एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 17 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 17

प्रत्येक रात्रीला पडणारा अंधार मृणालच्या आयुष्यात दुःख घेऊन येत होता . रात्री झोप तिला कदाचीतच यायची ..संपूर्ण जग झोपी गेल्यानंतर मृणाल मात्र रात्र नि रात्र भिंतीकडे पाहत असायची ..तिची स्वताची एक काल्पनिक दुनिया बनली ज्यात तिला नको ते विचार यायचे .त्या विचारात ती स्वताच हरवली जायची..कधी कधी ती वेड्यासारखं वागून जायची आणि संपूर्ण जग त्या वेडेपणावर हसत आहे असा भास तिला होऊ लागला ....अशाही स्थितीत समीरने तिच्या आयुष्यात येऊन पुन्हा दुःखांची नवीन शृंखला उभी केली ..त्याच्या अप्रिय विचारनी मृणालची झोप उडाली होती ..पण आज मृणाल एकटीच नव्हती जी झोपली नव्हती तर बाजूच्याच घरी समीरदेखील जागत होता ..समीर सिगारेटवर सिगारेट ओढत होता पण त्याच्या डोक्यातून थोड्या वेळापूर्वी घडलेले क्षण बाहेर जात नव्हते ....त्याने झोपण्यासाठी डोळे बंद केले की मृणाल अजिंक्यच्या कुशीत झोपलेली दिसायची आणि तो खळबळून जागा व्हायचा ..एक वेळी अशी आली की ते दोघे त्याच्या समोरच उभे आहेत असा त्यालाही भास होऊ लागला ...मृणाल त्यावर हसत होती आणि तो मान खाली करून अपमानाचे घोट पित होता ..आज समीरची ही बेचैनी त्याला घेऊन डुबणार होती ..त्याला ते क्षण असह्य होऊ लागले आणि इच्छा नसतानाही त्याने बॅगमधील मद्याची बॉटल काढत समोर ठेवली ..एक एक पॅग बनवून तो आत घेऊ लागला ..सुरुवातीच्या पॅगने तर त्याची नशाही कमी झाली नव्हती ..म्हणून तो एकावर एक पॅग घेऊ लागला ..शेवटी बॉटल खाली झाली आणि मद्याच्या नशेत त्याला केव्हा झोप लागली त्यालाच कळले नाही ..

दुसऱ्या दिवसापासून पुन्हा तसच जीवन सुरू झालं ..समीर दिसला की मृणाल आपली वाट बदलून घेऊ लागली तर मृणालची एक झलक दिसावी म्हणून समीर घराच्या घिरट्या घालू लागला ...समीरच्या मनाची बेचैनी फारच वाढू लागली होती त्यामुळे त्याला लवकरात लवकर आपल्या मनातलं तिला सांगायचं होत पण त्याला संधीच मिळत नव्हती ..मृणाल निशा किंवा आईसोबत सदैव चिकटली असे त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली होती ..रात्री बाहेर जाऊन तो ड्रिंक करून रात्री परत यायचा ..दारूच्या नशेत भलते - सलते विचार त्याच्या मनी डोकावू लागले होते पण तरीही त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवलं होतं ..कदाचित त्याला मृणालच उत्तर हवं होतं ..आणि तीच उत्तर काय असेल याच विचारात तो सदैव बुडालेला असायचा ..त्याच्या मनी फक्त मृणालचा सुंदर चेहरा लपून बसला होता ..मागील तीन चार दिवस मृणालचा चेहरा त्याला जवळून पाहता आला नव्हता पण निशा परत मुंबईला गेली आणि त्याचा एक मार्ग मोकळा झाला ..त्याच मन तिला मनातलं सांगण्यासाठी भिरभिर गिरक्या घेऊ लागल ..

निशा तर गेली होती ..अजिंक्यचे बाबाही बाहेर शेतावर जायचे ..फक्त मृणालसोबत बोलण्यात एक रोडा म्हणजे आई होती ..तीही कधीतरी बाहेर जाईलच या आशेने तो दिवस काढू लागला ..आणि नशिबाने त्याला संधी दिली मृणालशी मनमोकळं बोलण्याची ...आज आईही बाबांसोबत शेतावर गेली होती ..तर प्रज्ञा शाळेत आणि अजिंक्य ऑफिसला गेला होता ..त्याला अचूक संधी सापडली होती ..आई गेल्यानंतर साधारणतः अर्ध्या तासाने तो अजिंक्यच्या घरी पोहोचला ..मृणाल त्यावेळी किचनमध्ये काम करत होती ..तर समीर हॉलमध्ये बसत म्हणाला , " वहिनी मला एक चहा मिळेल का ? " मृणालला जरी त्याचा राग असला तरीही तिने एक शब्दही न काढता त्याच्यासाठी चहा टाकला ..समीर आताही हॉलमध्ये बसला होता ..त्याने इकडे तिकडे नजर टाकली आसपास कुणीच नव्हतं ..मनात काही शब्द आणि बाहेर बेचैनी अशी त्याची अवस्था होती ..तिला सांगू की नये असं त्याला वाटत होतं आणि शेवटी मेंदूशी चाललेला गोंधळ दूर सारत तो किचनला पोहोचला ..संपूर्ण हिम्मत एकवटून तो बोलून गेला .." मृणाल मला तुला काहीतरी सांगायचं आहे ..प्लिज बोलू का ..ते सांगून मी इथून निघून जाईल .." मृणालला तो काय बोलणार होता हे ठाऊक होतं ..तिलाही त्याला नकारच द्यायचा होता पण त्याने आपल बोलणं पूर्ण केल्याशिवाय हे सर्व सुरळीत होणं शक्य नव्हतं म्हणून तिने त्याला परवानगी दिली ..अर्थातच तिला हे सर्व संपवायच होत ..समीर भिंतीला टेकत म्हणाला , " प्रेम म्हणजे काय असत हे मला आधी माहिती नव्हत पण मृणाल काही दिवसांपूर्वी आईने अजिंक्य - तुझे फोटो पाठवले ..तुला पाहताच मी तुझा झालो ..त्या रात्री मी तुझा फोटो डोळ्यांपासून दूरच केला नाही..सतत तुझाच विचार येऊ लागला ..नंतर तुला जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली ..तुझा गोड आवाज एकता यावा म्हणून आईला तुझ्या घरून फोन करायला लावायचो ..तुझा आवाज एकला की मन शांत व्हायचं ..गेले कित्येक दिवस मी असाच आहे ..नीट खान होत नाही की नीट झोपन होत नाही..माहिती नाही काय जादू केलीस तू पण मी तुझाच झालो ..नंतर जाणवत गेलं की तू तर विवाहित आहेस मग माझी कशी होशील ? ..या विचारांनी माझी झोपच उडवली आणि मनातून उत्तर आलं की फक्त मला तू हवी आहेस मग बाकी समाज , घरचे काहीही म्हणाले तरीही मी त्यांचा विरोध करून तुला स्वीकारेल .अगदी तुझ्या मुलीसह तुला स्वीकारायला तयार आहे ..प्लिज दे ना मला तुझा सहवास आयुष्यभरासाठी .." मृणालच आताही त्याच्याकडे लक्ष नव्हतं ..ती शांत होत म्हणाली , " सॉरी ...समीर तुला भरपूर मुली मिळतील ..सो एखादी सुंदर मुलगी शोधून लग्न करून घे ..मी नाही देऊ शकत तुला साथ .एका क्षणासाठीही नाही " आणि समीर थोडा बेचैन होत म्हणाला , " का पण ? काही कमी आहे का माझ्यात .." मृणाल तरीही शांत होती ..काही क्षण थांबत ती म्हणाली , " सॉरी उत्तर देण मी गरजेचं समजत नाही .. मी माझं उत्तर तुला दिलंय ..बास आता तू आपली वाट शोध आणि मला मोकळं कर माझ्या जीवनात .."

तिच्या नकाराने समीर हलून गेला ..त्याला नकार पचवणं अवघड होऊ लागलं ..त्याला स्वतःवरच होश नव्हता ..काय करू काय नको अस झालं आणि मागून तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला , " मला उत्तर हवंय मृणाल !! " त्याचा हात तिच्या हातावर पडताच मृणालचा राग अनावर झाला आणि तिने पलटून त्याच्या कानफाटाखाली लावून दिली ...तिला स्वतःचा क्रोध आवरण शक्य होत नव्हतं आणि ती म्हणाली , " तुला काय वाटलं मी शांत आहे म्हणजे कमजोर आहे ? ..तुझ्यासारखे छप्पन पाहिले मी माझ्या आयुष्यात आणि त्यांना आपली जागाही दाखवली आहे ..तेव्हा हा राग ना माझ्यावर दाखवायचा नाही ..तुला असेल रे मोठी जॉब पण अजिंक्यसारखं मन कुठून आणशील ? ..तू करोडो रुपये जरी मांडले ना तरी तुझ्यासोबत एक पाऊल टाकन मला आवडणार नाही ..शी काय तुझी ती घाणेरडी नजर..तुला साथ देण्यापेक्षा मी जीव देईल आणि ऐक तू घरचा आहेस म्हणून कुणालाच काही सांगितलं नाही पण पुन्हा एकदा माझ्या वाट्याला आलास न तर काहीच खर नाही .घरच्यांना सर्व काही सांगेल मग जे काही होईल त्याला तू जबाबदार राहशील ..मिळालं न तुझं उत्तर ..चल वाट धर .." आणि तो आपला गाल चोळत घराबाहेर पडला ..

आज कितीतरी दिवसानी तो मृणालचा धडाकेदार स्वभाव पाहायला मिळाला होता आणि आता तो कधीच तिची वाट अडवणार नाही अस तिला वाटू लागलं ..पण ही आग इथेच शांत होणार होती ..

मृणालच्या बोलण्याचा परिणाम असा झाला की समीर दुसऱ्याच दिवशी कुणालाही न भेटता दिल्लीला गेला ..त्याच अस अचानक दिल्लीला जाण कुणालाच आवडलं नव्हतं फक्त मृणालला सोडून ..तिच्या चेहऱ्यावर आज हसू होत ..तो गेल्यानंतर ती मनमोकळं बाहेर फिरू लागली ..शिवाय तिला समीरबद्दलही कुणाला काहीच सांगावं लागलं नव्हतं ..ती समीरच्या जाण्याने फारच खुशी होती ..एका दिवसांपूर्वी चेहरा पाडून बसलेली मृणाल आज अशी का वागत आहे हे कुणालाच कळत नव्हतं पण तिला खुश बघून सर्वच खुश होते ..तिच्यासाठी हा मॅटर इथेच संपला होता पण समीरसाठी मात्र आता सुरुवात झाली होती ..

पाच - सहा दिवस झाले होते ..समीरच्या मनात मृणालचे शब्द घर करून बसले शिवाय कुणालाही न सांगता त्याला परत यावं लागल्याने तो संतापाने पेटून उठला ..त्याला त्याच मन खाऊ लागलं ..त्याला आपल्या मनातल कुणाशी तरी शेअर करायचं होतं त्यामुळे तो आज पियुषसोबत ड्रिंक करायला बाहेर गेला ..बारमध्ये पोहोचताच त्यांनी ड्रिंक मागवली ..समीर एकावर एक ग्लास खाली करत होता तर पियुष आरामशीर ड्रिंक घेऊ लागला ..दोघांत एक बॉटलदेखील संपली होती ..पियुष नाही नाही म्हणत असताना समीरने आणखी एक बॉटल मागवली आणि पुन्हा ग्लास भरू लागला ..समीरला बरीच नशा झाली होती आणि तो म्हणाला , " पियुष मेरी जाणं साला ईश्क मे धोका हो गया ..मै तो उसे दिल की बात बताने गया था पर उसने तो इज्जत का कचरा कर डाला ..क्या मोहब्बत का इजहार करना भी गुनाह है ?...उसने नही बोला वो ठीक है पर साली ने गाल पे चिपका दिया ..क्यू तो उस्के हात पर हात रखा इसलीये ..उस्के हर अल्फाज मुझे रात भर सोने नही देते ..बोली तेरे से शादी करणे से बेहतर है की मर जाऊ ..मुझसे इतना गुस्सा क्यू ? शायद उसे पत्ता नही के मेरे भी चारो ओर लडकीया घुमती है पर मैने किसीं को भाव नही दिया .क्यू इतनी अकड दिखायी यार उसने ..मुझे कितनी तकलीफ हो रही है उसे कोई अंदाजा नही ..बता ना दोस्त क्या मोहब्बत करणे का मुझे कोई हक नही " आणि पियुष त्याच्यावर हसत म्हणाला , " क्या बात कर रहा है बे तू ..तू और प्यार ..सपना तो नही देख रहा न मै ..चल बता उसकी तसविर ..देखू तो क्या खास बात है उसमे की तू उसपे लट्टू हो गया ..."

समीरने मोबाइलमधला मृणालचा फोटो दाखविला ..पियुष तिचा फोटो पाहत होता आणि पाहतच राहिला ..काही क्षण तिच्यात हरविल्यानंतर पियुष म्हणाला , " क्या कयामत है बाप !! इसे देखकर तो कोई भी लट्टू हो जाये ..इसके लिये तो साला मै किसिका खून भी कर दु ..खुदाने भी क्या बनाया है इस्को .." पियुष तिची स्तुती करत आहे हे पाहून समीर म्हणाला , " साले तू भी मेरे जखम मे नमक छिडकं ..मेरी हालत तो साला कुत्ता भी नही पुछता .." पियुष त्याला सावरत म्हणाला , " सॉरी भाई ..तू सिर्फ बता..तेरे लिये कुछ भी करणे को मै तयार हु ..तू सिर्फ बता .." आणि समीर हसत म्हणाला , " ये हुयी ना बात ..अब बता मेरी जगह तू होता तो क्या करता ..? " पियुष थोडा जोराने हसत म्हणाला , " उसको उठाकर लाकर अपना बना लेता और हर रात उस्के मजे लेता या फिर उसकी जिंदगी जहाँनुम बना देता जीससे वो जिंदा तो रेहती पर उसे ये जिंदगी नरक से कम नही लगती ..अब तू बता इसमे से क्या करना है .." पियुषच बोलणं समीरच्या कानावर तर गेलं होतं पण तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता ..त्याची ती स्थिती ओळखून पियुष त्याला घरी घेऊन गेला ..त्याला ड्रॉप करत तो आपल्या घरी पोहोचला ..

पियुष आपल्या घरी पोहोचला होता ..मृणालला पाहून त्याला काही सुटल्यासारखं वाटत होतं ..बार मध्ये त्याच्या ते लक्षात आलं नव्हतं पण घरी गेल्यावर त्याच्या डोक्यांत घंटा वाजू लागली आणि त्याला समजलं की मृणालला कुठंतरी पाहिलं आहे ..त्याला राहवलं नाही आणि तो आपला लॅपटॉप ओपन करून काहीतरी बघू लागला ..कितीतरी वेळ तो एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरला जात होता पण त्याला हवं ते मिळत नव्हत ..एक एक फोल्डर ओपन करून तो कंटाळला होता ..पण त्याला हवं ते मिळालं नाही ..तो कंटाळून आपला लॅपटॉप बंद करणारच होता की त्याला हवं ते स्क्रीनवर फ्लॅश होऊ लागलं आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली ..ती स्माईल बरच काही सांगत होती ..कदाचित त्याचा संबंध मृणालशी तर नव्हता ...तो तीच स्माईल घेऊन झोपी गेला ..समीर आज होशमध्ये नसल्याने तो त्याला फोन करू शकत नव्हता पण त्याला वाट होती ती सकाळची ..

आणि

ती सकाळ उगवली ..


क्रमशः .....