Addiction - 2 - 16 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 16

मॅरेज अनिवर्सरीचा प्रोग्रॅम संपला होता ...अजिंक्यही बाबांसोबत झोपी गेला ..निशा आणि मृणाल सोबतच झोपणार होते ..प्रवासाने निशाला लवकरच झोप लागली पण मृणालला काही झोप लागली नव्हती ..मृणालची मानसिक स्थिती आधीच बरी नव्हती त्यात समीरच्या घृणास्पद वागण्याने ती घाबरून गेली होती ...त्याची ती नजर तिच्या समोरून जातच नव्हती ...त्याच्या नजरेत तिला हवस दिसत होती आणि ती हवस मिटविण्यासाठी तो काहीही करू शकत होता ..हीच हवस तिने मुंबईला असताना सर्वांच्या डोळ्यात पाहिली होती आणि तीच स्थिती बऱ्याच वर्षानंतर आल्याने ती अवघडून गेली ..रात्रीच्या अंधारात देखील तिला तोच तो दिसत होता ..आजूबाजूला सर्विकडे आज तोच तो होता ..तिच्या मेंदूवर त्याने अधिराज्य स्थापन केल आणि नंतर अस काही घडत गेलं की ती त्या भोवऱ्यातून बाहेर येऊच शकणार नव्हती ....आज ती झोपी गेली होती पण हीच झोप तिला निवांत पडू देणार नव्हती ..त्या नजरेचे पडसाद तिच्या आयुष्यावर दीर्घ परिणाम करणार होते ..

विचारा - विचारात दुसरा दिवस उजाळला ..अजिंक्य सकाळी - सकाळीच ऑफिसला निघाला होता ..तर मृणाल अंघोळ करून आपले काम करीत बसली होती ..निशा अजिंक्यच्या आईसोबत गाव फिरण्यात व्यस्त होती ..मृणालने स्वतःचे केस धुतले आणि केस वाळू घालण्यासाठी तिने केस मोकळेच ठेवले होते..केस मोकळे असल्याने वारंवार तिच्या डोळ्यासमोर यायचे आणि तिची सुंदरता आणखीच वाढायची ..तिलाही आपल्या केसांशी खेळण्यात मज्जा येऊ लागली ..अशा वेळी अजिंक्य तिच्या केसांशी नेहमीच खेळायचा त्यामुळें त्याक्षणी तरी ती त्याच्या विचारात हरवली होती ..बाबा फक्त एकटेच घरात होते ..मृणाल आपल्या सिल्की केसांना आरशात न्याहाळत होती आणि समीर तिच्या अगदीच समोर येऊन उभा राहिला ..त्याच्यात आणि मृणालमध्ये किंचित अंतर होत ...हृदयाचा ठोक्यांचा आवाज बाहेर पर्यंत येऊ लागला आणि त्याची ती किळसवाणी नजर तिच्या छातीवर येऊन थांबली ...मृणालला काय करु नि काय नको अस झालं होतं तेवढ्यात बाबांचा मागून आवाज आला आणि मृणाल मागे जाऊ लागली ..मृणालचे हातपाय थरथर कापत होते ..हृदयाची ठोकेही आणखी जोराजोराने धडधड करू लागले ...तीच स्वतःवरच कंट्रोल नव्हतं त्याच वेळी बाबांनी तिला आवाज दिला ...तरीही मृणाल त्या शॉकमधून बाहेर आली नव्हती ..बाबा पुन्हा एकदा म्हणाले , " बेटा मृणाल समीरसाठी चहा नाही टाकणार का ? " मृणालच्या तोंडून फक्त हो शब्द निघाला ..ती हळूहळू किचनकडे जाऊ लागली ..कसातरी चहा टाकला ..आज तीच कशावरच लक्ष नव्हतं ..दूध गरम करायला टाकलेल असताना ते पण उतू गेलं ..कसतरी थोडं फार दूध तिने वाचवलं आणि त्याचाच चहा बनविला ..तिचे हातपाय आताही थरथर कापत होते ..तरीही बाबांना ते कळू नये म्हणून तिने स्वताला सावरण्याचा प्रयत्न केला ..मृणालने त्याला चहा देण्यासाठी हात समोर केला आणि त्याने तिथेही संधी शोधून खालून तिच्या हाताला आपला हात लावलाच ..त्याच्या त्या स्पर्शाने ती पुन्हा एकदा घाबरली ..घाबरल्यामुळे चहा हातातून सुटून जाणार तेवढ्यात समीरने दुसरा हात तिच्या हातावर दिला ...बाबांनी चहा हातावर पडल्यापासून वाचविले म्हणून समीरला धन्यवाद दिले पण मृणालच त्याच सत्य जाणून होती ..त्याने संपूर्ण चहा पडण्यापासून वाचविला असला तरीही तिच्या हातावर गरम चहाचे काही थेंब पडलेच होते ..स्वाभाविक तिला त्याचा त्रास व्हायला हवा होता पण त्याहीपेक्षा तिला जास्त त्रास समीरच्या चुकीच्या स्पर्शाचा होत होता ...

मृणाल तसाच हात घेऊन किचनला पोहीचली ..जवळपास संपूर्ण स्वयंपाक बनवून झाला होता ..किचनमधील काम आवरत ती बेडरूममध्ये जाऊन बसली ..समीर बाहेर बसून असल्याने तिने बेडरूमचे दार आतून लावून घेतले ..बेडरूममध्ये असताना ती फक्त स्वतःच्या हाताकडे पाहत होती ..त्यावर चहाने जखम झाली असतानाही तीच त्यावर लक्ष नव्हतं पण तो स्पर्श तिच्या मनात घर करून गेला ..कितीतरी वेळ ती एकटीच स्वतःच्या हाताकडे पाहत होती ..हॉलमध्ये बाबा आणि समीर मोठ्याने बोलत असतानाही तिला कुणाचाच आवाज येत नव्हता ..काही वेळ ती तशीच होती ..दारावर जोरा जोराने थाप पडू लागली आणि ती अचानक भानावर आली ..तिच्या हार्ट बिट्स आणखीच फास्ट झाल्या ...कदाचित याक्षणी तो समोर आला असता तर मृणालच हार्ट फेल होण्याची भीती होती ..ती हळूहळू पावले टाकत समोर जाऊ लागली ..दरवाजावर पोहोचत तिने दार उघडलं आणि समोर निशाला पाहताच तिच्या जीवात जीव आला .." काय ग मृणाल दार लावून का बसली आहेस " , निशा म्हणाली आणि मृणालच्या डोळ्यात चटकन पाणी आले ..निशालाही ते लक्षात आलं ..आणि तिचा मूड छान करण्यासाठी ती मृणालची खेचत म्हणाली , " अजिंक्य तुला सोडून ऑफिसला गेला आहे म्हणून व्हय वाटत ..टिपिकल पत्नी झाली आहेस तू मृणाल ..अशा रडणाऱ्या बायकोला अजिंक्य कसा सांभाळतो काय माहीत बाप्पा .." तिच्या बोलण्याने मृणाल हसू लागली पण डोळ्यात पाणी तसच होत ..ते पाहून मृणाल पुन्हा एकदा म्हणाली , " मृणाल माझ्याकडे न एक पर्याय आहे अश्रू घालविण्याचा .." अस म्हणत तिने अजिंक्यला विडिओ कॉल केला ..अजिंक्यने विडिओ कॉल स्वीकारताच मोबाइल तिच्यासमोर केला आणि निशा म्हणाली , " ए अजिंक्य किती शहाणा आहेस न तू ? मृणालला असच सोडून गेलास ..तू गेलास तेव्हापासून मॅडमचे अश्रू थांबले नाहीत ." आणि अजिंक्य तिला साथ देत म्हणाला , " यार खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा तर ..एक काम करतो सरांना अश्रू पुसायला सुट्टी मागून लगेच घरी येतो ..बघ निघतोय .." आता मृणाल बोलती झाली आणि म्हणाली , " पुरे झाली तुमची थट्टा ..अजिंक्य तू ये मी बघतेच तुला .." काही क्षण एकमेकांची खेचत अजिंक्यने फोन ठेवला ..वरवर सर्व काही छान दिसत होतं ..मृणाल हसत होती पण खरंच तिच्या मनातून तो प्रसंग बाहेर निघाला होता का ?
दुपारला सर्वांचे काम आटोपले आणि निशा , आई , मृणाल तिघेही गप्पा मारण्यात व्यस्त झाले ..निशा कॉलेज लाइफचे काही प्रसंग एकवत होती ...अजिंक्यचा शांत स्वभाव आणि त्यांनी घालवलेले क्षण सर्व काही एकूण आई मृणाल दोघेही खुश होते ..मृणालही नकळत अजिंक्यच्या जुन्या आठवणीत हरवली ..त्याच्यासोबत घेतलेली सिगारेट असो की निशाच्या नावाने चिडवन असो सर्व काही तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि ती हसू लागली ..मृणालला हसताना पाहून निशा म्हणाली , " काकू मला वाटत मृणाल तुमच्या लेकाच्या आठवणीत हरवलीय ..तुमची काळजी घेते की नाही की फक्त लेकाचीच काळजी घेते .." आणि आईही चिडवत म्हणाली , " आता आमच्या म्हातार्यांना कोण बघणार ..आम्ही जगतो असेच ..सुनेच प्रेम फक्त लेकालाच जात .." मृणालला त्या दोघांचा गमतीशीर स्वभाव माहीत होता त्यामुळे तिला त्याच वाईट वाटलं नाही उलट तीही हसू लागली ..प्रज्ञा आणि निशाचा मुलगा बाहेर खेळून आले होते ..तर यांच्या गप्पाने वातावरण मजेदार झालं होतं ..बोलतां - बोलता बरीच वेळ झाली ..सायंकाळचा चहा घेऊन त्यांनी रात्रीच्या जेवणास सुरुवात केली ..आईने समीरच जेवण आज घरीच असल्याचं सांगितल्याने मृणालचा पारा आणखीच वाढला पण आईला वाईट वाटू नये म्हणून ती काहीच बोलली नव्हती ..आई समीरच्या आवडीचा बेत सांगत होती आणि मृणालला आणखीच राग येऊ लागला ..तोही बाबांसोबत बाहेरच बसला होता आणि पाण्याचे बहाण्याने किंवा कुठलाही बहाणा करून तो किचन रूममध्ये येऊ लागला ..शेवटी मृणालने निशाला सोबत बोलावून घेतलं आणि त्याने आत येन बंदच केलं ..स्वयंपाक बनवून झाला आणि जेवण वाढण्याची वेळ आली ..कुठलेही नातेवाईक आले की त्यांना हक्काने खायला घालणारी मृणाल आज किचनच्या बाहेरच आली नव्हती ..समीरची भिरभिरती नजर आताही मृणालला शोधत होती .पण मृणालने जाणूनच बाहेर येन टाळलं होत ...पुरुषांचे जेवण झाल्यावर महिलानीही जेवण आटोपलं ..मृणाल किचनच सर्व काम आवरून हॉलमध्ये पोहोचली ...काही वेळ गप्पा झाल्यावर आईबाबा झोपायला आत बेडरूमला पोहोचले ...तर मूलही खेळून खेळून थकल्याने झोपी गेले ...

मृणाल - निशा झोपेची तयारी करत असताना अजिंक्य आत येत म्हणाला , " ओये मॅडम कुठे आताच झोपत आहात ? अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे ..मुंबईला असताना आपण भरपूर गप्पा मारल्या आहेत सो आज मोका भी है और दस्तुर भी ..चले कुछ पुराणी यादे ताजा करणे .." निशा मृणाल दोघीही एकमेकांचा हात पकडून बाहेर निघाल्या ..रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते ..उन्हाळ्याचे दिवस असल्याने वातावरण थोडं चिडचिड होत पण टेरिसवर पोहोचताच थंड वाऱ्याच्या लहरींनी मन सुखावू लागलं ..मृणाल - निशा इकडून तिकडे फेऱ्या मारत होत्या ..दोघांच्याही पैंजनाच्या आवाजने वातावरण मंत्रमुग्ध झालं ..अजिंक्य त्यांना खाली बसवत म्हणाला , " बर झाल्या का आज माझ्या मन भरून चुगल्या करून ? " दोघेही एकमेकांना काहीच माहीत नसल्याचा आव आणत होत्या .." मॅडम माझी लेक असल्यावर तुम्हाला वाटत का की काही लपून असेल .." , अजिंक्य म्हणाला आणि त्यावर मृणाल म्हणाली , " चोंबडी ..हिच्या न पोटात काहीच पचत नाही .." तर समोरून निशा ओरडत म्हणाली , " हा केल्या मग काय म्हणणं आहे तुझं .." निशाचा आवाज आला की अजिंक्यची बोलती बंद होत असे ..आणि आताही ती गोष्ट तशीच आहे हे बघून मृणाल गालातल्या गालात हसू लागली ..अजिंक्यलाही तिच्या हसण्याच कारण कळाल होत आणि जाणूनच त्याने तिचा चिमटा काढला ...मृणाल जोराने किंचाळली ..निशाणे कारण विचारलं असता ती काहीच बोलू शकली नव्हती ..निशा आज अगदी कॉलेजला होती तशीच वागत होती आणि अजिंक्य तिच्या गोष्टी ऐकण्यात व्यस्त होता ..ती बोलत बसली आणि अजिंक्य तिला न्याहाळत होता तर मृणालला अजिंक्यला पाहून ईर्षा होऊ लागली ..शेवटी ते त्याच पहिल प्रेम होतं ..जुने दिवस आठवत तिघेही एकमेकांची खिचाई करत होते ..अचानक समीर मोबाइलवर बोलत टेरिसवर पोहोचला ..त्या तिघांची मेहफिल रंगली असताना आपण उगाच अडथळा बनू नये असं त्याला वाटलं अर्थात त्याच ते नाटकच होत म्हणून त्याने आपण चुकून आल्याचं नाटक करू लागला..अजिंक्यने त्याला परत जाताना बघून त्यांच्याकडे बोलविल आणि त्याला हवं ते मिळाल्याने तो हसू लागला ..मागे पलटत क्षणाचाही विलंब न करता तो त्यांच्याकडे गेला ..अजिंक्यने त्याला बसण्याची विनंती केली आणि तो मृणालच्या अगदी समोरच बसला ..निशा अजिंक्य त्याला बरेच प्रश्न विचारत होते आणि तो सीन्सिअर बॉयसारखा सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ लागला ..निशा त्याची बरीच खिचाई करीत होती पण त्याने पलटून उत्तर दिलं नव्हतं ..अजिंक्यने त्याची खिचाई करता यावं म्हणून विचारलं , " काय समीर महाशय ..नौकरी आहे वेल सेटल आहात तर मग आता लग्न करणार आहात की नाही ? .." आणि निशा त्याच्या शब्दाला साथ देत म्हणाली , " अफकोर्स डिअर ..त्याने तर शोधलीही असेल एखादी ..फक्त आपल्याला सांगायला लाजतो आहे , हो ना रे समीर ? " आणि समीर लाजतच म्हणाला , " आधी अस काही नव्हतं पण माझ्याही नकळत एक मुलगी मनात घर करून बसली...तिला पाहिल्यापासून माझं चैन गेलंय ..सतत तिचाच चेहरा समोर असतो .. आता फक्त तिला मनातलं सांगायचं आहे ..एकदा तिने होकार कळविला की मी निवांत ... " त्याच्या शब्दावर अजिंक्य म्हणाला , " भाऊराजे नक्कीच होकार येईल तिचा तुम्हाला ..लकी असेल ती खूप .शेवटी माझा भाऊ आहे आहेच इतका कर्तबगार." यांच्या गप्पा सुरु होत्या पण मृणाल मात्र आणखीच खचली ..समीर त्यांच्या नकळत मृणालबद्दल बोलून गेला होता ..तिचे हात पून्हा थरथर कापू लागले ..अजिंक्यच मृणालकडे लक्ष गेलं आणि तो म्हणाला , " काय ग मृणाल इतक्या गर्मीतही तुला थंडी का वाजते आहे ..बरी आहेस ना ? " मृणाल समिरशी नजर चोरत म्हणाली , " अजिंक्य मला बर नाही वाटत आहे प्लिज आपण आत जाऊ .." त्याने तिची विनंती मान्य केली आणि तिला घेऊन आत जाऊ लागला ..मृणालही अजिंक्यचा हात पकडून समोर जाऊ लागली ..ती त्याच्या इतकी जवळ होती की त्यांच्यात किंचितही गॅप नव्हती ..निशाही त्यांच्या मागे खाली जाऊ लागली ..पण मृणालला अजिंक्यच्या इतक्या जवळ पाहून समीरचा पारा जास्तच वाढला..ते खाली जाताच समीरने रागात आपला हात भिंतीवर मारला .त्याच्या हाताला फारच रक्त लागलं होतं पण तरीही त्याला कसलाच त्रास होत नव्हता ..कदाचित मृणाल त्याच्यासाठी जीव की प्राण झाली..आणि एक विचार त्याच्या मनात येऊन गेला मृणाल त्याला मिळाली नाही तर ??

क्रमशः ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED