बारा जोतिर्लिंग भाग ११ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बारा जोतिर्लिंग भाग ११

बारा जोतिर्लिंग भाग ११

त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र– नाशिक)

त्र्यंबकेश्वर हे शहर महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे.
गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे
हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असुन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर यानांवाने प्रसिद्धआहे.
या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्टय म्हणजे या लिंगात ब्रम्हा, विष्णु आणि महेश हे तीन देव असल्याचे समजले जाते, म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हटले जाते.

हेमाडपंती पध्द्तीचं बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्थापत्य आणि शिल्पकला हे ही या मंदिराचे वैशिष्टच आहे. ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बारा ही महिने भाविकांचा मोठा राबता असतो.
श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते.

येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातुन हजेरी लावतात.
ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ आहे.
निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.
मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे.

कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे.

कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे.

मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.
भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायणनागबली, त्रिपिंडी, कालसर्पशांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्तविधी, हे धार्मिक विधी केले जातात

श्री त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास असा सांगतात
दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली.
त्यांतील एक हे शिवालय आहे..

ती शिवालये अशी होती ..
गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर,
वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय,
धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे
बाम नदीच्या उगमाशेजारचे
बेलगावला कडवा नदीच्या उगमाशेजारचे
टाकेदला प्रवरा नदीच्या उगमाशेजारी
रतनवाडीतील अमृतेश्वर
मुळा उगमस्थानी असलेल्या हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर
पुष्पावतीजवळ खिरेश्वरातील नागेश्वर
कुकडीजवळ्च्या पूरमधील कुकडेश्वर
मीना नदीच्या उगमाशेजारच्या पारुंडेतील ब्रह्मनाथ
घोड नदीच्या उगमस्थानी वचपे गावातील सिद्धेश्वर
आणि भीमा नदीजवळचे भवरगिरी.
ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत.
यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.
डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.
याची पौराणिक कथा अशी आहे ..

एके काळी येथे बरीच वर्षे पाउस पडला नाही त्यामुळे लोकांनी इथून निघून जाणे उचित समजून ते हा भाग सोडून जाऊ लागले.
या गोष्टीमुळे चिंतित होऊन महर्षि गौतमांनी 6 महीने इथे तपश्चर्या केली .

यामुळे वरुण देव अत्यंत प्रसन्न झाले आणि तेथे प्रकट झाले व महर्षि गौतमाना म्हणाले की आपण एक खड्डा खोदा .
महर्षि गौतमांनी एक खड्डा खोदला .
तेव्हा वरुण देवानी तो खड्डा पाण्याने भरून दिला व सांगितले यातुन अक्षय पाणी मिळेल .

पाणी भरल्यावर तेथे रोपे ,झाडे उगवणे सुरू झाले आणि सगळीकडे हिरवेगार झाले.
मनुष्य, पशु, पक्षी हे सर्वजण जे तेथुन निघुन गेले होते ते परत आले.
सर्व लोकानी महर्षि गौतमांची प्रशंसा केली .

एकदा त्या खड्यातून पाणी आणण्यासाठी महर्षि गौतमांचे शिष्य गेले असताना त्याच वेळी अन्य ऋषिच्या पत्नी आपापल्या घागरी घेऊन गेल्या होत्या .
त्यांच्यात कोण पाणी आधी घेणार यावरून भांडणे झाली .
इतक्यात तेथे माँ अहिल्या आल्या .
त्यांनी सांगितले की हे शिष्य लोक तुमच्या आधी येथे आले आहेत तेव्हा प्रथम यांना पाणी दिले पाहिजे .
ऋषिपत्निना हे त्यांचे बोलणे आवडले नाही .
त्यांना वाटले की माँ आपल्या शिष्यांची बाजु घेत आहेत .
हे पाणी तर महर्षि गौतम यांच्यामुळे मिळाले आहे .
म्हणूनच हे पाणी प्रथम त्यांच्या शिष्यांना दिले जात आहे .
त्या स्त्रियांनी या गोष्टी घरी जाऊन आपापल्या पतींना थोड्या वाढवुन सांगितल्या .
ऋषींना अतिशय राग आला आणि त्या सर्वांनी ठरवले की या गोष्टीसाठी महर्षि गौतमांचा बदला घ्यायचा .
त्या सर्वांनी भगवान गणेशजींची पूजा-अर्चना करायला सुरु केली .

तेव्हा प्रसन्न होऊन तेथे गणेश भगवान प्रकट झाले .
त्या सर्व ऋषींनी महर्षि गौतम यांचा अपमान करण्यासाठी भगवान गणेश यांच्याकडे मदत मागितली .
तेव्हा गणेशजी म्हणाले की महर्षिसोबत असे वागणे ठीक होणार नाही .
त्यांनीच तुम्हा सर्वांना पाणी मिळवुन दिले आहे हे विसरू नये .
तरीही त्या ऋषींनी खुप हट्ट केला त्यामुळे भगवान गणेशजी यांना ते ऐकावे लागले .
पण त्यावेळी गणेशजीनी निक्षून सांगितले की तुम्ही जर प्रत्येक गोष्ट चुकीची करायला लागलात तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत .
त्यानंतर एके दिवशी गणेशजी एका अशक्त गायीच्या रूपात महर्षि गौतम यांच्या धान्याच्या शेतात गेले.
गौतम ऋषींनी बघितले की ही अत्यंत अशक्त आहे ते स्वतःच्या हाताने त्या गाईला खाऊ घालू लागले .
धान्याच्या कणाचा स्पर्श होताच ती गाय ज़मीनीवर धाडकन पडली आणि ताबडतोब तिचा मृत्यू झाला .
तिथे लपुन बसलेल्या अन्य ऋषी व त्यांच्या पत्नी हे सर्व पहात होते आणि गायीचा मृत्यु झाल्यावर ते सर्व ताबडतोब बाहेर आले .
तुमच्यामुळेच गाय मरण पावली असा ते महर्षिवर आरोप करू लागले .
तुम्हीच खुनी आहात .
आता जोपर्यंत तुम्ही येथे रहाल तोपर्यंत पितृ गण आणि अग्निदेव आमचा नेवेद्य ग्रहण करणार नाहीत .
तुम्ही एक गौहत्या करणारे आहात , तुम्हाला आपल्या परिवारा सहीत दुसरीकडे जाऊन राहायला पाहीजे.
तेव्हा महर्षि गौतम त्र्यंबक पासून दुर निघून गेले आणि दुसरीकडे आश्रम करून राहू लागले .
इथे पण ऋषि त्यांना त्रास देऊ लागले आणि पूजा, हवन,यज्ञ यात अडथळा निर्माण करू लागले .

तेव्हा गौतमजीनी गौहत्या शुद्धिसाठी सर्वांना प्रार्थना केली .
त्यावेळेस ऋषींनी सांगितले की जर तुम्ही आपल्या पापाचा उच्चार करीत तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा कराल आणि परत येऊन इथे एक महीनाभर व्रत कराल आणि त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वताची 100 वेळा प्रदक्षिणा कराल त्यानंतरच तुमची शुद्धि होईल .
किंवा दुसरा उपाय म्हणजे गंगेच्या पाण्याने स्नान करा व एक करोड पार्थिव लिंगे बनवुन महादेवांची पूजा करा
परत त्यानंतर गंगास्नान करून ब्रह्मगिरी पर्वताला 11 वेळा प्रदक्षिणा घाला त्यानंतर 100 घडे पाण्याने पार्थिव शिवलिंगाला स्नान घाला त्यानंतरच तुमचा उद्धार होईल ,
ऋषींनी जे जे सांगितले त्या अनुसार गौतमांनी सर्व तसेच केले .

माँ अहिल्याने सुद्धा यामध्ये आपल्या पतीची साथ दिली .
यामुळे भगवान शिवजी अत्यंत प्रसन्न झाले आणि तेथे प्रकट होऊन म्हणाले की आपण आपल्याला पाहीजे तो वर मागू शकता .
गौतम ऋषि म्हणाले की मला गौहत्या मुक्त करा.
या पापातून मला बाहेर काढा .
तेव्हा भगवान शिवजी म्हणाले की महर्षि आपण तर नेहेमीच निर्दोष होतात.
या दुष्टांनी तुमच्या सोबत कपट केले आहे.

तुम्ही गंगेप्रमाणे पवित्र आहात.
त्या पापी लोकांचा मात्र कधीच उद्धार नाही होणार कारण ते सर्व मिळुन तुमच्याशी कपटी वागले आहेत .
त्यावेळी महर्षि म्हणाले की जर ते ऋषि तसे वागले नसते तर मला आपले दर्शन कधीच झाले नसते .
जर खरोखर आपण माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला माँ गंगा प्रदान करा .

त्यावेळेस शिवजीनी गंगामैय्याला परत पृथ्वीवर अवतरित होण्यास सांगितले .
तेव्हा गंगामैय्याने सांगितले की आपण आपल्या परिवारासहीत जर येथे लिंग रुपात वास्तव्य कराल तरच मी येथे राहीन .
शिवजी तेव्हा तथास्तु म्हणाले .

देवतागण म्हणाले की जेव्हा जेव्हा बृहस्पति, सिंह राशिमध्ये प्रवेश करतील तेव्हा सरस देव गण येथे येतील .
अशा प्रकारे माँ गंगा गोदावरी रूपात प्रसिद्ध आहे आणि शिवजी तेथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नावाने विराजमान आहेत .
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले.

भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती
ब्रह्मा, विष्णू, महेश
वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस
भक्त लोटती भावे
भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती

इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मनोकामना शिव भगवान पूर्ण करतात .
दूर दूर ठिकाणाहून भक्त या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात आणि पाप मुक्त होतात.

क्रमशः