मला काही सांगाचंय..... ३१ - १ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय..... ३१ - १

३१. स्वप्न आणि सत्य

ती काही वेळ तशीच बिछान्यावर डोळे मिटून होती .... तिच्या बंद पापण्यांच्या पडद्यावर तिला काही परिचित अपरिचित चित्र दिसू लागली ... ती फक्त विचाराधीन मनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करु लागली ... तिला एकवेळ नजरेसमोर दवाखान्यात पाहिलेला कुमार दिसला , तिने डोळे उघडले ... किंचित मान वर करून तिने हळूच बाजूला नजर फिरवली तर तो पलीकडे तोंड करून झोपलेला तिला दिसला , परत एकदा खात्री करून तिने डायरी हातात घेतली ... तीने पुढे वाचायला सुरुवात केली...

कुमारने डायरीत समोर लिहिलं होतं ...

तिचा वाढदिवस होऊन जवळपास एक आठवडा झाला होता पण तरीही केवळ बाहेरगावी जावं लागलं अन वेळेवर परत न आल्याने मला तिला स्वतः इतक्या मेहनतीने , उत्सुकतेने बनवलेलं ग्रिटींग कार्ड तर देता आलं नाही ... साधं विश सुध्दा करायला मिळालं नाही याच दुःख वाटतच राहिलं .... एका महिन्यांनंतर जरा मला त्या गोष्टीचा विसर पडला होता .. उन्हाळ्याच्या सुट्ट्या अजून बाकी होत्या ...

एप्रिल संपून मे महिना सुरु झाला , सुटीचा मनसोक्त आनंद लुटत होतो ... तिला रोज भेटणं , बोलणं जणू रोचच्या दिवसाचा एक भाग झाला होता... तो दिवस उगवला ... बारावीचा निकाल लागला म्हणजे माझापण ..! अपेक्षित होते तेवढे टक्के मिळाले होते आणि पहिल्याच प्रयत्नात पास झालो याचा आनंद झाला होता ... घरी सगळे आनंदी होते ... तिला भेटलो तेव्हा तिने हात मिळवत शुभेच्छा दिल्या ...

" कुमार , अभिनंदन ..."

" किर्तीप्रिया , धन्यवाद ! "

" आता तू पदवीला जाणार .. मज्जा आहे मग आता .."

" हो , पण मज्जा कसली ? "

" मस्त पैकी पदवीला असलं की मॉर्निंग कॉलेज असतं ना .."

मी याचा विचार केला नव्हता मग मनात आलं होतं ' सकाळचं कॉलेज ... हिचं दुपारी कॉलेज असणारं .. अरे यार ..'

"कुमार , कुमार .. कुठे हरवला "

भानावर येऊन " काही नाही "

" तुझ्या नोट्स असतील ना ? "

" आहेत ."

" कुणाला देऊ नको .. मला पाहिजे .."

" बरं ठीक आहे , येतो मी ..."

" पुन्हा एकदा अभिनंदन "

यावेळी मात्र मी तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो होतो ... काहीही न बोलता ... एकटक !

सायकल घेऊन घरी आलो ... मनात बरेच विचार येत होते ... बारावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद , पदवीचं पहिलं वर्ष सुरू होणार होत , नवनवीन मित्र आणि बरंच काही नवीन शिकायला मिळणार होत , सकाळी कॉलेज झालं की दुपारचा मोकळा वेळ मिळेल हे सर्व विचार एकीकडे अन कॉलेजला जातांना , येतांना आता तिला भेटण्याचं निमित्त यापुढे राहणार नाही ... याचं थोडं वाईट वाटलं होतं ...

इतकं वाचून ती जरावेळ थांबली , कित्येक विचार मनावर ताबा घेऊ लागले ... काही क्षणात तिच्या नजरेसमोर अंधार पसरला ... काहीवेळ तिला कशाचीच जाणीव झाली नाही , पुढच्या क्षणाला तिला जरा प्रकाश दिसू लागला जसा एखाद्या अंधाऱ्या खोलीच्या दाराच्या फटीतून उजेड आत यावा तसा ... ती उठून जवळ गेली तशी उभी रेष जास्त स्पष्ट झाली अगदी हातभर अंतर जवळ गेल्यावर हळूहळू दार बाजूला सारून तिने पूर्ण दरवाजा उघडला ... तसा तिच्या नजरेसमोर लख्ख प्रकाश पसरला ... तिला समोरच दृश्य पाहून कुण्या वेगळ्याच दुनियेत आल्याचं जाणवलं ....

तिने मनाला धीर देत एक एक पाऊल पुढे उचलले , ती बारकाईने लक्ष देत आजूबाजूला पाहू लागली ... तिला गार वारा स्पर्शला , तिचा अंगावर शहारा आला ,समोर अतिविशाल वृक्ष ... उंचच उंच डोंगर , आभाळ जणू काही डोंगराला टेकलं अस तिला वाटलं , आजूबाजूला धुके पसरलेले ... कितीतरी मोहक फुलांचे झाडं , वेली तितकीच सुंदर फुलपाखरं ... तऱ्हेतऱ्हेचे पशु पक्षी तिला तिथे दिसले ... मोर , कोकिळा , कबुतर , हरीण , ससा , घोडे , हत्ती बरेच पण त्यांच्यात एक वेगळेपण तिला दिसून आलं ते म्हणजे त्याचे डोळे जरा निळसर आणि अंगावर चमक ... याआधी तिने कधीच न पाहिलेले असे ते दृश्य पाहून ती सुखावली पण दुसऱ्याच क्षणाला एकटे पणाची तिला जाणीव झाली ... ती झपझप पावलं टाकत पुढे जाऊ लागली , कुणीतरी ओळखीचं दिसावं इतकंच तिला हवं होतं ....

ती समोर जात असता , तिला आजूबाजूच्या वेलींचा स्पर्श झाला , त्यांचा सुगंध , ती चमक तिच्यात आली ... बराचवेळ चालत आलेली ती थकली , जरा खाली वाकून तिने डोळे मिटले तसे काहीतरी सर्रकन तिच्या बाजूने गेल्याच तिने ऎकलं ,तिने पटकन नजर फिरवली तसा एक साप तिला दिसला ती पळत सुटली , एक क्षण न थांबता , मागे फिरून न पाहता ती वेगाने धावत खूप दूर आल्याचं तिला कळलं तशी ती जागीच थांबली ... त्या अनोळखी ठिकाणी असं एकाकी असतांना भयानक संकट उभे राहिले अन तिने भितीने , धावपळ केली , ती घामाने चिंब भिजली , तिचा श्वास जोरात सुरू झाला तसा खाली वाकून तिने दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले अन त्या संकटातून तिची सुटका झाली ... तिला बाजूलाच फळांची झाड दिसली , तिला भूक लागली असल्याने तिने काही फळं खाल्ली , ती जवळच एक झाडाला टेकून बसली , वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने तिचं लक्ष वेधले , ती सावकाश जरा खबरदारी घेत बाहेर पडली , समोरच तिला नदीचा काठ दिसला , इतकं स्वच्छ पाणी आजवर न पाहिल्याच तिच्या मनात आले , ती ओंजळीने पाणी प्यायली ... ' खूप चवदार अस पाणी ' ती स्वतःलाच म्हणाली ... जरा मागे होऊन तिने उजव्या बाजूला पाहिले तर नदी सरळ दूरपर्यंत वाहत असल्याचं तिला दिसलं , समोर पाहिलं तर पुढे बरंच अंतर पार करून जावं लागेल तेव्हाकुठे पलीकडच्या काठावर पोहोचता येणार पण इकडून तिकडे जायला तिला काही साधन दिसलं नाही , मग तिने डाव्या बाजूला पाहिलं तर काही अंतरावर तिला धबधबा दिसला ज्याचं पाणी तिच्या समोरून वाहत चाललेलं ... काय करावे तिला काही एक सुचत नव्हतं , नजर खालून वर करत ती धबधब्याचे पाणी पाहू लागलीं , वर एक दम टोकावर तिला एक मानव आकृती दिसली ती लगबगीने तिकडे निघाली....

ती पटापट पाऊल टाकत उंचावरून खाली पडणाऱ्या पाण्याजवळ पोहोचली ... आजूबाजूला जणू धुकं दाटलेले , तिने नजर रोखून वर पाहिले तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही .. . तिने पुन्हा एकदा खात्री म्हणून धबधब्याच्या टोकावर उभ्या असलेल्या त्या आकृतीला पाहिले तिच्या काळजाचा ठोका चुकला ... ती स्वतःशीच पुटपुटली ' कुमार ' ... आता तिला ओळख पटली तिने भान हरपून त्याला हाक मारली ... " कुमार .... कुमार .... "

continue...