नवा आरंभ Arun V Deshpande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवा आरंभ

कथा -
नवा-आरंभ
ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.
---------------------------------------------------------------------------
मित्रांनो -

दरवर्षी डिसेंबर महिना सुरु झाला की ..आपणास चालू असलेले वर्ष सरत येते हे जाणवू लागते आणि ,आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन-वर्षाची चाहूल लागते

.आपल्याकडे लगेच एक गोष्ट सुरु होते
ती म्हणजे .आगामी नव-वर्षात आपण काय काय करायचे ? .हे पक्के ठरवणे ,यालाच एखाद्या गोष्टीसाठीचा संकल्प करणे "असे म्हणतात..
डिसेंबर महिना म्हणजे अशा संकल्प- योजनेचा हंगामच असतो. आपल्या ओळखीचे अनेक मित्र- मैत्रिणी, नातेवाईक यातले रोज कुणी न कुणी "आपण काय करणार "
याचा संकल्प जाहीर करीत असतात .

या संकल्पांची एक गोष्ट मोठी गंमतशीर आहे बघा ती म्हणजे -
१.टीव्ही कमी पहाणे , २.सिरीयल पहायच्या नाही असे पक्के ठरवणे ,३. मोबाईलवर कमी वेळ राहुत ४.मोबाईलवरचे गेम खेळणे कमी करू .
५.रात्री जागरण करायचे नाही, ६. सकाळी लवकर उठून फिरायला जायचे नक्की .

७. चहा कमी घेणे ,८, शाळेसाठी जातांना मुलांनी स्वतहा तयार होणे , ९.आपला होमवर्क
वेळेवर करणे १०. पुस्तके वाचन करणे ..११. सांगितलेले ऐकणे ..वगेरे वगेरे ..
हे सगळे संकल्प मोठ्या माणसांनी आणि मुलांनी दोघांनी करावेत असेच कॉमन आहेत .

आता आपला हा मित्र - अजय असे त्याचे नाव आहे , तो देखील संकल्प करण्यात पटाईत आहे
पण यात , दरवेळी होता काय की , जानेवारी महिना सुरु होतो ,त्याच बरोबर अजयचा संकल्प देखील सुरु होतो .

.
सकाळी लवकर उठून .अभ्यास करणे , शाळेला वेळेत तयार होणे ..त्याचे हे संकल्प ..केवळ "अंथरुणात लोळत रहाणे ,गुडूप झोपी जाणे "
या आवडत्या सवयीमुळे बिचार्या अजयला संकल्प पूर्ण करण्यात इतके अडथळे येतात की, पहिल्या महिन्याच्या शेवटी शेवटी .अगदी नाईलाजाने .त्याने
सुरु केलेला संकल्प .त्याला मध्येच सोडून द्यावा लागतो , अजय तरी काय करणार ना ? नाईलाजच होतो त्याचा .
एक गोष्ट त्यातल्या त्यात बरी म्हणायची . की- आपला दोस्त अजय..संकल्प अगदी सोपा करीत असतो , फक्त त्याप्रमाणे प्रत्यक्ष्य कृती करणे ",
त्याच्यासाठी कठीण असते ", , मग काय, नव्याचे नऊ दिवस ",या प्रमाणे , अजयला केलेला संकल्प आणि त्याची कल्पना दोन्हीना सोडून द्यावे लागते .

या चालू वर्षात मात्र असे काही होणार नाही..याची अजयला खूप मोठी आशा आहे. आणि घरातील सगळ्यांना खात्री आहे. याचे कारण म्हणजे ..
अजयला त्याच्या संकल्प-पूर्तीसाठी त्याचे आवडते आबा .स्वतहा त्याला मदत करणार आहेत. दोघात तसे अगदी पक्के ठरलेच आहे .
अजयच्या आई-बाबांना ,दीदीला सुद्धा आता संकल्प-पूर्तीसाठी अजयच्या मागे-मागे रोज आठवणीचा भुंगा लावण्याची गरज उरणार नव्हती ..


घरात आई, बाबा , दीदी आणि सध्या आलेले आज्जी आणि आबा हे सगळे सतत काही-न -काही कामात
असतात ,आणि आईच्या कामाच्या वेळी ..तिला दीदी मदत करते , आज्जी तर सगळ्यात पुढे असते.. आबा आलेत म्हणून बाबा पण त्यांच्यासाठी तयार असतात .
या सगळ्या सोबत आपला दोस्त..अजय..तो मात्र मदत करणे " या उपक्रमात सहसा नसतो ..
आणि कितीदा सांगितले तरी तो सोयीने दुर्लक्ष करतो ,म्हणून मग
त्याला काही काम सांगण्याच्या फंदात कुणी पडत नाही " ,आपण आपले काम केलेले बरे , कारण अजयला काही सांगा.. तर "काम कसे टाळायचे ..यासाठी
त्याच्या जवळ कारणे रेडी असतात ,ती ऐकूनच .त्याला काम न सांगितलेले बरे " असे सगळ्यांना वाटत असे.

अजयचे असे वागणे आबांच्या नजरेतून कसे सुटणार ? त्यांना तर सगळेच सारखे ..त्यांनी ठरवले .या आयतोबा -अजयला "शिकवणे आवश्यक आहे .
आतापर्यंत जे झाले ते झाले , अजयचे वागणे चुकीचे आहे " हे त्याला पटवून देणे आपल्या सारख्या मोठ्या माणसांनी केले पाहिजे ,चुकीची दुरुस्ती "करण्याची
मनापासूनची तयारी असणे ", ही सुध्या एका नव्या बदलाची छान सुरुवात असणार आहे . अजय नक्की बदलेल ,आपण मोठ्या माणसांनी नेहमीच मुलांना
पुन्हा पुन्हा संधी दिली तर, मुलांच्या वागण्यात बदल नक्की घडवता येऊ शकतो.

त्या दिवशी .आबा आणि अजय सोसायटीच्या बागेत गेले . बेंचवर अजयला आपल्या शेजारी बसवत आबा म्हणाले ..अजयबाबू , आता नवे वर्ष सुरु होणार ,
सगळे लहान -मोठे काही न काही छान संकल्प करणार ..मला वाटते तू पण एक छान संकल्प करून पहावा ..त्यासाठी मी तुझ्या सोबत आहे.

होय आबा ..मग तर मी संकल्प करणार ..
सकाळी लवकर उठण्याचा , तुमच्यासोबत सकाळी मी पण येणार फिरायला ,मग वेळेवर तयार होणे ,
मुळीच कठीण नाही जाणार मला , हो ना आबा ?

अगदी बरोबर -- ठरवलेच आहे तू तर ,हे जरूर कर अजय, पण, आणखी एक छोटासा संकल्प तू करणार आहेस , प्रोमीस कर मला ..तू हे मनापासून करशील..
हो आबा ..तुम्ही माझ्या सोबत आहात ना ? मग मी प्रोमिस करतो की..तुम्ही जे सांगाल ..मी तसे करीन ..पक्का प्रोमीस.अजयने आबांना काबुल केले .

हे बघ,बेटा ,अगदी सोप्पा काम आहे ..आपण आपल्या घरातील माणसांना ..ते करीत असलेल्या कामात ..आपणहून जमेल तशी,जमेल तितकी मदत करावी ,
त्याने कामाचा भार हलका होतो , वेळेवर मदत करणे " हे सुद्धा खूप मोलाचे काम असते अजय बाळा.
आपल्या आबांच्या सांगण्यावरून अजयने अगदी सोपा संकल्प केला..तो म्हणजे .सगळ्यांना जमेल तशी मदत करायची .
कित्ती सोपा आणि साधा संकल्प ..दिसेल त्याला योग्य ती मदत , न सांगता करायची असा हा संकल्प अजयने आणि आबांनी मिळून केला

आबा ..आले लक्षात माझ्या , मी आता जे वागतो ते चुकीचे आहे" हे जाणवते कधी कधी , पण, स्वभाव .नडतो ..पण यापुढे असे नाही होणार ,मी हळू हळू नक्की
बदलून दाखवील , तुम्ही विस्वास ठेवा माझ्यावर . अजय अगदी खरेपणाने आणि मनापासून बोलतो आहे ..याची आबांना खात्री वाटत होती.
अजय, मला खात्री आहे ..तू तुझ्या सगळ्या संकल्प-पूर्तीसाठी प्रयत्न करणार आहेस. त्यासाठी ..आम्ही सर्व तुझ्या सोबत आहोतच.

आबा ..मी काय संकल्प केलेत ,ते कुणाला बिलकुल सांगू नका , मी कृतीतून दाखवेल माझ्यातील बदल , तेव्न्हा सगळ्यांना होणारा आनंद मला पाहुद्या प्लीज.

अजयचे हे बोलणे ऐकून आबांना खूप आनंद झाला . ते म्हणाले .अजय, हे आपल्या दोघातले सिक्रेट असेल.तू तुझ्या संकल्पांना सुरुवात कर, तू आणि मी
मिळून एक "नवा -आरंभ करू या ...!
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रेरक कथा - नवा आरंभ .
ले - अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------