जुळले प्रेमाचे नाते - भाग-४४ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४४

आजचा दिवस मी लवकरच उठले. कारण आज मला निशांत सोबत त्याच्या दिवाळी खरेदीसाठी जायचं होतं. फ्रेश होऊन किचनमध्ये गेले तर आईच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होत...
"आज सूर्य कोणत्या दिशेने उगवला आहे जे तु कॉलेज नसताना ही लवकर उठलीस प्राजु...???" आई हसत बोलली..
"काय ग आई...! आता काय मी लवकर ही उठु नको का...!!" मी जरा नाराजीने बोलले असता आई माझ्याजवळ आली.

"अग बाळा लवकर उठलीस म्हणुन विचारले. कुठे बाहेर जायचं आहे का आज..???" एक स्माईल देत आईने विचारले.

"नाही ग आता नाही संध्याकाळी जायचं आहे..!" मी लगेच बोलले आणि नंतर स्वतःची जीभ चावले.. कारण निशांतसोबत जायचं हे आईला माहीत नव्हते.. आई माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होती..

"अग आई.., निशांतला दिवाळीची खरेदी करायची आहे. त्यामुळे आम्ही जाणार आहोत." मी फ्रीज उघडुन त्यात उगाचच काही तरी शोधण्याचा प्रयत्न करत बोलले. मागे वळुन पाहिलं तर आईच्या चेहऱ्यावर अजून ही प्रश्नचिन्ह होतच.....

"काय झालं आई.???" मी स्वतःचे बत्तीस दात दाखवत कसतरी हसत विचारले.... तिने मानेनेच नकार दिला आणि माझ्या हातात चहा आणि नाश्त्याची डिश दिली.. मी पण मग काही ही न बोलता हॉलमध्ये पळालेच..

नाश्ता करतच मोबाईल वर टाईमपास चालुच होता. हे समोर, बसलेले बाबा पेपरमधुन डोकं वर काढुन बघ होते...
"काय मग सुट्टीचे काही प्लॅन आहेत की नाही..???" चहाचा कप घेऊन तोंडाला लावत बाबांनी विचारल.

"अजून काही ठरलं नाहीये बाबा. म्हणजे आज मी आणि निशांत जाणार आहोत त्याच्या शॉपिंगसाठी." मी पोह्यांचा एक घास घेत बोलले.

"अरे वाह..!! मग तु ही करून घे. तुझ्यासाठी पैसे ट्रान्सफर करतो." बाबा एक स्माईल देत बोलले. हे ऐकुन मी लगेच उठुन बाबांना येऊन मागून मिठी मारली.

"बाबा तुम्हीच माझं मन समजता..." एवढं बोलत मी मिठी घट्ट केली. आणि पवरत येऊन स्वतःचा नाश्ता करत बसले.

हे सगळं आई किचनमधुन बघत होती. नाश्ता करून बाबा ऑफिकसाठी निघुन गेले होते. मी आईला बाकीच्या गोष्टी करण्यात मदत करत होती.. हे करताना नकळत माझ्या चेहऱ्यावर स्माईल येत होती आणि आई माझ्या चेहऱ्यावरील भाव अचुक टिपत होती...

"काय मग.. निशांत कसा वाटतो तुला प्राजु.???" आईच्या अचानक आलेल्या प्रश्नाने मी दचकलेच... हातातलं काम तसाच ठेवत आईकडे बघत कढीबतरी स्माईल दिली...

"म्हणजे ग आई..?? तुला नक्की काय बोलायचं आहे.??" मी तोंडात येतील ते शब्द तिच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला.
"अग म्हणजे तुला आपला निशांत कसा वाटतो. म्हणजे बघ ना तुझ ऍकसिडेंट झालं होतं तेव्हा किती काळजी घेत होता तुझी... त्यात आजकाल त्याच आपल्याकडे येणं वाढलं आहे. अस नाही का तुला वाटत..!! त्यात तुझ्या चेहऱ्यावर उगाचच स्माईल येते. म्हणजे तुला निशांत आवडतो ना...! की कोणी दुसरा...?? की राज तर नाही ना या स्माईलच्या मागचं उत्तर..???" आई शांतपणे हातातलं काम करत बोलली..


हे ऐकून तर माझे डोळेच बाहेर यायचे बाकी होते.

"अस काही नाहीये ग आई... म्हणजे मला निशांत..., म्हणजे राज... म्हणजे राज आणि निशांत..."

मी तर चांगलेच गोंधळले होते. हे बघुन आई मात्र माझी आज घेत होती.

"अग हो हो... किती गोंधळतेस तु.."

आई हातातलं काम बाजुला ठेवुन माझ्या बाजूला येऊन बसली.. माजज्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या कपाळावर एक गोड पापा घेतला.

"प्राजु.., तुला माहीत आहे का...! मी जेव्हा तुझ्या वयाची होती ना तेव्हा माझं ही हेच झालं होतं..." आई बाजूला6 बसत बोलली.


मग मी पण हातातलं काम बाजूला ठेवत ऐकायला सज्ज झाले. आई पूढे बोलु लागली..

"असाच दिवाळीचा दिवस होता.. तुझे बाबा आणि मी तेव्हा कॉलेजमध्ये एकत्र होतो. एक वर्ष सिनिअर होते ते मला. कॉलेजमध्ये असताना माझ्या मैत्रिणीला सांगुन माझ्यासाठी एक लेटर पाठवलं होत त्यांनी... माझ्यासाठी लव्ह लेटर.."

हे बोलताना आई तिच्या त्या दिवसांमध्ये हरवून गेली. तिच्या डोळ्यात ते आठवणींच्या क्षणांचा आनंद दिसुन येत होता..
हे बघून मला ही खूप छान वाटलं. आई बोलु लागली..

"मी यांना होणार दिला. ती दिवस होता पाडव्याचा. आपल्या नवऱ्याला पाडव्याला ओवाळतात गिफ्ट्स देतात ही आपली परंपरा... मी मुद्दाम तो दिवस निवडला होता. त्यांच्या आवडीच्या खोबऱ्याच्या वड्या आणि सोबत एक शर्ट. त्या कमी नको म्हणून प्रेमाचं प्रतीक होतच त्यासर्वाची शोभा वाढवायला."

त्यानंतर तुझ्या बाबांना कॅफेमध्ये भेटायला बोलावल.. ते आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. जस काय मी त्यांना खाणारच होते.. त्यांचा चेहरा बघुन तर आधी मी हसले. पण चेहऱ्यावर गंभीर भाव आणत मी त्यांना बसायला सांगितले."


हे सगळं मी ऐकत होते.. आज आई.., त्यांची लव्हस्टोरी सांगत होती.. किती गोड...

"मग मी त्यांच्या समोर खोबऱ्याच्या वड्यांचा डबा सरकवला तशी त्यांच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आलेली.. तो हसरा चेहरा मी तरी या जन्मात विसरून शक्य नाही... बघता बघता त्यांनी त्या वड्या अर्ध्या संपवल्या ही.. मला तर एक ही विचारली नाही. नंतर त्यांना आठवल तस त्यांनी राहिलेल्या शेवटच्या दोन वड्यां पैकी एक मला दिली. मग काही तरी विषय काढून मी त्यांच्या हातात त्यांनीच दिलेलं लेटर दिल आणि बघायला सांगितलं.. त्या लेटर खाली मी माझं उत्तर दिल होत..


"आधी तर त्यांना नक्की काय झालं हेच कळलच नाही.. पण जेव्हा मी गुलाब आणि शर्ट पूढे केलं तेव्हा तर ते त्या कॅफेमध्ये उठुन अक्षरशः नाचत होते.. कसतरी थांबवुन मी त्यांना बसवलं.. सगळं कॅफे आम्हाला बघत होता... बापरे...! किती तो आनंद. मी त्यांना विचारल तस त्यांनी माझ्याकडे पाहिलं... त्यांचे डोळे भरले होते आनंदाश्रूने.."


"ए आई तु तर सॉलिड निघालीस ग...!!" मी आई ला डोळा मारत बोलले. तशी आई हसली आणि पूढे सांगू लागली.

"मग तुझ्या बाबांनी घरी विचारल.. बाबा आधी नकार देत होते. ते बोलले की आधी जॉब आणि नंतर लग्न. कारण त्यांचं म्हणणं होतं की, "ती तुझी जबाबदारी असणार आणि तिला कशातलच काही कमी पडल नाही पाहिजे.."हे मला ही ही पटल. मग आम्ही आमच शिक्षण पूर्ण केलं. जशी तुझ्या बाबांना नोकरी लागली मी माझ्या घरी विचारल.."


"माझ्या घरी ही यांच्या बद्दल माहित असल्याने नकार येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि झाला एकदाच विवाह..." एवढं बोलून आई गोड हसली.. पदराने स्वतःचे पाणावलेले डोळे पुसले...


"आई ग... किती गोड आहे तुमची लव्हस्टोरी..." मी आईला मिठी मारत बोलले.

To be continued