कुठे आहात रे तुम्ही....
" प्रीतीला आठवतय सार , मागच्या वेळी तिने भविष्यातल्या रवीला पाहिलय . आणि आता तिला सारं काही आठवतंय....
" तुम्ही घरीच आहात ना....
" हो रे ....
" तिथेच थांबा मी आलो.... संकेत
" कोणाचा फोन होता...." प्रीती
" संकेतचा तो येतोय... रवी
" त्याला माहीत आहे का की तूच....? प्रीती
" होय मागच्या वेळी आम्ही टाईम पोर्टलमध्ये गेलं होतो तिथं कळालं आम्हाला....
" पण कारवी का तू असं करशील....?
" अगं प्रीती तो मी नव्हेच . तो भविष्यातला रवी आहे . मी तुला कधीच दुखावणार नाही... रवि तिला समजावत म्हणाला
" तरीही असं काय झालं भविष्यात , कि भविष्यातला रवी मला मारण्यासाठी भूतकाळात आलाय...
" मला माहित नाही , पण तो महेंद्र वेडा होता भविष्यातला . त्याच्यासाठी हा फक्त एक प्रयोग आहे...
" रवी माझ्याकडे बघ , मला सांग सर्वकाही , मला माहित आहे तू मला दुखावणार नाही पण मला वाटतंय तू काहीतरी लपवत आहेस... I still love you . माझं तुझ्यावरती प्रेम आहे भविष्यातल्या रवी वरती नाही....

तेव्हाच संकेत तिथे आला .
" मला तुम्हाला दोघांनाही काहीतरी सांगायचं आहे ....रवी म्हणाला
संकेत व प्रीती दोघेही तिथे बसले आणि रवी बोलू लागला
" पैज ही वाईट गोष्ट आहे , आणि मी तेव्हा माझ्या उनाड मित्रांनी बरोबर ती लावली होती . त्या वेळी ती गोष्ट फार शुल्लक वाटली , पण ज्यावेळी मला त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं होतं , तोपर्यंत फार उशीर झाला होता ....
" काय बोलतोयस काय रवी.... प्रीती
" तुला जिंकायची पैज लावली होती त्यानं , जणू तू काही वस्तू होतीस ... संकेत रागाने बोलून गेला " गोष्टी ऐकत बसायला आपल्याकडे वेळ नाही भविष्यातला रवी कधीही येऊ शकतो .....
त्याने रवीच्या डोळ्याला पट्टी बांधली . कानात बोळे कोंबले आणि डोक्यावरती काळी पिशवी झाकली .
" काय करतोयस नक्की संकेत तू....? प्रीती म्हणाली " त्याला जे काही दिसतं ते त्याच्या आठवणीत जमा होतं . आणि ते भविष्यातल्या रवीला माहीत होतं . त्यामुळे तर प्रत्येक वेळी त्याला आपला ठिकाणा माहीत व्हायचा ...
संकेतला एक मेंटल इन्स्टिट्यूट माहीत होती . ज्याठिकाणी रूग्णाला असलेल्या खोल्या बाहेरच्या परिसरापासून पूर्णपणे वेगळ्या केलेल्या असतात . ते तिघेही कुठे आहेत ते रवीला कळणे अशक्य होतं . तिघेही त्या खोलीत गेले. दार वगैरे लावून घेतल्यानंतर त्यांनी रविच्या डोळ्यावरची पट्टी काढली . कानातले बोळे काढले .
" बोल आता ....संकेत म्हणाला
" प्रीती मी जे काही केलं त्याची मला लाज वाटते पण मी तुझ्यावरती खरच प्रेम केलं होतं ... रवी म्हणाला

" पण तू काय काय नि कसं केलं ते सांग आधी .. " संकेत म्हणाला
" मी त्यावेळी खरंच मूर्ख होतो . कोणताही विचार न करता कृती करायचो. माझी पैज लागली होती तुला माझ्या प्रेमात पडायचं पण झालं उलटंच मी तुझ्या प्रेमात पडलो . पण हे नंतर . सुरुवातीला मी हे सर्व प्लॅनिंग केलं होतं . संकेत बरोबर मैत्री . इतका जवळचा मित्र होतो की त्याचे पासवर्डही मला माहित होते . मग एका मुलीला आम्ही त्याला फसवण्यासाठी तयार केलं . संकेतच्या अकाऊंटवरून तिच्या सोबत सेक्स चॅट केल्याचे स्क्रीन शॉट काढून मी प्रीतीला दाखवले . कन्फर्मेशन करायला ती मुलगी होतीच . मला त्यावेळी हा सारा खेळ वाटला होता . पण आता जेव्हा तिला झालेले दुःख आठवते तेव्हा माझं हृदय पिळवटून निघत . संकेतला याबाबतीत काहीच माहिती नव्हतं . तो फारसा मोबाईलही वापरायचा नाही . मीच त्यावेळी त्याला सर्व अकाउंट तयार करून दिले होते . त्यामुळे तिच्या बोलण्याचा त्याला काहीच संदर्भ लागला नाही . पण मी तुम्हा दोघांचा एकमेकांसोबत संपर्क होऊ दिला नाही . मी तुम्हा दोघांनाही वेगवेगळ्या गोष्टी सांगून दूर केलं . प्रीतीच्या मनात संकेत विषयी विष कालवलं . तिचं मन पूर्णपणे द्वेषाने भरलं . पण संकेतच्या मनात द्वेषला जागा नव्हती . मी त्याला पटवून दिलं की प्रीतीला तो आवडत नाही . तिला सरळ सांगनं चुकीचं वाटतंय म्हणून तिने भांडण केलं . वगैरे वगैरे . तिला मी आवडतो ती आनंदी आहे , म्हटल्यानंतर एका आदर्श प्रेमी प्रमाणे तोही आनंदी झाला . सगळं झालं . ठरल्याप्रमाणे मी पैज जिंकलो होतो , पण मला खाल्ल्यासारखं वाटत होतं... तुम्हा दोघांना दूर केल्यामुळे माझं मन मला खात होतं . पण त्या अपराधीपणाला मी आतल्या आत गाडून टाकलं . मी प्रीती बरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं पण आता माझं तिच्यावर ती खरंच प्रेम झालं होतं . अजूनही आहे आणि मी मरेपर्यंत राहील...

हे सारं काही ऐकून संकेत व प्रीती दोघेही निशब्द झाले . प्रीतीला स्वतःचा राग येत राग येत होता . तिचे संकेत वरती प्रेम होतं पण विश्वास नव्हता . विश्वास असता तर तिला कळालं असतं की संकेतने तिचा विश्वासघात केला नव्हता . रवीने सांगितलेल्या व त्या दुसऱ्या मुलीने खात्री केलेल्या गोष्टी तिने संकेतला स्पष्टीकरण देण्याची ही संधी न देता खऱ्या मानल्या होत्या . तिला स्वतःच्या मूर्खपणाची किव येत होती . संकेतच्या खऱ्या प्रेमाचा तिला अभिमान होता . तिने वेळोवेळी संकेतचा अपमान केला होता पण अजूनही तो तिच्यासाठी झटत होता . तिला आता प्रश्न पडला होता या प्रेमाला आपण पात्र आहोत का...? या सार्‍या गोष्टी तिच्या डोक्यात चालू असताना प्रीती रडत होती . संकेत तिच्या जवळ जात तिला शांत करायचा प्रयत्न करू लागला...
" I am so so sorry माझी चूक झाली रे ...
" असू दे तुझी चूक नव्हती , तुला जे सांगितलं , दाखवलं त्यामुळे तू तशी वागलीस. तुझ्या जागी मी असतो तर मीही तसंच केलं असतं ....
" नाही ना... तू तसं काहीच केलं नाही . मीच मूर्ख होते , नाही मीच मूर्ख आहे ... मी तुझ्या प्रेमाला खरंच पात्र नाही.... ती जोरजोरात रडत होती . स्वतःचा राग करत होती . त्याच वेळी त्या खोलीचं दार उघडलं.
" तर आता सगळ क्लिअर झालय ... तर एकदाच हा खेळ संपवून टाकू....
भविष्यातल्या रवी आत येत बोलला...
" आता तरी मला मदत करशील का नाही
" मी तुला कधीच मदत करणार नाही . मी तुझ्या सारखा कधीच होणार नाही . .....
वर्तमानातल्या रवी त्या भविष्यातल्या रवीला म्हणाला . " तू आणि मी आपण दोघे काही वेगळे नाही आहोत . तुला ही आतल्याआतमाहित आहे की ज्यावेळी तुझं खरं बाहेर आलं त्यावेळी ती तुझ्यासोबत राहणार नाही .... काही वर्षांनी तुझी अवस्था माझ्यासारखीच होईल ... तू बाजूला सर . मला माझं काम करू दे . नंतर तू माझं आभार मानशील . वर्तमानातला रवी भविष्यातल्या रवी च्या समोर उभा होता . भविष्यातल्या रविने बंदुक काढली आणि त्याच्या अंगावर धावून गेला . वर्तमान काळातल्या रवीने भविष्यकाळातल्या रवीच्या हातून बंदूक घेतली व बाजूला फेकली . त्या दोघांची मारामारी चालू होती .
" संकेत बंदूक उचल नि गोळी घाल...
संकेतने बंदुक उचलली खरी पण तो बंदूक घेऊन शब्द उभारला . त्यांची मारामारी चालु होती गोळी कोणत्याही रवीला लागली तर समस्या सुटणार होती . आताच्या रवीला मारलं तर भविष्यातला रवी राहणारच नाही आणि भविष्यातल्या रवीला मारलं तरी हे चक्र थांबणार होतं . त्याला कितीही राग आला असला तरी तो तो वर्तमानातल्या रविला मारू शकत नव्हता आणि भविष्यकाळातल्या रवीला मारण्यास त्याचा निशाणा नव्हता . ते दोघेही सतत हलत होते .
" फार वाट बघू नकोस ...
भविष्यकाळातल्या रवी समोर वर्तमान काळातला रवी फार काळ टिकू शकला नाही त्याला जोरात लाथा रडत भविष्यातला रवी संकेत कडे धावला त्याच्या वरती नेम धरत संकेतने बंदूक चालवली पण त्याने चपळतेने गोळी चुकवली संकेत जवळ येत त्याने त्याच्या हातून बंदूक घेत संकेतवरतीच गोळी झाडली . गोळी संकेतच्या डोक्यातून आरपार जात रक्ताचे शिंतोडे उडवत मेंदूचे भाग सर्वत्र पसरवत गेली . संकेत जागीच ठार झाला . भविष्यातल्या रविने आता प्रीतीवरती निशाणा धरत ट्रिगर ओडला पण तेव्हाच प्रीतीला बाजुला ढकलत असताना ती गोळी वर्तमानातल्या रवीला लागली . वर्तमान काळातल्या रवीचा मृत्यूमुळे भविष्यातला रवी ही जागीच हवेत विरून गेला . काही कळायच्या अगोदरच प्रीतीवरती प्रेम करणाऱ्या दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता .

समाप्त....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED