तोच चंद्रमा.. - 13 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोच चंद्रमा.. - 13

१३

भेट ब्रुनीची..

सात अाठ दिवस गेले मध्ये. आॅफिसच्या कामाचा डोंगर उभा समोर. इतक्या वर्षांत अकाउंटचे उंट कसे हाकावेत याची माहिती नसलेल्या कुणी मेन्टेन केलेली बुक्स. त्यातून हवी ती माहिती काढून तिची व्यवस्था लावणे कर्मकठीण. त्यामुळे ती शिस्त लावेतोवर मान मोडून कामाला पर्याय नव्हता. आणि माझ्या आवडीचे काम ते, त्यामुळे मी तसा खूश होतो. मी सारे हिशेब सांभाळण्यात सारे विसरून गेलो की काय असे वाटले एका क्षणी. राॅबिनशी पण जास्त बोलणे नाही नि ब्रुनीबद्दलही फारसा विचार नाही. रात्री येईपर्यंत थकायला होई नि मी जास्त विचार न करता ताणून देई. बिचाऱ्या राॅबिनशीही फारसे बोलणे झाले नव्हते.. त्यामुळे त्याला काय वाटेल असा विचार आला नि क्षणभर तो ह्युमनाॅईड असल्याचा विसर पडल्याचीही गंमत वाटली मला!

दुपारी खूप दिवसांनी काम आटोक्यात आलेसे वाटून काॅफी पित बसलो तर समोर ब्रुनी उभी! मला आश्चर्य वाटले. ब्रुनी अशी आॅफिसात आधी कधी अाली नव्हती आणि आज अचानक!

"वाॅव! तू! कधी आलीस?"

"जस्ट नाऊ डियर! तुम्हाला आठवण येत नाही मग वुई नीड टू कम हियर!"

माझ्या कानांवर विश्वास बसेना! ही असे बोलतेय म्हणजे. पण मागे ती मला क्लायंट म्हणालेली, तेव्हा हे तसेच काही असेल तर?

"बस. हॅव काॅफी!"

"यस. शुअर. तू म्हणतोस तर बसतेच. आयॅम नाॅट इन अ हरी!"

"आम्ही देखील घाईत नसलो की हरी हरी करतो!"

मला वाटले या परग्रहवासिनीला कळणार नाही पीजे .. पण नाही. कळला तिला तो. आपले सुंदर दात दाखवत हसली ती मस्त. आणि त्या पीजेचे सार्थक झाले जणू"

"आय केम टू सी यू.."

मला वाटले तिला विचारू.. एनी पेमेंट पेंडिंग? पण नाही विचारले. ती खरंच मला भेटायला आली असेल तर? उगाच कुणाला दुखवणे स्वभावातच नाही माझ्या.

"थ्यांक्स. मी पण तुझाच विचार करत होतो.. त्या दिवशी पार्टी मस्त झाली नाही?"

"हो ना! धिस कांदळगावकर्स डू इट व्हेरी वेल. म्हणून मी पण आले मुद्दाम पार्टीला. नाहीतर केटरिंगवाले स्वतःच जेवायला येतील का?"

"हुं. नाइस आॅफ यू टू जाॅइन अस. आय कान्ट गेट ओव्हर दॅट इव्हिनिंग. थ्यांक्स टू यू ब्रुनी!"

"इव्हन मी. आय लाइक्ड युवर गिटार सो मच! वाॅव! हाऊ डू यू डू इट यार?"

मनात मी एक जुने पुराणे गाणे म्हणत काॅफीचा कप तिच्या समोर ठेवला.. 'तू कहे अगर जीवनभर मैं गीत सुनाता जाऊं..' ती हातात कप घेऊन बसली समोर ..

"एकदा ना आपण गिटारचा प्रोग्राम करूयात .. हाऊ'ज द आयडिया?"

"एक्सलंट! गिटार म्हटले की आयॅम आॅलवेज रेडी.. कुठे नि कधी बोल फक्त.."

"वुई विल अरेंज.."

"यस.. आणि माझ्यासाठी गिटार पण कर अरेंज. आय कुडन्ट गेट इट फ्राॅम इंडिया."

"बघू. करूयात काहीतरी. पण आय टेल यू.. दॅट प्रोग्राम विल बी फाॅर लिमिटेड पीपल.. लिमिटेड.. मे बी वुई बोथ ओन्ली."

"तू म्हणशील तसे.. ब्रुनी. द वे यू विश!"

लोक काय नजरेत प्रेमबिम वाचतात. मला काय असले वाचता आले असते तर.. तिच्या बोलण्यात काही हिंट मिळत असावी असे वाटत होते.. एकाएकी मनात आले.. राॅबिन .. ही शुड मॅप हर ब्रेन .. जमत असल्यास. एलियन्सचे ब्रेन मॅपिंग त्याच्या प्रोग्राम मध्ये फीड केले असेल का?

"काॅफी इज नाइस. आज काय काम नाही वाटते .. बसलास नुसता.. "

"नाही गं. गेला आठवडाभर आय वाॅज बिझी. आज दुपारी जरा वेळ मिळाला .."

"आणि आय टुक अवे दॅट.."

"नो नो ब्रुनी.. इट्स सो प्लेझंट टू हॅव यू अराऊंड. तू आलीस, मला खूप बरे वाटलेय.. थ्यांक्स फाॅर कमिंग!"

"हे अंबर, आय हॅव अ सजेशन डियर.. लेट्स् बी फ्रेंडस.. म्हणजे ना हे थ्यांक्यू नि प्लीज कॅन बी डिबार्ड .. व्हाॅट से?"

"ओह! तू किती छान बोलतेस ब्रुनी!"

"थ्यांक्स.."

"दॅट्स अ नो बाॅल ब्रुनी.."

"व्हाॅट?"

"तूच म्हणालीस ना लेट्स् बी फ्रेंड्स.. अँड नो थ्यांक्स.."

"येस .. बट वुई हॅवन्ट साइन्ड द एमओयु.. आॅफ फ्रेंडशिप!"

"ओह! तुला आॅफिशियल लेटर हेड वर हवेत?"

"यस्.. अँड अ शेकहँड इज इनफ!"

असे म्हणून तिने हात पुढे केला. तिचा तो मऊ मुलायम हात हातात घेत म्हणालो,

"खरं सांगू आजवर तुझ्या इतकी हुशार मुलगी पाहिली नाहीये मी. आणि खरं सांगू तर सुंदर ही."

"बट यू मस्ट बी हॅविंग अ गर्लफ्रेंड.."

"मी? नाही गं. नेव्हर हॅड वन.."

"व्हाय?"

"माझी कोण होणार गर्लफ्रेंड.. बट यस.. वुड लाइक टू हॅव वन!"

मी बऱ्यापैकी कात टाकली होती .. माझे मलाच जाणवले बोलण्यातून. ब्रुनी पण तशी मोकळी बोलण्यात त्यामुळे आपोआप शब्द येत गेले ..

"सो.. सर्चिंग फाॅर वन?"

"खरं सांगू.. वाॅज सर्चिंग फाॅर वन.. प्रोबॅबली हॅव फाऊंड हर.."

"वाॅव! द लकी वन!"

"तुला खरंच वाटतं असं?"

"हो. दॅट वर्षा हॅड आॅल प्रेझ फाॅर यू. काॅलेजात तू हुशार होतास फार म्हणाली ती."

"मी? असेन पण तुझ्या इतका नाही. तुझ्या नुसत्या हसण्या नि बोलण्यात जाणवते, धिस ब्रुनी इज सुपर ब्रेनी! तू ब्रुनी नाहीस .. ब्रेनी आहेस!"

"वा! हरभऱ्याच्या झाडावर चढवतोस मला? पडेन ना मी खाली!"

मला वाटले तिला तिच्या ह्या सुपर ब्रेनचे रहस्य विचारावे. पण कदाचित विषय तिच्या एलियन असण्याकडे वळेल. आणि इतक्यात तो विषय नकोच!

"हा! हा! बाय द वे.. ती नॅचरल पार्कची पिकनिक कधी आहे? लकीली तू लकी विनर आहेस त्याची!"

"तुला सांगू .. नॅचरल पार्कमधल्या पिकनिकला मला नाही जावेसे वाटत.."

"बाप रे! मग मी कसा जाणार?"

"अरे नाही.. पण मी येणार आहे .. तू जातोयस तर मी ही येईन.. अंबर."

माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ब्रुनी खूपच ओपन होती. आणि तिच्या बोलण्यात चांगलाच आत्मविश्वास होता.

"थ्यांक्स."

"सी.. नो बाॅल अगेन.. ते लोक कळवतीलच. दॅट रघुवीर इज व्हेरी सिस्टमॅटिक. तो चुकत नाही कधीच! इनफॅक्ट असा पृथ्वीवासी मी क्वचितच पाहिलाय."

ब्रुनीने स्वत: एलियन असल्याचे सांगितले नव्हते मला.. पण ते माहिती असावे असे बोलत होती ती. तिला ती एलियन असल्याचे ना अप्रूप असावे ना गंड. एखादी साधी बाब असल्यासारखा तो उल्लेख परत आला तिच्या बोलण्यात. त्यातला एलियन असण्याचा मुद्दा माझ्यासाठी किती महत्त्वाचा ठरणार कुणास ठाऊक पण तिच्या वागण्यात तरी ते महत्त्वाचे नाही एवढेच जाणवत होते.

"आणि हाऊ डू यू फाइंड इट हिअर?"

"अगं सध्या इतका बिझी आहे ना की वेळ नाही, पण इथे आधी कंटाळा यायचा .. आता अायॅम फिलिंग लाइक अॅट होम! इस्पेशियली टुडे!"

"व्हाय टुडे?"

"गेस.."

"बिकाँज आय केम हिअर?"

"आय वोन्ट टेल यू ब्रुनी!"

"ओके .. ऐक एक.. एकदा कम टू माय होम!"

ब्रुनी मला तिच्या घरी बोलवत होती. हीच ती वेळ आहे का तिच्याबद्दल जाणून घ्यायची. मला वाटले नाही ..

"यस.. अाॅफकोर्स. तू म्हणशील तेव्हा.."

"आता काय घरी निघणारेस?"

"यस ब्रुनी. आजचे काम संपवले. निघेन नंतर. तुला जायची घाई नाही ना?"

इथवर संभाषण एखाद्या स्वप्नात घडावे तसे घडले. आणि तिचा फोन वाजला.. ती बोलत असताना मी तिच्याकडेच पाहात होतो. क्यूट शी इज. पृथ्वीवर कुणाशी तुलना होईल हिची? खरेतर आपल्याला फक्त सिनेमातल्या हिराॅइन्स ठाऊक असतात .. तेही त्यांचे कितपत सौंदर्य नैसर्गिक असते कुणास ठाऊक! ती बोलेपर्यत एक निष्कर्ष काढला मी.. ब्रुनी सारखी ब्रुनीच! फोनवर बोलून झाले न ती म्हणाली,

"मला जावे लागेल डिअर.. काॅल फ्राॅम द आॅफिस"

"ओह! शेवटी काम लागलेच मागे! ही काॅफी संपवून जा!"

"हो ना!"

ब्रुनी काॅफी पित बसलेली आणि इतक्यात राॅबिन आत शिरला.

"अंबर.."

"अरे राॅबिन .. ये ना!"

राॅबिन ब्रुनीला बघून थबकला असावा.. तो आत आला..

"ब्रुनी.. हा माझा खास दोस्त .. राॅबिन. आणि राॅबिन .. ही ब्रुनी. मून अँड मून केटरिंगची ब्रेन.. ब्रुनी .."

राॅबिनने हात पुढे केला. ब्रुनी हस्तांदोलन करत म्हणाली, "नाइस टू मीट यू राॅबिन.. मी निघते अंबर. विल कॅच अप लेटर.."

ती निघून गेली. आणि राॅबिन म्हणाला, "तुला रोज उशीर का होतो ते कळले आता!"

हे म्हणजे अति होते.. रोज रात्ररात्र जागून काम केलेले मी.. सारा गृहपाठ पूर्ण करावा नि वर्गात गृहपाठाची वही न्यायला विसरावी तसे झाले माझे.. टीचर म्हणणार.. नुसते खेळायला हवे.. हुंदडायला हवे..

"नाही रे. आज पहिल्यांदाच आली ती."

"असेल. पण छान आहे."

"थ्यांक्स!"

"तू कशाला थ्यांक्स बोलतोयस.. काँप्लिमेंट इज नाॅट फाॅर यू डियर!"

"खरंय. तर कसा काय आलास?"

"कसा म्हणजे? का आलास विचारतोयस का? नाही इफ आय हॅव डिस्टर्बड यू.. बोथ.."

"राॅबिन तू.. बोल."

"काही नाही. बरेच दिवसात बातचीत नाही. मॅडम इज वरीड. मॅडम म्हणाल्या, काय भानगड आहे पहा म्हणून!"

"राॅबिन, डोन्ट टेल मी, आईने भानगड शब्द वापरला आणि.. तू ती सांगितलीस.."

"दोन्हीचे उत्तर एकच.. एन् ओ.. नो. मी माझ्या प्रोग्राम मध्ये बदल केलेला सांगितलं होते तुला .. सो डोन्ट वरी!"

"अरे, तुला आईशी बोलणे झालेले सांगितले नाही मी.."

"तू नाही सांगितले पण मला माहितीय. मॅडमनी माझ्याशी पण डिस्कस केले.."

"काय?"

"हेच ब्रुनी अँड आॅल!"

"म्हणजे?"

"अरे, मॅडम वाॅज आस्किंग.. एलियन्स असतात का? आणि मी कधी पाहिलेय का कुणाला?"

"मग? तू ब्रुनीबद्दल सांगून टाकलेस?"

"अंबर ब्रो.. तुला काय वाटते?"

"मला काय वाटते त्यापेक्षा तू काय केलेस ते सांग!"

"तर ऐक.. मी माझे सारे लिंग्विस्टिक स्किल वापरून उत्तर दिले .. त्याला काय म्हणतात.. एक मिनिट .. हां नरो वा कुंजरोवा!" राॅबिन त्याच्या मशिनीत पाहात म्हणाला.

"अरे मी सांगितले, एलियन्स असणारच.. पण त्यांना एलियन्स म्हटल्याने ते अलायनेट होतील! आणि कीपिंग ब्रुनी इन माइंड.. मी माझ्या कल्पनेतली एलियन ही डिस्क्राइब केली! सुपर ब्रेनी! आणि विथ आॅल फीचर्स आॅफ ब्युटी!"

"आणि उद्या आई ब्रुनीला भेटेल तेव्हा?"

"उद्या? यू आर टू सुपर फास्ट!"

"उद्या म्हणजे पुढे केव्हा तरी. डोन्ट टेक लिटरल मिनिंग यार.."

"ते कळले मला, पण तुझे कसेय ना.. जस्ट अ मिनिट .." तो मशिनीत पाहात म्हणाला पुढे,

"महाभारतात अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळा दिसत होता ना तसा तुझा ब्रुनीवर डोळा आहे!"

"पण अर्जुनाला तो डोळा फोडायचा होता.."

"हुं.. नाऊ इट्स युवर टर्न ब्रो.. डोन्ट टेक लिटरल मिनिंग.. तर मी इन जनरल सांगितले मॅडमना. त्यांनी मला त्यांच्या पुस्तकाची स्टोरी सांगितली. त्यात मी एक बदल करायला सांगणार होतो.. फ्राॅम माय एक्सपिरियन्स.."

"काय?"

"हेच.. लेट द हिरो बी अॅन एलियन!"

"तू सांगितले नाही ना?"

"अजून नाही .. पण सांगेन!"

"यू नाॅन सेन्स.. डोन्ट मेक मी टेन्स."

"अरे, एक चांगली गोष्ट आहे, युवर मदर इज ओपन फाॅर एलियन्स .. चल. जाऊ घरी. बाकी मला तुझ्या लव्हस्टोरीतले डिटेल्स सांगत जा.."

"व्हाय? हिअर आयॅम क्युरीयस अबाऊट क्युरी .. पण तू कुठे सांगतोस तुझी स्टोरी?"

"चल. उगाच डोन्ट मेक मी जेलस.. विश आमच्यात ही फॅकल्टी डेव्हलप होईल .."

"राॅब, हल्ली सीरियल्स फार पाहतोयस.. आय थिंक धिज सीरियल्स हॅव बिकम युवर स्टेपल डाएट सिरियल! बिघडत चाललाहेस तू!"

"तुझ्या सारखा? पण आय टेल यू, नथिंग मोअर ब्युटीफूल दॅन टू सी .. दोन प्रेमी जीव! वाॅट्स दॅट काॅल्ड.. युगुल!"

"वा! तू आता कविता करशील की काय?"

"असेल प्रोग्राम मध्ये तर करीनही!"