जुळले प्रेमाचे नाते - भाग-४९ Hemangi Sawant द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जुळले प्रेमाचे नाते - भाग-४९

"अग छडी नाही.. फटाके आणले आहेस ना..." मागून निशांत हातात भल्यामोठ्या ब्यागा घेऊन येत बोलला.
तिकडच्या काकांनी त्याला मदत केली आणि आम्ही सगळे आत आलो.

"दिवाळीच्या शुभेच्छा आसावरी मॅडम.. कशा आहात तुम्ही..??" मी त्यांना मिठी मारत विचारलं.

"मी छान आहे.. तु कशी आहेस आणि तुला ही दिवाळीच्या शुभेच्छा.." मिठी घट्ट करत त्यांनी ही शुभेच्छा दिल्या.
"कशी आहे आता तब्बेत प्रांजल..?? निशांतकडुन कळलं तुझं ऍकसिडे झालेल. आता तब्बेत ठीक आहे ना.???" त्यांनी काळजीने विचारलं..

"अहो मी एकदम ठणठणीत आहे. हा निशांत काही ही सांगतो.. माझं कुठे ऍकसिडे होतंय.. त्या बिचाऱ्या ट्रकच झालं ऍकसिडे.." माझ्या या वाक्यावर तर त्या जोरात हसल्याच...

"काय ग हे... किती हसवशील..! चला म्हणजे आमची प्रांजल छान आहे आधी सारखीच.." हसत त्यांनी स्वतःच वाक्य पूर्ण केलं.

"तुम्ही दोघी येणार हातात का फटाके लावायला.. आम्ही बाबा करतो आहोत मज्जा..." निशांत आम्हाला बोलवायला आलेला.

"हो हो आलोच..." मी आसावरी मॅडम चा हात धरत त्यांना घेऊन गेले.. सगळे मिळून आम्ही फटाके लावत होतो.. मला भीती वाटत होती म्हणून निशांत मला मदत करत होता..


त्याचा प्रत्येक स्पर्श मला नव्याने त्याच्या प्रेमात पाडत होता. नकळत होणारे ते स्पर्श..., अंगावर शहारे आणणारे होते. "का एवढं प्रेम करावं कोणावर.. की त्याच्या नुसत्या बघण्याने ही आपण लाजावे..."



फटाके लावून आम्ही सगळे हालमध्ये गेलो. हात स्वच्छ धुवून आम्ही तिकडेच सर्वांसोबत फराळ खाल्ला.. गप्पा गोष्टी करत.. पण या सर्वात निशांतने मला सांगितलेच नाही की मी कशी दिसत आहे.. हे आठवताच मी त्याच्याकडे पाहिलं खरं..., पण तो त्या लहानमुलांसोबत बोलण्यात इतका गुंतला होता की मी विसरून गेले.. सरते शेवटी आम्ही त्यांना निशांतने आणलेली गिफ्ट दिली आणि परत भेटु अस प्रॉमिस देत निघालो...



"खडूस..., आज पाहिलं ही नाहीस तु आणि बोलला ही नाहीस की मी कशी दिसते आहे..??" मी नकट्या रागात बोलले. हे ऐकून निशांत गालातल्या गालात हसला.. आम्ही आमच्या बिल्डिंगच्या जवळ आलेलो. तस त्याने गाडी जरा बाजुला लावली...


"इकडे बघ माझ्याकडे....." माझ्यासमोर चेहरा करून निशांत बोलला..
"हा बोल काय झालं.???" मी जरा रागात त्याच्याकडे पाहिलं...

त्याने माझ्याकडे पाहिलं आणि स्वतःचे डोळे बंद केले.. परत उघडले आणि एक दीर्घ श्वास घेत तो बोलु लागला...

"तु..., का दिसावी एवढी सुंदर की मी माझं सारकाही विसरून फक्त तुझ्याकडे एकटक पहावं. तुझ्या त्या ओल्या केसांचे छोटेसे बट उगाचच मानेवर रेंगाळत होते.. गळ्यातली ठुशी.. स्वतःचं अस्तित्व नक्कीच वेगळं दाखवत आहे.., पण तिला काय माहित जरा बघावं तिने "तुला" आरशामध्ये स्वतःलाच ती विसरून जाईल..
आणि ही नाकातली नथ.. तिचा रुबाबचं वेगळाच.. पण तिला काय माहीत तिचा हा रुबाब फक्त तुझ्यावर असल्याने खुलला आहे..
आणि ही कपाळावरची चंद्रकोर.. शांत.., तशीच तु.... बघ ना त्या चंद्रालाही बघावस वाटावं एवढी सुंदर दिसते आहेस.. म्हणुन की काय वेळ लवकर धावत असावी..
आणि ही साडी.. भले ती छान असेल. पण तीच खरं सौंदर्य फक्त तु परिधान केल्यावर खुलल आहे. सरते शेवटीचा तुझ्या हा परफ्यूम... एवढा सुगंधी की कोणालाही वेड लावाव त्याने... पण खरं वेड लावतो तो तुझा शरीराचा गंध... मोहक.. हवा हवासा वाटणारा.. डोळे मिटताच फक्त तु आठवावी.. एवढी गोड आणि सुंदर का दिसावी तु...??? सांग ना का दिसावी.???"

निशांतने स्वतःचे डोळे मिटले आणि परत उघडत माझ्याकडे पाहिलं... माझ्या डोळ्यातुन आलेला आनंदाश्रू त्याने स्वतःच्या बोटाने टिपला...

"अग तुला आवडलं नाही वाटत.. रडतेच काय लगेच..??" माझी मस्करी करत निशांत बोलला. तशी मी त्याला गाडीमध्येच बिलगले.

"काय हे नवीन... एवढं छान बोलत का कोणी... म्हणजे एवढी सुंदर आणि तेवढी गोड.. अस असत का कुठे..??" मी बिलगुन रडत होते.. आणि निशांत मात्र हसत होता. त्यालाही माहीत असावं मुलींचे डोळे लवकर भरतात...

"चला आता रडकू वर जाऊया.. नाही तर सगळे आपल्याला कॉल करून ओरडतील.. हे ऐकताच मी त्याच्या पासून दूर झाले..

"बाय द वे.. मी कशा दिसतोस हे नाही सांगितलंस..." डोळा मारत त्याने विचारले असता.. मी त्याचे गाल हाताने खेचले...
"एकदम हँडसम... एका गालावर किस केली जे त्याला ही कळलं नाही.. आणि दार उघडून वर पाळाले...
मागे निशांत एकटाच गाडीमध्ये गालाला हात लावून हसत होता...


घरी आल्यावर आम्ही सर्वानी कपडे बदलले.. जेवणाची तयारीसाठी मी आईला मदत केली.. असच म्हणून मी बाहेर आले तर बाबा आणि आजोबा टीव्ही बघत होते तर निशांत दिसत नव्हता..


मी इकडे तिकडे पाहिलं.. कुठेच दिसत नाही बघून मी आजी-आजोबांच्या रूममधे गेले..


"अग हो ग... तु नाहीस तर ही दिवाळी माझ्यासाठी नाही... डोन्ट व्हरी तूच हवीस मला ओवालायला... नाही ग.. तु आल्याशिवाय ही दिवाळी काही पूर्ण होणार नाही...
हो हो... चालेल मॅडम तुम्ही म्हणाल ते देईल तुम्हाला आधी या तुम्ही...
कधी येणारे आहेस बोलतेस... पाडव्याला... अरे वाह...!!
हो हो.., नक्की भेटूया.. चल नंतर बोलु भेटूनच..." एवढं बोलून त्याने हस्तकंग6 कॉल ठेवला.


निशांत बाल्कनीमध्ये फोन वर कोणाशी तरी बोलत होता..
"कोणाशी बर बोलत असेल. ते ही एवढं गोड... आणि अजून कोण आहे जिच्या शिवाय दिवाळी.., दिवाळी सारखी नाही वाटणार.."

माझ्या डोक्यात असंख्य प्रश्न धुमाकूळ घालत होते.. "एवढी छान नटुन आम्ही दिवाळी साजरी केली. आणि याच काही भलतच चालू आहे.." स्वतःशी बडबडत मी निघाले असता मागून येऊन निशांतने माझा हात धरला आणि मला आत खेचला....


"हनी-बी सकाळी एवढी तुझी स्तुती केली त्या बद्दल मला काय मिळणार ग..??"

"काय मिळणार म्हणजे.. काही नाही मिळणार कळलं ना... आणि काही हवंच असेल ना तर जा तिच्याकडे माग. मी कशाला हवी नाही का???" एवढं बोलून मी तणतणत किचनच्या दिशेने निघून गेली...


मागे हा स्वतःच्या डोक्यावर हात मारत तसाच उभा...
"आता ती कोण...? ही हनी-बी पण ना....!!"


to be continued......