Bara jyotiling - 6 books and stories free download online pdf in Marathi

बारा जोतिर्लिंग भाग ६

बारा जोतिर्लिंग भाग ६

परळी वैद्यनाथ

परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेचे एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.

भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते.
ब्रम्हा ,वेणू आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम इथे पाहायला मिळतो .
हेमाडपंथी शैलीतले हे चिरेबंदी मंदिर तीन घाट,दगडी दीपमाळ,सभामंडप ,तीन गर्भगृहे व दोन नंदी या समावेत वसले आहे.हे मंदिर शाळीग्राम शीळेचे आहे ,व एका टेकडीवर आहे .
याच्या शिखरावर प्राणी व देव देवतांची शिल्पे आहेत .
बाजूला अकरा छोटी शिवमंदिरे आहेत .

मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत.
येथे दरवाज्यात गणपती आहे त्याचे दर्शन घेऊनच आत जावे लागते .
तसेच येथे शंकर पार्वती आणि गणपती या तिघांचा वास असल्याने हे कुटुंबवत्सल मंदिर म्हणून ओळखले जाते
मंदिराला लांबलचक पायऱ्या आहेत व प्रवेशद्वार भव्य आहे .
मंदिर अत्यंत प्रशस्त असुन जागृत देवस्थान आहे .

मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते.
गाभार्याला चार दरवाजे आहेत .
वैजनाथ म्हणजे खरेतर वैद्याच्या भुमिकेत असणारा शंकर त्यामुळे हा खुप श्रेष्ठ आहे .

काशीपेक्षा ही जवभर श्रेष्ठ हे स्थान मानले जाते .

मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
महाशिवरात्र ,दसरा व श्रावणात दर सोमवारी शिव पालखीची मिरवणुक काढली जाते .
तेव्हा महादेवास बेल व विष्णुला तुळस वाहीली जाते .

अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे.
येथुन जवळच एक औष्णिक विद्युत केंद्र आहे .

ज्या वेळेस भगवान शंकर सतीच्या शवाला आपल्या खांद्यावर ठेऊन इकडे तिकडे वेड्यासारखे फीरत होते त्याच वेळी या जागेवर सतीच्या हृदयाचा भाग गळून पडला होता .
भगवान शंकराने सतीच्या त्या हृदयाच्या भागाचा दाह-संस्कार योग्य जागेवर केला होता ज्यामुळे याचे नाव ‘चिताभूमि’ पड़ले.
श्री शिव पुराण मध्ये एक श्लोक आहे ज्याअनुसार वैद्यनाथ त्या चिताभूमिचे स्थान मानले जाते .

अर्थात ‘देवतानी भगवानांचे समक्ष दर्शन केले आई त्यानंतर त्यांच्या लिंगाची प्रतिस्थापना केली .
देवगण त्याच लिंगाला ‘वैद्यनाथ’ नाव देऊन त्याला नमस्कार करून स्वर्गलोकी निघून गेले .
याची कथा अशी सांगितली जाते .

राक्षसराज रावण अभिमानी आणि अहंकारी होता .
एकदा राक्षसराज रावणाने ने हिमालयावर स्थिर उभे राहुन भगवान शिवाची घोर तपश्चर्या केली .
त्याची तपश्चर्या खुप कडक होती .
तो उन्हाळ्याच्या दिवसात पाच अग्निच्या मध्यात बसुन पंचाग्नि सेवन करीत असे
तर धुंवाधार पावसात मोकळ्या मैदानावर उघड्यावर झोपत असे .
आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसात गळयाबरोबरच्या पाण्यात उभे राहुन साधना करीत असे .
या तीन वेगवेगळ्या प्रकाराने रावणाची तपश्चर्या चालू होती .
इतके कठोर तप करून सुद्धा भगवान महेश्वर त्याच्यावर प्रसन्न झाले नाहीत .
असे म्हणतात की दुष्ट आत्म्यांक्डून देवाला प्रसन्न करणे खुप कठीण असते .
अशा कठिण तपाने सुद्धा जेव्हा रावणाला सिद्धि प्राप्त झाली नाही ,
तेव्हा रावणाने आपले एक-एक शीर कापुन शिवलिंगावर पर अर्पण करून त्याची पूजा करायला सुरवात केली .
या प्रकियेमध्ये त्याने आपली नऊ शिरे अर्पण केल्यावर दहावे शीर कापण्यासाठी जेव्हा तो उद्युक्त झाला तोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न झाले होते .
प्रकट होऊन भगवान शिवांनी रावणाची दाही शिरे पहील्या सारखी केली आणि त्यांनी रावणाला वर मागायला सांगितले .
रावणाने भगवान शिवाला सांगितले की मला शिवलिंगाला नेऊन लंकेत स्थापित करण्याची अनुमति द्या .
शिवशंकरांनी या अटीवर लिंग नेण्यास परवानगी दिली की जर ते लिंग नेताना जमिनीवर ठेवले गेले तर तिथेच त्याची प्रतिस्थापना (अचल) होईल .
जेव्हा रावण शिवलिंग घेऊन निघाला तेव्हा मार्गात असलेल्या ‘चिताभूमि’ मध्ये त्यांना लघुशंका करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याने लिंगाला एका सेवकाच्या हातात दिले आणि ते लघुशंकेसाठी गेले .
इकडे शिवलिंग जड झाल्याने त्या सेवकाने ते भूमिवर ठेवले आणि ते तेथेच अचल झाले .

परत आल्यावर रावणाने खुप ज़ोर लाऊन त्या शिवलिंगाला जमिनीतुन बाहेर काढायचा प्रयत्न केला.
परंतु तो त्यात असफल झाला .
शेवटी तो निराश झाला आणि त्याने त्या शिवलिंगावर आपले अंगठे दाबून परत त्याला जमिनीत गाडले आणि रिकाम्या हाताने लंकेला गेला .
इकडे ब्रह्मा, विष्णु इन्द्र आदि देवतांनी तेथे पोचुन त्या शिवलिंगाची विधीवत पूजा केली .
त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आणि लिंग प्रतिस्थापना करून शंकराची स्तुति केली .
त्यानंतर ते स्वर्गलोकी निघून गेले .
अशा प्रकारे रावणाच्या तपश्चर्येच्या फलस्वरूप श्री वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंग ची निर्मिती झाली .
जो मनुष्य श्रद्धा भक्तिपूर्वक भगवान श्री वैद्यनाथला अभिषेक करतो शारीरिक और मानसिक रोग अतिशीघ्र नष्ट होतात असा समज आहे .
त्यामुळे वैद्यनाथधाम मध्ये रोगी व्यक्तींची व दर्शनार्थिची जास्त गर्दी दिसते .
हे ज्योतिर्लिंग जमिनीत दाबले गेल्यामुळ त्याचे वरील भागात एक खड्डा झाला आहे .
तरीही या शिवलिंग मुर्तीची उंची जवळजवळ अकरा बोटे आहे .
दुसर्या एका कथेनुसार

एकदा शिवशंकरांनी रौद्र रूप धारण करून दक्षाचे मुंडके त्रिशुळाने उडवले .
यानंतर खुप मनधरणी केल्यावर बाबा बैद्यनाथ तिन्ही लोकात दक्षाचे मुंडके हुडकू लागले पण ते मिळाले नाही यानंतर त्यांनी एका बकर्याचे मुंडके कापून दक्षाच्या धडावर प्रत्यारोपित केले .
यामुळेच बकर्याच्या आवाजाच्या ब.ब.ब. च्या उच्चारातने महादेवाची पूजा करतात .
गालावर असा ध्वनी करून श्रद्धालु शंकरबाबाना खुश करतात .
हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहेअसे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा 1706 साली जीर्णोद्धार केला.

पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळली होती


क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED