बारा जोतीर्लींग भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बारा जोतीर्लींग भाग ९

बारा जोतिर्लिंग भाग ९

औंढा नागनाथ हे महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील एक गाव आहे.
आमर्दकपूर (औंढा-नागनाथ, जि. हिंगोली, ) हे ज्योतिर्लिंग क्षेत्र आहे.
याचे प्राचीन नाव आमर्दक.
ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता.
यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली.
'आमर्दक संतान ' या नावाने ओळखल्या जाणार्‍या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून,
त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्‍या नागनाथ (नागेश्वर) मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे.
या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते.
हे मंदिर एका विस्तीर्ण २९०X१९० फुटी आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे.
परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे.
तेच मुख्य प्रवेशद्वार होय.
आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो.
सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात.
मुख्य मंदिराची लांबी १२६ फूट, रुंदी ११८ फूट आणि उंची ९६ फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे.
त्यांची समाधी या परिसरातच आहे.
हे गाव बालाघाट पर्वताच्या कुशीत वसलेलेआहे.

मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगां पैकी नागनाथ एकआहे.
प्राचीन काळी हा प्रदेश दारुकावन नावाने प्रसिद्ध होता.
ऋषिमुनींना त्रस्त करून सोडणार्‍या दारुका राक्षसाचा वध करून भगवानशंकराने याचठिकाणी लिंगरूपाने वास्तव्य केले.
या मंदिरातील लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही.
नंदिकेश्वरा चे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे.
मंदिराच्या आवारात 12 ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरेआहेत.
तीन लिंगाचा समावेश असलेले नागेश मंदिर आहे .

श्लोकांतील , ‘नागेश दारुकावने’ असा आहे आणि त्याप्रमाणे द्वारकेजवळचे लिंग ते हेच ज्योतिर्लिग होय,
असे ब-याच लोकांचे म्हणणे आहे.
गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणा-या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हे आहे .
गुजरातमध्ये असणारं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे नागेश्वर. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं नागेश्वर नेमकं कुठलं यावर उत्तरखंड आणि महाराष्ट्रामध्ये वाद चालू आहे.
मात्र शिवपुराणाप्रमाणे नागेश्वर दारुकावनातील घनदाट देवदार जंगलामध्ये वसलेलं आहे. या वर्णनानुसार उत्तराखंडाला पूर्वी दारुकावन संबोधत. आणि गुजरातमधील द्वारका परिसरात याचा कुठलाही संदर्भ आढळत नसला, तरीही आज नागेश्वर मंदिर गुजरातमध्येच असल्याचं मानलं जातं
याची कथा अशी सांगितली जाते

दारूका नावाची एक प्रसिद्ध राक्षसीण होती जी पार्वतीकडून वरदान प्राप्त करून गर्विष्ठ झाली होती .
तिचा पती दरुक महान् बलशाली राक्षस होता .
त्याने अनेक राक्षसांना सोबत घेऊन समाजात सगळीकडे दहशत पसरवली होती .

तो यज्ञ आणि इतर शुभ कामे नष्ट करत संतमहात्म्यांचा संहार करीत होता .
तो एक कुप्रसिद्ध धर्मनाशक राक्षस होता .
एका भल्या मोठ्या नैसर्गिक संपदेने नटलेल्या पश्चिम समुद्र किनार्यावरील एका वनात तो रहात होता .

दारूका जिथे जात असे तिथले वृक्ष आणि सुसज्जित वनभूमि ती आपल्या उपभोगासाठी सोबत घेऊन जातअसे महादेवी पार्वतीने त्या वनाच्या देखभालीची जबाबदारी दारूकाला सोपवली होती .
पार्वती देवींच्या वरदानाच्या प्रभावामुळे सर्व वन तिच्याच ताब्यात होते .
तिच्या त्रासामुळे पीड़ित झालेल्या प्रजेने महर्षि और्व यांच्याकडे जाऊन आपला त्रास कथन केला .

शरणागतांच्या रक्षणाचा धर्म पालन करीत महर्षि और्व यांनी राक्षसांना शाप दिला .
ते म्हणाले की जो राक्षस या पृथ्वीवर प्राण्यांची हिंसा आणि यज्ञ विनाश करेल, त्याच वेळेस त्याला आपले प्राण गमवावे लागतील .

महर्षि और्व यांच्या शापाची सूचना जेव्हा देवतांना समजली, तेव्हा त्यांनी त्या दुराचारी राक्षसांवर स्वारी केली. राक्षसांवर मोठेच संकट कोसळले .
जर त्यांनी युद्धात देवतांना मारले असते , तर शापामुळे ते स्वतःच मेले असते .
आणि जर त्यांना नाही मारले तर ते पराजित होऊन भुकेने मारून जातील .
त्या वेळेस दारूकाने राक्षसांना आसरा दिला आणि पार्वती देवीच्या वरदानाचा प्रयोग करून ती संपुर्ण वन सोबत घेऊन समुद्रात जाऊन राहिली.
अशा प्रकारे राक्षसांनी निर्भयतापूर्वक समुद्रात राहायला सुरवात केली आणि तिथेपण ते प्राण्यांना सतावू लागले . एकदा धर्मात्मा आणि सदाचारी असा सुप्रिय नावाचा शिवभक्त वैश्य नौकेत बसुन समुद्रातून जात होता त्या वेळेस या दारूक नावाच्या भयंकर बलशाली राक्षसाने त्याच्यावर आक्रमण केले .

दारूकाने सर्व लोकांसहीत सुप्रियचे अपहरण केले आणि त्याला बन्दीवान केले .
सुप्रिय शिवजीचे अनन्य भक्त होते ,ते नेहेमीच शिवजीच्या आराधनेत मग्न रहात असत .
कारागृहात सुद्धा त्यांची आराधना बंद झाली नाही आणि त्यांनी आपल्या इतर साथीदारांना शिवभक्तीसाठी जागरूक केले .ते सर्व शिवभक्त झाले.
अशा प्रकारे कारागृहात शिवभक्तिचा प्रसार झाला .

राक्षस दारूकला जेव्हा हे समजले तेव्हा तो क्रोधीत झाला .
कारागृहात सुप्रिय ध्यान लावुन बसला होता तेव्हा तो त्याला ओरडून म्हणाला ,
वैश्य! तू डोळे बन्द करून माझ्याविरुद्ध कोणते षड्यन्त्र रचतो आहेस ?
पण त्याच्या ओरडण्याचा कोणताच परिणाम झाला नाही .
घमेंडी राक्षस दारूकाने आपल्या सेवकांना आदेश दिला की या शिवभक्ताला मारून टाका .
आपल्या हत्येच्या भयाने सुद्धा सुप्रिय घाबरले नाहीत आणि ते भयहारी, संकटमोचक भगवान शिवाच्या प्रार्थनेत दंग राहिले .
देवा ! आपणच आमचे सर्वस्व आहात , आपणच माझे जीवन आणि प्राण आहात .
अशा प्रकारे सुप्रिय वैश्य याची प्रार्थना ऐकुन भगवान शिव प्रकट झाले .
त्यांच्यासोबतच चार दरवाजांचे एक सुन्दर मन्दिर प्रकट झाले .
त्या मन्दिराच्या मध्यभागी (गर्भगृहात ) एक दिव्य ज्योतिर्लिंग प्रकाशित होत होते .
त्याचप्रमाणे शिव परिवाराचे सर्व सदस्य सुद्धा तेथे उपस्थित होते .
वैश्य सुप्रियने शिवपरिवारासकट त्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि पूजन केले.

सुप्रियच्या पूजेने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी स्वतः पाशुपतास्त्र घेऊन प्रमुख राक्षस त्यांचे सहकारी व त्यांची अस्त्रे आणि शस्त्रे यांचा नाश केला .
भगवान शिवांनी आपला भक्त सुप्रिय आणि त्याच्या अनुयायांचे रक्षण केल्यानंतर त्याच उपवनाला हा सुद्धा वर दिला की , आजपासुन या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तथा शूद्र, या चार वर्णांच्या धर्माचे पालन केले जाईल
या वनात शिव धर्म प्रचारक श्रेष्ठ ऋषि-मुनि निवास करतील आणि इथे तामसिक दुष्ट राक्षसांसाठी जागा नसेल

राक्षसांवर आलेले हे भारी संकट बघुन राक्षसी दारूकाने दीन भावाने देवी पार्वतीची स्तुती करायला सुरवात केली तिच्या प्रार्थनेमुळे प्रसन्न झालेल्या माता पार्वतीने विचारले
बोल मी तुझ्यासाठी कोणते प्रिय काम करू ?
दारूका म्हणाली आई आपण माझ्या कुळाचे रक्षण करावे .

पार्वतीने तिच्या कुळाच्या रक्षणाचे आश्वासन दिले आणि भगवान शिवाला त्या म्हणाल्या
मी आपली सहधर्मचारिणी आहे आपल्या आश्रयाला राहते.
म्हणुन माझ्याकडुन दिलेल्या वचनाला आपण पुष्टी द्या .
ही राक्षसीण दारूका सर्वात बलिष्ठ आहे.
म्हणून ही राक्षसांच्यावर राज्य करेल.
या राक्षसांच्या पत्नी आपल्या राक्षसपुत्राना जन्म देतील आणि सर्वजण एकजुटीने या वनात राहतील असा माझा विचार होता .शिवाय ती माझीच भक्त आहे
तेव्हा माता पार्वतीच्या या बोलण्यावर भगवान शिवाने सांगितले
असे होणे शक्य नाही कारण
मी माझ्या भक्तांचे पालनपोषण आणि त्यांच्या रक्षणासाठी प्रसन्नतापूर्वक या वनात निवास करणार आहे .
जो मनुष्य वर्णाश्रम धर्म पालन करेल व श्रद्धा-भक्ति पूर्वक माझे दर्शन करेल तो चक्रवर्ती राजा बनेल.
कलियुगच्या अंती तथा सत्ययुगाच्या प्रारंभी महासेनचा पुत्र वीरसेन राजांचा महाराज होईल .
तो माझा परम भक्त आणि मोठा पराक्रमी असेल .
जेव्हा तो या वनात येऊन माझे दर्शन घेईल.
त्यानंतर तो चक्रवर्ती सम्राट होइल.
पार्वती मातेला हे सारे पटले .

यानंतर शिव-दम्पत्ति तेथेच स्थाईक झाले .
शिवभक्तांचे प्रिय ज्योतिर्लिंग स्वरूप भगवान शिव नागेश्वर आणि पार्वती देवी नागेश्वरी अशा नावाने प्रसिद्ध झाले .
जे तिन्ही लोकांच्या इच्छांची ते पूर्तता करतील
नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनानंतर भक्त सर्व पापांपासून मुक्त होतील.
व सम्पूर्ण भौतिक आणि आध्यात् सुख प्राप्त करतील .

क्रमशः