Serial Killer - 4 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 4

4
फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही खून करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता . ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत होती ती म्हणजे दोन्ही होऊन एकाच व्यक्तीने केले होते किंवा दोघांनी मिळून दोन्ही खून केले असतील . दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच प्रकारचे एकाच पद्धतीने असे खून करणे कधीच शक्य नव्हते . त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली ती म्हणजे पत्रकार व निखिल दोघांचा खून करणाऱ्या व्यक्ती शक्यतो एकच असावी . पण ह्या गोष्टीमुळे तर आमच्या पुढचा प्रश्न अधिकच गहन झाला , जर पत्रकार लोखंडेचा व निखिल कांबळेचा खून एकाच व्यक्तीने केला असेल तर तिने या दोघांची निवड नक्की कशी केली..? एक गोष्ट मात्र नक्की होती हे दोघेही बलात्कार करणारे पुरुष होते . ही गोष्ट त्यांच्या मध्ये समान होती . पण या दोघांनी बद्दलची ही माहिती खून करणाऱ्याला कशी मिळाली...? निखिल बद्दलची माहिती एखादा सहज मिळवू शकत होता . तो कॉलेजचा विद्यार्थी होता . त्याच्या मोबाईल मध्ये त्याने स्वातीचा व्हिडिओ काढलेला होता , आणि एखाद दुसऱ्या वेळेस त्याच्या मित्रांकडून ती माहिती पसरत गेली असावी पण पत्रकार लोखंडेच्या बाबतीत ही गोष्ट शक्‍य नव्हती . तो पत्रकार होता .त्याच्याकडे व्हिडीओ काढलेले होते . पण तो इतक्या सहजासहजी लोकांच्या हाती लागणाऱ्या व सापडणाऱ्यातला नव्हता . त्याबद्दलची माहिती खून करणाऱ्या व्यक्तीला कशी कळली...?

त्यावेळी पाटील साहेबांनी डोकं चालावायला सुरुवात केली . तसे त्यांच्या डोक्यामध्ये आयडियाचे पिक पटापट यायचं , पण यावेळी मलाही एक आयडिया सुचली होती . दोघांचा खुनी एक आहे ही शक्यता गृहीत धरली तर असाच व्यक्ती असू शकतो ज्या व्यक्तीला या दोघांनीही केलेल्या बलात्काराच्या गुन्ह्याबद्दल माहिती आहे . मग असा व्यक्ती शोधायचं असेल तर या दोघांच्या व त्यांनी त्यांच्यावर अत्याचार केले त्यांच्या आयुष्यात बारकाईने लक्ष द्यावे लागणार होतं ....? मी त्यादिवशी बराच वेळ डोकं चालवत होतो . इकडून तिकडून येणाऱ्या लिंका जुळवत होतो . दोन खुनांमधील संबंध पकडत होतो . शेवटी मला उत्तर सापडलं . स्वातीच्या म्हणण्यानुसार त्याच्यावरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल स्वाती व निखिल वगळता फक्त आणि फक्त तिची एक मैत्रीण सुवर्णालाच माहीत होतं . माणिकराव लोखंडे , आमदार सदाशिवराव ढोले , वकील रमाकांत शिंदे आणि तलाठी बाबुराव माने यांनी ज्या मुलीवर ती बलात्कार केला होता त्या मुलीचा भाऊ हा स्वातीच्या कॉलेजमध्ये होता . आधी चौकशी केल्यावरती मला समजले की सुवर्ण व आत्महत्या केलेल्या पीडित मुलीचा भाऊ संकेत दोघे जवळचे मित्र होते . जर स्वातीने सुवर्णाला सुवर्णाने संकेतला सांगितले असेल तर संकेत निखिलचा खून करू शकतो पण संकेतला पत्रकार माणिकराव लोखंडे त्यांचा तो पेन ड्राईव्ह याबाबत माहिती कशी कळली...? हा प्रश्न होताच . संकेतला पोलीस स्टेशनवर बोलवण्यासाठी मी पाटील साहेबांकडे गेलो व त्यांना मी केलेला तपास सांगितला...
संकेतला पोलीस स्टेशनवर वरती आणले गेले . पाटील साहेबांनी मलाच त्याला प्रश्न विचारायला व तपास करायला लावला . पत्रकारांना इतका वेळ पत्रकारांना टाळत असलेल्या पाटील साहेबांना पत्रकारांना उत्तर देणे भाग होते . फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर थोडाफार तपास लागल्यानंतर त्यांनी पत्रकारांना समोर जायचे ठरवले होते . ते पत्रकारांसोबत बोलण्याकरता निघून गेले . मी संकेतला बोलायला सुरुवात केली पण त्याच्या बोलण्यातून अजिबातच पश्चातापाची धून ऐकू येत नव्हती . मी हर प्रकारे प्रश्न विचारले पण त्याची उत्तरे एकच होती . एक तर त्याने याची तयारी केली असावी किंवा तो खरं बोलत असावा . माणिकराव लोखंडे यांचा मृतदेह 8 जुलैला सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये सापडला , आणि त्यांचा खून सात जुलैला रात्री केव्हातरी झाला असावा . पोस्टमार्टम रिपोर्टनुसार रात्री बाराच्या आसपास त्यांचा खून झाला असावा . तीच गोष्ट निखिलच्या बाबतीतही लागू पडत होती . निखिलचा खून पहाटे चार ते साडेचार झाला असावा . या दोन्ही वेळेस संकेत त्याच्या रूमवरती एकटाच होता . त्याच्यासोबत दुसरे कोणी नव्हते पण आमच्याकडे ठोस असा पुरावा नव्हता तर संकेतने भरपूर नियोजन आणि प्लॅनिंग करून हे खून केल्या असावेत किंवा त्याला याबाबतीत काहीच माहीत नसावं पण पुराव्याअभावी आम्हाला त्याला काहीच करता येऊ शकत नव्हतं . शेवटी त्याला सोडून द्यायचं ठरवलं पण त्याच्यावरची 24 तास लक्ष ठेवण्याचं ठरविण्यात आले .

इकडे पत्रकार माणिकराव लोखंडे यांच्या मृतदेहा बरोबर सापडलेल्या पेन ड्राइव मधील पुराव्यावरून आमदार सदाशिवराव ढोले वकील रमाकांत शिंदे व गाव कामगार तलाठी बाबुराव माने यांच्या वरती कोर्टामध्ये केस दाखल करण्यात आली होती . त्यांच्या वतीने ही चांगल्यातला चांगला वकील सादर केला गेला होता . त्या व्हिडिओमध्ये सगळ्या दिसत होतं की ते तिघे जण एकाच मुली सोबत असले चाळे करत होते ती मुलगी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती पण तरीही वकिलांनी केलेली युक्ती वादामुळे कोर्टाचा खटला पुढच्या पुढे चालू राहणार होता . त्यांना शिक्षा होईल अजून किती वर्षे जावे लागणार होती हे डोळ्यावरची पट्टी बांधलेल्या न्याय व्यवस्थेलाच माहित . एवढा ठोस पुरावा असूनही न्यायव्यवस्थेला त्या बलात्कार करणाऱ्या लोकांना शिक्षा ताबडतोब व लगेच शिक्षा करणे शक्य नव्हते . आणि शिक्षा झाली तरीही आरोपी लगेच वरील कोर्टामध्ये धाव घेतात । आणि शेवटच्या कोर्टातून निकाल लागेपर्यंत एक तर पीडित व्यक्ती मृत झालेला असतो किंवा त्याच्यावरती दबाव आणून त्याला केस मागे घ्यायला लावतात , किंवा तोच शेवटी लढायचं सोडून देऊन आपली तलवार म्यान करून घेतो. हे सगळं टाळण्यासाठी जो कोणी होता त्याने त्या पत्रकाराचा व निखिलचा स्वतः निवडा केला होता . मला संकेतवरती अजूनही पूर्णपणे संशय होता . पण पत्रकाराचा खून आणि तो पेन ड्रायव्ह संकेतने कसा मिळवला असावा हा प्रश्न मला अजूनही सुटत नव्हता...

आठ तारखेला पहिला खून झाला , दहा तारखेला दुसरा आणि बारा तारखेला तिसरा खून झाला ... या वेळी आमच्याकडे संशयित आरोपी होता . आम्ही संकेत वरती 24 तास नजर ठेवून होतो . संकेतने कोणतीही हालचाल केली नव्हती पण 12 तारखेला व्हायचा तो खून झाला होता . एका बस ड्रायवरचा त्याच पद्धतीने खून झाला होता . त्याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी सापडला होता . तो एकटाच राहायचा . त्याने खोली भाड्याने घेतली होती . हा खूनही इतर दोन खुणाप्रमाणेच झाला होता . कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि त्याच्याच तोंडामध्ये त्यातच कापलेले लिंग ... मागील चार ते पाच दिवसात हा तिसरा खून होता तीन एकूण एकाच प्रकारे झाले होते पहिल्या दोन लोकांनी बलात्कार केल्याचे पुरावे खून करणाऱ्या व्यक्तीने सोबतच सोडले होते . ज्या ठिकाणी स्कूल बस ड्रायव्हरचा खून झाला होता एक पेन ड्राइव्ह होता . त्या ड्राईव्ह मध्ये नक्कीच त्याने केलेल्या बलात्काराचे व्हिडिओ असणार यात शंका नव्हती ड्रायव्हरचे नाव चंद्रराव गोडबोले होतं . वयाची तिशी उलटलेला असा हा चंद्रराव, आजूबाजूला चौकशी केली असता त्याच्या बद्दल समाजात खूप चांगलं मत होतं . पण ते मत फक्त पेन ड्राइव मधील व्हिडिओ बघण्या आधीच होतं . चंद्रराव हा बलात्कार करणारा होता पण हा सगळ्यातच कहर करणारा ठरला . त्याने स्वतः केलेल्या कृतीची व्हिडिओ काढले होते . त्यांनी केलेल्या कृती ह्या साक्षात कलियुगाला ही भीती घालत अशा होत्या ... लहान मुलांवर ती त्याने अत्याचार केले होते . आज काल लोक इतके वासनांध झाली आहेत की त्यांना लिंगा दिसत नाही वही कळत नाही ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी वासनेची भूक भागवायला बघतात . असाच हा वासनेचा भुकेला होता चंद्रराव... तिसऱ्या खुनानंतर मात्र नक्की झालं जो कोणी होता तो बलात्कार करणाऱ्यांवर तीच डोळा ठेवून होता आणि वेळ मिळताच शिकार करत होता... माझा संकेत्वर चा संशय चुकीचा ठरला संकेत घरातून बाहेरच निघाला नव्हता संख्येचा या खुनाशी काही संबंध नव्हता मग हे सारे खून कोणी केले असावे निखिल व स्वाती बद्दल त्याच्या काही मित्रांना माहित होतं काही पाहण्यासाठी त्या मित्रांना बोलावून घेऊन चौकशी करण्याचे ठरवले पण त्यातूनही काही निष्पन्न झालं नाही.... माझा आता डोकं चालेनासं झालं होतं , त्या रात्री दमून मी घरी गेलो , जेवत असताना मी टीव्ही लावली होती . त्यावेळी पाटील साहेबांचा पत्रकारांना दिलेलं स्टेटमेंट दाखवला जात होतं....
" तीन झालेल्या खुनानंतर एक गोष्ट स्पष्ट झालेले आहे . जो कोनी खून करणारा व्यक्ती आहे त्याच्या रडारवरती बलात्कार करणारे व अत्याचार करणारे लोक आहेत . आतापर्यंत सापडलेली तिन्ही मृतदेह हे पुराव्यासोबत सापडलेले आहेत . पहिला मृतदेह लोखंडे यांचा व त्यांच्यासोबत त्यांनी केलेल्या बलात्काराचा पुरावा सापडलेला आहे . दुसरा मृतदेह निखिल कांबळे याचा होता . त्याने एका तरुणीला ब्लॅकमेलच्या धमक्या देऊन महिनाभरासाठी अत्याचार केले होते . तिसरा मृतदेह स्कूल बस ड्रायव्हर चंद्रराव गोडबोले याचा आहे . त्याच्यासोबत आहे एक पेन ड्राईव्ह सापडलेला आहे त्यामध्ये चंद्रराव गोडबोलेंनी लहान मुलांवर ती केलेल्या लैंगिक शोषणाची व्हिडिओ आहेत . आमच्या तपासात बऱ्यापैकी प्रगती झालेली आहे . या तिघांना जोडणारा एक कॉमन पॉईंट आहे , जो आम्हाला खून करणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहोचवेल... "
अकाउंट बद्दल विचार करतेस मी त्या रात्री झोपी गेलो
क्रमःश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED