Serial Killer - 2 books and stories free download online pdf in Marathi

Serial Killer - 2

2

मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली .
" काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या घरून काही कळलं का....?
" काय सांगायचं कुणालाबी विचार सगळेजण असं बोलतेय जणू काही हा पत्रकार नाही संतच होता .….
" म्हणजे कोणावर संशय वगैरे आहे का त्यांच्या घरच्यांचा..
" अरे न्यूज चॅनेल वाल्यांना सांगितले ना तेच आम्हालाबी सांगितलय वेगळं काहीच सांगितलं नाही ...
" म्हणजे अजून तपास काही खास नाही झाला म्हणायचा..
" नाहीरे अजून फारशी म्हणावी अशी प्रगती नाही म्हणूनच त्याच्या ऑफिसमधून उचललेल्या पुरावा तपासायचं काम दिलय साहेबांनी . पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत बऱ्याच गोष्टी कळणार नाहीत . तोपर्यंत या पुराव्यातून काही लिंक लागली तर बरच झालं...
मी पवार साहेबां बरोबर प्रत्येक पुरावे तपासत राहिलो . वेगवेगळ्या डायरी होत्या . काही डायऱ्यामध्ये पेपरचे संपादकीय लेख होते , तर काही डायरीमध्ये पैशाचे हिशोब होते . दोन-तीन पेन ड्राईव्ह मध्ये वेगवेगळ्या फोटो होते . एवढं सगळं तपासायला आम्हाला कितीतरी तास गेले. पण शेवटी मात्र कष्ट फळाला आले . एका पेन ड्राईव्ह मध्ये आम्हाला भलतीच गोष्ट सापडली आणि त्या गोष्टीमुळे पुढे बऱ्याच गोष्टी घडल्या. त्या पेन ड्राईव्ह मध्ये असे काही फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ होते की ज्या मुळे त्या पत्रकाराचा जीव गेला . मंगलपुर मधीलच एक यशस्वी वकील रमाकांत शिंदे , गाव कामगार तलाठी बाबुराव माने आणि विद्यमान आमदार सदाशिवराव ढोले यांचे व स्वतः त्या पत्रकाराचे एकाच मुलीं बरोबर अश्लील फोटोग्राफ्स व व्हिडिओ त्यामध्ये होते . पण या पेन ड्राईव्ह साठी त्याला कोणी का मारला आणि जर मारलं तर मारणाऱ्याने पेन ड्राईव्ह गायब का केला नाही . आता मात्र माझं डोकं पूर्णपणे चक्रावू लागलं . मी विचार केला जर पत्रकाराला आमदार वकील व तलाठी या तिघांनी मिळून मारला असेल तर पेनड्राइव्ह गायब व्हायला हवा होता . आणि जर त्यांनी मारला नाही तर दुसर्‍या कोणी मारलं हा एक प्रश्न होता.
आम्ही तो पेन ड्राईव्ह इन्स्पेक्टर पाटील साहेबांना दाखवला . आमच्या दोघांच्याही डोक्यात जी गोष्ट आली नाही ती गोष्ट पाटील साहेबांना समजली . काहीतरी कोडं सुटल्यासारखं जरासं उत्साहात ते म्हणाले
" अरे या फोटोग्राफ्स वरून तुम्हाला काही कळले नाही का...?
मी माझं चक्रावलेले डोकं घेऊन मूर्खपणे त्यांना प्रश्न विचारला की... अहो साहेब त्या फोटोमध्ये आपला गावातील प्रसिद्ध वकील तलाठी आणि आपले विद्यमान आमदार आणि स्वतः पत्रकार ही आहे . एकाच मुलीबरोबर ते सारे अश्लील चाळे करत आहेत . आता त्या तिघांनी जर पत्रकाराला मारलं असतं तर हा पेन ड्राईव्ह गायब व्हायला हवा होता आणि जर त्यांनी मारलं नाही तर दुसर्‍या कोणी मारलं असावं ...
" अरे निकम साधी गोष्ट आहे पत्रकारांनी vigilant killer चा प्रश्न विचारला होता ना त्याचे उत्तर आता नक्कीच मिळाले . या फोटोग्राफ्स मध्ये जी मुलगी आहे ना त्या मुलीने साधारणपणे दोन-अडीच वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. साधी सिंपल आत्महत्याची केस म्हणून ती क्लोज केली होती . त्याच मुलीसोबत हे व्हिडिओ आहेत . ती केस मंगलपुर पोलीस स्टेशनच्या अख्यत्यारीत नव्हती , पण माझ्या अजूनही चांगलंच लक्षात आहे . त्या मुलीने चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की ' मी काही अशा कृती केल्या आहेत ज्याची मला लाज वाटत आहे आणि म्हणून मी आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येचा दोष कोणालाही देऊ नये...' त्यावेळी त्या मुलीच्या घरातील लोकांनी आमची मुलगी आत्महत्या करू शकत नाही हा खूनच आहे म्हणून कालवा केला होता . त्यांनी अप्रत्यक्षपणे यामागे आमदाराचा हात असल्याचाही सुचवण्याचा प्रयत्न केला होता . पण त्यांचा आवाज दाबला गेला होता . आता आपल्यासाठी हा व्हिडिओ लागलाय याचा अर्थ काय होतो...
सारं काही समजल याप्रमाणे मी म्हणालो
म्हणजे साहेब तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या चौघांनी मिळून त्या मुलीवर बलात्कार केला असावा आणि नंतर तिचा खून करून , त्याला आत्महत्याचे स्वरूप दिलं असावं...
होय अगदी तेच म्हणायचं आहे मला .. साहेब जराशी लिंक लागल्यामुळे उत्साहात आले होते . तरीही पवार साहेब न समजून म्हणाले
" अहो पण साहेब या गोष्टीमुळे पत्रकारचा खून कोणी केला हे कुठं सिद्ध होतय.... आपल्याला फक्त एवढेच कळले की या चौघांनी मिळून एकाच मुलीवर बलात्कार केला होता...
जरासा विचार करा पवार , या पत्रकाराला कोण मारू शकेल , आणि त्याचबरोबर हा पेनड्राइव्ह ही त्या ठिकाणी ठेवू शकेल ....
मी अति उत्साहित होऊन बोलून गेलो... असा कोणीतरी व्यक्ती जिचं या मुलीवरती प्रेम असेल किंवा असा कोणीतरी व्यक्ती ज्या व्यक्तीकडे हा पेन ड्राईव्ह असेल आणि तिच्या मनात ह्या अन्यायाबाबत चीड असेल किंवा असा व्यक्ती जिला या चौघांची हे धंदे माहीत असतील आणि तिने या चौघांना धडा शिकवायचे ठरवले असेल . ...
बरोबर आहे पण आगोदर क्लोज झालेली ती आत्महत्येची केस चंदनपुर पोलीस स्टेशनमध्ये उघडायला सांगायला पाहिजे... मग आपण पत्रकाराच्या खुण्याचा शोध घेऊ....
त्यादिवशी पाटील साहेब भलत्याच आवेशात आले . या केसमध्ये आमदाराचा समावेश होता , शक्यतो अशा मोठ्या केसला वर कळवूनच पुढील कारवाई केली जाते पण पाटील साहेबांनी त्यादिवशी सरळसोट प्रेस कॉन्फरन्स घेऊन टाकली .
" आत्ताच हाती लागलेल्या नवीन पुराव्यानुसार या केस मध्ये थोडी प्रगती झाली आहे . मंगलपुर मधील वकील रमाकांत शिंदे , गाव कामगार तलाठी बाबुराव माने , विद्यमान आमदार सदाशिवराव ढोले व स्वतः पत्रकार माणिकराव लोखंडे या चौघांनी मिळून दोन अडीच वर्षापूर्वी आत्महत्या केलेल्या मुलीबरोबर अश्लील चाळे केल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ असलेला पेन ड्राईव्ह आमच्या हाती लागलेला आहे . खून करणाऱ्या व्यक्तीने तो पेन ड्राईव्ह त्याठिकाणी पुराव्यासाठी ठेवला असावा असा आमचा कयास आहे . आत्महत्या म्हणून बंद केलेली ती केस पुन्हा एकदा उघडण्यात येणार आहे . आणि राहिलेल्या तीनही व्यक्तींवर ती मुकदमे चालवण्यात येणार आहेत...."
" ते ठीक आहे पण स्वतः कायदा हातात घेऊन स्वतः न्यायनिवाडा करणाऱ्या त्या खुन्याचा तपास कुठपर्यंत आला आहे असा उद्घाट प्रश्न एका पत्रकारांने विचारला...
"त्या बाबतीतही तपासात प्रगती झालेली आहे . ज्या कोणी व्यक्तीने हा पेनड्राइव्ह त्या ठिकाणी ठेवला असावा त्या व्यक्तीचे पेनड्रायव्हरती बोटाचे ठसे उमटले असतील. आणि पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरच येईल त्यामध्ये पत्रकाराचा मृत्यूबाबत कळेल . त्यानंतर जो कोणी खुनी आहे तो आमच्या हातात आल्यावाचून राहणार नाही....
त्यानंतर बरेच प्रश्न झाले साहेबांनी उत्तरे दिली आणि पत्रकार परिषद झाल्यानंतर दोन मिनिटांच्या आतच पोलीस स्टेशनमधील फोन खणखणू लागले. वरिष्ठांचे फोन येत होते . पाटील साहेबांना वरून बर्‍यापैकी झापण्यात आले असावे असे एकंदरीत त्यांच्या देहबोलीवरून सांगता येत होते . पण एक वेगळेच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ती दिसत होतं .
पत्रकार परिषद झाल्यानंतर सर्वत्र एकच वादळ माजलं . सोशल मीडिया वरती या तिघांना गुन्हेगार ठरवण्यात आलं होतं . त्यांच्या नावाची छी थू होऊ लागली होती . विद्यमान आमदार सदाशिवराव ढोले यांच्या पक्षाचं सरकार राज्यात असल्यामुळे विरोधी पक्षाला जळते कोलीतच हाती लागलं होतं . दोन अडीच वर्षांपूर्वी झालेली आत्महत्येची केस साहेबांनी आम्हाला सविस्तर समजावून सांगितली . साहेबांनी स्पष्टपणे निष्कर्ष काढला होता की आत्महत्या केलेल्या मुलीवरती या चौघांनी बलात्कार केला होता आणि त्या बलात्काराची शिक्षा म्हणून जो कोणी खुनी होता त्याने पत्रकारला मारलं होतं आणि तो पेन ड्राईव्ह इतर तिघांना अडकवण्यासाठी याठिकाणी ठेवला होता .
त्यावेळी माझ्या मनात मलाही न कळत समाधानाची भावना आली होती . बलात्कारासारखा गुन्हा अजूनही रिपोर्ट केला जात नाही . त्यामुळे बलात्कारी लोकांवरती केस चालवण्यात जात नाहीत .आणि ज्या वेळी गुन्हा रिपोर्ट केला जातो त्यावेळी आरोपी थोडीफार शिक्षा भोगतात किंवा मोकळे सुटले जातात . बलात्कारावर ती निर्बंध बसेल किंवा न्यायव्यवस्थेचा धाक राहील अशी परिस्थिती अजूनही नाही . राजरोसपणे लहान मुले व स्त्रियांवरती बलात्कार होत राहतात . पण उगाच बदनामी होईल , चारचौघात अब्रू जाईल म्हणून लोक तो गुन्हा दाखल करत नाहीत . आणि जे लोक गुन्हा दाखल करतात त्यांच्यावरती बऱ्याच वेळा दबाव आणला जातो . त्यामुळे त्यांनाही तो गुन्हा माघारी घ्यावा लागतो . पोलिस यंत्रणा जेवढं शक्य असेल तेवढ्या गोष्टी करते आणि शेवटी या गोष्टी सामान्य जनता आणि न्यायव्यवस्थेच्या हातात असतात . ते फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ इतके बिभत्स होते की मला पावलेही नाहीत .त्यावरून त्या पत्रकार यांच्या चरित्राची झलक दिसत होती . आणि हे व्हिडिओ काही गपचूप काढले नव्हते तर त्या चौघांनी एकमेकांची व्हिडिओ शूट केले होते . व्हिडिओमध्ये चेष्टामस्करी चालू होती . घाण भाषेत शिव्या दिल्या जात होत्या . मुलगी अर्धवट शुद्धीत असल्यामुळे प्रतिकार करू शकत नव्हती . अशा गुन्हेगाराला न्यायव्यवस्थे समोर उभे केले , तर असे गुन्हेगारही आपल्या संरक्षणासाठी चांगले चांगले वकील उभा करतात व न्यायव्यवस्थेला फसवून समाजात उजळ माथ्याने फिरतात . नैतिक दृष्ट्या पत्रकाराचा खून जरी चुकीचा असला तरी मला नकळत आनंद झाला होता . मनोमनी त्या खून करणाऱ्या व्यक्तीला आभार मानणार होतो पण पहिला खून होऊन एक दिवसही उलटला नव्हता . तोवर दुसरा खून झाला व तोही अगदी पहिल्यासारखाच . तो दिवस होता 10 जुलै 2018 त्या दिवसापासून डोकेदुखी अधिकच वाढत गेली ...
क्रमःश

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED