Rushipanchami books and stories free download online pdf in Marathi

ऋषीपंचमी

ऋषी पंचमी
भाद्रपद शुद्ध पंचमी ही भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.

हिंदूंच्या चालीरीतींप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमी हे स्त्रियांनी करावयाचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे व षोडशोपचारे पूजा करतात.
यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले.
कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्रि या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि वसिष्ठांची पत्नी अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते.
या दिवशी बैलाच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतःच्याच कष्टाचे अन्न खावे, हा यामागचा संकेत वा संदेश आहे.
अशा रितीने ‘स्वकष्टार्जित’ या शब्दाला ऋषींनी प्रतिष्ठा दिलेली आहे. आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धान्ताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करत राहावे, याची आठवण देण्यासाठी ही ऋषिपंचमी आहे.
गणेशोत्सवाच्या काळात भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत केले जाते.

स्त्रिया ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात.
ऋषींबद्दल वाटणारी आपुलकी व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ऋषीपंचमीचा सण साजरा केला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी व्रत करणार्‍या स्त्रीया बैलांच्या श्रमातून न पिकवलेल्या भाज्यांचा, धान्यांचा आहारात समावेश करतात. यादिवशी रानभाज्या,कंदमुळं आणि केवळ हाताने कष्ट करुन पिकवलेले अन्न सेवन करावे असे मानले जाते. या दिवशी आपल्या संस्कृतीतील ऋषींनी दाखविलेल्या मार्गावरून चालण्याची प्रतिज्ञा करण्याचा हा दिवस मानला जातो
सकाळी उठून आगाड्याची सात पानं आणि सात काड्या यांची प्रत्येकी पुरचुंडी बांधली जाते.
आंघोळ करताना सात वेळेस ही पुरचुंडी डोक्यावरून मागे टाकावी असे सांगितले जाते. पूर्वी स्त्रिया ही आंघोळ एकत्र विहीरीवर किंवा नदीवर करत असे. आंघोळीनंतर नवे कोरे वस्त्र घालून पुढील पूजा केली जाते. ऋषीपंचमीच्या दिवशी सप्तऋषींचा फोटो लावून पूजा केली जाते. यानंतर ऋषीपंचमीची कथा वाचली जाते. सप्तऋषींना नमस्कार करुन आपली काही चूक झाली असल्यास माफी मागतली जाते. प्रामुख्याने ही पूजा स्त्रिया करतात.
पुराणात त्यासंबंधी आलेली आख्यायिका अशी -
वृत्राचा वध केल्याने इंद्राला ब्रह्महत्येचे जे पातक लागले ते त्याने अग्नी, नद्या, पर्वत आणि रजस्वला स्त्रिया यांच्या ठिकाणी विभागून दिले.
त्यामुळे मासिक धर्माच्या काळात स्त्रियांच्या हातून झालेल्या संपर्काचे प्रायश्चित्त घेण्यासाठी स्त्रियांनी ते व्रत करावे असे त्याबद्दल सांगितले आहे.
त्याची कहाणी अशी सांगतात
विदर्भ देशांत उत्तंक नावाचा सदाचारी ब्राम्हण राहत होता .
त्याच्या बायकोचे नाव सुशीला होते व ती पतिव्रता होती .
त्यांना एक मुलगा व एक मुलगी होते .
मुलगी विवाहयोग्य झाल्यावर त्यांनी चांगल्या घरात तिचे लग्न करून दिले .
परंतु दुर्दैवाने तिच्या पतीला अपघात झाला .
व तो त्यात मृत्युमुखी पडला आणि ब्राम्हण कन्या काही दिवसातच विधवा झाली .
मुलीच्या आयुष्यातील अचानक घडलेल्या या भयानक घटनेने पती पत्नी दोघेही दुख्खी झाले .
त्याना गावात राहण्यास काहीच रस वाटेना .
दुख्खी ब्राम्हण पतीपत्नी क्न्येसाहित गंगा तीरावर झोपडी बांधून राहू लागले .
व तेथेच काहीतरी करून आपली उपजीविका करू लागले .
एक दिवस तर आणखीन भयानक प्रकार घडला ब्राम्ह्णकन्या झोपली असताना अचानक तिचे शरीर किड्यांनी भरले व ती वेदनेने विव्हळू लागली .
तिने ताबडतोब हे आपल्या आईला सांगितले .
आईने हे सर्व तिच्या पतीला सांगुन माझ्याच मुली संबंधात अशा घटना होण्याचे कारण विचारले .
उत्तंक ने समाधी लावली असता त्याला याचे कारण समजले .
पूर्वजन्मी या ब्राम्हण कन्येने मासिक धर्मा वेळी सगळीकडे शिवाशिव केली होती .
या जन्मी सुद्धा तिने ऋषीपंचमी चे व्रत न केल्याने तिची अवस्था अशी झाली होती.
नंतर पित्याच्या सांगण्या प्रमाणे तिने विधीपूर्वक ऋषीपंचमी ची पूजा केली व व्रत पार पाडले तेव्हा
पुढील जन्मी तिला सौभाग्य व अक्षय सुखाचा लाभ झाला .
अशी ही ऋषीपंचमी ची कथा

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED