प्रेम हे..! - 8 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 8

............ विहान ने मेसेज परत परत वाचला... आज निहिरा ने पहिल्यांदाच त्याला मेसेज केला होता.. तसे ग्रुप चॅट वगैरे चालूच असायचे त्यांचे.. पण एकमेकांनी पर्सनली मेसेज नव्हता केला कधी.. आज विहान चं 'सोने पे सुहागा' असं झालं होतं...!! 😄😄

विहान ने लगेच रिप्लाय केला..

📱माय प्लेजर डिअर !
तू ही काही कमी नाहीस 😊
यू वेअर जस्ट आॅसम!!
मलाही आवडलं तुझ्यासोबत
डान्स करायला..

📱 थँक यू फॉर कॉम्प्लिमेन्ट 😊
चल बाय.. झोपतेय😄
गुड नाईट!

📱 Yeah.. गुड नाईट!

विहान ला खाली 'मिस यू' लिहावंसं वाटत होतं.. पण त्याने कंट्रोल केलं.. 😁

तिचे मेसेज त्याने निदान वीस वेळा तरी वाचले.. तिच्याच आठवणीत त्याला कधी झोप लागली कळलच नाही...! 💕

निहिरा ही दिवसेंदिवस विहान मध्ये गुंतत चालली होती...
पण अजूनही त्याच्या बाबतीत ती कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नव्हती.... विहानचं ही नक्की तिच्यावर प्रेम आहे की तो हे सर्व फक्त अॅज अ फ्रेंड करतोय हे ही तिला ठाऊक नव्हतं.. खरं तर तिलाही त्याचा सहवास आवडत होता... पण काही गोष्टी तिने वेळेवर सोडून द्यायचं ठरवलं....

- - - - - - - XOX - - - - - - -

निहिरा चा गॅदरींग चा दिवस ही उजाडला... तिचा डान्स उत्तमच होणार ह्यात कोणालाही शंका नव्हती.. आणि तसेच झाले.. तिला डान्स मध्ये प्रथम पारितोषिक तर मिळालेच... शिवाय बेस्ट परफॉर्मरचं ही बक्षिस मिळालं... एका पास वर दोघांना एंट्री असल्यामुळे विहान ही सोनिया च्या पास वर तिच्यासोबत गेला होता... आजही त्याने निहिरा सोबत स्वतःलाच पाहिले होते.. 😊.... निहिरा ने आणि तिच्या पार्टनर ने ही गाण्याला चांगला न्याय दिला होता... ☺️

गॅदरींग सुद्धा झाली... आता सर्वांनाच एक्झाम चे वेध लागले होते... जो तो अभ्यासामध्ये व्यस्त झाला होता.. हिंडणे फिरणे जवळ जवळ बंदच झाले होते... त्यामुळे विहान ला निहिरा ला बघायला मिळत नव्हते... मग तो तिला अधून मधून गुड मॉर्निंग... गुड नाईट चे मेसेज करत होता... कधीतरी हाय.. हेल्लो... काय करतेयस वगैरे... पण निहिरा ही तेवढ्यास तेवढं उत्तर द्यायची... जास्त बोलायची नाही... ईच्छा असूनही!... तिला तिच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास करावाच लागणार होता... त्यासाठी तिला तिच्या मनाला आवर घालावा लागत होता...
पण विहान ला हा दुरावा सहन होत नव्हता... त्याच्या मनाला निहिरा ची ओढ लागलेली असायची.. पण त्यानेही सध्या 'दुधाची तहान ताकावर' भागवायचं ठरवलं... तो फक्त मेसेज मधून तिच्यासोबत बोलत होता.. ते ही कधीतरी... कारण त्यालाही तिला डिस्टर्ब करायचे नव्हते... त्याचंही हे लास्ट इयर होतं... त्यामुळे त्यानेही सध्या त्याच्या अभ्यासावर फोकस करायचं ठरवलं...

- - - - - - - XOX - - - - - - -

अखेर सर्वांची एक्झाम झाली... विहान ने काही दिवस आराम करून वडिलांचा बिझनेस जॉईन केला... मे महिन्यात विहान चा वाढदिवस होता.... त्याने सर्व फ्रेंड्स ना आपल्या घरीच बोलवायचे ठरवले.... सर्वांनी ग्रुप वर त्याला बर्थ डे विश केलं.. निहिरा ने त्याला पर्सनल मेसेज ही केला... तिचा मेसेज बघून तो खूपच खुश झाला... एक्झाम जवळ आल्यापासून त्याने तिला बघितलं नव्हतं.... त्यामुळे त्याला तिची खूपच आठवण येत होती... तिचाच विचार करत असताना सोनिया चा कॉल आला...

"हां सोनिया बोल.."

"हाय buddy..... विश यू अ व्हेरी व्हेरी व्हेरी हॅप्पी बर्थडे डिअर !!! 😙" सोनिया ने ओरडतच विहान ला विश केलं..

"थँक्स डिअर ... थँक्स अ लॉट!! 😙"

"व्हॉटस् द प्लॅन ???"

"तेच सांगायचंय तुला... आय नीड युअर हेल्प .."

"अरे बस्स क्या... तू बोल तो सही... बंदी आपके खिदमद में.... समथिंग😜 ..हाजिर है.... 😄😄"

"लिसन... I wanna propose her.." विहान गंभीरपणे बोलला..

"whaaaat???? आर यू शुअर???... 'नाही' बोलली तर.... आजच्या दिवशी मूड खराब करून घेशील.. 😐" सोनिया काळजीने बोलली..

विहान एक दीर्घ श्वास घेत म्हणाला...
"I m ready for everything... Whatever it may be.. पण आता नाही राहवत 😖.."

"ओके डिअर ... मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे?"

"आता साडे आठ वाजलेत... बरोबर दहा ला निहिरा ला कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये बोलव... एकटीलाच...मी बोलावलंय ते नको सांगू... नाहीतर कदाचित ती येणार नाही.. पुढचं मी बघून घेईन काय ते..."

"ओके ... मी आत्ताच कॉल करते तिला...." म्हणून सोनिया ने फोन कट केला...

विहान ने ठरवलं खरं पण आता त्यालाच टेंशन आलं होतं... रात्रभर सुद्धा हाच विचार करुन तो झोपला नव्हता... काय बोलेल ती... तिला आवडेल का असं विचारलेलं... आधीच तापट... ऐकून तरी घेईल का माझं... एक ना अनेक प्रश्न त्याला सतावत होते.... जे होईल ते होईल पण आज निहिरा ला सांगायचंच असं त्याने ठरवलं...

- - - - - - - XOX - - - - - - -

सोनिया ने निहिरा ला कॉल केला..

"हाय निहिरा.. हाऊ आर यू?"

"मस्त मजेत... तू बोल... आज सकाळी सकाळी कॉल केलास? एनी प्रॉब्लेम??"

"अ‍ॅक्च्युअली थोडं बोलायचं होतं तुझ्याशी... कॉलेज जवळच्या कॅफे मध्ये येशील का दहा वाजता? प्लीज...एकटीच ये..."

"ओके ... नो प्रॉब्लेम .. येते.."

"ओके बाय.."

"बाय".. म्हणत दोघींनीही फोन ठेवला..

To be continued..
🙏
#प्रीत 🍁