Mahabali Hanuman books and stories free download online pdf in Marathi

महाबली हनुमान

महाबली हनुमान

शक्‍ती, भक्‍ती, कला, चातुर्य आणि बुद्धीमत्ता यांनी श्रेष्ठ असूनही प्रभु रामचंद्रांच्या चरणी सदैव लीन रहाणार्‍या हनुमान जन्माचा इतिहास आणि त्याची काही गुणवैशिष्ट्ये या लेखातून आपण समजून घेणार आहोत.

राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ केला. तेव्हा यज्ञातून अग्निदेव प्रगट होऊन त्याने दशरथाच्या राण्यांसाठी पायस (खीर) प्रदान केला होता.

दशरथाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या हनुमानाच्या आईला अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच हनुमानाचा जन्म झाला होता.

त्या दिवशी चैत्रपौर्णिमा होती. तो दिवस ‘हनुमान जयंती’ म्हणून साजरा करतात.

जन्मतःच हनुमानाने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) हनुमान हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते.
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्त्वांत वायूतत्त्व हे तेजतत्त्वापेक्षा जास्त सूक्ष्म, म्हणजे जास्त शक्‍तीमान आहे.

सगळ्या देवतांमध्ये केवळ हनुमानाला वाईट शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत.
हनुमान उपासना या शक्तींना दूर ठेवू शकते .

लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते हनुमानाला काही करू शकले नाहीत. त्यांची शक्ती हनुमानापुढे निष्प्रभ होती .

म्हणूनच हनुमानाला ‘भुतांचा स्वामी’ म्हटले जाते. भुताने कोणाला पछाडले, तर त्या व्यक्‍तीला हनुमानाच्या देवळात नेतात व स्तोत्रे म्हणतात.

याने त्रास न गेल्यास पछाडलेल्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवून तो हनुमानाच्या देवळात नेऊन फोडतात. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते आणि तो नारळ देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी शक्‍ती हनुमानाच्या सामर्थ्याने नष्ट हो असा समज आहे

ते त्यानंतर तो नारळ विसर्जित करतात.

राम-रावण युद्धात ब्रह्मास्त्रामुळे राम, लक्ष्मण, सुग्रीव इत्यादी वीर निश्‍चेष्ट झाले असता जांबुवंत म्हणाला ,‘वानरश्रेष्ठ हनुमान जिवंत आहे ना ? हा वीर जिवंत असता सर्व सैन्याचा जरी वध झाला, तरी तो न झाल्यासारखाच आहे.
परंतु जर हनुमानाने प्राणत्याग केला, तर आम्ही जिवंत असूनही मृतप्राय आहोत.
रावणाबरोबर युद्ध करताना लक्ष्मण रावणाच्या बाणाने मूर्च्छित झाला त्यामुळे संपूर्ण सैन्यात घबराट पसरली .स्वतः श्रीराम सुद्धा आसवे गाळू लागले .त्यांना वाटले लक्ष्मणाचा मृत्यु झाला .
अशा वेळी स्वतः सावध राहून हनुमानाने सुषेण या वैद्याला बोलावले तेव्हा त्यांनी लवकरात लवकर जर संजीवनी बुटी चा लेप लावला तर लक्ष्मणाला बरे वाटेल असे सांगितले .
ही वनस्पती फक्त द्रोणागिरी पर्वतावर उपलब्ध होती जो लंके पासून शेकडो योजने दूर होता .
फक्त हनुमान आपल्या अंगी असलेल्या उड्डाण शक्तीमुळे थोडक्या वेळात तेथे जाऊ शकत होता .
हनुमानाने तातडीने जाऊन संजीवनी बुटी आणल्याने लक्ष्मणाचे प्राण वाचले

हनुमानाने जंबु-माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ इत्यादी बलाढ्य वीरांचा नाश केला.

त्याने रावणालाही मूर्च्छित केले.

समुद्रपार उड्डाण करण्यात हनुमान निष्णात होते .
रावणाने त्यांच्या शेपटीला लावलेल्या आगीसकट त्याने उड्डाण करून लंकादहन केले .
लंकादहनानेही त्याने रावणाच्या प्रजेचा रावणाच्या सामर्थ्यावरील विश्‍वास डळमळीत केला.
इत्यादी घटना या हनुमानाच्या शौर्याच्या प्रतीक आहेत.

दास्यभक्‍तीचे एक सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणून अद्याप मारुतीच्या रामभक्‍तीचेच उदाहरण देतात.

तो आपल्या रामप्रभूंकरता प्राण अर्पण करण्यासाठी सदैव तयार असे.

त्यांच्या सेवेपुढे त्याला शिवत्व आणि ब्रह्मत्व यांची इच्छाही कवडीमोल वाटत असे.

हनुमान म्हणजे सेवक आणि सैनिक यांचे मिश्रण !
हनुमान म्हणजे भक्‍ती आणि शक्‍ती यांचा संगम

रामाचा एकनिष्ठ सेवक होता तो .

युद्ध चालू असतांनाही हनुमान थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यानस्थ बसत असे; पण तेव्हासुद्धा तो सावध असे. त्याची शेपटी गदेवर असायची

‘व्याकरणसूत्रे, सूत्रवृत्ती, भाष्य, वार्तिक आणि संग्रह यांत हनुमानाची तुलना करणारा कोणी नव्हता.’ हनुमानाला ‘अकरावा व्याकरणकार’ मानतात.

हा मानसशास्त्रात निपुण आणि राजकारणपटू पण होता .

अनेक प्रसंगी सुग्रीवादी वानरच काय, पण रामानेही याचा सल्ला मानला आहे.

रावणाला सोडून आलेल्या बिभीषणाला आपल्या पक्षात घेऊ नये, असे इतर सेनानींचे मत असता मारुतीने ‘त्याला घ्यावे’, असे सांगितले आणि रामाने ते मान्य केले.याचा फायदा युद्धात रामचंद्रांना झाला .

लंकेत सीतेच्या प्रथम भेटीच्या वेळी तिच्या मनात स्वतःविषयी विश्‍वास निर्माण करणे, शत्रूपक्षाला नामोहरम करण्यासाठी लंकादहन करणे, स्वतःच्या (रामाच्या) आगमनाविषयी भरताला काय वाटते, ते पहाण्यासाठी रामाने त्यालाच पाठवणे, यावरून त्याची बुद्धीमत्ता आणि मानसशास्त्रातील निपुणता दिसून येते.

हनुमान जितेंद्रिय होते .

सीतेच्या शोधासाठी रावणाच्या अंतःपुरात गेलेल्या हनुमानाची मनःस्थिती ही त्याच्या उच्च चारित्र्याची निदर्शक आहे.

त्या वेळी तो स्वगत म्हणतो, ‘निःशंकपणे पडलेल्या या सर्व रावणस्त्रिया मी या अशा पाहिल्या खर्‍या; परंतु त्या पहाण्यामुळे माझ्या मनामध्ये विकार उत्पन्न झाला नाही.अनेक संतांनीही या जितेंद्रिय अशा हनुमानाची पूजा बांधून त्याचा आदर्श समाजापुढे ठेवला.

इंद्रियजित असल्यामुळेच हनुमान इंद्रजितालासुद्धा हरवू शकला.

हनुमान साहित्य, तत्त्वज्ञान आणि वक्‍तृत्वकला यांत प्रवीण सुद्धा प्रवीण होते .

रावणाच्या राजसभेतील हनुमानाचे भाषण हे वक्‍तृत्वकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

हनुमानाला संगीत-शास्त्राचा एक प्रमुख प्रवर्तक मानलेले आहे. यामागे त्याचा रुद्राशी असलेला संबंध साहाय्यभूत असावा.

त्याला रुद्राचा अवतार मानतात.

रुद्र हे शिवाचे एक रूप आहे.

हनुमान हा शिवाचा अवतार असला, तरी रामाच्या उपासनेने त्याच्यातील विष्णुतत्त्व जास्त झाले आहे. शिवाच्या डमरूतून नाद निर्माण झाला.

म्हणून शिवाला संगीताचा कर्ता समजतात.

हनुमानाच्या अंगच्या गायनी कलेमुळे समर्थ रामदासस्वामींनी त्याला ‘संगीतज्ञानमहंता’ असे संबोधले आहे.
असा हा बलशाली व सर्वगुण संपन्न असा हनुमान

जय श्री हनुमान

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED