बारा जोतिर्लिंग भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बारा जोतिर्लिंग भाग ८

बारा जोतिर्लिंग भाग ८

रामेश्वरम हे भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक लहान शहर आहे.
रामेश्वरम शहर तमिळनाडूच्या आग्नेय भागात मन्नारच्या आखातामध्ये असलेल्या रामेश्वरम द्वीपावर वसले आहे.
या बेटालाच पंबन बेट म्हणतात.
पंबन बेट हे भारताच्या मुख्य भूमीला पंबन पुलाने जोडले आहे.
हे श्रीलंका आणि तमिळनाडू यांच्यामधील मन्नारच्या आखातात येते.
रामेश्वरममध्ये १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामनाथस्वामी मंदिर आहे.
ह्यामुळे रामेश्वरम हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते.
रामायणामध्ये भगवान श्रीरामांनी रामेश्वरममधूनच लंकेमध्ये आपले सैन्य नेण्यासाठी रामसेतूची रचना केली होती.
सध्या ह्या सेतूचे केवळ अवशेष शिल्लक असून एकेकाळी हा सेतू भारतीय उपखंडाला श्रीलंका बेटासोबत जोडणारा अखंड दुवा होता हे सिद्ध झाले आहे.

तसेच रामेश्वरम रेल्वे स्थानक दक्षिण रेल्वेचे एक टर्मिनस असून चेन्नई व मदुराईहून येणारे रेल्वेमार्ग येथे संपतात.

सन १९६४ साली धनुष्कोडी हे भारतात प्रवेश करण्यासाठीचे मोठे बंदर होते.
त्यावेळी एक फार मोठे चक्रीवादळ आले, आणि त्यामुळे धनुष्कोडी शहर, तेथली रेल्वे लाईन, एक स्टीम रेल्वे इंजिन आणि त्याला जोडलेले डबे हे सर्व वाहून गेले. या चक्री वादळाला रामेश्वर वादळ असे म्हणतात. वादळाच्या वेळी समुद्राच्या लाटांची उंची साडेचार मीटर होती.

लंकेवर स्वारी करण्यापुर्वी रावणाविरुद्ध लढण्याचं पाप धुण्यासाठी श्रीरामाने भगवान शंकराची उपासना करून याची स्थापना केल्यामुळे याला असे नाव पडले.
स्कंदपुरण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेखआलेलाआहे.
रामेश्वर द्वीपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले होते.
रामेश्वर मंदिराची निर्मिती १२ ते १६ व्याशतकात झाली. इ.स. १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनार्थ येऊन गेले आहेत.

बंगालचा उपसागर व हिंदीमहासागर यांचे हे संगमस्थान असून द्रविडस्थापत्यशैलीचे हे मंदिर मानले जाते .
येथील मंडपाची निर्मिती इ.स. १७४० ते १७७० याकालावधीत झाली. या मंदिर परिसरात २२ विहिरी असून गर्भगृहात चांदीच्या चौथ-यावर सुंदर शिवलिंग आहे.

विशेष म्हणजे या शिविलगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो.

महाशिवरात्रीस येथे मुख्य उत्सव होतो.
हत्तीवरून रामेश्वर पालखीची मिरवणूक काढतात.
दीपोत्सव साजरा केला जातो.
या ठिकाणी तामिळ भाविक मोठया प्रमाणावर यात्रेसाठी येत असतात.
सदर यात्रा पंधरा दिवस चालते.
असे मानतात की भगवान श्रीरामांनी श्रीलंकेतुन परत येताना महादेवाची या जागेवर पूजा केली होती.
म्हणुनच याचे नाव रामेश्वर मंदिर आणि रामेश्वर द्वीप पडले .
यासंबंधात अशी कथा आहे ..
रावणाचा वध केल्यावर भगवान राम आपल्या पत्नी देवी सीतासोबत रामेश्वरमच्या तटावर परतले तेव्हा अनेक ऋषी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले .
या ऋषिनी श्री रामाला सांगितले की त्याना ब्रम्ह्हत्येचे पाप लागले आहे कारण त्यांनी पुलस्त्य कुलाचा विनाश केला आहे .
त्यातून मुक्त होण्यासाठी एक शिवलिंग निर्माण करून त्याची पूजा करावी व शिवप्रभुना प्रसन्न करून घ्यावे म्हणजे आपणास या पापापासुन मुक्ती मिळेल .
ऋषिच्या या सांगण्यानुसार श्री रामाने हनुमानाला आदेश दिला की ताबडतोब कैलास पर्वतावर जाउन एक शिवलिंग घेऊन ये .
आदेशानुसार हनुमान ताबडतोब कैलास पर्वतावर पोचले पण लिंग मिळाले नाही .

तिथेच त्यांनी शिव भगवानची तपश्चर्या सुरु केली .
हनुमानच्या या तपश्चर्येवर शिवजी प्रसन्न झाले आणि प्रकट झाले .
ते लिंग घेऊन हनुमान त्वरित गंधमादन पर्वतावर पोचले पण त्यांना उशीर झाला होता .
तिथे ऋषिनी सांगितलेल्या मुहूर्ताप्रमाणे शिवलिंगाची स्थापना व्हायला हवी होती .
तेव्हा सर्वांनी निर्णय घेतला की स्वतःच लिंग निर्माण करायचे ,मग सीतामाईनी वाळु आपली हातात दाबून त्याचे लिंग तयार केले,आणि त्याची पूजा केली .
पूजा झाल्यानंतर जेव्हा हनुमानजी आले आणि त्यांनी पाहीले की लिंगाची स्थापना झालेली आहे .
तेव्हा त्यांना खुपच दुःख झाले आणि ते प्रभु रामाच्या पायावर कोसळले .
श्री रामांनी त्याची खुप समजून काढली पण काही उपयोग झाला नाही .
शेवटी हे लिंग उखडून हनुमानाने आणलेले लिंग स्थापायचे ठरवले .
पण जेव्हा लिंग उखडायला हनुमान पुढे गेले तेव्हा लिंग तर उखडले तर नाहीच उलट हनुमान मात्र जवळ जवळ तीन किलोमीटर दूर फेकले जाऊन बेशुध्द पडले .

हनुमान शुद्धीवर आले आणि त्यांनी श्री रामांच्याकडे पाहीले तेव्हा त्यांना परब्रह्माचे दर्शन झाले .
आपली चुक उमजून त्यांनी श्री रामांची क्षमा मागीताली .
तेव्हा श्री रामांनी त्यांना समजावले की ज्याच्याकडून या शिवलिंगाची स्थापना झाली आहे त्या शिवलिंगाला कोणी उखडू शकत नाही .अशी चुक परत करू नकोस .
आपल्या भक्तावर दया – भाव दाखवत त्यांनी हनुमानाने आणलेल्या शिवलिंगाला सुद्धा तिथेच स्थापित केले अशा रीतीने श्रीरामांक्डून स्थापित शिवलिंगाचे नाव रामेश्वर ठेवले गेले आणि हनुमानाकडून आणलेल्या शिवलिंगाचे नाव हनुमदीश्वर ठेवले गेले.
दुसऱ्या एका कथेनुसार
सीताहरण झाल्यावर जेव्हा श्री राम, लक्ष्मण, हनुमान वानरसेनेसोबत समुद्र तटावर पर पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की लंका नगरी समुद्राच्या पलीकडे आहे .
हा समुद्र ओलांडून लंकेपर्यंत कसे जायचे हा विचार ते करीत होते .
त्यांच्यासाठी ही एक फार मोठी समस्या होती कारण त्यांना सितामाईना रावणाच्या लंकेतून परत आणायचे होते श्रीराम शिव शंकराची रोज पूजा करीत असत परंतु या समस्येच्या विचारांच्या नादात ते त्या दिवशी पूजा करणे विसरून गेले .
अचानक त्यांना पुजेची आठवण झाली आणि त्यांनी तेथेच शिवलिंग बनवले व पूजा सुरु केली .
त्यांनी शिवाची प्रार्थना केली की प्रभू माझी समस्या सोडवायला मदत करा.
रावणाने सीतेला पळवले आहे .
तो आपला भक्त आहे आणि आपल्याकडुन मिळालेल्या वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला आहे .
कृपया मला सहाय करा .
तेव्हा तिथे भगवान शिवजी प्रकट झाले आणि प्रसन्न मनाने म्हणाले
“तूच माझा परम भक्त आहेस .तुझ्या सर्व समस्याचे समाधान जरूर होईल .
तु वर माग.
त्यावेळेस श्री राम म्हणाले की रावणाबरोबर होणाऱ्या युद्धासाठी माझा विजय सुनिश्चित करा आणि लोकांच्या कल्याणासाठी कायम येथेच विराजमान व्हा .
भगवान शिवांनी त्यांना वर दिला आणि ते कायम तेथेच विराजमान झाले ..

यानंतर 15व्या शतकात राजा उडैयान सेतुपतिने याच्या 78 फीट ऊंच गोपुराची निर्मिती केली होती .
सोळाव्या शतकात मंदिराच्या दक्षिणेकडच्या दुसऱ्या भागातील भिंतीची निर्मिती तिरुमलय सेतुपतिने केली होती मंदिराच्या दरवाज्यावरच तिरुमलय आणि त्यांचे पुत्र यांच्या मूर्ति विराजमान आहेत .
राजा उडैयन सेतुपति कट्टत्तेश्वर यांनी नंदी मण्डप निर्माण केला होता .
हे मंदिर एक हजार फुट लांब व 650 फुट रुंद आहे .
चाळीस फुट ऊंच असलेल्या दोन दगडावर तेवढाच एक लांब दगड ठेऊन याची निर्मिती केली आहे
जे पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण आहे .
रामेश्वरम मंदिराच्या निर्मितीत वापरलेले दगड श्रीलंका येथून नावेतुन आणले गेले आहेत.
रामेश्वरम मंदिराच्या परिसरातील सर्व विहिरीं आपल्या अमोघ बाणा द्वारे भगवान रामांनी तयार केल्या होत्या.
त्यांनी या विहिरीत अनेक तीर्थांचे पाणी सोडले होते .
ज्योतिर्लिंगावर पुर्ण श्रद्धेने गंगाजल अर्पण करणाऱ्याला मोक्षप्राप्ति होते असे म्हणतात .
रामेश्वरम मंदिरात 22 तीर्थ आहेत जी सुप्रसिद्ध आहेत .
मंदिराच्या सर्वप्रथम असणारे आणि सर्वात मुख्य तीर्थ अग्नितीर्थं नावाने ओळखले जाते .

रामेश्वरम मंदिर पहाटे पांच वाजता उघडले जाते .
भक्त पहाटे पाच ते दुपारी एकपर्यंत दर्शन पुजन करू शकतात .
एक ते तीन मंदिर बंद रहाते .
तीन ते रात्री नऊ पर्यंत भक्त पुन्हा दर्शन करू शकतात .
इथल्या प्रत्येक पूजेला वेगवेगळी नावे आहेत तसेच त्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात .

रामेश्वरम मंदिरात फेब्रुवारी -मार्च महीन्यात महाशिवरात्रिचा उत्सव अद्भुत प्रकारे साजरा होतो .
जो पुर्ण 10 दिवस चालतो.

मे-जून महीन्यात या मंदिरात वसंतोत्सवम नावाचा उत्सव साजरा होतो जो दहा दिवस असतो आणि वैशाखात संपतो .

क्रमशः