Bara Jyotiling - 5 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग ५

बारा जोतिर्लिंग भाग ५

नर्मदेच्या डोंगरावरील ओमकारेश्वर -अमलेश्वर

भारतातील बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेले ‘ओंकारेश्वर’ हे ज्योतिर्लिग मध्य प्रदेशात नर्मदा नदीच्या किना-यावर आहे.
नर्मदा व कावेरी या दोन नद्यांच्या मध्ये दीड किलोंमीटरचे बेट तयार झाले असून ते ॐ आकाराचे आहे. मांधावा नावाच्या पर्वतावर दोन मंदिरे असून त्यापैकी एक ओंकारेश्वर आणि दुसरे अमलेश्वर या नावाने ओळखले जाते.

उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-काठी आहे.
हे नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थाने आहेत. दुसरे ॐकार या नावाचे लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकार अमलेश्वर असे म्हणतात.
नर्मदेच्या दक्षिण किनार्यावर हे मंदिर आहे .
याचे खरे नाव अमलेश्वर आहे .

नर्मदा नदीस मध्यप्रदेशची जीवनरेखा मानण्यात येते.
या नदीवरच ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे,ज्याला ओंकारेश्वाराची शाही स्वारी म्हणतात .
येथील सृष्टीसौंदर्याने नटलेल्या रम्य वातावरणात आल्यावर भाविक शिवभक्तीत तल्लीन होतात.
येथील वैशिष्ट्य म्हणजे मंदिर असलेल्या डोंगराचा आकारही ॐ असा आहे आणि या डोंगरावरून पाहिल्यास माता नर्मदाही ॐ आकारात वाहत असल्याचे दिसते.
इतरत्र वेगात वाहणार्‍या नर्मदा नदीचे शांत रूप येथे बघायला मिळते.

येथे एक नव्हे तर दोन शिवलिंग आहेत. ओंकारेश्वर आणि दुसरे अमलेश्वर. दोन्ही शिवलिंग जागृत असल्याचे मानण्यात येते.
संथपणे वाहणार्‍या नर्मदेच्या भिन्न किनार्‍यांवर ती वसली आहेत.
स्कंद पुराणात रेवा खंडात या क्षेत्राविषयी माहिती दिली आहे.
राजा यौवनाश्व हा वरुण यज्ञ करत होता. त्यावेळेस चुकून तो अभिमंत्रित केलेले पाणी प्याला.
त्यामुळे त्याला जो पुत्र झाला त्याचे नाव मांधावा असे ठेवले.
ईश्वाकू वंशातील हा मांधावा राजा अतिशय पराक्रमी होता.
त्याने इंद्राच्या सिंहासनावर आपला हक्क सांगितला,त्यामुळे इंद्राला अतिशय राग आला आणि त्याने पाऊस पाडणे बंद केले.
दुष्काळ पडला व सगळीकडे हाहाकार माजला.
पशु-पक्षी, मनुष्यप्राणी सर्व जण पाण्यावाचून तडफडू लागले.
तेव्हा मांधावा राजाने शंकराची तपश्चर्या केली .
आणि त्याच्या वरामुळे पाऊस पडला व इंद्रावर विजय मिळाला .

त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शंकराने वर मागण्यास सांगितले तेव्हा आपण इथे वास्तव्य करावे, अशी राजाने प्रार्थना केली म्हणून शंकर या ठिकाणी स्थित झाले.
आणि हे क्षेत्र ओंकारमांधावा म्हणून प्रसिद्धीला आले.
मांधावाचा मुलगा मुचुकंद याने या क्षेत्राची स्थापना केली.
महर्षि च्यवन यांनीही या तीर्थाचे दर्शन घेतले होते.

आदी शंकराचा-यांचे गुरू गोविंद भगवत यांचे इथल्या गुहेत वास्तव्य होते.

शिव पुराणानुसार.
ओंकार बाबा व ममलेश्वरजी ओंकारेश्वराचे अधिपती असल्याचे मानले जाते.
प्रत्येक सोमवारी प्रजेचे सुख-दु:ख जाणून घेण्यासाठी ते शहरात फिरत असतात अशी लोकांची धारणा आहे .
भगवान ओंकारास वाजत गाजत नावेत बसवून अमलेश्वर मंदिराच्या घाटावर आणण्यात येते.
येथूनच दोन्ही देवता नगर भ्रमणासाठी निघतात.
दर सोमवारच्या या पालखीला श्रावण सोमवारी विशेष स्वरूप प्राप्त होते.
आपल्या आराध्य दैवताच्या दर्शनासाठी शहरभर भक्तांची गर्दी होते.
शेवटचा श्रावणी सोमवार तर मंगलमय वातावरणात साजरा करण्यात येतो.

या दिवशी येथे गुलालाची होळी खेळली जाते. सर्व रस्ते गुलालाने न्हाऊन निघत असतात.
जयजयकाराच्या घोषणा आणि गुलालाने आसमंत दुमदुमून जातो.
हे सर्व पाहण्यासारखे असते.

ओंकार महाराजांची चांदीची पंचमुखी प्रतिमा फुलांनी सजवून पालखीतून घाटावर आणण्यात येते. नगर भ्रमणानंतर दोन्ही लिंगे थाटात नौकाविहार करतात.
संपूर्ण वातावरण शिवमय होऊन जाते.

ओंकारेश्वर’ मंदिरासाठी तिथल्याच स्थानिक नरम दगडांचा वापर केला आहे. दगड नरम असल्यामुळे मंदिरावर अतिशय नाजूक कलाकुसर केलेली जाणवते. हे मंदिर नागर शैलीत बांधलेले असून त्यात अन्नपूर्णा व गणेशाच्या मूर्ती आहेत.

याची पुरातन कथा अशी आहे ..
एकदा विंध्य पर्वताने शंकराची आराधना करून आपण इथे वास्तव्य करावे अशी विनंती केली.
शंकराने ही विनंती मान्य केली.
पण आपण दोन भागात वास्तव्य करावे अशी इतर देवांनी प्रार्थना केली.
तेव्हा शिवलिंगाचे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर असे दोन भाग झाले आणि हे ज्योतिर्लिग ‘ओंकारम् अमलेश्वरम्’ या जोडनावाने ओळखले जाते.

उज्जैनीचे महाराज शिवमंदिरात शिवशंकराची उपासना करत होते. हे एका मुलाने पाहिले. तेव्हा आपल्या झोपडीत एक दगड आणून त्याला शिवलिंग समजून त्याची पूजा करू लागला. पण हे त्याच्या आईला आवडले नाही. तिने तो दगड आणि त्याने केलेली पूजा उधळून टाकली. तेव्हा काही न खाता,पिता डोळे मिटून हात जोडून तो मुलगा चार दिवस स्वस्थ बसला.
त्याची ही भक्ती पाहून शंकर प्रसन्न होऊन शिवलिंगाच्या स्वरूपात प्रकट झाले. अशीही एक दंतकथा सांगितली जाते.

अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधले. मंदिर तीन मजली आहे. तळाला ओंकारेश्वर, दुस-या मजल्यावर महांकालेश्वर आणि तिस-या मजल्यावर वैद्यनाथेश्वर अशी मंदिराची रचना आहे.
मंदिर नागर शैलीत बांधलेले असून त्यात अन्नपूर्णा व गणेशाच्या मूर्ती आहेत.

प्रत्येक महिन्यातील एकादशी, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी विशेष प्रकाराने पूजा केली जाते.
दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.
भारतात फक्त नर्मदा नदीची परिक्रमा केली जाते. या परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वरला होते. नर्मदेच्या दक्षिण तीरापासून सुरुवात करतात आणि भडोच जवळचा सागर संगमाजवळ नर्मदा पार करून अमरकंटकला वळसा घालून परत ओंकारेश्वरला येऊन या परिक्रमेची सांगता होते.
असा या क्षेत्राचा महिमा आहे.
असे मानले जाते की वराहअवतारात जेव्हा सगळीपृथ्वी जलमय झाली होती तेव्हा मार्केंडेय ऋषिचा आश्रम मात्र कोरडा होता .
हा आश्रम नर्मदातटा वर ओंकारेश्वर इथे आहे .
ओंकारेश्वरची निर्मिती खुद्द नर्मदा नदी पासूनच झाली आहे .
ही भारतातली सर्वात पवित्र नदी मानली जाते .
आता यावर विश्वातला सर्वात मोठा पूल बांधण्याची योजना आहे
शास्त्र मान्यता अशी आहे की कोणीही तीर्थयात्री भले ही देशभरातील सगळ्या तीर्थांची यात्रा करो पण जोपर्यंत तो या सर्व तीर्थक्षेत्रांचे पावन पाणी ओंकारेश्वर महादेव येथे येऊन इथे समर्पित करीत नाही तोपर्यंत त्याची सर्व तीर्थयात्रा अपूर्ण मानली जाते .

धार्मिक पुराणा अनुसार
ज्या ओंकार शब्दाचा का उच्चार सर्वप्रथम सृष्टिकर्ता विधाता च्या मुखातून झाला , वेदाचे कोणतेच पठण या उच्चारा शिवाय होत नाही .
या ओंकाराचे भौतिक विग्रह ओंकार क्षेत्र आहे .
यामध्ये 68 तीर्थे आहेत आणि 33 कोटि देवता आपल्या परिवारा सहित इथे निवास करतात .
तसेच 2 ज्योतिस्वरूप लिंगांसहीत 108 प्रभावशाली शिवलिंग सुद्धा आहेत .
एकट्या मध्यप्रदेशात देशातल्या प्रसिद्ध 12 ज्योतिर्लिंगा पैकी 2 ज्योतिर्लिंग विराजमान आहेत .
एक उज्जैन मध्ये महाकाल रूपात
आणि दूसरे ओंकारेश्वर इथे ओंकारेश्वर -अमलेश्वर च्या रूपात विराजमान आहे .

अनुक्रमनुसार भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिगामध्ये चौथा ओंकारेश्वर आहे .
ज्योतिर्लिंग त्या स्थानाला म्हणता जेथे भगवान शिव स्वतः प्रकट झाले आणि ज्योति रूपात स्थापित आहेत . प्रणव ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर च्या दर्शनाने सर्व पाप भस्म होतात .

पुराणामध्ये स्कन्द पुराण, शिवपुराण व वायुपुराण मध्ये ओंकारेश्वर क्षेत्राचा महिमा उल्लेख केलेला आहे . शिवाय हे असे एकमात्र ज्योतिर्लिंग है आहे जे नर्मदेच्या उत्तर तटावर आहे .
भगवान शिव दररोज तिन्ही लोकांमधून भ्रमण केल्यानंतर इथे येऊन विश्रांती घेतात .
म्हणूनच इथे दररोज भगवान शिवाची विशेष शयन व्यवस्था केलेली आहे तसेच आरतीही केली जाते व शयन दर्शन दिले जाते .
ओंकारेश्वर क्षेत्रात पूर्वी आदिवासींची वस्ती होती .
त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती त्यामुळे घाबरून भाविक येथे फारसे येत नव्हते
दारीयाई नावाच्या महापुरुषाने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले

त्यानंतर या ठिकाणी उत्सव होऊ लागला.

सन ११९५ मध्ये राजा भरतसिंहाने आदिवासींचा पराभव केला .
यानंतर मराठ्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली .
काही कालावधी उलटल्यानंतरअहिल्याबाई होळकरांनी या मंदिराच्या मोठया प्रमाणावर सुधारणा केल्या. त्यांच्या काळातच कोठी लीन्गार्चान प्रथा सुरू झाली.
महाशिवरात्री, कार्तिक पौर्णिमेस उत्सव,व श्रावण सोमवारी इथे पूजा-अभिषेक केला जातो.

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED