Shree Raam navmi books and stories free download online pdf in Marathi

श्री राम नवमी

रामनवमी

म्हणजे रामाचा वाढदिवस
राम हे हिंदू धर्मीयांचे आदर्श अन्‌ लाडक दैवत.
जगकल्याणासाठी, धर्म रक्षणासाठी, दुष्टांच्या र्निदालनासाठी, भगवान महविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीराम अवतार हा त्यांचा सातवा अवतार.
राम नवमी’ आपल्यातील दिव्य आत्मप्रकाश प्रकटीप्रित्यर्थ साजरी केली जाते.
चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला 'रामनवमी ' म्हणतात.
वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव.
दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही भगवान् करून सोडले, तेव्हा या दुष्ट शक्तीच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते.

हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र.
ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, मुग्ध होतो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे राम.
या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.

अयोध्येमध्ये राजा दशरथ राज्य करीत होता.
त्याचं राज्य मोठं व सुखी होतं.
परंतु राजा मात्र दुःखी होता.
कौसल्या, सुमित्रा अन्‌ कैकयी ह्या त्याच्या राण्या होत्या .
त्यांना पुत्र संतान नव्हते. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते.
म्हणून राजा दशरथाने वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार व धर्मनिष्ठ राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुत्र संतान व्हावे म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ केला.
या यज्ञामुळे देव प्रसन्न झाले व 'ईच्छा लवकर पुरी होईल' असा आशीर्वादही दिला.
यज्ञदेवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले. त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळे दिली.
तो प्रसाद भक्षण केल्यावर तीनही राण्यांना पुढे उचित वेळी चार पुत्र झाले. त्या राजपुत्रांची नावे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी ठेवली.
कौसल्या राणीचा मुलगा म्हणजे राम.
श्रीराम ह्यांचा अवतार झाला तो त्रेता युगांत.
श्रीराम हे श्रीरामायण ह्या ग्रंथाचे नायक, एक आदर्श पुत्र-पति-बंधू, स्वामी, धर्मरक्षक आणि कर्तव्यदक्ष, प्रजा पालक.
श्रीराम हे पितृवचन पालक, मातृभक्त, एकवचनी आणि आदर्श असं व्यक्तिमत्व होय.

मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाचे जीवन, त्यांची कर्तव्य निष्ठा, संयम, शौर्य, औदार्य हे सारं सारंच कसं अगदी वंदनीय आणि आचरणीय.

ह्या आदर्श देवाताराची आपल्याला सदैव आठवण रहावी तो आदर्श आणि ते गुण आपण काही अंशी तरी आपल्यात उतरावेत म्हणून हे रामजन्माचे निमित्य.
श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरुंच्या यज्ञांचे, धर्माचे संरक्षण केले.
दुष्ट राक्षसांचा संहार केला.
अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं.

मोठेपणी रामाला वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षणासाठी ठेवले.

शिक्षणात बारा वर्षे गेली.

राम हा सत्यवचनी व आज्ञाधारक होता.

लढाईत अचूक बाण मारीत असे म्हणून 'राम-बाण ' म्हणजे लक्षभेद असा संकेत ठरला आहे.

कित्येक राक्षसांना त्याने ठार मारले होते व चित्रकुट पर्वता वरील अनेक ऋषींचे राक्षसापासून रक्षण केले होते .

जनक राजाची कन्या जानकी हिच्या विवाहासाठी जनकाने शिव धनुष्य पेलण्याचा पण ठेवला होता .

रामाने तेथे जाऊन सहज ते धनुष्य पेलले व त्याचे दोन तुकडे केले .

यानंतर जानकी जिचे दुसरे नाव सीता होते तिने रामाच्या गळ्यात वरमाला घातली .

राम सीतेचा मोठा विवाह थाटामाटात पार पडला .
श्रीराम हे अयोध्येचे राजपद भुषवणार म्हणून सारी प्रजा आनंदांत असतानाच मातृ-पितृ आज्ञेचं पालन करीत त्यांनी चौदा वर्षाचा वनवास स्वीकारला. सीता हरणाच्या निमित्त्याने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना ह्यांचा वध केला.
कैकयीला दिलेले वचन दशरथ राजाने पाळले व आपल्या माता पित्यांना दिलेले वचन रामाने पाळले म्हणून
रघुकुल रीत सदा चली आये
प्राण जाये पर वचन न जाये असे म्हणतात .

रामाने अनेक वर्षे उत्तम राज्यकारभार केला.

प्रजेला अतिशय सुखात ठेवलं.

आजही आदर्श राज्य म्हणजे रामराज्य हि वस्तुस्थिती आजच्या लोकशाहीतही मानली जाते.

आपल्या स्वातंत्र्य-लढ्याचे बाबतीतसुद्धा गांधीजींनी रामराज्याचा आदर्श सर्वांच्या नजरेसमोर ठेवला होता.

महर्षी वाल्मिकींनी आपल्या रामायणामध्ये रामराज्य कसे होते, याचे वर्णन केले आहे.

रामराज्याचा काळात कुठल्याही स्त्रीला विधवापणाचे दुःख नव्हते.

प्रजेला सर्प किंवा व्याधीचे भय नव्हते.

चोर किंवा चोरी यांची नवनिशाणी नव्हती.

कुठल्याही प्रकारचा अनर्थ ऐकू येत नव्हता.

या काळात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नव्हती. सर्वजण रोग,शोकापासून मुक्त होते.

वास्तवामध्ये हे राज्य लोककल्याण नजरेसमोर ठेवूनच चालत होते.

रामाने दुसऱ्याला दिलेले वाचन पाळण्यासाठी अनंत हालअपेष्टा सहन केल्या.

दुष्टांवर वाचक बसविणे व सजनांना अभय देणे, हे त्याचे जीवितकार्य होते.

राम एकबाणी, एकवचनी व एकपत्नी होता, म्हणूनच रामचंद्राला ' मर्यादापुरुषोत्तम ' म्हटले आहे.

श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, बंधू, शिष्य, पिता व आदर्श राजा होते.

राम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवासमान मानू लागले.

रामाची देवळे बांधली गेली .

रामाच्या गोष्टी ऐकून त्या नेहमी कृतीत आणाव्यात. मुलांना संध्याकाळी रामरक्षा स्तोत्र म्हणावयास घराची मंडळी सांगतात.

या पृथ्वीवर रामासारखा राजा झाला नाही आणि होणार नाही. श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्याबद्दल इतके प्रसिद्ध होते कि, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना ' रामः शास्त्रामृतामहम् ' अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे.

राम जन्माच्या दिवशी मठ-मंदिरात भजन, पूजन, किर्तन, प्रवचन इ. कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळांत रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन इ. कार्यक्रम ही केले जातात.
मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी बारा वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव केला जातो. सुंठवडा वाटला जातो.

श्रीराम जन्माला आले ती वेळ माध्यान्हीची होती. नक्षत्र पुनर्वसू होते.



नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते.
माध्यान्हकाळी कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात व भक्‍तमंडळी त्यावर गुलाल व फुले उधळतात.
काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात.
याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.
त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात व प्रसाद म्हणून सुंठवडा देतात.
काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

साऱ्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो. अयोध्येत तो मोठ्या प्रमाणात होतो.
राम वनवासात असताना पंचवटीत राहत होते म्हणून पंचवटीत उत्सव मोठा होतो.
या दिवशी श्रीरामाचे व्रतही करतात.
हे व्रत केल्याने सर्व व्रते केल्याचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्‍ती होते, असे सांगितले आहे.
राम कथा व रामायण याला काही अध्यात्मिक बाजु पण आहेत .

ज्या रामकथेतील नावांपासून सुरु होतात .

रामाची माता कौसल्या म्हणजे कौशल्य

पिता दशरथ चा अर्थ ज्याच्याकडे दहा रथ आहेत असा .

हे रथ दर्शवतात की आपल्या शरीराला दहा अंग आहेत,

पंच ज्ञानेंद्रिय आणि (दोन हात,दोन पाय,जननेन्द्रिय(उत्सर्जन इंद्रिये) आणि तोंड अशी) पंच कर्मेंद्रिये.

दशरथाला आणखी दोन राण्या होत्या सुमित्रा आणि कैकयी

सुमित्रा म्हणजे जी सदैव सर्वांसोबत मैत्रीभाव ठेवते.

कैकयी म्हणजे जी सदैव सर्वाना निस्वार्थपणे देत रहाते.

राम म्हणजे अंतःप्रकाश,

लक्ष्मण ( भगवान रामाचा लहान भाऊ ) म्हणजे सजगता.

शत्रुघ्न म्हणजे अजातशत्रू

आणि ज्याला कसलाही विरोध नाही.भरत म्हणजे योग्य,प्रतिभावान.
जेंव्हा आपल्या मन(सीता)चे अहंकार(रावण) द्वारा अपहरण होते,तेंव्हा आत्म प्रकाश आणि सजगता(लक्ष्मण) यांच्या माध्यमातून भगवानांनी हनुमान(प्राण शक्तीचे प्रतिक)च्या खांद्यावर आरूढ होऊन त्याला स्वगृही परत आणले जाऊ शकते.

हे रामायण आपल्या शरीरात सतत घडत असते.

श्री राम जयराम जय जय राम

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED