Serial Killer - 6 Shubham S Rokade द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Serial Killer - 6

6

13 तारखेला संध्याकाळी अजून तीन खून झाले . गाव कामगार तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे आणि चक्क आमदार सदाशिवराव ढोले यांचाही . हे तिघेही एकाच ठिकाणी होते . तिघांच्याही बॉडी एकाच ठिकाणी आढळल्या . त्याच्या केस संदर्भात काहीतरी चर्चा करण्यासाठी आमदार सदाशिवराव ढोले यांनी त्यांच्या स्पेशल फार्महाऊसवर त्या दोघांना बोलवलं होतं . त्याच वेळी त्या सिरीयल किलरने त्याचा डाव साधला . तिघांनाही उघड करण्यात आलं होतं . तिघांची लिंग कापून त्यांच्या तोंडात टाकली होती , आणि तिघांच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट असं लिहिलं होतं . साधारणपणे आमदार साहेबांबरोबर त्यांचा ड्रायव्हर असतोच . पण त्यादिवशी फक्त ते तिघेच होते . ड्रायव्हरला त्यांनी घरी पाठवलं होतं . फार्महाऊसवर च्या गड्यालाही त्यांनी घरी पाठवून दिलं होतं . त्यामुळे त्या सिरीयल किलरला चांगलाच मौका सापडला होता . नंतर त्याला फोन करून बोलावून घेतलं होतं आणि जेव्हा तो फार्महाउस वरती आला त्यावेळी त्याला हे मृतदेह सापडले .पाटील साहेबांना ताबडतोब बोलावून घेण्यात आले . पंचनामा झाल्यानंतर बॉडी पाठवल्या गेल्या आणि चौकशीसाठी तिघांच्याही परिवाराला बोलून घेण्यात आलं . पाटील साहेब ऑफिशियली कामावरती युनिफॉर्म वरतीच असायचे मी तर त्यांना अजून एकदाही विदाऊट युनिफॉर्म पाहिले नव्हते , त्यामुळे फॉर्मल कपड्यात पाहून कोणी वेगळाच माणूस आल्यासारखे वाटलं . तिनीही परिवारांच्या घरी हे तिघेही कुठे गेले आहेत याची कल्पना नव्हती . काहीतरी काम आहेत असे सांगून तिघेही घरातून बाहेर पडले होते . कुठे जातोय हे तिघांनीही सांगितलं नव्हतं . त्यांच्या घरच्यांकडून अजून काही माहिती मिळते का हे आम्ही तपासून पाहिलं . त्यांनाही काही माहिती नव्हती . जे काही आम्हाला माहीत होतं त्यामुळे थोडेफार एक-दोन तपशील अधिक मिळाले फारसं काही नाही . शेवटी ज्या ड्रायव्हरला मृतदेह सापडले होते, त्याची चौकशी करताना काही इंटरेस्टिंग गोष्टी समजल्या . त्याने सांगितले की आमदार साहेब असं अधून-मधून फार्म हाऊस वरती वैयक्तिक पार्टी ठेवायचे . फार्महाऊसवरील गडी आणि ड्रायव्हर लोक सगळ्यांना ते माघारी पाठवून द्यायचे . ज्या काही लोकांना त्यांनी बोलावलेले असायचं , फक्त तेच तेवढे फॉर्महाउस वरती राहायचे . इतर लोकांना दुसऱ्या दिवशी सकाळीच आत प्रवेश मिळायचा . शक्यतो ते रात्री-अपरात्री कोणालाही बोलवायचे नाहीत . पण त्या दिवशी मात्र आमदार साहेबांचा फोन आला होता दारूच्या नशेत त्यांनी फोन केला असावा असं त्या ड्रायव्हरचे म्हणणं होतं त्यांनी नसेल त्याला बोलावलं होतं येताना बरोबर विशिष्ट प्रकारची दारूही आणायला सांगितली होती...

पण यातून सिद्ध काय होतं हे मला कळत नव्हतं . एखाद्यावेळेस फार्महाउसमधील दारु संपली असेल म्हणून आमदार साहेबांनी ड्रायव्हरला माघारी बोलावले असेल . पण त्यात विशेष असं काही नव्हतं. मी काढलेली theory पाटील साहेबांना सांगण्यासाठी उत्सुक होतो . साधना परांजपे वरती पत्रकार माणिकराव लोखंडे व आमदार सदाशिवराव ढोले यांनी बलात्कार केलेला होता . आणि मागच्या महिन्याभरापासून ती गायब होती . तिच्याच कॉलेजमधील एका विद्यार्थ्याचा व शिपयाचाही खून झाला होता . ती या प्रकरणात समाविष्ट असू शकते असे मी पाटील साहेब समोर मांडलं . माझ या अनुमानाने पाटील साहेबांच्या चेहऱ्यावरचे असलेले बसलं त्यांना बहुदा माझ्याकडून आशा खून तपासाची अपेक्षा नसावी .

स्टेशन वरती पोहोचेपर्यंत पत्रकारांची फौज आमच्या स्वागताला जमात होती . आतापर्यंत पाच दिवसात सहा खून झाले होते . आणि आज तर उच्चांकच गाठला होता एकाच दिवशी तीन खून झाले होते . त्यातील एक वकील होता दुसरा गाव कामगार तलाठी तिसरा तर महाराष्ट्रातील विधानसभेचा आमदारच . त्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा काय असा प्रश्न विचारला जात होता . पहिला खून झाला होता तो पत्रकाराचा आणि आज झालेल्या तीघांमध्ये एक वकील होता तर एक प्रशासकीय अधिकारी आणि एक विधी मंडळातील सदस्य . असे चौघे मिळून लोकशाहीच्या चारही स्तंभ होते . आणि अशा चार थांब आता जर खून होऊ शकत असेल तर सामान्य जनतेने काय करावे खरा प्रश्न होता . या ठिकाणी अजूनही लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे या लोकशाहीच्या चारही स्तंभातील सदस्य हे गुन्हेगार होते आणि तेही बलात्कारासारख्या मोठ्या गुन्ह्याचे . ज्या लोकशाहीला लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेला आहे त्याचा लोकशाहीतील चार स्तंभ जर एकत्र येऊन लोकांवर अत्याचार करू लागले , तर काय करायचं...? आणि सध्या हीच परिस्थिती होती . अशा परिस्थितीला कंटाळून एका सामान्य माणसाने जर असे खून करायला चालू केले तर चूक कोणाची ?? हे विचारण्याचे धाडस मला होत नव्हतं...

पत्रकार परिषदेत पाटील साहेबांनी एकच स्टेटमेंट दिलं व ते स्टेशन मध्ये निघून आले. त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी म्हटलं की ' पोलीस प्रशासन व न्यायव्यवस्था असताना कोणी जर स्वतः कायदा हातात घेत असेल तर त्याला आम्ही मोकळे सोडणार नाही . स्वतः न्यायाधीश बनून स्वतः शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्या अशा मानसिक रुग्णाला लवकरात लवकर आम्ही पकडू . आजचे खून हे त्याची शेवटचे खून असतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो . आमचा तपास आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे . आमच्या तपासात मदत करण्यासाठी आलेली ऑफिसर कदम व आमची टीम मिळून संशयितांची यादी केली आहे . आता लवकरच त्यांना अटक करण्यात येऊन की केस क्लोज करण्यात येईल .

खरे पाहता अशी कोणतीच यादी आम्ही केली नव्हती आणि जो कोणी ऑफिसर कदम होता तो सकाळी येऊन कागदपत्रे घेऊन गेल्यापासून परत स्टेशन वरती फिरकलाच नव्हता . त्यामुळे पाटील साहेबांना मी असं का .सांगितलं मला कळालंच नाही . केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी मला बोलावून घेतलं आणि साधना परांजपे विषयी अधिक माहिती विचारली ती मी त्यांना सविस्तरपणे सांगितली . नवीन सापडलेल्या पेनड्राइव्ह व त्यामध्ये सापडलेल्या साधनांचा व्हिडिओविषयी मी त्यांना सांगितलं . त्यांनाही थेरी पटत होती पण एकट्या साधनाला हे शक्य नव्हतं . एकट्या कोणालाच शक्य नव्हतं . त्यांच्यामते हे टीमवर्क होतं . किमान दोन किंवा तीन तरी माणसे यामध्ये असावेत असा त्यांचा कयास होता . त्या रात्री स्टेशन वरती तो ऑफिसर कदम पळत पळत आला। त्याच्या हातात फाईल होत्या आणि बर्‍याच काही गोष्टी होत्या . तो पूर्णपणे अस्ताव्यस्त होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता . तो फक्त युरेका वगैरे ओरडायचं बाकी राहिला होता . त्याच्या शरीरयष्टी व हावभावा जणू काही त्याला खुनी सापडला असावा असं वाटत होतं ...

तो प्रेझेंटेशन देण्यासाठी पुढे उभारला . पाटील साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्या योग्य होत्या . सगळ्या तपास आम्ही केला . हिंडून फिरून पुरावे गोळा केले . आम्ही सर्वत्र नोंदी केल्या त्या एकत्र करून मांडल्या . थोडेफार निष्कर्ष व अनुमान काढले . आणि हा येणार जमा केलेल्या गोष्ट वापरणार आणि खून करणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचं श्रेय घेऊन जाणार....

त्याने पहिलाच मुद्दा मांडला तो म्हणजे हे काम एकट्याचे नव्हतं आणि हे टीम वर्क होतं पाटील साहेबांनी हे अगोदरच सांगितलं होतं . यात काहीही वेगळं नव्हतं आणि दुसरा मुद्दा मांडला तो म्हणजे खून करणारा व्यक्ती कोणीही ऐरिगैरा नव्हता . त्याच्या भाषेत सांगायचं झालं तर " the killer is not amature , he is brilliant , he has plans . He is executing his plans accordingly ....

आणि त्याच वेळी पाटील साहेबांच्या खोलीमध्ये छोटासा विस्फोट झाला . त्यांच्या केबिनमध्ये सर्वत्र रंगीबेरंगी कागदी उडत होते . तो कागदी बॉम्ब होता . कोणत्याही पार्टीमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी वापरतात त्या प्रमाणे आणि तिथेच बाजूला एक पेन ड्राइव पडले होते . ते पेन ड्राइव व्हिडीओ प्लेअर जोडले व प्ले करण्यात आले . त्या व्हिडिओमध्ये साधना होती आणि ती बोलत होती

" तुम्हाला अधिक शोध व तपास करण्याची गरज नाही . मी माझ्या केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आहे....