मला काही सांगाचंय..... - ३५ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय..... - ३५


३५. भाग्य


सुजित बस स्थानक येथून दवाखान्यात परत आला तर आर्यन , अनिरुध्द आणि ऋतुराज सुध्दा इतक्यातच तिथं पोहोचले होते . एकमेकांशी नजरानजर झाल्यावर सुजितला त्याच्यावरचा राग त्यांच्या डोळ्यात दिसून आला ... मग तो जवळ जाऊन ," दोस्तहो , मला माहित आहे तुम्हाला नक्कीच माझा राग आला असेल , पण खरंच माझा नाईलाज झाला होता असं नाही की मी विसरलो होतो , नाही मला तिला डायरीबद्दल विचारण्याचा मुळीच विसर पडला नव्हता , मी तिला एकांतात बसून व्यवस्थित विचारलं तर ती चुकून डायरी घरीच राहिली अस सांगत होती आणि तिला घरी जाणं खूप आवश्यक होतं म्हणून मी तिला थांबवू शकलो नाही . मी स्वतः तिला बस स्थानक येथे आत्ताच सोडून आलो ... तरी तुम्हाला मी चुकीचा वागलो असं वाटत असेल तर मला माफ करा ! "


ऋतुराज , " सुजित , माफी वगैरे मागू नको पण आम्ही तुझ्यावर नाराज आहोत .. "


अनिरुध्द त्याला दुजोरा देत " हो बिलकुल मी सुध्दा नाराज आहेच , तिला सकाळी एकदा आठवण करून द्यायला हवं होतं ... "


मध्येच आपलं मत मांडत आर्यन , " हो ना सुजित , कमीत कमी एक फोन केला असता तरी जमलं असत ... "


अनिरुध्द आणि ऋतुराज एकसाथ , " नाहीतर काय ? ते बाजूला ठेवून देऊ पण तिला 10 - 15 मिनिट सहज थांबवता आलं असत ... "


मग सर्वजण बोलता बोलता जरा शांत झाले , जणू वास्तविकतेचा त्यांना विसरच पडला की कुमारचं कालच ऑपरेशन झालं , आज तर त्याची भेट सुध्दा कुणाला घेता अली नव्हती , अजून त्याच्याशी कुणाचंच बोलणं झालं नव्हतं हे एक आणि डायरीचं गुपित कुणालाच ठाऊक नसतांना सुजितला अचानक ते कळलं , त्याला ती डायरी वाचण्याचं भाग्य लाभलं अन आपणांस अजून पर्यंत ती डायरी एक नजर बघण्याचं भाग्य नाही हे दुसरं असे दोन कारण त्यांना वास्तव विसरून जायला टोकाची भूमिका बजावत होते ... पण यांत त्यांचा काहीएक दोष नाही कारण इतरांना जे माहित आहे किंवा जे इतरांच्या भाग्यात आहे , इतरांना जे अनुभवता आलं .. ते आपण सुध्दा अनुभवावं , आपल्या भाग्यात यावं असं प्रत्येकाला वाटतं , हा आपल्या माणसांचा आणखी एक स्वभावविशेष म्हणावा लागेल ... पण सारंच साऱ्यांच्या भाग्यात असतं असं नाही आणि समजा असेलच तर एकाचवेळी असण कसं काय शक्य आहे ..? जे जेव्हा ज्याच्या वाट्याला यायचं ते तेव्हाच येईल , कितीही नाकारलं . भाग्य वगैरे काही नसतं तर जीवनात तशी वेळ , परिस्थिती निर्माण झाली की ज्याची त्याला प्रचिती येते .... इतकं मात्र खरं ..!


सुजितनेच पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली , शांततेच्या बुडबुड्याला शब्दाने टोचणी बसावी तसं शांततेच अस्तित्व संपलं ... " काय आहे ना दोस्तहो , काही काही गोष्टी जेव्हा कळायच्या तेव्हाच कळतात , जेव्हा घडायच्या तेव्हाच घडतात ... भाग्य लागतं असं म्हणतात ना ! कदाचित माझ्या भाग्यात ती डायरी सर्वात आधी वाचणं असेल ... भाग्यात असेल तर ते मिळेलच पण योग्य वेळ यायला हवी ... "


हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंचित बदलले , मनात काही प्रश्न अन सोबतच मित्राने इतकं भारी तत्वज्ञान ऐकवलं याचं आश्चर्य वाटलं ... जणू सुजित अस काही बोलेल याची त्यांना काहीएक कल्पना नव्हती तर तो भाग्य वगैरे गोष्टी सांगत होता यावर विश्वास बसेना असे मिश्र हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले ... सुजितने एक दोनदा तिघांच्या नजरेला नजर दिली मग ते तिघे जरा विचारात मग्न झाले कि नुसतेच फक्त तसं दाखवत होते याचा सुजितला संशय आला ... त्याने आर्यनच्या खांद्याला हलकेच हलवून आवाज दिला , " आर्यन ... आर्यन "


मला तुझं म्हणणं जरा पटतंय , कारण बघा ना , जर इतक्या दिवसांपासून ते डायरीचं गुपित उघड झालं नाही , अचानक कुमारचा अपघात झाला आणि ती डायरी सुजितला नकळत मिळाली .. त्याचं भाग्यच म्हणावं लागेल की कुमारच्या सहवासात असूनदेखील इतके दिवस लपवून ठेवलेलं रहस्य असं अनपेक्षितपणे कळलं ...


आर्यन ला दुजोरा देत , अनिरुध्द " हो यार , आपण नेहमी दूर असून मोबाईल वर कुमारशी बोलायचो पण त्याने कधी कधी म्हणून डायरीचा विषय काढला नाही की अस काही लपवून ठेवण्यासारखं त्याच्या वाट्याला आलं कधी जाणवू दिलं नाही ... आता जेव्हा नियतीने हा भलताच डाव मांडला आणि ते डायरीचं गूढ सुजितला कळलं , काय म्हणावं याला कुमारचा अपघात झाला हे दुर्भाग्य कि त्याच्या मनात जपून ठेवलेलं , डायरीत उतरवलेलं गुपित यानिमित्याने कळलं हे सौभाग्य ..? "


अनिरुध्द च्या या प्रश्नाने सर्वांना विचार करायला प्रवृत्त केले , खरंच हा निव्वळ योगायोग होता की हे सगळं घडण्यामागे नियीतीचा आणखी काही हेतू होता ...? कुणास ठाऊक ? शेवटी मान्य किंवा अमान्य केल्याने कशाचं अस्तित्व असणं , नसणं ठरवता येत नाही तर वेळ आणि परिस्थिती माणसाला अनुभूती देऊन पटवून देतात ...


ऋतुराज आतापर्यंत विचारातच बुडालेला होता आणि अनिरुध्द च्या प्रश्नाने तो आणखी गंभीरपणे विचार करत होता ... मग एका क्षणाला त्याचं विचारचक्र थांबलं तो म्हणाला , " तसा माझा अजिबात भाग्य वगैरे गोष्टी वर विश्वास नाही , मी मानतो ते फक्त कर्माला ... जसे कर्म तसे फलित , आपल्याला डायरी वाचायला मिळाली असती जर सुजितने स्वतः ती बॅगमध्ये ठेवली असती तर , त्याने आकाशला ती डायरी बॅगमध्ये ठेवायला सांगितली आणि हा सगळा गोंधळ झाला ... "


" बरं असो , जे झालं ते झालं , यावर वाद करून आता काहीएक उपयोग नाही तर कुमार आता कसा आहे ? आपण इथं आलो पण अजून त्याची भेट घेतली नाही ... चला तिकडे जाऊया ... " म्हणत आर्यनने विषयांतर केले आणि सर्व जण रूमकडे जायला निघाले ...