Serial Killer - 5 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 5

5
तीन खून झाल्यानंतर सारेजण आमच्या डिपार्टमेंटच्या डोक्यावरती बसले होते . पत्रकार व न्युज चॅनलवाले वेगळं , राजकीय नेते वेगळे आणि सामान्य जनता वेगळच ओरडत होती . खून झालेली जरी गुन्हेगार असले तरी न्यायव्यवस्थेला काही किंमत आहे का नाही असे पत्रकारांची बोंबाबोंब चालू होती . नेत्यांचं आम्हाला काहीही न विचारता लवकरात लवकर तपास पूर्ण केला जाईल असे स्वतःच पत्रकारांना सांगत होते . तर सामान्य जनता वेगळ्याच मूडमधे होती . कोणी त्या खून करणाऱ्या सिरीयल किलरला सपोर्ट करत होती तर कोणी त्याला विरोध करत होते . एकंदरीत काय तर लवकरात लवकर तपास लागावा म्हणून आमच्यावरची दबाव आणला जात होता . पाटील साहेबांना मदत म्हणून वरील डिपार्टमेंटमधून तात्पुरत्या तपासासाठी एक नवीन अधिकारी पाठवला होता . 13 तारखेला सकाळी सकाळी तो पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला होता . पाटील साहेबांच्या केबिनमध्ये काहीबाही बोलत होता . बराच वेळ बोलून झाल्यानंतर तपासासाठी लागणारे तिन्ही खुनाचे आवश्यक पुरावे घेऊन तो निघून गेला .
अजून तीन दिवसही झाले नव्हते तोवरच हा दुसरा हा अधिकारी ' मदतीसाठी ' पाठवला होता . आमच्या डिपारमेंटला जनू आमच्यावरती विश्वासच नव्हता . त्या दिवशी दुपारी पाटील साहेबांना चक्कर आली . नंतर ते काही मिनिटांसाठी बेशुद्ध झाले होते . त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले . व्यवस्थित विश्रांती न घेतल्यामुळे व आवश्यक ती अन्न प्रथिने मिळत नसल्यामुळे असे झाले यांचे डॉक्टरांचं म्हणणं होतं . त्या दिवसापुरती पाटील साहेबांनी रजा टाकली . इकडे नवीन आलेला अधिकारी पोलिस स्टेशनमध्ये अजिबात येत नव्हता पण त्याचा तपास चालू होता . मी व पवार साहेब दोघांनी मिळून तीन खुनांमधील कॉमन पॉईंट शोधण्याचा प्रयत्न केला . तीन खुणा मधील तिन्ही मृतांना जोडणारा एखादा का होईना दुवा असणारच अशी आमची खात्री होती . पण तो समान दुवा कोणता हाच सापडत नव्हता . पत्रकार माणिकराव लोखंडे यांचं काही हे एकच प्रकरण नसणार हे मला माहीत होतं , पण हे एकच उघड झालेलं होतं . त्यांच्या त्यांच्या ऑफिसची चांगलीच झडती घेण्यात आलेली होती . अजून काही सापडलं नव्हतं . पण मी पुन्हा एकदा व्यवस्थित पणे तपास करून यावा म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो . सर्व काही व्यवस्थित तपासलं होतं . तरीही कुठे काही छुपा कप्पा , किंवा लपवलेलं काही आहे का हे मी पुन्हा एकदा पाहू लागलो... चांगला दीड तास कसून तपास केल्यानंतर फरशीच्या खाली एक तिजोरी लपवलेली अढळली . त्या तिजोरीला टाकण्यासाठी कोड हवा होता . पण तो कोड त्याच्या घरच्यांनाही माहित नव्हता . त्यांच्या घरी अशी कोणती तिजोरी होती हे ही माहीत नव्हतं . त्यामुळे त्यांना कोड माहित असण्याचा प्रश्नच नव्हता . मग त्या तिजोरीचा कोण कोणाला माहित असावा ...? स्टेशनमधून पुराव्यासाठी ताब्यात घेतलेल्या डायऱ्या मागवायचा प्रयत्न केला पण त्या डायर्‍या त्या नवीन आलेला अधिकारी घेऊन गेला होता . शेवटी स्टेशनच्या संपर्कात एक तिजोरी खोलणारा एक्सपर्ट होता . त्याला बोलविण्यात आले आणि तिजोरी उघडली . तिजोरीत दुसरं काहीच नव्हतं फक्त एक पेन ड्राइव्ह होता . या केसमध्ये पेन ड्राईव्हची बरीच मदत झाली म्हणून हा व्हिडीओ ही मी पेन ड्राईव्हमध्ये स्टोअर करतोय...
तर असो बोलण्याचा मुद्दा एवढाच की पत्रकारासोबत ही एक पेनड्राईव्ह सापडला होता आणि बस ड्रायव्हरचा मृतदेहा सोबतही एक सापडला होता . दोन्ही पेन ड्राईव्ह कंपनी एकच होती . दोन्ही एक साथच खरेदी केल्याप्रमाणे वाटत होते . निखिल सोबत कोणताही पेन ड्राईव्ह सापडलेला नव्हता . जो काही व्हिडिओ होता तो त्याच्या मोबाईल मध्ये स्टोअर केलेला होता . जो कोणी खुनी होता तो बलात्कार करणाऱ्यांना टारगेट करतच होता आणि हे बलात्कार व अत्याचार करणारे लोक सामान्य दर्शनी वरून पाहता सज्जन म्हणून समाजात गणले जाणारे होते . त्यांची वाईट कर्मे शक्यतो कोणालाच माहीत नव्हती . जेवढं शक्य होईल तेवढं हे स्वतः पुरतचं रहस्य जपायचे , पण त्या खून करणाऱ्याला या सर्वांची सारी रहस्य माहीत होते . तिजोरीमध्ये सापडलेल्या पेन ड्राईव्हमध्ये अजूनही असेच दहा-बारा व्हिडिओ होते . काही व्हिडिओ मध्ये फक्त पत्रकार लोखंडे वकील रमाकांत शिंदे होते , तर काही व्हिडिओमध्ये ते चौघेही होते . त्यामध्ये वकील रमाकांत शिंदे , तलाठी बाबुराव माने आणि कुठेतरी आमदार सदाशिवराव ढोले दिसत होते . मात्र एका व्हिडिओमध्ये फक्त पत्रकार होता . त्या व्हिडिओ मध्ये एकूण सात ते आठ मुली होत्या . काही मुली पूर्णपणे शुद्धीत होत्या आणि काही स्वेच्छेने करत असल्यासारख्या वाटत होत्या . त्याच पेन ड्राईव्हमध्ये त्या आत्महत्या केलेल्या मुलीचाही व्हिडिओ होता . तिच्या प्रमाणेच अजून एक मुलगी अर्धवट बेशुद्ध होती . एक मात्र पूर्णपणे शुद्धीत होती व ती प्रतिकार करायचा प्रयत्न करत होते . पण या पत्रकाराने तिला कशातून तरी गुंगीचे औषध दिलं असावं , हळूहळू तिचाही प्रतिकार कमी आला . पत्रकाराच्या साऱ्या कर्माचा पाढा पुढे आला होता . यांनी तीन मुलींवर ती जबरदस्तीने बलात्कार केले होते , तर चार मुलींचे लैंगिक शोषण केलं होतं असं म्हणायला हरकत नाही . आणि हे फक्त रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओच्या बाबतीत होतं . असे रेकॉर्ड न झालेले किती होते हे फक्त त्या चौघांनाच माहीत . हा पेन ड्राईव्ह सापडल्यानंतर चौकशीसाठी तलाठी बाबुराव माने , वकील रमाकांत शिंदे यांना बोलविण्यात आले। आमदार साहेबांना मात्र स्टेशनमध्ये गैरहजर राहण्यासाठी काहीतरी कारण मिळालं होतं . त्या दोघांकडून चौकशी करून त्या व्हिडिओमधील मुलींबाबतीत जी काही माहिती मिळवता येईल ती मिळवली . या आठ मुलींमधील एका मुलीने तर आत्महत्या केली होती . उरल्या सात मुली. त्यातील एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं . त्या मुलीचे नाव होतं साधना परांजपे . ती त्याच कॉलेजमध्ये शिकवायला होती ज्या कॉलेजमध्ये निखिल शिकत होता , आणि त्याच कॉलेजमध्ये चंद्रराव गोडबोले पूर्वी शिपाई म्हणून काम करत होता .
साधना परांजपे ही कॉलेजमध्ये प्राध्यापिकेचे काम करत होती . कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली असता कळाले कि ती मागच्या महिन्याभरापासून कॉलेजमध्ये आलीच नाही . तिच्या अपार्टमेंटला गेले असता मालकाकडून कळले की ती मागच्या महिन्यातच अपारमेंट सोडून गेलेली आहे. मंगलपुर मध्ये ती एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती . ती एकटीच होते . तिच्या बाबतीत फारशी कोणाला माहीत नव्हती. फक्त एवढेच माहीत होते की तिचे आई-वडील मंगलपुरला लागून असलेल्या एका छोट्याशा खेड्यात राहत होते . तिच्या कॉलेजमधील एका सहकाऱ्यांकडून तिच्या आई-वडिलांचा नंबर मिळाला . तिच्या घरी फोन केला असता कळले की ती घरीही नव्हती . मग माझा संशय तिच्यावरती दाट झाला . बँक अकाऊंट , एटीएम कार्ड आणि मोबाईल नंबर ट्रेस करण्याला सुरुवात केली . बँक अकाउंटचे कोणतेच व्यवहार नव्हती . सिमकार्ड ही बंद होते . शेवटची लोकेशन मंगलपुरमधीलच होती , तिच्याच आपारमेंटची...

म्हणजे मागच्या महिन्याभरापासून ही साधना परांजपे बेपत्ता झाली होती आणि कोणालाच माहीत नव्हते कुठे गेली . नक्कीच तिचा काहीतरी संबंध असणार असे मला वाटत होते पण त्याला कोणतेच पुरावे नव्हते. मला तर तिन्ही ही खुनां मधील समान दुवा सापडला होता आणि यासंबंधी त्याला धरूनच खुनाचा तपास लागणार होता . थोडक्यात मला खुनी सापडल्यासारखे वाटत होते . पण नवीन आलेला अधिकारी नक्की काय तपास करत होता हे त्यालाच माहित...? मी दुसऱ्या दिवशी पाटील साहेबांना माझी theory सांगण्यासाठी उत्साहीत होतो...
क्रमःश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED