Serial Killer - 9 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 9

9

साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल लावला . मीडिया , आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच नको . लोकांचे ब्रेन वॉशिंग करण्यापासून लोकांच्या मनात एखादी कल्पना रुजवण्यार्यंत सारे काही मीडिया करू शकते . आजची पत्रकारिता ही कशी आहे हे काही मला माहीत नाही , पण पत्रकारिता ही मनोरंजन छान करते हे मात्र मला माहित आहे. सिरीयल किलरचं नामांकन रेपिस्ट किलर म्हणून अगोदरच झालं होतं . वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळे सिन्स , सांडणारे रक्त , उडणारे शिंतोडे वेगवेगळे कार्टून ग्राफिक्स दाखवून न्यूज चॅनल वाले जून एक सस्पेंस थ्रिलर चित्रपटच दाखवत होते . रहस्यमय आवाजात केलं जाणारं सूत्रसंचालन , पार्श्वभूमीला लावलेलं गंभीर संगीत , अधून मधून येणारे आवाज , अजून काय हवं असतं टीआरपी वाढवण्यासाठी ...

ज्या सहा लोकांचे खून रेपिस्ट किलरने केले होते, त्या सहाही लोकांवरती प्रोग्रॅम चालू होते , त्यांचा कच्छा चिट्ठा वाचला जात होता . आमदाराच्या मृत्यूनंतर त्या चांडाळ चौकडीचे बरेच गुन्हे सर्वांच्या समोर आले होते . त्या चौघांच्या गुन्ह्याचे जे कोणी शिकार झाले होते ते स्वतःहून पुढे येत होते. असं म्हणतात कोणाच्या मृत्युनंतर त्याच्या विषय अपशब्द बोलू नये , पण मेल्यावरती ही रात्रंदिवस त्यांच्या गुन्ह्याची यादी वाचली जात होती . त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात होते . त्यातील बऱ्याच गोष्टी खऱ्या होत्या नि काही गोष्टी न्यूज चैनल वाले सुत्रांच्या नावाखाली मनोरंजनासाठी समाविष्ट करत होते . साधनाने जो व्हिडीओ पोलीस स्टेशनला पाठवला होता तोच व्हिडीओ इंटरनेट वरती अपलोड केला होता . न्यूज चॅनल वाले तो व्हिडिओ वारंवार दाखवत होते आणि शक्य होईल तेवढे पोलिसांच्या नाकर्तेपणावर प्रश्न उपस्थित करत होते .

एका न्यूज चैनल ने तर कहरच केला . कोण आहे किलर्स ऑफ किलर , रेपिस्ट किलरचा खून कोणी केला... पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यानुसार साधना परांजपे हिने एका व्हिडीओमधून आपण रेपिस्ट किलर असल्याची कबुली दिलेली आहे , मात्र कबुली दिल्यानंतर काही वेळातच साधना परांजपे यांची डेड बॉडी पोलिसांच्या हाती लागली . कोण आहे हा खुनी ज्याने रेपिस्ट किलरचा केला खून , कोण आहे हा किलरस ऑफ किलर , याचाच शोध घेण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट...
आता आम्हालाही याविषयी काही माहिती नव्हती . आम्ही शोधत होतो तोवर यांनी रिपोर्ट बनवून टाकला , जणू काही हे स्वतः तपास करत होते . तर असो त्यादिवशी रात्री असल्याच चविष्ट खबरी ऐकत आणि पहात झोपेच्या आधीन झालो . झोपेत जरा चित्रविचित्र स्वप्न ही पडले आणि दुसऱ्या दिवशी अचानकच उगाचच माझ्या डोक्यात एक कल्पना आली की साधना परांजपेचा खून कशावरून असेल , एखाद्यावेळेस तिने आत्महत्या केली असू शकते...
तसेही तिला कॅन्सर झाला होता . काही दिवसात तिचा तडफडून मृत्यू होणार होता . आणि तिचा बदलाही पूर्ण झाला होता . तिच्याकडे जगण्यासाठी काही खास कारण नसावं , म्हणून तिने आत्महत्या केली असावी . आत्महत्या करण्यापूर्वी तिने तो पेन ड्राईव्ह कुणाच्यातरी हस्ते पोलीस स्टेशनमध्ये पाठवला असावा आणि इंटरनेट वरती व्हिडिओ अपलोड केला असावा ज्यामध्ये तिने आपण खून केल्याची कबुली दिली .
स्वतःच्याच आयडिया वरती मी भलताच खूश झालं आणि त्याच आनंदात मी पोलिस स्टेशनवर पोहोचलो ही आयडिया कदम साहेबांना सांगणारच होतो , पण पोलीस स्टेशनवरती जो तो टीव्हीकडे टक लावून पहात होता . टीव्ही वरती एक न्यूज चैनल चालू होता त्याच्यामध्ये कोणाचीतरी मुलाखत दिसत होती .
" तर तुम्ही म्हणताय की तुम्ही साधनाला खून करण्यासाठी मदत केली...?
" नाही नाही मी मदत नाही केली . मी सर्व काही प्लॅन केलं . मी तो प्लॅन पाळला . या सर्वांमध्ये माझा मोठा वाटा आहे . साधना माझ्याकडे आली होती . आम्ही दोघांनी मिळून या सर्व गोष्टी केल्या आहेत .
" पण तुम्ही हे सर्व कसं केलं हे सांगाल का आणि का केलं...?
" कसं केलं हे मी काही सांगणार नाही कारण साधनानं आणि पोस्ट केलेल्या व्हिडिओ नुसार पोलिसांना थोडेतरी काम नको का...? का केलं हे मात्र मी सांगू शकतो...
" म्हणजे साधना परांजपे यांचा ही खून तुम्हीच केला का..?
" नाही नाही . आमच्या प्लॅननुसार आम्ही दोघ पोलिसांना एकत्रितपणे सरेंडर करणार होतो . पण साधनाच मत असं पडलं कि मी माझ्या आयुष्याचं वाटोळं करू नये , म्हणून तिने आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओ तिने पोस्ट केला .
" तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही हे का केलं सांगणार आहात...
" आपल्या भारतात बलात्काराच्या कितीतरी केसेस पडतात . त्यातील कित्येक कमी लोकांना गुन्ह्याची शिक्षा मिळते . अशा कितीतरी केसेस असतात ज्या रजिस्टरच होत नाहीत . त्यामुळे गुन्हेगार मोकाट फिरताना दिसतात . आपल्या देशातील गुन्हेगारांना न्यायव्यवस्थेचा वचक मुळीच नाही . आपल्याकडे जरा पावर आली की ते खुशाल पणे गुन्हे करतात . अशा गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून आम्ही दोघांनी हे करण्याचं ठरवलं होतं...
" पण तुम्ही गुन्हेगारांची निवड कशी केली....?
" सदाशिवराव ढोले , बाबुराव माने , माणिकराव लोखंडे आणि रमाकांत शिंदे या चौघांच्या गुन्ह्याची बळी स्वतः साधना परांजपे होती , आणि त्या चौघांनी इतरही गुन्हे केले होते याची माहिती साधना परांजपे यांच्याकडे होती . तर बस ड्रायव्हर आणि निखिल कांबळे या दोघांच्या गुन्ह्याची माहिती मला होती . अशी सहा जणांची आम्ही यादी तयार केली आणि एकापाठोपाठ एक त्यांचा काटा काढला...
" पण तुमच्याकडे ते पेन ड्राईव्ह आणि पुरावे कसे आले याबद्दल काही सांगाल का...
" तुम्ही मला मूर्ख समजताय का ? मी तुम्हाला म्हटलं ना का केलं हे सांगेन , पण कसं गेलं हे पोलिसांना शोधून काढावे लागेल . तुम्ही उलटेसुलटे प्रश्न फिरवून माझ्या कडून ही माहिती काढून घेऊ इच्छितात , पण मी मुळीच सांगणार नाही . आता मी चंदनपुर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आत्मसमर्पण करणार आहे ...

आणि तो कॉल कट झाला .
आता तर माझं डोकं गरगरत होतं . पहिल्यांदा सहा खून झाले . साधना परांजपे मी खून केले आणि मला कोणाची मदत नव्हती म्हणून पुढे येते . नंतर तिची डेड बॉडी सापडते . त्यानंतर कदम साहेब अशी थेरी मांडतात की साधना एकटी नव्हती आणि या साऱ्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड आहे . नंतर तोच मास्टर माईंड न्यूज चॅनलला आपला इंटरव्यू देतो....
त्याच वेळी पोलीस स्टेशनमध्ये एक पंचविशीचा तरुण चालत आला . हा तोच होता ज्याने न्यूजला इंटरव्यू दिला होता . हा तोच मास्टरमाइंड होता ज्याने हे सहा खून केले होते . हा तोच होता ज्याने आमच्या मागे इतकी कट लावली होती . हा तोच होता जो एक आठवड्यासाठी सगळ्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू झालेला होता .

आम्ही त्याला ताब्यात घेतले आणि तुरुंगात टाकलं . कदम साहेब स्वतःहून त्याची चौकशी करण्यासाठी गेले होते . पण पाटील साहेब जरासे अस्थिर वाटत होते . त्यांना कोणीतरी चिंता सतावत होती .
" का हो पाटील साहेब काय झालं ...? तुम्हाला आनंद झाला नाही का... की ही केस शेवटी एकदाची सुटली म्हणून ...
सुरुवातीला त्यांचे माझ्याकडे लक्ष नव्हतं , नंतर प्रश्न विचारल्यावरती ते बोलले
" निकम तुला काही वेगळं वाटत नाही का ...? काल साधना पुढे येते आणि हा वेडसर आणि गबाळा दिसणारा पंचविशीतला तरुण मास्टर माइंड म्हणून पुढे येतो...
" अहो अशा लोकांना स्वतःच्या प्रसिद्धीची हौस असते , साधना परांजपेने ही प्रसिद्धी स्वतः लाटण्याचे प्रयत्न केले . हे या गड्याला आवडलं नसावं म्हणून आज तो स्वतः पुढे आला.....
पण तरीही पाटील साहेबांना एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती . जुनं काही त्यांचे समाधान झाले नसावं. मी नंतर त्यांच्याकडे जास्त काही लक्ष दिले नाही . मी त्या आलेल्या मास्टर माइंड कडून काही माहिती मिळते का हे ऐकण्याच्या तयारीत होतो . कदम साहेबांनी हर एक प्रयत्न करून पाहिले . पण तो तोंड उघडायला अजिबात तयार नव्हता . त्याचा एकच टुमनं होतं , मी खून केले आता कसे केले हे तुम्ही शोधून काढा....

तो दिवस जरा शांततेत गेला . कदम साहेब मात्र सारखी धावपळ करत होते. न्यूज कॉन्फरन्स त्या मास्टर माइंडची मुलाखत स्टेटमेंट घेणे वगैरे वगैरे . मला वाटलं होतं हे वादळ शेवटी एकदाच थांबले . इतक्या दिवस नुसतं काम काम मागे लागलं होतं , मी तर दमून गेलो होतो . आता म्हटलं जरा एक-दोन दिवस सुट्टी घेऊन आराम करावा...
पण आम्हाला आराम करु देणार हे देवाला बहुदा पहावलं नसावं . कारण दुसर्‍या दिवशी अजून एक बॉडी सापडली . त्या बॉडी सोबत एक पत्रही सापडलं .......
क्रमःश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED