वरची खोली Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वरची खोली

कथा -वरची खोली
ले- अरुण वि.देशपांडे
------------------------------
मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली ...मी पण साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या साईटवर आलो , गाव लहान असल्यामुळे थोड्या मुदतीसाठी इथे किरायाने खोल्या मिळणार नाहीत "याची कल्पनां लॉजवाल्यांनी देत .आमच्यासाठी छान व्यवस्था करून देतो असे कबूल केले ,आमची वर्किंग टीम १०-१५ जणांची होती ,कधी कमी तर कधी जास्त मेम्बेर्स असत .अशी आमची टीम एक लॉज मध्ये राहू लागली .
माझ्या सोबतच्या दोस्तांना गाव कसे आहे ?, लोक कसे आहेत ? याच्याशी काही देणे-घेणे नव्हते ..सोमवार ते शुक्रवार साईटवर कामात वेळ जायचा ,शनिवार -रविवार आपापल्या गावी ,घरी राहून यायचे अस एक कलमी कार्यक्रम बहुतेकांचा होता . मी टीम मधला सर्वात लहान तरुण उमेदवार , इकडे कुणी नातेवाईक नव्हते , मी ज्यांचा होतो ते परदेशात होते ..अशा एका अर्थाने मी एकटा आणि सडाफटिंग होतो ,


मी सहजपणे या गावात फिरून याचो, लॉजवर आलो की मित्र म्हणयचे . साहेबंना फोर्स करून तू या गावात आलास , काय कारण आहे? सांग तरी , मी म्हणायचो , मलाच अजून नक्की ठरवता आलेले नाहीये ..मी का आलो ? काही उपयोग होईल का माझ्या इथे येण्याचा ? आता काहीच सांगू शकणार नाही ..तुम्हाला , नंतर आपोआपच कळेल
एक संध्याकाळी फिरत फिरत मी गावाच्या बाहेर आलो ,अंतर -२-३ किमी च्या आसपास असेल . एका छोट्याश्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या बंगल्याच्या समोर उभा राहून मी पहात राहिलो .खाली ७-८ खोल्या ,वर गच्ची ,पूर्वेच्या कोपर्यात वर एक खोली ,त्या खोलीला बाहेरून लोखंडी ग्रील आणि खिडक्यांना काचा दिसत होत्या .खोलीत प्रकश होता, म्हणजे या वरच्या खोलीत कुणी आहे "याची खुण होती ती.
बंगल्यातल्या खालच्या ऐसपैस आणि मोकळ्या जागेत दोन मोठी मोठी झाडे सावली देणारी ,, मेहनतीने वाढवलेली फुलवलेली बाग , भरपूर पाणी लागलेला मोठा हापसा ,त्याच्या बाजूला छोटासा हौद .घराच्या चारीबाजुला भक्कम तटबंदी सारखी साधारण उंच असलेली कंपाउंड - भिंत , सुमारे ३०-३५ वर्षापूर्वी शहरापासून बाहेर वस्ती होण्यास हा बंगला झाल्यावर सुरुवात झाली असावी .

मी तिन्हीसांजेला या घराच्या समोर उभा राहून पहात होतो .. या घरातली माणसे तशी माझी कुणीच नव्हती , पण याहून अधिक गम्मत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ..मी मात्र त्यांचा कुणीतरी होतो ..आणि हेच सांगण्यासाठी तर मी या गावात आलो होतो .. ही गोष्ट या घरातील माणसांना अजिबात माहिती नव्हती ..कारण मी या अगोदर या पैकी कुणाला पाहिलेले नव्हते ,आणि त्यांनी पण मला पाहिलेले नव्हते ..पण , या अनोळखी नात्यात ओळखीचे दुवे होते .. ते दुवेच नव्याने जोडले जातात का ?
हे पहाण्यासाठी मी इथे,या गावात आलेलो आहे हे तुम्हाला मात्र सांगतोय..


आत जाऊ की नको ? गेलो तर येण्याचे कारण काय सांगू ?, नुसता घोळ चालू होता मनात .. तरी पण मनाचा पक्का निश्चय झाला आणि समोरचे गेट उघडत मी आत गेलो , समोरचा दरवाजा बंद होता , पण आत कुणीतरी नक्कीच असणार याची कल्पना होती ,
मी दरवाजा वाजवला .. तो उघडणारे गृहस्थ मध्यम वयाचे , त्यांनी मला पाहिले
-अनोळखी कोण आलाय बाबा हा इकडे ?असेच भाव त्यांच्या नजरेत होते .
काय काम आहे ? कोणाकडे आलात तुम्ही ? त्यांच्या आवाजात पुढे न बोलण्याची इछाच जास्त होती .


मी शांतपणे म्हणालो - काही काम नाही, सहज आलो इकडे ..गावाबाहेर हा छान बंगला पाहून जरा आश्चर्य वाटले .म्हणून थांबलो .. चालेल ना असे ?
माझा खुलासा ऐकून - हा येडा की खुळा ? असेच त्यांना म्हणयचे असावे
.तसे काही न बोलता ..म्हणाले ..
या आत या , लांबून फिरत फिरत आलात ,बसा , , पाणी वगरे घ्या .


बाहेरच्या व्हरांड्यात माझ्या सारख्या आगंतुक आणि अनोळखी माणसासाठी फोल्डिंग खुर्च्या असतात , अशाच एका खुर्चीवर मी बसलो ,
मघाचे गृहस्थ .. पाण्याचे ग्लास घेऊन आले.
कोण तुम्ही , काय करता ? इकडे कसे काय आलात ,?


त्यांनी प्राथमिक माहितीचे प्रश्न विचारले , त्यांना उत्तर देत मी म्हणालो -
मी इकडे नोकरीसाठी आलोय , काही महिन्यासाठी , मग जाणार आहे परत .
तुमच्याकडे रिकामी खोली असेल तर द्याल का ? माझे इथले काम झाले की मी लगेच परत जाईनइथून .
तुम्हाला माझा काहीच त्रास होणार नाही.एकटाच आहे , तुम्ही म्हणाल ते भाडे देईन मी ,
मला खोली मात्र इथेच हवी आहे. प्लीज.


माझ्या आवाजातील आर्जव-स्वर ऐकून क्षणभर ते काहीच बोलले नाही , काय उत्तर द्यावे, त्यांना ठरवता येत नसावे ,असे मला वाटले .
मी पुन्हा जोर लावून विनंती केली - नाही म्हणू नका , कसे ही करून एक खोली द्या. माझ्या साठीच्या सोयी-गैर-सोयीचा विचार करू नका ,
खाली इतक्या बंद खोल्या दिसत आहेत, त्यातली कोणती ही एक द्या .


ते गृहस्थ सांगू लागले - हे बघा , तुमचे म्हणे पटते मला ,
आम्ही या बंगल्यातल्या खोल्या किरायाने कधीच कुणाला दिल्या नाहीत ,का देत नाहीत ? याचे कारण , तुम्ही इथे नवे आहात ,बाहेरगावचे आहात ,काहीच माहिती नाही तुम्हाला ,
म्हणून विचारलेत , हे समजू शकतो मी .पण या बद्दलचा निर्णय मी घेऊ शकत नाही
,मला ..वरच्या खोलीत जाऊन त्यांनाच विचारावे लागेल , सांगावे लागेल , पटवून द्यावे लागेल ,
ते जर हो म्हणाले तरच .तुम्ही इथे येऊ शकाल ..एरव्ही नाही
कारण वरच्या खोलीत रहाणार्या "त्यांना " इथे कुणी त्रयस्थ इथे आलेलें अजिबात चालत नाही.


वरच्या खोलीत ..कोण असते ? आणि त्यांना विचारून करावा लागत हे समजू शकतो , पण कुणी आलेला चालतच नाही ..हे जरा विचित्र आहे.
माझे बोलणे त्याना फारसे आवडलेले नाही असे जाणवले ..
हे बघा तुम्ही दोन दिवसांनी या, त्यावेळी सांगेन तुम्ही इथे येऊ शकता की नाही ते ,
आणि हो,
हा घ्या पेपर - यावर तुमच्या बद्दलची माहिती लिहून द्या, ते पाहतील , वाचतील आणि वाटलं तरच हो /नाही म्हणतील.


दिलेल्या पेपरवर माहिती लिहून होई पर्यंत ,आतून माझ्या साठी ते चहा घेऊन आले .चहा घेतांना मी मनात म्हटले ..खोली मिळायचा चान्स तर दिसतोय .
ठीक आहे ,येईन मी पुन्हा , नक्की दिवस नाही सांगता येणार , साईटवर गेलो की सोपे नाही येणे .
त्यांचा निरोप घेऊन मी लॉजवर आलो.


या बंगल्यात खोली तर मिळेल , त्या नंतरच त्या वरच्या खोलीत असलेल्या "त्यांना ", कसे नि कधी भेटायचे हे पण ठरवता येईल , त्यासाठीच तर हा सगळा आटापिटा करतो आहे मी .


मला लगेच काही जमले नाही त्या बंगल्याकडे जाणे , पण जमवावे लागणार होते त्याशिवाय ज्यासाठी मी इतक्या दूर आलोय ते काम कसे पूर्ण होणार ? मग अगदी वेळ काढून मी पुन्हा एकदा त्या गावाबाहेरच्या बंगल्यात गेलो ..वेळ तीच .संध्याकाळची ,
तो बंगला निर्मनुष्य , निर्विकार अवस्थेत तसाच होता , खाली उजेड आणि त्या वरच्या खोलीत ..अंधार वाटणार नाही इतकाच प्रकाश दिसत होता.
आज समोरचा दरवाजा उघडा होता कारण मी येण्यागोदर मोबाईल फोन करून सांगितले होते ,
बाहेरच्या अंगणात खुर्च्या टाकून आम्ही बसलो .
माझ्याशी बोलतांना ते म्हणाले ..जगन्नाथ माझे नाव , गावातले सगळे लोक मला जगनभाऊ असे म्हणतात ,, तुम्ही पण म्हणू शकता आतापासून .


एक गोष्ट समजून घ्या -
"वरच्या खोलीत जे राहतात ..त्यांचा मी कुणीच नाहीये , आहे तो एक आश्रित , त्यांनीच सांभाळलेला , वाढवलेला ,
पण इतक्या दिवसांच्या राहण्यामुळे त्यांच्याच घरातील वाटणारा माणूस आहे मी . माझ्या परीवारा सहित मी राहतो , त्यांची काळजी घेणे , सांभाळणे , हा बंगला संभाळणे हीच माझी नोकरी


काय गंमत आहे. इथेच रहाणारे हे जगनभाऊ सगळ्या गोष्टी करणारे ..पण वरच्या खोलीतील "त्यांच्यासाठी " एक आश्रित आणि पगारदार नोकर ,
मी पण या "त्यांनाच " भेटायला ,बोलायला आलेलो ..पण त्यांचा कुणी ही नाही ..पण आमची भेट होणे खूप गरजेचे होते ..काही जुने -चुकलेले हिशेब -दुरुस्त झाले पाहिजे " ही भावना मी एक परका .पण एका आपलेपणाच्या भावनेने इथे आलो होतो ..


हे पहा अभय.. खालच्या खोल्यातील एक खोली तुम्हाला देण्यास त्यांनी परवानगी दिली आहे , अट एकच..तुमचे काम ज्या दिवशी संपेल ,त्याच दिवशी तुम्ही इथून निघून जायचे आहे.
आणि दुसरी महत्वाची अट "वरच्या खोलीत येणाचा प्रयत्न पण करायचा नाही.
जगनभाऊंनी खोली देऊन मला नाराज केले नाही , पण त्यांच्या अटी" सांगून निराश केले . काही उलट बोलणे टाळणे बरे "असे ठरवून मी गप्प राहिलो .
आता जास्त टाईमपास करून मला चालणार नव्हते ..शक्यतो लवकर मनात ठरवलेल्या गोष्टीचा सोक्ष-मोक्ष लावूनच टाकू या . मनातल्या मनात मी पक्के ठरवून टाकले


दुसरेच दिवशी सकाळी , माझे समान घेऊन मी बंगल्यावर दाखल झालो ,आणि आठवड्याभरात मी जगनभाऊ आणि परिवारात रुळून गेलो . या प्रेमळ जोडप्याने माझा बाहेरचे जेवण बंद केले , दोन वेळा जेवणाचा डबामला मिळू लागला , साईटला गेलो की उशीर व्हायचा पण जगनभाऊ वाट पहात जागे असायचे.
माणसांचे एकमेकांचे ऋणानुबंध असतात हेच खरे ".


एक दिवस जगनभाऊ माझ्या खोलीत आले , एरव्ही कधी न येणारे ,आज आले ते गंभीर चेहेर्याने ..
अभयराव- त्यांना फार बरे नाहीये , ,त्यात हट्टी आणि हटवादी , डॉक्टर कडे येणार नाहीत ,आत्ता तुम्ही तुमच्या बाईकवर गावात जाऊन डॉक्टरला घेऊन येता का , दिवसा गेलो असतो मी , इतक्या रात्री एकट्याला ,पायी जाणे त्रासदायक आहे.


अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर .मी लगेच निघालो ..गावात जाऊन डॉक्टरला भेटलो , बंगल्यावरून कुणी घेण्यासाठी आलाय " तो देखील कुणी अनोळखी , ?
डॉक्टरला हे खरेच वाटत नव्हते .
रस्त्यात डॉक्टर म्हणाले .. - तुम्ही तिथे रहाताय "हा चमत्कारच वाटतोय मला , कसे काय तुम्हाला राहू दिलाय त्यांनी ? वंडरफुल .
तुम्ही भेटलात का त्यांना "वरच्या खोलीत जाऊन "?
अहो डॉक्टर - मी वरच्या खोलीत येण्याचा प्रयत्न करायचा नाही " हीच त्यांची पहिली अट आहे , मग कशी होईल त्यांची भेट , ते कसे आहेत .हे पहिले सुद्धा नाहीये.


अभयराव- आज तसा शारीरिक आजार नसलेला हा गृहस्थ मानसिक आजारी आहे. त्यामुळे तो गेल्या अनेक वर्षापासून विजनवासात गेल्या सारखा राहतो आहे ..
न कुणाला भेटणे, ना बोलणे .जणू जगा पासून ,सर्वापासून त्यांनी कायमची फारकत घेतली आहे . याचे कारण काय ..?..सांगू की नको .अशी अवस्था डॉक्टर साहेबांची झाली होती.


चालू असलेली बाईक थांबवीत म्हणालो ..डॉक्टर साहेब ..तुम्हाला खरे वाटणार नाही ..पण त्यांच्या या अशा वागण्याचे कारण मला माहिती आहे ,
काय म्हणता अभयराव ? अहो कसे शक्य आहे हो हे, तुम्ही त्यांचे कुणी नाही , त्यांना पाहिलेले पण नाही .मग कसे काय म्हणता..तुम्हाला कारण माहिती आहे..


डॉक्टर साहेब - आता मी सांगतो ते ऐका ..मग ठरवा ..मी खर बोलतोय की, जे सांगितल ते खोटे आहे..


त्यांचा लाडका मुलगा , नोकरीला परदेशात गेला ,लग्न केले परस्पर , बायकोसह तिथेच स्थायिक झाला , इकडे येणाचा प्रश्नच नव्हता ..त्यांनी स्पष्टपणे बजावले होते ..इकडे येण्याचा प्रयत्न करू नये , बापाचे तोंड पहायला मिळणार नाही . असा निर्वाणीचा निरोप दिल्यावर ..तो पण त्यांचाच मुलगा .. पुन्हा जन्मभर फिरकणार नाही तिकडे असे ठरवून तिकडेच राहिला ,
काही वर्षे गेली .. राग निवळून गेला , वाढत्या वयाने समज आली .आणि मग आपण चुकलो हे त्याला कळून आले आणि त्याने ठरवले .आता .सरळ इकडे येऊन चूक कबूल करायची आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून माफी मागायची आणि निर्मल मनाने परतायचे ..
पण हे सगळे प्रत्यक्षात येता येता राहिले ..दुर्दैवाने एका अपघातात त्यांच्या मुलाला इतकी मोठी दुखापत झाली की तो पुन्हा उभारी घेऊ शकला नाही.
डॉक्टर .. त्यांच्या मुलाच्या शेजारी आम्ही राहतो , माझे आई-बाबा आणि हे शेजारचे काका पक्के मित्र ..दोघांच्या वयात खूप अंतर ,तरीही हे दोघे घट्ट मित्र. आपल्शा आजाराचे निमित झाले ,आणि माझे बाबा या जगातून निघून गेले .. नंतरच्या कठीण दिवसात या शेजारच्या काकांनी मला मुलासारखे सांभाळले , मी पोरका आणि अनाथ झालो नाही ते या काकंच्या आधारामुळे .


उपकरापोटी म्हणा ,सहवासातील प्रेमाच्या पोटी म्हणा त्याच वेळी मी ठरवले इकडे येऊन काकांच्या बाबांना भेटून सर्व सांगायचं .आणि मनातली कटुता विसरायला लावायची , त्यासाठीच नोकरीचा बहाणा करीत या गावात आलोय .


अविस्वसाच्या नजरेने डॉक्टर माझ्याकडे पाहत राहिले .. अभयराव ..काय बोलावे ? निशब्द झालोय मी . असे वागणारा माणूस असतो, तुमच्यामुळे कळाले बुवा .
त्यांचे तुमचा हेतू खूप चांगला आहे. आता उशीर लावू नका .."त्यांना हे सर्व सांगून त्यांच्या मनातली सगळी कटुता बाहेर पडली पाहिजे .. उरलेल्या दिवसात "त्यंना " जगणे म्हणजे एक शिक्षा वाटणार नाही.


डॉक्टर पाठोपाठ पहिल्यांदा मी आज "वरच्या खोलीत " गेलो ..आत जगनभाऊ होते ..पलंगावरआजारी शरीर घेऊन एक कणखर आणि जिद्दी मनाचा माणूस डोळे मिटून पडलेला आहे असे मला वाटले , तपासणी करून .औषधी देऊन डॉक्टर निघाले ..जातांना "त्यांना म्हणाले..
हा मुलगा घेऊन आला मला , म्हणून वेळेवर औषध मिळाले तुला , काळजी करू नको , पडेल आराम . उद्या याला पुन्हा वरच्या खोलीत येऊ दे , तो काय सांगतो ते ऐकून घे ..
यात नुकसान नाही ,मानले तर तुझ्याच हिताचे आहे.
ठीक आहे डॉक्टर .तुम्ही म्हणताय , ऐकेन मी . जगनभाऊ ..उद्या सकाळी आणा याला वरच्या खोलीत , सांगू द्या काय सांगायचे ते..


जगनभाऊ आणि मी खाली आलो , खोलीत आल्यावर ..मी कोण, कशासाठी आलोय हे त्यांना सविस्तर सांगितले .. सगळ ऐकून जगनभाऊंनी मला मिठीच मारली , म्हणाले ..देव करतो ते भल्यासाठीच करतो ,
रात्रभर मी जागा होतो , माझी झोप पार उडाली होती . विचारांचा नुसता गोंधळ ..आता उद्या काय होईल ? मी कोण आहे, कशा साठी आलोय , सांगितलेले ऐकून .मग काय वाटेल त्यांना ? काय म्हणतील ? रागाने बाहेर जा ,असे सुनावतील , ? की हे सांगण्याची हिम्मत कशी झाली म्हणून संतापतील ?
, उद्याच्या भेटीवर माझे इथे येणे सफल की निष्फळ ? हे ठरणार होते ,काही ही होवो ..माझा हेतू निर्मल आणि स्वच्छ होता. आता जे होईल ते होईल, घेऊ ऐकून , ते जे म्हणतील ते..


सकाळी .जगनभाऊ चहाचा कप माझ्या हातात देत म्हणाले .अभयराव .. आजचा चहा तुम्हीच घेऊन जा .. मोकळेपणाने मनातले सांगून टाका , देव तुमचे भले करो...
धडधडत्या मनाने मी वरच्या खोलीत गेलो , त्यांना पाहिले " ते खिडकी बाहेर पहात होते.. , पण त्यांचे कान आणि लक्ष दरवाजाकडे होते ..जणू माझ्या येण्याची चाहूल कधी लागते याची वाट पाहत होते .का ते ? .असे असेल तर .घाबरण्याचे कारण नाही ..असे मी स्वतःला समजावले...


मी चहाचा कप हातात दिला आणि उभा राहिलो , समोरच्या खुर्चीवर बस .अशी खुण करीत त्यांनी चहा घायला सुरुवात केली ..
गोरा पान वर्ण , रूपरे केस , वयपरत्वे चेहऱ्यावर आलेला पोक्तपणा , तीक्ष्ण आणि करारी नजर ..दर्शनीरूप समोरच्यावर छाप टाकणारे आणि मनात भीतीयुक्त आदर निर्माण करणारे होते ,
गावात आणि पंचक्रोशीत धाक, दरारा आणि स्वभावाची चर्चा होणे मला तरी वावगे वाटले नाही .


जगनभाऊने तू खाली राहायला आला आहेस हे सांगितले आहे मला , अभय नाव ना रे तुझं ?
हो म्हणत - मी मान डोलावली .
डॉक्टरने काल मला सांगितले आणि विचारले .. माझ्या जुन्या मित्राला मी नाही म्हणू शकत नाही ..
म्हणून तुला वर येण्याची मी परवानगी दिलीय ,
.
मला एक वेळ कुणी विचारले नाही तर त्याचा राग येत नाही , पण ,कुणी स्वतः मला गृहीत धरून , यांना काय विचारायचे ?, काय सांगायचे ?
असे ठरवून मला मूर्ख ठरवत असेल तर.. मात्र ..अशा महामुर्खाला मी माझ्या समोर उभा सुद्धा करीत नाही मग तो कुणी असो ..अगदी माझ्या घरातील असला तरी मला काही फरक पडत नाही.
त्यांच्या मनातले नेमके शब्द मला ऐकायला मिळाले .. आणि त्या क्षणी ..जाणीव झाली .. "त्यांच्या मुलाने आपण काय काय ,कसे कसे करणार आहोत , हे सांगितले नव्हते ..मग, विचारण्याचा प्रश्नच नव्हता , त्यामुळे ..बाप-लेकात हा जन्मभराचा दुरावा आलाय ..हे नक्की .


ज्या काकांनी माझ्या कठीणकाळात मुलाप्रमाणे सांभाळले , आधार दिला , नोकरीला लावले ..आज त्याच काकांना ..त्यांच्या वडिलांचा गैरसमज दूर करण्यासाठी ,झालेल्या चुकीची माफी मागण्यासाठी इथ पर्यंत येणे शक्य नव्हते .. त्यांची शारीरिक असमर्थता , बौधिक परिस्थिती ..इतकी बिकट होऊन गेली होती की.. गेली अनेक वर्षे स्वास घेतात म्हणून ते जिवंत आहेत असे म्हणायचे . काकू तर बोलून चालून परक्या ..परक्या देशातल्या , इकडच्या कोणत्याच नात्याशी त्या जोडल्या गेल्याच नव्हत्या ...मग त्या काय व्यक्त होणार ?


काकांच्या या बाबांना सत्य काय आहे ते तरी कळावे ,त्यांचा गैरसमज जरी मला दूर करता आला तर..खूप आंतरिक समाधान मिळणार होते .
बाजूची खुर्ची ओढून घेत ..मी त्यांच्या पलंगाच्या जवळ जाऊन बसलो ..आणि ..काकांच्या बद्दल सांगण्यास सुरुवात केली ..


मी न थांबता सांगत असतांना त्यांच्या चेहेर्याकडे पाहत होतो .. दुरावलेल्या आणि इतक्या वर्षा पासून नजरेआड झालेल्या मुलाचे नाव ऐकायला मिळेल याची त्यांनी स्वप्नात ही कल्पना केली नसेल , मी सुरुवात केली , नाव ऐकताच ..ते मला थांबवत म्हणाले ..
उठ इथून अगोदर , खाली उतरून सरळ फाटकाच्या बाहेर निघून जायचे ..समान -बिमान जगन आणून देईन तुझे


,तू काय वकिली करायला आलास का रे इथे ? तुझ्या वकिलीचा काही परिणाम होणार नाही ..
चुका केल्या ..शिक्षा भोगावी लागणार ...
तुम्ही पोर .बापाला इतक कमी का लेखता रे ? बाप दुश्मन नसतो मुलाचा , तुम्ही शहाणे झाले याचा अर्थ ..बापाला विचारण्यात कमीपणा समजणे असे असते का ?
ठीक आहे एक वेळ .ते ही मान्य .. की भले-बुरे समजण्याची अक्कल आणि बुद्धे दोन्ही आहे.. पण ..
निदान ..बापाला , घरातील तुमच्या माणसांना सांगायला काय हरकत आहे , संमती नसते कधी कधी .पण..काही वेळ गेला की विरोध मावळू शकतो ...हा पण संयम नाही का रे तुमच्यात .


हे पहा अभय..पुढेचे ऐकण्याची माझी इच्छा नाही ..तू इथून जा ..
शांतपणे मी म्हणालो .. तुम्ही आतापर्यंत जे ऐकलय ..ते तर तुम्हाला माहीतचच आहे.. आता जे तुम्हाला बिलकुल माहिती नाहीये .. ते तर ऐकून घ्या ..मगच मी इथून जाईन..


हे ऐकून कसे काय की ..ते म्हणाले .. बर ठीक आहे ..ते पण सांगून टाक..पण लक्षात ठेव.. माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस .काही मिळणार नाही तुला इथले ..

मी मनात म्हटले ..आहो , मी काही नेण्यासाठी आलोच नाहीये , उलट तुम्हाला काही देण्यासाठी आलोय.


मी तपशीलवार सांगितले ..आणि माझ्या मनावरचे ओझे हलके झाल्याचे समाधान मला वाटून गेले ..
मी त्यांची प्रतिक्रिया ..काय येते याची उत्सुकतेने .वाट पाहू लागलो ..


मी सांगितलेले ऐकत असतांना ..त्यांनी डोळे मिटून घेतले होते ..आणि निर्विकार चेहेर्याने ते ऐकून घेत होते . मी माझे सांगणे संपवले ..तसे त्यांनी डोळे उघडून माझ्या कडे पाहिले
डोळ्यातून येणारे पाणी प्रयत्नपूर्वक थांबवत ते मला म्हणाले ..
बेटा .अभय ..तू खरोखरच एक पुण्य्कार्य केले आहेस .. माझ्या साठी आता एक काम कर , इथून तिकडे गेल्यावर भानावर नसलेल्या माझ्या मुलाला तू सांगितलेले कितपत कळेल कल्पना नाही याची मला ..पण , ज्या दिवशी
माझा मुलगा डोळे उघडून तुझ्या कडे पाहिलं ..त्या वेळी त्याला ..माझा हा हसरा फोटो दाखव.. तो समजेल ..त्याच्यावरचा माझा राग गेलाय...


त्यांनी दिलेला फोटो खिशात ठेवीत .मी उठलो .. त्यांना नमस्कार केला ..आणि खाली आलो .. जगनभाऊ माझी वाट पाहतखाली उभेच होते ..
त्यांचा हात हातात घेत म्हणालो ..भाऊ .. निघतो मी ..इथले सामान .मला काही उपयोगाचे नाही. राहू द्या इथेच ..


मी गेटच्या बाहेर उभा राहिलो ,अंगणात जगनभाऊ उभे होते .. त्यंना मी खुणावले .. बघा वर..तिकडे ..!
आम्हाला दिसले की -
कित्येक वर्षांनी ..वरच्या खोलीचे सगळे पडदे दूर झालेलं होते ..आणि ते स्वतहा खिडकीत उभे राहून बाहेरच्या जगाकडे ..पहात होते ....!.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कथा - वरची खोली
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
९८५०१७७३४२
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------