Bara Jyotiling - 7 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग ७

बारा जोतिर्लिंग भाग ७

भीमाशंकर हे जोतिर्लिंग पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे.
भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे..

हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे.
१९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली.
या जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात.
येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू,म्हणजे उडणारी खार.
येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलातच आढळते.
बिबट्याच्या संवर्धनासाठी सुद्धा येथे वनविभागाने विविध योजना अवलंबल्या आहेत.

अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्र असल्यामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

बऱ्याच जणांच्या मतानुसार ‘शिवपुराणा’त वर्णन केलेलं भिमाशंकर हे आसामच्या गुवाहाटीमध्ये आहे. तर ‘लिंग पुराणा’त वर्णन केल्याप्रमाणे भीमाशंकर हे ओडीसा मध्ये आहे.
मात्र पुण्याजवळील भीमाशंकर यालाच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जाते .
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे भीमाशंकर.
हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे १२०० ते १४०० वर्षांपूवीचे आहे.
मंदिराच्या छतावर, खांबावर सुंदर नक्षीकाम आढळते.
मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या रेखीव व सुंदर मूर्ती आहेत.
सभामंडपाबाहेर सुमारे पाच मण वजनाची असलेली लोखंडी घंटा आहे.
चिमाजी अप्पांनी ही घंटा भेट दिल्याचे सांगण्यात येते.
या घंटेवर १७२९ असे इंग्रजीत नोंद आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार व नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही.
मंदिराचा भव्य सभामंडप, उंच कळस, डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही.
शंकराने या ठिकाणी त्रिपुरासुराचा वध केला.
त्यानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे.
या भागातील घनदाट जंगलाचा फायदा घेऊन सावंत बंधूंनी औरंगजेबाचा पराभव केला असल्याची माहिती आहे.

सह्याद्री पर्वतातील, देवराई जंगलातील दरीत हे मंदिर वसलेले असून सुमारे शंभर पाय-या उतरून या मंदिरात जावे लागते.
या मंदिराच्या रचना इंडो-आर्यन शैलीतील आहे.
त्यामुळेच मुख्य शिखरावर छोटी छोटी शिखरे जोडलेली आढळतात.
येथे असणारा नंदी मंडप प्राचीन काळातील मानतात.
या मंदिरात अकरा सुंदर कमानी व नव्या रचनांचा मेळ सुंदररित्या घातला आहे.

.

भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे नाव भीमाशंकर कसे पडले याची एक पौराणिक कथा प्रचलित आहे .
कथा महाभारतकाळातील आहे .
महाभारतातले युद्ध पांडव आणि कौरव यांच्यात झाले होते .
यामध्ये दोन्हीकडचे बरेच महान वीर मारले गेले होते .
या युद्धात भाग घेण्यापूर्वी दोन्हीकडच्या वीरांना गुरु द्रोणाचार्य यांचेकडून प्रशिक्षण प्राप्त झाले होते .
जिथे कौरव आणि पांडवाना हे प्रशिक्षण देण्याचे कार्य केले गेले होते .
ते स्थान आज उज्जनक या नावाने ओळखले जाते .
इथेच आज भगवान महादेव भीमशंकराचे विशाल ज्योतिर्लिंग आहे .
याच मंदिराला भीमाशंकर ज्योतिर्लिग म्हणतात .
भीमशंकर ज्योतिर्लिंगची पौराणिक कथा अशी आहे
पुराणकाळात भीम नावाचा एक राक्षस होता .
तो कुंभकर्ण राक्षसाचा मुलगा होता .
परन्तु त्याचा जन्म नेमका त्याच्या पित्याच्या मृ्त्यु नंतर झाला होता .
आपल्या पित्याचा मृ्त्यु भगवान राम यांचाकडून झाला ही घटना त्याला माहित नव्हती .
काही दिवसांनी जेव्हा त्याला आपल्या आईकडून ही घटना समजली तेव्हा तो श्रीरामांचा वध करण्यासाठी आतुर झाला होता .

आपला उद्देश पूरा करण्यासाठी त्याने अनेक वर्षपर्यंत कठोर तपश्चर्या केली .
त्यामुळे प्रसन्न होऊन त्याला ब्रह्मदेवाने विजयी होण्याचे वरदान दिले .
वरदान मिळाल्यावर मात्र हा राक्षस बेताल वागू लागला .
त्यामुळे मनुष्यासोबत देवीदेवता सुद्धा भयभीत राहु लागले .
हळूहळू सगळीकडे त्याची दहशत वाढू लागली आणि सगळीकडे त्याची चर्चा सुरु झाली .
युद्धात त्याने देवीदेवतांचा पण पराभव करणे सुरु केले .
तो जेथे जात होता तेथे सतत मृ्त्युचे तांडव होऊ लागले .
त्याने सगळीकडचे पूजापाठ बंद केले .
अत्यंत त्रस्त झाल्यामुळे सर्व देव भगवान शिवाला शरण गेले .
भगवान शिवांनी सर्वाना आश्वासन दिले की ते यावर काहीतरी उपाय काढतील .
भगवान शिवांनी राक्षसाला मारून टाकले .
त्यावेळी भगवान शिवांना सर्व देवानी आग्रह केला की ते त्या जागेवर शिवलिंगाच्या रुपात विराजमान होतील . त्यांच्या या प्रार्थनेला भगवान शिवांनी स्वीकृती दिली आणि ते भीमाशंकर ज्योतिर्लिंगच्या रुपात तेथे विराजित झाले .

पौराणिक कथांमध्ये त्रिपुरासुराच्या वधासंबंधी डाकिनी देवीचे या अरण्यक्षेत्रात असण्याचे पुरावे मिळतात .
असे सांगतात की दैत्य त्रिपुरासुराच्या उन्मत्त वागण्याने त्रस्त झाल्यामुळे व्याकुळ झालेल्या देवतांनी आणि ऋषींनी भगवान शिवाना या दुष्ट राक्षसापासून वाचवण्याची प्रार्थना केली .
शिव शंकरांनी ब्रम्हा आणि इन्द्र देवांना भीमाशंकर पहाड़ीवर स्थित आदिशक्तिची कमलपुष्पांनी पुजा करण्याचा मार्ग सुचवला.
आदिशक्तिच्या सहाय्याने भीमकाय रूप धारण करून स्वताः शिवांनी विष्णुच्या बाणाने आणि वासुकीच्या धनुष्याने त्रिपुरासुराचा अंत केला .
या घमासान युद्द्धानंतर आराम करणाऱ्या शिवांच्या घामातुन सहस्त्र जलधारांची उत्पत्ति झाली ज्यापासुन भीमा नदीचा उगम झाला .
सदाशिवाच्या या विजयोत्सवाला येथील लोक त्रिपुरी पूर्णिमा किंवा कार्तिक पूर्णिमा या दिवशी परंपरागत रूपाने आनंदात साजरा करतात .
या दिवशी आस-पासच्या भागात राहणारे आदिवासी, कोळी, महादेव कोळी समाजातले असंख्य परिवार इथे एकत्रित होतात आणि भीमाशंकराला खीर अथवा अन्य नैवेद्य दाखवुन कृतज्ञता व्यक्त करतात .
महाशिवरात्रीत यथे भव्य यात्रा भरते, सोमवती अमावस्या, कार्तिक पौर्णिमेस उत्सव होतो व दर सोमवारी भाविकांची मांदियाळी या ठिकाणी मोठया प्रमाणावर होअसते
या दिवशी मंदिर परिसरात दीपमाला प्रज्वलित करत्तात आणि देऊळ सजवतात तसेच शिवाचा ज्योतिर्लिंग स्वरुपात शृंगार करतात .
भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे १.५ किमी पूर्वेला पुन्हा प्रकटते असे मानले जाते. ही जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.
शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत.
पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत.
नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जिर्णोध्दार केला होता..
भिमाशंकर हे खुप सुंदर ठिकाण आहे.
भीमाशंकर येथील भीमा नदीचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे.

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED