Bara Jyotiling - 4 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग ४

बारा जोतीर्लींग भाग ४

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर

उज्जैनचे महाकाल मंदिर हे शंकराच्या बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक आहे. हे एकमेव दक्षिणमु्‍खी शिवलिंग आहे. तांत्रिक-मांत्रिकांसाठीही हे मंदिर खूप महत्त्वाचे मानले जाते. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.महाकालेश्वर मंदिर मधील मूर्तीस बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ओळखले जाते.
कारण ती दक्षिण मुखी मूर्ती आहे.
परंपरेनुसार महाकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक आहे,व सर्वात जास्त आस्थेचे मानले जाते.

येथील लिंग महादेव तीर्थ स्थळाच्या वर स्थापित केले आहे. येथे गणेश पार्वती आणि कार्तिकेय देव यांच्या प्रतिमा पण आहेत. दक्षिण दिशेस प्रिय नंदी स्थापित केले आहे.
महाकालेश्वर मंदिर एका विशाल बगीच्याच्या मध्यभागी आहे.
हे मंदिर पाच मजली असून त्यातील सर्वात खालचा म्हणजे पहीला मजला हा जमिनीत आहे.
याच्या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे
येथे बनविलेले चौथ्या मजल्यावरील नागचंद्रेश्वर मंदिराचे द्वार फक्त नागपंचमीस उघडले जातात.
याच्या भिंतीवर पितळी दिवे स्थापित केले आहेत. येथे सोमवारी भक्तांची फार गर्दी असते. दररोज विधिवत पूजा केली जाते.
महाकालेश्वर लिंगास सजवले जाते.
नित्य नियमाने प्रसादाचे वाटप होते.

येथे महाशिवरात्रीस एका मोठ्या महोत्सवाचे रूप पाहायला मिळते.
या मंदिराच्या प्रांगणात स्वप्नेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे.
येथे महाकाल रुपी भगवान शंकरांची पूजा केली जाते.

अशी समजुत आहे की येथे पूजा केल्यास आपले स्वप्न पूर्ण होते.
हे एक सदाशिव मंदिर आहे.
येथे भक्त मोठ्या भक्ती भावाने स्वप्नेश्वरांची पूजा करतात.
येथे माता स्वप्नेश्वरींचा वास आहे से मानतात .
त्यामुळे माता भगीनी आपल्या मनोकामनाचे साकडे त्यांच्याकडे घालतात.

महाकालेश्वर मंदिर सकाळी ४ ते रात्री ११ पर्यंत खुले असते .

शक्तीपिठामध्ये १८ शक्तीपीठांपैकी हे एक मानले जाते.
येथे मनुष्याच्या शरीरास आंतरिक शक्ती मिळते असे म्हणतात .

शिव पुराणानुसार ..
एकदा त्रिदेव म्हणजे ब्रम्हा,विष्णू आणि महादेव यांच्यात चर्चा सुरु होती.
तेव्हा भगवान शंकराच्या मनात ब्रम्हदेव आणि महादेव यांची परीक्षा घेण्याचा विचार आला.
त्यांनी त्या दोघांना प्रकाशाचा अंत कोठे आहे हे शोधण्यास सांगितले.

ब्रम्हा व विष्णू दोघांसाठी शिवांनी एक मोठा स्तंभ उभारला ज्याचा अंत कोठे होता ते दिसेना.
दोघेही त्या स्तंभाचे टोक शोधू लागले,पण तो सापडेना.
श्रीविष्णू थकले व आपली हार मान्य केली तर ब्रम्हा मात्र खोट बोलले कि त्यांना त्याचे टोक सापडले आहे .

यावरून क्रोधित होवून शिवांनी त्यांना शाप दिला की लोक तुमची पूजा कधीच करणार नाही तर फक्त विष्णूची सर्वजण पूजा करतील.
तेव्हा क्षमा मागत ब्रम्हानी शिवाची विनवणी केली.
त्या वेळेस या स्तंभात शिव स्वतः विराजमान झाले.
हा स्तंभ महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आहे असे मानले जाते.
स्तंभाचे रुपांतर लिंगात झाले तेव्हा पासून या ज्योतिर्लिंगास खास महत्व प्राप्त झाले आहे.
प्रमुख १२ ज्योतिर्लिंगापैकी महाकालेश्वर सर्वात पवित्र मानले जाते
येथे शिवलिंग स्थापन होण्यासंदर्भात अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
दूषण नावाच्या राक्षसाच्या अत्याचाराला उज्जैनवासीय वैतागले होते.
त्यांनी संरक्षणासाठी शंकराची आराधना केली. शंकर प्रसन्न झाले. ज्योतिच्या रूपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला.
भक्तांच्या आग्रहानंतर लिंगाच्या रूपात ते उज्जैनमध्ये स्थायिक झाले.
अशी कथा ‍शिवपुराणात आहे.

येथील शिवलिंग जगा‍तील एकमेव असे शिवलिंग आहे जेथे भस्माआरती केली जाते.
ही भस्मारती म्हणजे अलौकीक सोहळा असतो.
पहाटे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत वैदिक मंत्र, स्तोत्रपठण, वाद्य यंत्र, शंख, डमरू आणि घंटानादात ही भस्मारती केली जाते. बम-बम भोलेच्या जयघोषात ही आरती आपले अंतर्मन जागृत करते.
या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक उत्सुक असतात.

भस्मारतीचे वेळी पूजा करण्यासाठी पुरोहित साधे वस्त्र धारण करून गाभार्‍यात जातात .
पुरूषांसाठी रेशमी वस्त्र आणि महीलांना साड‍ी परिधान केल्यानंतरच गाभार्‍यात प्रवेश दिला जातो.
मुख्य आरतीत केवळ पुरूषच सहभागी होतात.
यावेळी स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही.
गाभार्‍याबाहेर तयार केलेल्या नंदी हॉलमध्ये भक्त या भस्मारतीचा आनंद घेऊ शकतात.

''पूर्वी येथे मृतदेहाला जाळल्यानंतर उरलेल्या राखेने (चिताभस्म) भोलेनाथाला सजविले जात असे.
परंतु, एकदा मृतदेहाची ताजी राख (चिताभस्म) मिळाली नाही.
त्यावेळी पुजार्‍याने आपल्या जिवंत पुत्राला अग्निच्या हवाली करून दिले आणि बालकाच्या चिताभस्माने शंकराला सजविले होते. तेव्हापासून येथे मृतदेहाच्या चिताभस्माऐवजी गायीच्या शेणाने तयार केलेल्या भस्मापासून भगवान शिवाला सजविले जाते.'', अशी दंतकथा आहे.
अध्यात्मिक दृष्टी प्रमाणे शंकर हेच संसाराचे सृजन कर्ता आणि मृत्यू लोकाचे स्वामी आहेत आणि ते काळाचेही काळ आहेत [ महाकाळ] तसेच सर्व सामान्य मनुष्याने पण आयुष्यातली दुखणी , रोग, संकट , मृत्यू भय इत्यादींवर काळ म्हणून प्रहार केला तर संसारी जीवन सोपं होईल.

जेंव्हा आपण आपल्या जीवनातल्या विसंगती , विकृती, भय ह्यांना खंबीरपणे प्रतिसाद देतो तंव्हा आपण नकळत आपलं जगणं सोपं करतो .
महाकाल मंदिरात शिवरात्र आणि श्रावणी सोमवारच्या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी उज्जैनचा राजा महाकाल आपल्या जनतेची परिस्थिती जाणून घेण्यासाठी शहरात फिरायला निघतो, अशी समजूत आहे.
या दिवशी भगवान शिवाचे मुखवटे पालखीत ठेवून मिरवणूक काढली जाते.
शेवटच्या श्रावण सोमवारी महाकालची शाही मिरवणूक काढली जाते. यामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभाग घेतात.
सगळीकडे महाकालचा जयघोष चाललेला असतो.

तलावाकाठी असलेल्या या मंदिराचे स्थान दक्षिणाभिमुख असून शाळीग्रामच्या शिवलिंगावर चांदीचे कवच चढवले आहे.
महाशिवरात्री, विजयादशमीस मोठा उत्सव, माघ कृष्ण षष्टीपासून चतुर्दशीपर्यंत उत्सव, प्रदोशानंतरच्या पूजा याठीकाणी महत्त्वाच्या मानल्या जातात.
पंचामृत पूजा, धान्य पूजा, पुष्प पूजा पाहण्यासाठी भाविकांची या ठिकाणी खुपच गर्दी होत असते.

''उज्जैनचा एकच राजा आहे, तो म्हणजे महाकाल' असे पूर्वी सांगितले जात असे.
यामुळे उज्जैनच्या सीमेमध्ये कोणताही राजा-महाराजा रात्री थांबत नसे, असेही बोलले जाते. म्हणूनच उज्जैनवर शिंदे घराण्याचे राज्य होते, तेव्हाही रात्र काढण्यासाठी त्यांनी आपला राजवाडा शहराच्या सीमेबाहेर बांधला होता असे म्हणतात .
ह्या मंदिरात मृत्यू आणि आजार प्रवेश घेऊ शकत नाही आणि जो इथे दर्शन घेतो त्याला ह्या गोष्टींचे भय रहात नाही .
श्री महाकाल मंदिराचे दरवाजे पहाटे चार वाजता उघडतात.
ही वेळ भस्मारतीची असून ती सकाळी सहा वाजेपर्यंत चालते.ही आरती पाहण्यास महिलांना परवानगी नाही त्यामुळे त्यांना त्या वेळेस घुंघट घ्यावा लागतो .
सकाळी साडेसात ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत नैवेद्य आरती चालते.
संध्याकाळी पाचपासून जलाभिषेक बंद होतो. संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत सायंआरती आणि रात्री साडेदहा वाजता शयन आरती असते. रात्री अकरा वाजता मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (उन्हाळ्याच्या दिवसात नैवेद्य आरती सकाळी सात ते पाऊणे आठ वाजेपर्यंत आणि सायं आरती सात ते साडेसात वाजेपर्यंत असते.)
महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव, श्रावण सोमवारी पूजा-अभिषेक केला जातो.

वर्षभर महाकाल मंदिरात भक्तांची रांग लागलेली असते, परंतु शिवरात्र आणि श्रावण महिन्यात या नगरीचे रूप निराळेच असते.
सगळीकडे गर्दी असते. रस्त्यावर खांद्यावर कावड घेतलेले लोक नजरेस पडतात.
संपूर्ण शहर शिवभक्तीत मग्न झालेले असते. श्रावणात येथे श्रावण महोत्सव होतो.
वर्तमान मंदिर श्रीमंत पेशवा बाजीराव आणि शाहू महाराजांचे सेनाप्रमुख राणाजीराव शिंदे यांनी १७३६ मध्ये बनवले होते .
नंतरच्या काळात त्यांच्या पुत्राने म्हणजेच महादजी शिंदे यांनी वेळोवेळी याच्यात उचित बदल व दुरुस्ती केली.

१८८६ पर्यंत ग्वालियरच्या शिंदे घराण्याचे अनेक धार्मिक विधी येथेच संपन्न होत असत .
शिंदे घराणे आज सिंधिया घराणे म्हणून ओळखले जाते.

श्री महाकालमंदिराची प्रशंसा महाभारतकालीन वेदव्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे.

देवलोकीच्या शिल्पकार विश्वकर्माने हे मंदिर बांधले, असा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आहे.
येथील मंदिराची निर्मिती अकराव्या शतकात झाली.
त्यानंतर जवळपास 140 वर्षानंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवर आक्रमण करून हे मंदिर उध्वस्त केले.
सध्याचे मंदिर मराठाकालीन आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता.
अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या.
त्यांच्या काळातच कोठी लिंगार्चन प्रथा सुरू झाली.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED