मला काही सांगाचंय..... - ३९ - ३ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय..... - ३९ - ३

३९. सोबती - जुने कि नवे - 3

तिच्यासाठी एक छानपैकी ग्रिटींग आणि एक लाल गुलाब घेऊन , काय आणि कसं बोलावं याचा सराव करून कॉलेजला गेलो होतो , पण माझं दुर्दैव जास्तच जोरावर होतं , ती कॉलेजला आलीच नव्हती आणि त्यादिवशी एक नजर दिसली पण नव्हती ... मग काय निराश होऊन कबीर जवळ ते ग्रिटींग आणि गुलाबाचं फुल घेऊन नशिबाला दोष देत बसून राहिलो होतो , मनात एकाच वेळी कितीतरी भावना येत होत्या ... राग , दुःख , प्रेम ..! एक क्षण आला की डोळ्यात आसवांनी गर्दी केली , एक दोन थेंब खाली पडले , दुःखाचा ओघ सरला , मी ओल्या पापण्या पुसल्या , सरसर झाडावर चढलो ... झाडाच्या त्या फांदीजवळ , जिथं मी तिचं नाव कोरलं होतं .. जरा अस्पष्ट दिसत होत म्हणून मी पुन्हा नखाने तेच नाव ठळक केलं , तिच्या नावाखाली त्यावेळी स्वतःला न आवरता पहिल्यांदा लिहिलं " I love you ... " मन तेव्हा कुठे जरा शांत झालं होतं . आधी तिला द्यायचे राहून गेलेले अजूनही तिची आठवण म्हणून जपून जवळ ठेवलेले ग्रिटींग कार्ड आणि एक पूर्ण सुकलेला पिवळा गुलाब याच्या सोबतीला आणखी एक ग्रिटींग कार्ड व लाल गुलाबाची भर पडली होती ... मनात एक प्रश्न , नेमकं महत्वाचं काही तिला सांगायचं असलं , तिला भेटावस वाटलं , तिची अनावर ओढ लागली की का बरं ती दिसत नाही ? भेटत नाही ? म्हणून त्यादिवशी तिचा खूप जास्त , कधीच आला नाही इतका राग आला होता . तो राग जवळपास दोन महिने कायम होता , त्या दोन महिन्यात तिला एकदाही भेटलो नाही कि तिच्याशी बोललो नाही . तिचा वाढदिवस माहित होता पण परत एकदा अपयशी ठरणारा प्रयत्न करायची मुळीच इच्छा झाली नाही , दरम्यान ग्रॅज्युअशन च्या दुसऱ्या वर्ष्याची परीक्षा सुरु झाली ... आणि सुट्टी जाहीर करण्यात आली होती ...

मग काय डोकं रिकामं झालं होतं , मे महिन्यात भर दुपारी कबीरजवळ बसून कादंबरी वाचत असताना , ती सोबत असतांना घालवलेले क्षण आठवले , सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या , तिचा चेहरा नजरेसमोर आला मी हरवून गेलो होतो , स्वतःशीच बोलायला सुरुवात केली होती की कबीर सोबत कळलं नाही , " तु समोर असतांना काय बोलावं कळत नाही मात्र एकांतात खूप काही बोलतो ... कबीरच्या सहवासात कितीतरी वेळ पापण्या मिटून बंद डोळ्यात तुझं प्रतिबिंब मी पाहतो , तु किती सुंदर आहे हे प्रतिबिंबाला मी सांगतो , तु कपाळावर टिकली पेक्षा लाल रंगाने जेव्हा बोटाने हळूच टिळा लावते तेव्हा जास्त मोहक दिसते , तुला तो लहानसा लाल रंगाचा टिळा शोभून दिसतो , तु लांब केसांची वेणी घालते ना खूप छान दिसते पण एकदाच जेव्हा तुला दोन वेण्या घातलेल्या असतांना पाहिलं ना , तेव्हा खरंच तु इतकी सुंदर दिसत होती की सांगायला शब्द नाहीत आणि तुला पाहतच राहावंसं वाटलं होतं ... कोणताही ड्रेस तुला शोभून दिसतो , सर्व रंग तुला उठून दिसतात आणि तुझा चेहरा मनात घर करतो ... तुला बघितलं कि सारं विसरायला होतं फक्त तूझा विसर पडत नाही , बंद पापण्यात तु आणि डोळे उघडले कि तुझी आठवण , तुझ्या भेटीचा मोह आवरता येत नाही ... नकळत पावलं तुला भेटायचं म्हणून रस्त्याने चालायला लागतात , तुझा सहवास असतांना वाटतं की वेळ पुढे जाऊच नये , तु बोलत रहावं आणि मी फक्त तुला बघत राहावं , तुझं नावं जरी ओंठावर आलं ना , आजकाल अंगावर शहारे येतात ... ऐक ना , तुला एक गोष्ट आणखी सांगायची राहिली , पेन हाती घेतला की नकळत हातावर , कागदावर तुझं नाव लिहितो . आजवर तु सुध्दा इतक्यावेळ स्वतःच नाव लिहिलं नसणार याची मला खात्री आहे ... फक्त K अक्षर लिहायची वाट असते मग शब्द कोणताही असो , मी आधी " किर्तीप्रिया " लिहून काढतो ... कित्येकदा नोट्स लिहितांना K अक्षराने सुरु होणाऱ्या शब्दाऐवजी Kirtipriya असं लिहिलं , नंतर लक्षात आल्यावर मी ते नावं खोडलं ... पेपर लिहितांना असं व्हायला नको मीच स्वतःला बजावून सांगितलं होतं , नाहीतर माझी चांगलीच वाट लागली असती ... " डोळे उघडले तर सूर्य मावळतीला आला होता , मनात पुन्हा तिला पाहण्याचा , भेटण्याचा , तिच्याशी बोलण्याचा विचार आला आणि मन तिच्या आठवणीत रमले ... कबीरला बाय करून मी घरी आलो होतो ...

मनातलं खूप दिवसांनी ओठांवर आलं होतं म्हणून कि काय ? तिला भेटण्याची इच्छा झाली होती , बराच वेळ कसतरी टाळलं पण ओढ अनावर झाली आणि ती साधी एक नजर दिसावी , जर ती स्वतःहून बोलली तरच बोलायचं नाहीतर नाही .. अस ठरवून मी सायकल घेऊन बाहेर निघालो होतो पण मला जरा विसरच पडला होता की जेव्हा जेव्हा मला तिला बघावं किंवा भेटावं अस वाटतं तेव्हा ती जशी गायब होते ... त्यादिवशी तसंच झालं ती दिसलीच नाही म्हणून सुजितला भेटून आलो होतो तर बोलता बोलता टायपिंग क्लास ला ऍडमिशन करायची अस आमचं ठरलं होतं ... दोन तीन दिवसांनी आम्ही ऍडमिशन केली होती आणि एक दिवस जेव्हा मी क्लास करून घरी परत येत होतो , ती तिच्या अंगणात उभी असल्याचं मला दिसून आलं ... तेव्हा ती जशी वागली त्यामुळे मी विचारातच पडलो होतो आणि तो किस्सा कधी एकदा कबीरला जाऊन सांगतो अस होऊन गेल होतं , कबीर जवळ बसलो आणि त्याला सांगायला सुरुवात केली , " कबीर , आज क्लास करून घरी परत येतांना ती समोर दिसली , मी सायकलचा वेग जरा कमी केला , तिच्यापर्यंत पोहोचणार होतोच कि अचानक तिने समोर येऊन सायकलचे हॅण्डल मधोमध पकडून मला जागीच थांबवलं ... पण उन्हात सायकल जोरात चालवित आणल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरून घामाचे लोट जसे वाहत होते म्हणून त्यावेळी तिच्याशी बोलत थांबण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती ... तरी मी म्हणालो , " किर्तीप्रिया , हे तुझं काय चाललं ? "

" कुठे काय ? काही तर नाही ... "

" अस मध्येच रस्त्यात सायकलच्या आड येणं , समजा माझा तोल गेला असता तर किंवा तुला लागलं असतं तर .."

" कुमार , ते होय , काही झालं नाही ना ... आधी तु सांग इतके दिवस कुठे होता ? दिसलाच नाही ... "

continue... ...