Serial Killer - 3 Shubham S Rokade द्वारा साहसी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

Serial Killer - 3

3
तो दुसरा खूनही हुबेहूब त्याच पद्धतीने झाला होता . त्याच्याही कपाळावरती आय एम द रेपिस्ट आणि तोंडामध्ये त्याचंच कापलेले लिंग घातलेलं होतं. तो एक कॉलेजचा विद्यार्थी होता . एवढ्याशा वयात त्याच्यावरती ही वेळ आलेली पाहून मनोमन मी त्या खून करणाऱ्या व्यक्तीचे आभार मानणार होतो याचं मला वाईट वाटलं . त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटतही नव्हतं की त्याने कोणता गुन्हा केला असेल . आता माझं स्पष्ट मत झालं की जो कोणी खून करणारा व्यक्ती आहे तो मानसिकदृष्ट्या स्टेबल नाही . बायपास रोडवरती असणाऱ्या एका शेतामध्ये त्याचे प्रेत सापडलं होतं . तो पूर्ण उघडा होता . त्याचे कपडेही त्याठिकाणी नव्हते . फक्त त्याच्या छातीवरती त्याचा स्मार्टफोन ठेवलेला होता . सकाळी सकाळी आम्हाला उठून त्या ठिकाणी पंचनामा करायला जावे लागेले . पाटील साहेबही वैतागले होते . त्याठिकाणी पंचनामा करायला फारसा काही वेळ लागला नाही . फोटोग्राफ्स घेऊन ती बॉडी पोस्टमार्टम साठी नेमण्यात आली . काही वेळानंतर फ्रेश होवून आम्ही पोलिस स्टेशनमध्ये जमलो . प्रशांत कांबळे या मुलाची डेड बॉडी होती त्याच्या घरी कळविण्यात आले होतं. अधिक चौकशीसाठी त्याच्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले होते .मोबाईल वरती काही बोटांचे ठसे आहेत का हे पाहण्यासाठीच एका फॉरेन्सिक डॉक्टरला बोलवण्यात आलं होतं , मोबाईल पूर्णपणे साफ होता आणि तो मोबाईल हाताळायला काही हरकत नाही असं त्याचं मत होतं . मोबाईल हा पासवर्ड प्रोटेक्टेड होता . त्याचा भाऊ निखिल कांबळे त्यांने नुकतेच अकरावीला ऍडमिशन घेतले होते आणि प्रशांत हा बीए सेकंड इयरला होता . निखिल कडून मी पासवर्ड विचारून घेतला व त्याला घरी पाठवून दिले. मला आता खरंच त्या खून करणाऱ्या व्यक्तीचा राग येत होता . एवढ्याश्या मुलांवरती तो अशा गोष्टी का करत होता ...? शेवटी वेड्या माणसांच्या वेड्या कृतींसाठी काही कारण नसतं हे मला कळून चुकलं होतं...
पासवर्ड टाकून मोबाईल ओपन केला . लास्ट कॉल्स आणि एसएमएस चेक करायला सुरुवात केली . त्याठिकाणी एका नंबरला मागील एका महिन्यापासून दररोज सकाळी चार ते पाच च्या दरम्यान एकाच प्रकारचा मेसेज गेलेला दिसत होता . पाटील साहेबांनी मला तो नंबर डायल करायला सांगितला , मी माझ्या मोबाईल वरून तो नंबर डायल केला . तिकडून फोन एका तरुणीने उचलला. थोड्याफार जुजबी बोलण्यानंतर ती फार घाबरली. ती तरुणी , स्वाती कोष्टी ही प्रशांत कांबळेच्या वर्गातीलीच होती . मी तिला अधिक न घाबरवता फोन कट केला व पाटील साहेबांना परिस्थिती सांगितली . त्यांनी मला सिविल ड्रेस मध्ये जाऊन तिच्या घरी चौकशी करायला सांगितली. मी तिच्या घरी जायला निघालो खरे पण पाटील साहेबांना मोबाईल मध्ये एक भलतीच गोष्ट सापडली . मोबाईलच्या गॅलरीमध्ये कॅमेराने शूटिंग केलेला तो एक व्हिडिओ होता . व्हिडिओ मध्ये दिसणारी जागा ओळखीची वाटत होती . त्याच जागी प्रशांतचा मृतदेह सापडला होता . या व्हिडिओमध्ये एक प्रेमीयुगल , सामान्य भाषेत बोलायचं झालं तर अश्लील चाळे करत होतं . त्यांना कल्पना नव्हती की त्यांचा व्हिडिओ काढला जात आहे . पुढे व्हिडिओ काढणाराने जाऊन या दोघांना धमकवायला सुरुवात केली . ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हती तर स्वातीच होती , मी काही वेळापूर्वी फोन केला होता तीच . आणि दुसरा मुलगा कोण होता हे स्वातीला विचारल्याशिवाय कळणार नव्हतं . आणि व्हिडिओ मध्ये आलेल्या संवादावरून एक गोष्ट स्पष्ट होती की तो व्हिडिओ प्रशांतनेच काढला होता .
एकदा कळलं की तो व्हिडिओ प्रशांतने काढला होता मग बाकीचं गोष्टी धुक्यातून बाहेर यायला मुळीच वेळ लागला नाही . स्वातीचं व्हिडिओ मधील मुलावरती प्रेम होतं . नंतर तिला विचारून त्याचं नाव प्रथमेश मोरे होता असं कळालं . प्रथमेश व स्वातीचा प्रेम होतं . दोघांनाही 18 वर्षे पूर्ण झाली होती आणि ते दोघेही स्वच्छेने एकमेकांबरोबर त्या गोष्टी करत होते . स्वतःच्या शरीराबरोबर काय करायचं हे त्यांना जगाने सांगण्याची गरज नव्हती , पण ते कुठे करायचं हे त्यांनी व्यवस्थितपणे ठरवायला हवं होतं . त्यांनी या गोष्टी उघड्यावर केल्या आणि त्या मोबाईल मध्ये कैद झाल्या म्हणून ते अश्लील चाळे झाले . त्यांनी जर त्याच गोष्टी बंद खोलीत केल्या असत्या तर ते प्रेम झालं असतं . आपल्या समाजाची मानसिकता फार विचित्र आहे झाकून राहीलं तर माफ उघडं पडलं की पाप . प्रशांतने त्या मुलीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली असावी आणि महिन्याभरापासून तिच्यावर राजरोसपणे अत्याचार करत असावा... पण या गोष्टी स्वातीला विचारल्या विना केवळ पोकळ होत्या . तिला जर पोलिस चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये आणलं तर उगाचच बदनामी होणार होती . झालेल्या गोष्टी उघड होउ नयेत म्हणून तिने अत्याचार सहन केला होता . अशा ठिकाणी न्यायव्यवस्था व पोलीस प्रशासन काहीच करू शकत नाही . त्याला समाजाची मानसिकता कारणीभूत असते . दोन प्रेमी जर स्वच्छेने एकमेकांसोबत काही गोष्टी करत असतील तर समाज त्यांना दोषी ठरवतो . याठिकाणी मी मुद्दामून एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो . स्वाती व प्रथमेशची एकच चूक होती ती म्हणजे त्यांनी या सर्व गोष्टी उघड्यावरती केल्या . आणि त्याच संधीचा फायदा प्रशांत सारखे लोक उचलून प्रेमीयुगुलांना ब्लॅकमेल करतात . अशा घटना सर्वत्र घडताना आपण पाहतो . Sex ही गोष्ट भारतात सर्वात खालच्या दर्जाची मानली जाते आणि तरीही भारताची लोकसंख्या जगातील लोकसंख्येच्या 17 टक्के आहे . जर तरुण आणि तरुणी एकमेकांसोबत सेक्स करत असतील तर ते बिघडलेले असंस्कृत आणि गलिच्छ समजले जातात .आणि त्यातही प्रेम ही संकल्पना आजच्या तरुण पिढीला खरंच कळत नाही . प्रेम आणि वासना यामध्ये त्यांची गफलत होते . स्वाती व प्रथमेश मध्ये प्रेम होतं का नाही याच्याशी आपला देणंघेणं नाही . वासना होती हे मात्र नक्की . पण ते दोघेही स्वइच्छेने एकमेकांसोबत या गोष्टी करण्यास तयार झाले होते . दोघांची 18 वर्षे पूर्ण होती , त्यामुळे consent age चा काही प्रॉब्लेम नव्हता . कायद्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काही चुकीचं केलं नव्हतं , त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नव्हतं . पण समाजात बदनामी होईल म्हणून स्वाती घाबरली . स्वाती व प्रथमेश ची जात वेगळी होती . दोघांच्याही घरी या प्रेमप्रकरणाबद्दल मूळीच कल्पना नव्हती . प्रशांत व प्रशांत सारखे लोक अशाच गोष्टींचा फायदा उचलतात . याच गोष्टीवरून प्रशांतने त्या दोघांनाही ब्लॅकमेल सुरू केलं . स्वाती व प्रथमेश दोघांनी एकत्र मिळून प्रशांतचा विरोध करायला हवा होता पण दोघेही घाबरले . कारण दोघांच्याही घरी कळालं आणि व्हिडिओ जर व्हायरल झाला तर नक्कीच दोघांचीही बदनामी होणार होती . म्हणून स्वातीला निखिलच्या अत्याचाराला महिनाभरासाठी सामोरे जावे लागले . पाटील साहेबांनी गुपचूप दोघांच्याही घरी चौकशी करण्याचे ठरवले . दोघांच्याही घरच्यांना झालेल्या प्रकरणाबद्दल माहिती दिली . दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल , प्रशांतने काढलेल्या व्हिडिओ बद्दल त्यांने केलेल्या ब्लॅकमेल बद्दल व स्वाती वरती झालेल्या अत्याचाराबद्दल व नंतर झालेला प्रशांतचा खून या सर्व गोष्टी सांगितल्या . स्वाती व प्रथमेश दोघांनीही त्यांना जे काही माहित होतं ते सर्व सांगितलं .
स्वाती व प्रथमेश या दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल ते दोघ सोडलं तर फारसं कोणालाच माहित नव्हतं . प्रशांत हा योगायोगाने त्या ठिकाणी आला होता व त्याने तो व्हिडिओ काढला होता . तो स्वाती वरती अत्याचार करत होता हे प्रथमेश व स्वाती सोडला तर इतर कोणाला माहित होतं का हेच फक्त आम्हाला पाहायचं होतं...?
आम्ही स्वातीला विचारलं याबद्दल कोणा कोणाला माहित आहे ...? स्वातीच्या फक्त एका मैत्रिणीला माहीत होतं की या सर्व गोष्टी चालू आहेत . म्हणजे स्वाती वरती महिनाभर अत्याचार चालला होता आणि तो फक्त स्वाती प्रथमेश आणि स्वाती ची एक मैत्रीण या तिघांनाच माहीत होतं . अन्याय सहन करण्याची कला भारतीय लोकांमध्ये अगदी ओतप्रोत भरलेली आहे . कित्येक शतके भारतीय लोकांनी निमूटपणे अन्याय सहन केलाय की अन्याय सहन करणे हे जणू आपल्या डीएनए मध्येच आहे . चुकीच्या गोष्टी विरुद्ध आवाज उठवणे हे आपल्याला माहीत नाही . अगदीच पाणी डोक्यावरून वाहू लागल्यावरती दोन-चार लोक जागे होतात एवढाच काय तो फरक....
आता आमच्यापुढे एकच प्रश्न होता , स्वातीवरती होणाऱ्या अत्याचाराबद्दल तिघांना सोडून इतर कोणालाच माहित नव्हतं . तर मग प्रशांत चा खून कोणी केला व ज्यांनी कोणी प्रशांत चा खून केला होता त्यानेच त्या पत्रकाराचा खून केला होता का..? . प्रशांतच्या झालेल्या खूनामुळे ही केस अधिकच किचकट झाली . प्रशांतचा व त्या पत्रकाराचा खून एकाच व्यक्तीने केला आहे का हे आधी ठरवायला हवं होतं आणि जर एकाच व्यक्तीने केला असेल तर ती व्यक्ती स्वाती किंवा प्रथमेश किंवा स्वातीची मैत्रीण या तिघांपैकी असू शकत होती . आणि जरी वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेला असला तर एकाच प्रकारची पद्धत का वापरली असावी... दोन्ही बॉडीचे पोस्टमार्टम आल्या शिवाय आता पुढील गोष्टी समजनं अवघड होत .
क्रमःश...