Serial Killer - 7 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 7

7

साधना बोलत होती ....
आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल , पुरावे गोळा करावे लागले असतील . पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली देत आहे . हे सहा खून फक्त मी आणि मी एकटीनेच केले होते . यामध्ये दुसऱ्या कोणाचाही समावेश नाही. मी हे खून का केले या मागचे कारण म्हणजे हे सहाही लोक माझ्या दृष्टीने फारच मोठ्या गुन्ह्याचे गुन्हेगार होते , आणि त्यांना शिक्षा मिळणे न्यायव्यवस्थेत शक्य नव्हतं . त्यामुळे मी स्वतः यांना शिक्षा देण्याचं ठरवलं आणि शिक्षा दिली . आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो म्हणजे मी हे सगळं कसं केलं आणि माझा प्लॅन काय होता ...? आता खूनही मीच केले आणि ते कसे केले हेही मीच सांगायचं का...? संवाद कसा दोन्ही बाजूनी असायला हवा . त्यामुळे खून कसे केले ते शोधून काढण्याचे काम मी तुम्हाला पोलिसांवरती सोपवत आहे. बघू आता तुम्ही किती दिवसात हा तपास लावताय ?

एवढं बोलून ती तिचा व्हिडिओ संपला . तिने पोलिसांच्या नाकावर टिच्चून आव्हान दिलं होतं . पाटील साहेबांचा पारा तर भयंकर चढला . त्या आलेल्या ऑफिसर कदम चेहऱ्यावरती मात्र challenge मिळाल्याप्रमाणे स्मित होतं . त्यांनाही चॅलेंज स्वीकारलं होतं . त्या व्हिडिओ वरून अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि तो व्हिडिओ फ्रेम बाय फ्रेम चेक करण्यासाठी त्याने त्याच्या स्पेशल edited ला तो व्हिडिओ पाठवून दिला . व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मधील आवाजावरून , तिच्या आवाजावरून व तिच्या देहबोलीवरून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार होत्या. त्याने आम्हाला पुन्हा एकदा गोळा केलं आणि त्याचे प्रेझेंटेशन देऊ लागला .

" तिने व्हिडिओमध्ये कितीही सांगितलं की ती एकटी आहे पण ह्या साध्या गोष्टीवरून सिद्ध होतं की ती एकटी काम करत नाही . तिच्या मागे टीम आहे जी टीम अनुभवी आहे . त्या टीममध्ये प्रत्येक बाजूने सक्षम ठरतील असे व्यक्ती आहेत . आता हेच पहाना आपल्या पोलिस स्टेशनमध्ये येऊन हा व्हिडीओ ड्रॉप करून जाणं म्हणजे आव्हानात्मक गोष्ट आहे . त्यामुळे आपण हे धरून चालायला हरकत नाही की ही जी काही साधन आहे ती एकटी नाही , आणि मला तर वाटत आहे की ती या प्लॅनची मास्टरमाइंड ही नसावी . या सर्व गोष्टी मागचा मास्टरमाइंड कोणीतरी वेगळाच आहे . जो कोणी पडद्यामागून सूत्र हलवतोय .

मी पोस्टमार्टम मधील एक गोष्ट तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो ती म्हणजे हे सहाही खून एकाच पद्धतीने झालेले आहेत . तुम्ही किती जणांनी पोस्टमार्टम रिपोर्ट वाचले आहे हे काही मला माहीत नाही पण मृत्यूचं कारण तुम्हाला माहित असावं अशी मी अपेक्षा बाळगतो . Air embolism बाबत तुम्ही ऐकलय का .......

तो बोलत होता पण माझ्या डोक्यावरून जात होतं . मृत्यूच्या कारणांचा मी विचारच केला नव्हता . पाटील साहेबांनी विचार केला असेल पण त्यांनी आमच्या सोबत काही डिस्कशन केलं नव्हतं . त्यामुळे या बाबत मला काहीच माहिती नव्हती . त्याने अधिक स्पष्ट करून सांगायला सुरुवात केली .

An injection of 2-3 ml of air into the cerebral circulation can be fatal. आपल्या cerebral circulation मधे दोन ते तीन मिली हवा जरी सोडली तरी ती हवा मेंदूपर्यंत जाऊ शकते ज्यामुळे माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . आता ह्या गोष्टीमुळे या सहाही लोकांचा पहिल्यांदा मृत्यू झाला होता . त्यानंतर त्यांचे लिंग कापून त्यांच्या तोंडामध्ये टाकण्यात आलेला आहे . त्यानंतरच कपाळावर ती जे काही लिहिलेला आहे ते लिहिण्यात आलं आहे . आणि दुसरी गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सहा कपाळावरती एकाच व्यक्तीचे हस्ताक्षर नाहीत . पहिला जो खून झाला त्या व्यक्तीच्या कपाळावरती आणि शेवटी जे तीन खून झाले त्यातील व्यक्तींच्या कपाळावरती एकच हस्ताक्षर आहे . आणि उरलेले दोन आहेत ते म्हणजे बस ड्रायव्हर आणि निखिल या दोघांच्या कपाळावरती वेगळ हस्ताक्षर आपल्याला आढळलेलं आहे . एकूण सहा मृतदेहांवर ती दोन वेगळ्या व्यक्तींची हस्ताक्षरे आहेत .
इतरही बर्‍याच गोष्टी ज्या मला माहित नव्हत्या त्या निदर्शनास आणून दिल्या . संपूर्ण शरीर जणू काही साफ केले गेले होते . त्याच्यावर ती एकही फिंगरप्रिंट केव्हा मातीचा कण नव्हता . आता अशा गोष्टी म्हणजे साध्या आणि मूर्ख माणसाचे काम नव्हे . याठिकाणी एक्सपर्ट लागतो . त्यामुळेच आपण हे गृहीत धरू शकतो की यांची ही जी काही टीम आहे त्यामध्ये एक्सपर्ट आहेत आणि ते प्रत्येक खुनाबरोबर मागे राहिलेले पुरावे नष्ट करतात . पोलिसांना फसवू शकतात . या सर्वांमागचा मास्टरमाईंड खरच हुशार आहे . पण त्याला आपण पकडू शकतो . कोणीही कितीही प्लॅनिंग आणि प्लॉटिंग केलं तरी काही ना काही चूक होतं असते , आणि ही चूक एकदा का आपल्या लक्षात आली की तो मास्टरमाइंड सापडला म्हणून समजा ....

आता तुम्ही म्हणाल ही चूक कशी काढायची , तर त्यासाठी आपल्याला फार काही वेगळे करावे लागणार नाही . पहिला खून झाला त्या दिवसापासून शेवटचे जे तीन खून झाले त्या पर्यंत सगळा घटनाक्रम एकापाठोपाठ एक आठवा . प्रत्येकाने आपापले नोट्स तयार करा आणि काही मिनिटांनी माझ्यासमोर सादर करा . एकट्या मेंदूने जेवढे काम होत नाही पण अनेक मेंदू एकत्रित केले की पटकन होते . त्या घटनाक्रमात आपल्याला नक्कीच काही न काही सापडेल . प्रत्येकाने त्या घटनाक्रमावर जरा नजर फिरवा .
मी सुरुवातीला कदम चा राग आणि द्वेष करत होतो पण आता मला त्याच्या काम करण्याची पद्धत खूपच आवडली होती . त्याने सांगितल्याप्रमाणे मी घटनाक्रमाची यादी करायला सुरुवात केली .
आठ जुलैला सकाळी पहिली डेड बॉडी सापडली . माणिकराव लोखंडे यांची . त्यांच्याच ऑफिसमध्ये आणि त्याच ठिकाणी त्यांचा एक पेन ड्राईव्ह सापडला ज्यामध्ये त्यांनी बलात्कार केलेले व्हिडिओज होते . 10 जुलैला दुसरी बॉडी सापडली निखिल कांबळे . तीही सकाळीच सापडली . आणि त्याच्या छातीवर ती मोबाईल ठेवला होता ज्यामध्ये त्याने व्हिडिओ रेकॉर्ड केला होता . तिसरी बॉडी बस ड्रायव्हर चंद्रराव गोडबोले यांची . तीही बॉडी सकाळीच सापडली . त्याही ठिकाणी पेनड्रायव्ह होता . आता जेव्हा मी हे सर्वकाही यादी करत होतो त्यावेळी मला आठवलं की तिनेही खून रात्री झाले होते आणि त्यांच्या बॉडी सकाळी सापडल्या होत्या . शेवटचे तीन खुल मात्र दिवसा झाले होते आणि त्यांच्या बॉडीज संध्याकाळी सापडल्या होत्या . आता यावरून काय कळणार होतं हे मलाही कळत नव्हतं तरीही मी आपली घडलेल्या घटनांची यादी करत राहिलो . पाटील साहेब ही काहीबाही करत होते . जो कोणी या तपासात होता पण ज्याला हा घटनाक्रम माहीत होता तो प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे घटनाक्रमाची यादी तयार करत होता . आणि ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या नोंद वहीत उतरवत होता . काही वेळानंतर आम्ही सर्वजण एकत्र आलो . आपापली घटनांची काढलेली यादी त्याच्याकडे जमा केले . त्याने सर्व याद्या जमा करून घेतल्यावरती , तो पुन्हा बोलू लागला . आता आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत , पण माहित असलेल्या गोष्टी आपण तपास कसा करायचा , कमीत कमी माहितीवरून आपण जास्तीत जास्त आउटपुट कसे मिळवायचे हे आपण पाहणार आहोत .

तो बराच वेळ बऱ्याच गोष्टी बोलत होता . काही गोष्टी माझ्या डोक्यावरून जात होत्या तर काही डोक्यात जात होत्या . त्यांनी बरेच निष्कर्ष काढले होते . आणि शेवटी तो व्हिडीओमधून काही माहिती मिळते का हे बघण्यासाठी त्याच्या मित्राकडे निघून गेला . आणि आम्ही मात्र स्टेशनमध्ये झालेल्या खुनाबद्दल विचार करत बसून राहिलो ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED