कादंबरी - जिवलगा ...भाग-६ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा ...भाग-६

धारावाहिक कादंबरी-

जिवलगा...

भाग- ६ वा

ले- अरुण वि. देशपांडे

-------------------------------------

सकाळी सहा वाजता पुण्याला पोंचणारी बस काल रात्रीच्या गोंधळामुळे तब्बल तीन तास उशिराने का होईना पोंचली खरी एकदाची.

सगळ्यांनी "पोंचलो रे बाबा एकदाचे ",असे सुटकेचे निश्वास सोडीत, आपापल्या भागात सोडणारे ऑटो शोधण्यास सुरुवात केली.
नेहाने स्वारगेटला जाण्यासाठी रिक्षा केली,ठाणे, मुंबईसाठी इथूनच बसने जाणे योग्य ",अशी सूचना मावशीने अगोदरच देऊन ठेवली होती.

नेहाचे फ्रेश होऊन झाले, चहापाणी करून झाल्यावर एकदम छान वाटले,

काल रात्रीच्या प्रवासातल्या प्रोब्लेमचं भूत आता नक्कीच आपल्या मानगुटीवरन उतरले आहे, असे वाटून, तिला खुप हायसे वाटले.
ठाणे जाणारी बस लागली, आणि नेहा तिकीट घेऊन बस मध्ये बसली.पाच- दहा मिनिटानंतर तिला अधिक रिलॅक्स झाल्या सारखे वाटले,

दहाला निघणारी बस एक-दीड पर्यंत पोंचणारी,या हिशेबाने मग ,,
नेहाने अगोदर मावशीला फोन लावला,प्रवासात झालेल्या सगळ्या प्रकारा बद्दल थोडक्यात तिला सांगितले,

ठाण्यात पोंचण्याच्या वेळी,आत्ता पुण्याहून निघते आहे,काळजी करताल तुम्ही, म्हणून सांगितले.
नेहाने सांगून झाल्यावर,

मावशी म्हणाली,अग, नेहा, ऐक ना जरा,सकाळी वेळेत आली असतीस आम्ही येणारच होतो,

पण आता आज दुपारच्या वेळेत तुला घेण्यासाठी काका किंवा मी येऊ शकत नाही,

आज दुपारी काकांचा चेकअप करायचा आहे, डॉकटरची अपॉइंटमेंट आम्ही तीन महिन्यापूर्वीच घेतली आहे,

त्यासाठी म्हणूनआम्ही साडेबारा पासूनच हॉस्पिटल मध्ये असुत.


पण, तू काळजी करू नको,तू बस स्टॉप वर उतरलीस की फोन कर, दहा मिनिटात, आपली गाडी घेऊन मधुरीमा येईल, तुला घेण्यासाठी,

मी कारचा फोटो पाठवते, म्हणजे नंबर पाहून तू गाडीजवळ गेलीस की, मधू तुला ओळखेल,आणि ती तुला सरळ घरी घेऊन जाईल.

आणि मग तू फ्रेश हो, मधू बरोबर जेवण कर, नंतर गप्पा नि आराम करा तुम्ही दोघीजणी

मग साडेपाचपर्यंत तुम्ही दोघी हॉस्पिटला या,मग आपण सगळे मिळूनच घरी येऊत.ठीक आहे ना ?
हो मावशी, डोन्ट वरी, तू सांगितल्या प्रमाणे करीन मी.


नेहाच्या मनात मावशी आणि काकांच्या बद्दल खूप आदर होता,एक अर्थाने नाईस- पर्सनस" म्हणून आयडॉल होते तिच्यासाठी हे दोघेजण.

मावशीच्या या नीटनेटकेपणाने वागण्याची सवय नेहालाच काय, सगळ्यांना खूप आवडतं असे,सरळ, स्पष्ट, मुद्देसूद, सांगणार मावशी,
उगीच अर्धवट बोलून, सांगून - गोंधळ घालणे ",असे प्रकार मावशी आणि काका करीत नसत,

कदाचित यामुळे बेशिस्त, धांदरटमाणसे नेहमीच या दोघांना घाबरून राहायची.


काकांचा चेकअप, मावशी त्यांचे सोबत हॉस्पिटलमध्ये हे सगळं ठीक आहे, पण या गडबडीतही मावशी माझ्यासाठी गाडी पाठवते आहे,

खरंच आपली मावशी ग्रेटच आहे.पण- आपल्यासाठी आज गाडी घेऊन येणारी मधू..मधुरीमा नेमकी कोण ?


काकांच्या फॅमिलीत मधुरीमा नावाची व्यक्ती असल्याचे आठवत नव्हते,मावशीने अगदी हक्काने हिला काम सांगते, आणि ती पण ऐकते"

,याचा अर्थ ती या फॅमिलीला खूप जवळची असणार, आपण खुपदा आपल्या एखाद्या फॅमिली फ्रेंड बद्दल. म्हणतोच की - अगदी घरच्या सारखी आहे हो ",ही मधुरिमा अशीच एक जवळची मेम्बर असणार .
मधुरीमा आपल्या वयाची असेल तर छानच,सेम एज -फ्रेंड", छान जमवून घेऊ तिच्याशी,मोठी असेल तर- दीदी किंवा ताई ,

त्याही पेक्षा मोठी असेल तर आणखी एक -मावशी "आपल्याला मिळणार म्हणायची",नेहाला या विचारांची गम्मत वाटली-


नेहा विचारात गुंगली -आपले मन किती हुरहूरले आहे - आपण आताघरापासून दूर आलो की, आपल्या माणसांची किंमत कळते,

त्यांचे प्रेम, काळजी ,जिव्हाळा,हे जाणवू लागते ",या आधाराविना कसे होणार या पुढे आपले ? ,

नव्या ठिकाणी, अनोळखी माणसाच्या सहवासात ,आपल्याला कुणी आधार देऊ शकेल असा एखादा " जिवलग.." भेटेल काय ?
ही भीती मनात आहे

आणि मावशीने पाठवलेली ही मधुरीमा " आपल्यासाठी कशी असेल ? तिच्या आताच्या येण्याने

आपल्या मनात "इथे कुणी आपले असणारे नक्कीच आहे", ही भावनाच किती धीर देते आहे ,देवा- ही मधुरीमा माझी बेस्ट फ्रेंड होऊ दे रे बाबा !
नेहा अशा विचारात असतांना तिचा स्टॉप आला, बॅगा घेऊन ती खाली उतरली, तिने मावशीला फोन करून ,ती स्टोपवर थांबली आहे असे सांगितले.

नेहा तुला वीस मिनिटे तरी वाट पाहावी लागेल ,मधुरीमा निघालीय तुला घेण्यासाठी,पण,

पण ती आता ट्राफिक मध्ये अडकली आहे ,काय करणार ना ?आपल्या हातात थोड्याच असतात या गोष्टी ?


स्टोप वर नेहा थाम्बली, रोडवरची गर्दी पाहण्यात वेळ घालवणे भाग होते.आजूबाजूला तिची नजर फिरत होती,

काही वेळातच तिच्या नजरेस निळ्या रंगाची कार उभी दिसली, फोन मधला फोटो पाहून कारचा नंबर तोच आहे याची खात्री पटताच ती कार जवळ जाऊन थांबली.
तिला आलेली पाहून कारमधून तिच्यपेक्षा मोठी दिसणारी -असणारी एक स्मार्ट लेडी फिगर उतरली,

हसतमुख चेहेरा, गोरापान वर्ण, जिन- टी शर्ट, डोळ्यावर स्टायलिश सन- ग्लास",

कुणी स्टार आहे की काय ही ?
सुरेख- सुंदर- स्मार्ट म्हणजे अगदी परफेक्ट थ्री- S.S.S..नेहा तिच्याकडे काहीच न बोलता फक्त पहातच राहिली,


डोळ्यावरचा गॉगल काढीत नेहाकडे पाहत म्हणाली-

" हॅलो नेहाकाकू, वेलकम इन ठाणे,मी मधुरीमा, आपणास घ्यावयास आले आहे,आपण बसावे कार मध्ये, म्हणजे निघुया घराकडे ..


आपण तिच्यापेक्षा लहान आहोत हे दिसत असून ही ,आपल्याला "नेहाकाकू " ?असे का बरे बरे म्हणत आहे ? हे असे का बोलती आहे ही,?
क्षणभर नेहाला काहीच कळले नाही, घरी गेल्यावर तिला ,

ती असे का म्हणाली याचा अर्थ विचारूच तिला, असे ठरवून नेहा गाडीत बसली.वीस मिनिटात कार मावशीच्या घरासमोर थांबली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धारावाहिक कादंबरी -

जिवलगा ..

भाग -६ वा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२