kdambari jivalaga - 17 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग - १७

कादंबरी – जिवलगा....भाग-१७ वा

ले- अरुण वि.देशपांडे

---------------------------------------------

मधुरिमा म्हणाली ..नेहा , आपले जेवण वगरे झालेले आहे, घरी जाऊन झोपणे “एव्हढेच काम ,

तुला उद्या ऑफिस ..! आणि मी , मला थोडेच कुठे जायचे घराच्या बाहेर , आराम करीन .

पण, आता आपण मस्त .. एक लांब चक्कर मारू या का कार ने ..? रात्रीच्या वेळी .फार मजा

येते लॉंग- ड्राईव्हला. मी मस्त गाडी चालवते , तू गप्पा मार , सोबत गाणी लावू या ,हे असे

मला खूप आवडते .

आपण दोघी आज पहिल्यांदा अशा मूड मध्ये फिरणार आहोत.

नेहा ,मला आवडते हे असे सगळे , पण, तुला आवडेल ना ग ?

उगीच ..मी म्हणते ,मग नाही म्हणून नाराज कशाला करायचे , असे फंडे नको करू हं !

नेहा म्हणाली -

नाही –मधुरिमा – मला पण असे नक्की आवडेल ..तुझ्या सहवासात राहून ..मला आता कळायला

लागलाय ..

आपल्यात बदल करण्यातच –आपले हित असते , फक्त..हे बदल करतांना ..त्यातले भले काय ,नी

वाईट काय “, हे आपण ठरवावे ,म्हणजे वाईट वाटून घेण्याची वेळ येणार नाही आपल्यावर .

नेहाचे बोलणे ऐकून ..मधुरिमा म्हणाली –

काही पण म्हण नेहा – तुझे बोलणे ऐकून ..नव्या मुला-मुलींना तुझ्याबद्दल , तुझ्या विचारांच्या बद्दल

तुझी मस्करी करावी वाटेल, ओल्ड लेडी , आज्जीबाई कुठली !

असे म्हणणारे आहेत, मी पण आहे तुला असे म्हणणारी .

पण कधी कधी डोके जागेवर असले म्हणजे ..मी विचार करते ..तेव्हा खरेच ..

मला पटायला लागते की..

यार , नेहा बोलते ते खरेच आहे, हसण्यावारी नेण्यासारखे नसते तिचे बोलणे .

मग मात्र मी मनातल्या मनात तुला नमस्कार करते बरे का ..नेहा –

जिला आधी मी

काय नेहाकाकू ? असे मस्करीने म्हण्यची.

पण आता नाही म्हणावे वाटत असे तुला ,

नेहा , माणसांचा सहवास घडतो न , तेव्हा आपल्याला

,एकमेकांना समजून घेणे खूप सोपे जाते , उगीच्या उगीच बनवलेली मते गळून पडू लागतात .

माझे असेच होत असते . माणसांना समजून घेणे मला फार आवडते. नेहा .

नेहाच्या चेहेर्यावर एक प्रसन्न सिमत उमटलेले पाहून मधुरिमा खुश झाली .

नेहा म्हणाली-

मधुरिमा ..तू मला जाणून घेते आहेस ,त्यापेक्षा तू मला समजून घेतलेस हे जास्त महत्वाचे ,

बघ,आज तुझ्यामुळे माझ्यात किती छान बदल होऊ लागले आहेत ..खरे सांगायचे तर,तुझ्याकडून

मी आत्मविश्वासाने पुढे जाण्यास शिकते आहे.

या नव्या जगात माझा कसा निभाव लागतो ते पाहू या .. ?

नेहा ..अजिबात घाबर्यचे नाही .लोक फार हुशार असतात हे जरी खरे असले तरी , आपण ही

त्यांच्या पेक्षा काही कमी नाही आहोत “,हे जाणवून दिले ना , मग, बरोब्बर वागतात आपल्याशी.

नेहा म्हणाली-

मधुरिमा – इतके दिवस झाले ,पण तू स्वतः बद्दल एका अक्षराने कधी काहीच सांगितले नाही ,

तुझ्या बोलण्यात कधी ही तुझ्या फमिली बद्दल काही उल्लेख नसतो ..

असे का बरे ? एनी प्रोब्लेम ?

तू सांगावे आणि मी ऐकावे ..असे म्हणेन ..

तू सुद्धा पुढच्या आठ-पंधरा दिवसात परदेशी जाऊन येणार आहेस...त्या अगोदर तुझ्याबद्दल सारे

जाणून घेण्यास मी उत्सुक असेल.

नेहाचे बोलणे ऐकल्यावर -

इतका वेळ उत्साहाने बोलणारी मधुरिमा .एकदम गप्प झाली ..काय बोलू ? सुचेना .

ती म्हणाली ..

नेहा – तू असे कधी न कधी विचारणार हे माहिती होते मला ..

माझी कहाणी ......

.हो,कहाणीच म्हणायची माझी ही ..तुझ्यापेक्षा खूप वेगळी आहे ..माझी कहाणी .

तुझे जग वेगळे आणि मी ज्या जगातून ..आताच्या या जगात आले आहे ..तो सगळा

प्रवास ..खूप वेगळा आहे ...

तुझ्या कल्पनेत नसणारा ..हे तर नक्कीच.

मी सांगेन तुला ..सगळ काही ..

घरासमोर गाडो थांबली , गेट उघडून दोघी आत आल्या ...

घरात आल्यावर घड्याळात पाहून ..मधुरिमा ..म्हणाली ..

नेहा - सकाळी तुला घाई असते ऑफिसला जायची ..सो, आता नो जागणे , नो गप्पा ..

गुड नाईट करू या .. !

उद्या तू ऑफिसातून आल्यावर ..बोलत बसू आपण, तू आणि मीच आहोत आता घरात .

नेहा ..पडल्या पडल्या विचार करू लागली ..

मधुरिमा असे जगावेगळे काय सांगणार आहे , ? या विचाराने कितीतरी वेळ नेहा जागीच होती ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग –१८ वा ..लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED