प्रेम हे..! - 12 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 12

............. मी वाट बघेन तुझी.... आणि तेव्हाच आपलं नातं प्रेमात बदलेल जेव्हा तू स्वतःहून माझ्याजवळ येशील.... " एवढं म्हणून तो उठला... आणि कार मध्ये जाऊन बसला...

निहिरा ला कळलं तो नाराज झालाय... तिच्या बोलण्याने दुखावलाय...तीही त्याच्या मागोमाग जाऊन कार मध्ये बसली....
"विहान..... प्लीज..... " तिने बोलायचा प्रयत्न केला...

त्याने तिच्याकडे न बघताच रागात सोनिया आणि अवनी साठी एकदा हॉर्न वाजवला...

सोनिया आणि अवनी ने एकमेकींकडे बघून खांदे उडवले... काय झालं त्यांनाही कळेना... त्याही येऊन कार मध्ये बसल्या...

मग तीही काहीच बोलली नाही... तिला वाटलं निदान रागाच्या भरात तरी तो माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यामुळे नकळत तोही बिझनेस मध्ये concentrate करू शकेल....

विहान ने कार स्टार्ट केली.. कॉलेज पर्यंतचा रस्ता त्याला माहीत होता.. त्यापुढचा रस्ता त्याने निहिरा ला न विचारता अवनी ला विचारला.. आणि निहिरा च्या घराच्या दिशेने गाडी वळवली... निहिरा च्या लक्षात आलं ह्याने मुद्दामच अवनी ला पत्ता विचारला🙄... सोनिया आणि अवनी च्या ही लक्षात आलं की दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय....! सोनिया ला वाटलं मी दोघांना बोलायची संधी देऊन काही चुकीचं तर नाही केलं ना... 🤔😐

निहिरा चं घर जवळ आलं तरी दोघे एक शब्दही बोलले नाहीत... तिच्या घराजवळच्या टर्न वर एका झाडाजवळ त्याने गाडी थांबवली.. दोघीही खाली उतरल्या.. सोनिया ही उतरली.. तिने दोघींना हग केलं आणि बाय करून कार मध्ये फ्रंट सीट वर येऊन बसली.. निहिरा ने एकदा वळून विहान कडे बघितलं... पण त्याने मुद्दामच बघून न बघितल्यासारखं केलं.... निहिरा आणि अवनी निघून गेल्या.. दोघीही घरी जाईपर्यंत विहान आणि सोनिया तिथेच थांबले होते.. त्या गेल्या तशी विहान ने कार वळवली... तो अजूनही गप्पच होता... सोनिया ने विचारलेच...

"What happened?? एवढा शांत का आहेस.. निहिरा ला नीट बाय सुद्धा नाही केलंस...."

"कुठे काय... नथिंग 😊" विहान सर्व नॉर्मल असल्याचं दाखवत होता...

"चेहरा सांगतोय तुझा... आज नाही ओळखत आहे मी तुला... मघाशी दोघे ज्या प्रकारे गाडीत येऊन बसलात ते बघितलं नाही मी असं वाटतंय का तुला?? "

विहान ला माहीत होतं... सोनिया ला सर्व सांगावेच लागणार.. तिच्यापासून आपण काही लपवू शकत नाही....
त्याने दोघांमध्ये काय बोलणं झालं ते सोनिया ला सांगितलं...

" निहिरा थोडं जास्तच strictly घेतेय.. But.. दोघांच्या करियर चा विचार करता तेच योग्य होईल तुमच्यासाठी.. तू ही उगीच उतावळेपणा करू नकोस... ती म्हणतेय तर थांब ना थोडं... तू ही बिझनेस मध्ये लक्ष घाल... आणि तसही किती दिवस एकटे अंकल सर्व सांभाळणार आहेत.. तुलाही तेवढाच वेळ मिळेल....काहीतरी करून दाखवण्यासाठी... आज ना उद्या तुलाच सर्व जबाबदारी उचलायची आहे ना... मग कर ना सुरुवात आत्तापासूनच...! 🙂"सोनिया ने विहान ला समजावलं...

" ह्म्म्म... तू पण तिचीच बाजू घे आता.... 😏"

" विहान........ "

" हो समजलंय मला... आता तू नको लेक्चर देऊ 🙄"

सोनिया ला कळालं तो चिडलाय... त्यामुळे ती शांतच बसून होती....विहान ही काही बोलत नव्हता...... दोघेही त्यांच्या कॉलनी मध्ये पोहोचले.. सोनिया उतरली.. तीही मुद्दाम काहीच बोलली नाही.. तशीच जायला निघाली... तसा विहान गाडीतून उतरला आणि तिच्याजवळ गेला...

"सॉरी ना... तुझ्यावर नव्हतं चिडायचं मला...😒"

"इट्स ओके ... I know........Positively घे तिला.. उगीच स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि तिलाही देऊ नको... 😊"

"हो... आणि थँक्स"

"कशासाठी?? 🤔"

"आज निहिरा ला माझ्या रूम मध्ये पाठवण्यासाठी... आम्हाला बोलायला मिळावं म्हणून तिला आईस्क्रीम च्या बहाण्याने किचन मध्ये पाठवण्यासाठी.. तिच्यासोबत थोडा वेळ घालवता यावा म्हणून पार्क जवळ गाडी थांबवायला लावण्यासाठी..... 😅😅"

" ओह्ह... आलं का ते आपल्या लक्षात 🤔🤔😅"

विहान ने हसून तिला हग केलं.." तुम नही होते तो मेरा क्या होता..!! "

" बस कर पगले अब रुलाएगा क्या 😓😂😂😂"

" नाटकी.... चल बाय... गुड नाईट!! "

" गुड नाईट dear.. "

आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेले..

विहान चेंज करून बेड वर पडला.. पडल्या पडल्याच त्याने निहिरा ने दिलेलं गिफ्ट open करून बघितलं..
" वॉव!! Beautiful... 😍"

निहिरा ने दिलेलं की चेन त्याला खुपच आवडलं.. त्याने लगेच त्याच्या बाइक ची चावी त्या की चेन मध्ये अडकवली.. आणि की चेन ला किस केलं... 😄 तिने दिलेला perfume ही त्याने व्यवस्थित कपाटात ठेऊन दिला....😃 तिलाच आठवत तो झोपी गेला...! 💕

- - - - - - - XOX - - - - - - - -

त्यानंतर आठवण येऊनही त्याने तिला मेसेज किंवा कॉल करायचा प्रयत्न केला नाही... निहिरा ने एक दोनदा त्याला मेसेज करायचा प्रयत्न केला होता पण त्याने मुद्दामच रिप्लाय केला नाही.... तो अजूनही थोडा रागातच होता...

दिवस भराभर जात होते.. निहिरा चं कॉलेज सुरू झालं ...तिने स्वतःला अभ्यासात बिझी करून ठेवलं होतं.. आणि त्याने बिझनेस मध्ये स्वतःला अडकवून ठेवलं होतं... तो खूप चांगल्या प्रकारे बिझिनेस हॅन्डल करत होता... त्याच्या डॅडना ही त्याच्यामुळे बराच आराम मिळाला होता... ते खूप खुश होते विहान वर!!

विहान बिझनेस मध्ये जरी चांगला रूळला होता तरी निहिरा ला तो खूप मिस करायचा... तो जरी तिला इग्नोर करतोय असं दाखवत असला तरी त्याला खूप आठवण यायची तिची... तो जेवढं तिच्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा तेवढी जास्त आठवण यायची तिची...! 😑

तिचीही हालत वेगळी नव्हती खरं तर ... पण विहान ने तिला रिप्लाय केला नाही म्हणून मग तिनेही परत त्याला मेसेज केला नाही... तिने पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं स्वतःला...शिवाय आपला प्रोजेक्ट जास्तीत जास्त चांगला बनवण्यासाठी ती मेहनत घेत होती.. खूपच जास्त आठवण आली विहान ची की मग ती थोडा वेळ त्याचे फोटो बघत रहायची... त्याच्यासोबत घालवलेले ते क्षण आठवायची... आणि तिला भरून यायचं... 😢 त्याने दिलेलं गिफ्ट हृदयाशी कवटाळून धरायची..😑त्याने दिलेली चेन तर कायम तिच्या गळ्यात असायची.... खुपदा मोह व्हायचा तिला.. त्याला कॉल करण्याचा... त्याचा आवाज ऐकण्याचा... पण मग ती स्वतःला आवरायची.. शांत डोळे बंद करून पडून रहायची... त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणायची आणि मग त्याचं निरागस वागणं आठवून ती स्वतःशीच हसायची..! 😅

विहान ने सुरुवातीला रागाच्या भरात खूप कंट्रोल केलं... पण जसजसे दिवस जात होते त्याच्या मनाची निहिरा बद्दलची ओढ ही वाढतच होती...💘

एकदा त्याने विचार केला.. की आपण निहिरा ला कॉल न करण्याचं आणि जास्त जवळ न येण्याचं प्रॉमीस केलंय... पण लांबून तर बघू शकतो ना तिला... 😍 मग तो जसं जमेल तसं तिला बघण्यासाठी कॉलेज वर जायचा... गेट च्या बाहेर तिला दिसणार नाही असं उभं राहून तो तिला बघायचा... ☺️असेच दिवस जात होते.. कधीतरी ग्रुप मधल्या कोणाचा बर्थडे असेल किंवा सर्व मिळून कुठे फिरायला जायचं असेल तर तेव्हा दोघे समोरासमोर येत असत... पण दोघेही अनोळखी असल्यासारखे वागत...😐 दोघेही एकमेकांना चोरून चोरून बघायचे पण समोरासमोर आल्यावर इग्नोर करायचे... 🤦... एव्हाना ग्रुपलाही त्यांचा अबोला लक्षात आला होता 😅.....
निहिरा बर्थडे पार्टीज् attend करायची पण इतर वेळी फिरायला येणं ती बर्‍याचदा टाळायची... एकतर विहान समोर असल्यावर कंट्रोल करणं कठीण व्हायचं... त्याच्याशी बोलावसं वाटायचं.... आणि दुसरं म्हणजे... ती जास्तीत जास्त तिचा अभ्यास आणि प्रोजेक्ट ह्यातच गुंतलेली असायची.. ती आता ध्येयवेडी झाली होती..!

अशातच पाच - सहा महिने निघून गेले.... ऑक्टोबर महिना उजाडला होता .. फर्स्ट सेम च्या एक्झामस् नुकत्याच झाल्या होत्या.. आता निहिरा चा वाढदिवस जवळ आला होता... इकडे विहान बेचैन झाला... आपण तर बोलत ही नाही एकमेकांशी.. तिचा वाढदिवस कसा साजरा करायचा? 🙁 त्याला तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं होतं.....आणि तिला गिफ्ट काय घ्यायचं हा तर यक्षप्रश्न होता त्याच्यासमोर...!!😐

एके दिवशी तो त्याच्या केबिन मध्ये chair वर बसून टेबल वर त्याची गोल्ड रिंग फिरवत कसला तरी विचार करत होता... इतक्यात त्याला काहीतरी आठवलं...😁 आणि तो खुष होत chair वरुन उठला...... 😄😄

To be continued..
🙏
#प्रीत 🍁