दुसऱ्याच दिवशी मृणालला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली ...ती घरी आली तेव्हा घर तेच होत पण मानस बदलली होती ..दररोज आई बाबांच्या ठहाक्याने घर उजळून निघायचं ..मात्र आता त्याच घरात राहायची इच्छा होत नव्हती ..रात्री झोप न लागल्याने अजिंक्य घरी येताच बेडवर पडला ..तर सुरज मृणालला शाळेत सोडून परत आला होता ..मृणाल एकटीच घरात काम करत बसली होती पण रोजसारखा तिला काम करण्यात आनंद जाणवत नव्हता ..स्वयंपाक करून ती बाहेर आली आणि अंगणात बसली ..समोर आई बसून होत्या ..मृणालला त्यांच्याशी बोलायची फार इच्छा होत होती तरीही त्या रागावतील म्हणून ती बोलायची हिम्मत करत नव्हती ..शेवटी हिम्मत करून तिने बोलण्याचा प्रयत्न केला पण आई समोरून उठून निघून गेल्या ..बाबानीही बोलणं टाकून दिलं होतं ..तिच्या डोळ्यांत अचानक अश्रू आले आणि ती डोळे पुसतच आत गेली ..
त्या दिवसानंतर मृणालच संपूर्ण आयुष्य बदललं ..जवळची म्हणणारी सारी नाती क्षणात बदलत गेली ..फक्त आसरा होता तो म्हणजे अजिंक्य आणि प्रज्ञा..प्रज्ञा लहान असल्याने तिला त्यातलं काहीच सांगितलं नव्हतं पण आजी आजोबा आपल्या सोबत का राहत नाहीत हा प्रश्न विचारल्यावर मात्र अजिंक्य - मृणालकडे कुठलंच उत्तर नसे ..त्यावेळी अजिंक्य कशीतरी वेळ मारून नेत होता ..घरातून बाहेर निघन कठीण होऊन बसल होत ..मृणालला या सर्वांचा त्रास होऊ नये म्हणून अजिंक्य शक्यतो तिला बाहेर पाठवत नसे ..घराचं अंगण आणि टेरिस इतक्यापर्यंतच तिची दुनिया सीमित झाली होती आणि इच्छा नसतानाही तिला चार दिवालीत कैद होऊन राहावं लागलं होतं ..रात्र तर अजिंक्यसोबत जाऊ लागली पण दिवस काढणं कठीण होऊ लागल..समोर असायच्या त्या भिंती आणि बाहेर निघालं की लोकांच्या सतत त्रास देणाऱ्या नजरा ..मृणाल अजिंक्यला फक्त गावातले लोकच शिव्या घालत नव्हते तर त्यांच्या घरचेच दररोज घालून पाळून बोलू लागले आणि त्यांचा त्याना त्रास होऊ लागला ..तरीही मृणाल ते सर्व अपमानाचे घोट पिऊन जगत होती ..याच अपेक्षेत की कधीतरी सर्व चांगलं होईलच ..
आज पुन्हा एक रविवार ..अजिंक्य मित्रांच्या मैफीलीत जाणे सहसा टाळू लागला होता पण आज मित्रांनी आग्रह केल्यामुळे तो तिथे गेला होता ..मित्रांनी नेहमीप्रमाणे ड्रिंक करायला सुरुवात केली ..अजिंक्य मात्र शांत होता ..सर्व बोलायचे आणि तो फक्त एकूण घेत होता ..मैफिल बरीच रंगात आली होती ..जवळपास सर्वानाच बरीच नशा झाली होती आणि नशेच्या अवस्थेत अमोल म्हणाला , " यार आपला अजिंक्य फार लकी आहे ? " आणि मयूर त्याला साथ देत म्हणाला , " कस काय लकी ..? " आणि अमोल पुन्हा हसत म्हणाला , " राव याची बायको रात्रभर थकत नसेल ना ? सवय झाली असेल तिला ....आपली तर लवकरच थकते .." आणि त्यातला प्रत्येक व्यक्ती हसू लागला ..अजिंक्यला त्या क्षणी फार राग आला पण स्वतःचा राग आवरून तो तसाच उभा राहिला ..त्याला राग आला असला तरीही त्याने तो आपल्या चेहऱ्यावर अजिबात दाखवला नाही ..तो मंद स्मित करीत होता ..मित्रांच्या गप्पा आज फक्त याच विषयावर होत्या ..विषय कुठलाही निघला की घुमून फिरून तो मृणालवरच येत होता आणि सर्व मित्र मनमोकळं हसायचे ..अजिंक्यला राग येत होता पण त्याला वाद घालायचे नसल्याने तो राग आवरून शांत बसला ..अजिंक्य काहीच बोलत नाही आणि केवळ हसतो आहे हे पाहून अमोल पुन्हा एकदा म्हणाला , " राव बायको माहेरी गेली आहे ..साल रात्रीची सोय झाली असती तर बरं झालं असत ..अजिंक्य मृणाल आहे का रे फ्री .." अमोलचे शब्द बाहेर यावे आणि आतापर्यंत स्वताला सावरुन ठेवलेला अजिंक्य त्याच्यावर तुटून पडला ..अजिंक्य त्याला कधी लातेने तर कधी हाताने तुडवत होता .मित्र त्याला सोडवायला समोर येत होते पण तो पुन्हा त्याच्यावर जाऊन पडायचा ..रागाच्या भरात त्याने त्याच डोकंही फोडला होत ..त्याला त्याचा इतका राग आला होता की बॉटल फोडून तो त्याचा खून करायला समोर गेला ..सर्वांनी अजिंक्यला वेळेवर आवरलं म्हणूनच तो वाचला .अजिंक्यला इतक रागावतना मित्रांनी पहिल्यांदाच पाहिलं होतं त्यामुळे सर्वांनी त्याला घरी जायला सांगितले आणि अजिंक्य नंतर तिथे क्षणभर सुद्धा थांबला नाही ... अजिंक्य घराकडे जात असताना अमोल म्हणाला , " साल काय समजतो तू स्वताला ..मी बदला तर नक्की घेईल ..खूप ज्ञान द्यायचा न बायकोला कस आनंदांत ठेवायचं ..बघ बायकोच चार घर फिरते आहे ..का रे बायको खुश नाही वाटत तुझी .."अजिंक्य समोर जाऊन थांबला आणि धावतच परत आला पण मित्रांनी त्याला आत येऊ दिलं नाही म्हणून अमोल वाचला ..कदाचित मित्रांनी त्याला थांबविल नसत तर आज अजिंक्यने अमोल ला नक्कीच मारलं असत ..अजिंक्य समोर निघून आला ..त्याच्या डोक्यात बरेच विचार सुरू होते ...घराकडे जाताना मृणालला काही कळू नये म्हणून त्याने स्वताला आवरून घेतलं ..त्याला मित्रांच्या अशा स्वभावाची जाण होती ..पण आज जे झालं त्यावरून हे त्याला कळून चुकलं की वेळ आल्यावर बाहेरचे तर सोडाच पण आपले लोकसुद्धा संधीचा फायद्या घ्यायला सोडत नाहीत ..इतकं रागात असतानाही मृणाल समोर गेल्यावर तिला काही कळू नये म्हणून स्वताला शांत करून घेतले ..त्याचा आनंदी चेहरा पाहून मृणालला लढण्याची जिद्द यायची त्यामुळे रागातही शांत राहण्याचे तंत्र त्याने या काळात शिकून घेतले ..
मृणाल तशी फार तर बाहेर जायची नाही ..तिच्यावरच जरी सर्वांचं प्रेम नाहीस झालं होतं तरीही तिने इतरांवर प्रेम करण सोडलं नव्हतं ..त्यात तीच आपल्या मुलीवर फारच प्रेम ..ती घरी आली की ती प्रज्ञाला क्षनासाठीही दूर करत नसे ...कधी कधी तिला प्रज्ञाही आपल्यापासून दूर तर जाणार नाही ना याची भीती लागून असे आणि ते स्वाभाविकच होत ..तिने विचार न केलेल्या गोष्टीही आता घडू लागल्याने ती थोडी सतर्क राहू लागली ..प्रज्ञा थोडी लहानच होती त्यामुळे घरात काय चाललं आहे याबद्दल तिला फारस कळत नव्हतं ..पण समाजातले लोक इतके निर्दयी होते की त्या छोट्याशा मुलीला देखील त्यांनी डीवचन सोडलं नव्हतं ..त्यामुळे मृणाल फक्त दिवसातून दोनदाच घरातून बाहेर निघायची ..एकदा तिला शाळेत सोडताना आणि दुसऱ्यांदा तिला परत आणताना ..वेळ पण कमालच करते ..एक वेळ अशी होती जेव्हा तिचा चेहरा पाहण्यासाठी कितीतरी लोक बाहेर वाट पाहत असत आणि वेळ बदलली तेव्हा त्याच लोकांनी तीच जगणं मुश्किल करून सोडलं ..लोक तिच्या शरीरावर चेष्टा करू लागले एवढंच काय तर अप्रत्यक्षरित्या तिला पैसे घेऊन शरीराची मागणी करू लागले ..ती तिथून घरी येईपर्यंत त्रास व्हायचा..इतका त्रास की तिथेच रडून द्यावस वाटायचं पण तेही करण्याची हिंमत ती करू शकत नव्हती .. आजही ती त्यांचं बोलणं ऐकून घरी परतली .प्रज्ञा शाळेतून येताच आजीकडे गेली ..मृणालला भरपूर रडायचं होत पण अजिंक्यला पाहताच तिने आपले अश्रू पुसून घेतले आणि त्याची विचारपूस करू लागली ..अजिंक्यला तीच मन जाणता येत होतं त्यामुळे इतकी छोटी गोष्ट त्याला न कळन शक्यच नव्हतं ..तो तिच्याजवळ जात म्हणाला , " राणीसरकार मन भरून आले की माणसांनी ते मोकळे करावे ..उगाच त्यांना रोखून स्वताला त्रास करून घेऊन नये .." त्याचे हे शब्द ऐकताच ती त्याच्या मिठीत जाऊन मोठ्याने रडू लागली ..मन रिकामी होईपर्यंत तिने आपले अश्रू थांबविले नाही ..अश्रू थांबल्यावर तीच म्हणाली , " नविन आहे न हे सर्व म्हणून डोळ्यात चटकन अश्रु आले .सवय झाली की घेतील डोळेच अश्रूंना सावरुन ..अश्रूंना समजत नाही ना कुठे वाहायच आणि कुठे नाही तर ...हेही दिवस जातील .. ए अजिंक्य तुलाही खूप त्रास होत असेल ना या सर्वांचा ? मग तू का नाही रडत ? " आणि अजिंक्य म्हणाला , " मला नाही वाटत रडावस ..तू आहेस जीवनात मग आणखी मला हवं तरी काय ..अश्रू कुणासाठी गाळू ..ज्यांनी समजून घेतलं नाही त्यांच्यासाठी की जे दररोज घालून - पाळून बोलतात त्यांच्यासाठी ..त्यांना सांगितलं नाही ही चूक आपली आहे पण माझा एक शब्द देखील एकूण घेतला नाही त्यांच्यासाठी अश्रू बाहेर यायला मन मानत नाही उलट तिच्यासाठी खंबीर राहावंसं वाटत जी माझ्यासोबत आहे ..सुखातही आणि दुःखातही .." त्याचे शब्द जणू तलवार होते ..मृणालच्या मनाला केव्हा घाव करून गेले तिलाच कळाल नाही..जो व्यक्ती माझ्यासाठी आपल्या घरच्यांच्या विरोधात उभा आहे त्याच्याजवळ मी अश्रू गाळून त्याला कमजोर बनवते आहे हा विचार तिच्या मनात आला ..आजपासून लोक काहीही बोलले तरी ते ऐकून घेईल पण स्वताला कमजोर बनविणार नाही हा प्रण तिने त्याचक्षणी घेतला आणि अजिंक्य - मृणाल या डोंगराने जणू वादळाला सांगितलं की तुम्ही कसेही या आणि काहीही करून जा पण तुमच्यासमोर आम्ही नमणार नाही आणि परिणाम काहीही होवोत आम्ही सदैव झुंज देऊ
इकडे समीर मृणालची अवस्था पाहण्यासाठी आतुर झाला होता ..तिला तडफडताना त्याला प्रत्यक्ष पाहायचं होत ..सर्व प्रकरण आपल्यावर येईल म्हणून तो इतके दिवस घरी आला नव्हता पण आता त्याला वाट पाहवेना ..तो गावात दाखल झाला आणि त्याचा चेहरा उजळून निघाला ..मागे स्वतःचा चेहरा लपवून पडलेला हाच होता यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही इतका तो खुश होता ...घरी पोहोचला नि पोचला अजिंक्यच्या आईने त्याला सर्व काही सांगायला सुरुवात केली ..गावात मृणालमुळे आम्हाला तोंड दाखवायची जागा उरली नाही असे शब्द आईच्या तोंडून ऐकल्यामुळे तो मनातून खुश होता ..बाकी वरून तो किती वाईट झालं याच नाटक करू लागला ..समीर सकाळपासून घरी होता तरी त्याला मृणालच दर्शन झालं नव्हतं ..तीच दर्शन व्हावं म्हणून तो खूप वेळा तिच्या घराच्या चकरा मारू लागला ..त्याला इतकी आतुरता लागली होती की तो तिच्या घराकडे जाऊ लागला पण त्याच्यावर सर्व ओरडले आणि त्याला तिथे जाताच आले नाही ..सायंकाळी मात्र त्याला हवं ते मिळालं ..मृणाल प्रज्ञाला शाळेतून आणायला गेली असताना तीच दर्शन झालं ..ती टवाळकी मूल तिला बरच काही बोलत होती आणि तो एक एक शब्द त्याला आनंद देऊ लागला ..ती घरी जाईपर्यंत तरी त्याने तो क्षण जगून घेतला ..
सायंकाळ झाली होती ..अजिंक्यला काकांच्या घरी जाण्याची परवानगी नव्हती ..त्यामुळे समीर दिसतानाही तो त्याच्याशी बोलू शकला नव्हता ..ही गोष्ट त्याला जाणवली आणि तोच अजिंक्यशी जाऊन बोलू लागला ..अजिंक्य त्याची बरीच विचारपूस करीत होता ...समीरला वाटलं होतं की तो सांगेल घरच्यांना तू समजाव पण तस काहीच झालं नाही ..तो काही क्षण बोलून आत गेला ..समीरने तिला पाहिलं तर होत पण त्याच्या मनाच समाधान आताही झालं नव्हतं ..त्याला तिच्याशी प्रत्यक्ष बोलून तिची जागा दाखवायची होती ..लोक म्हणतात की दुःखात व्यक्तीला झोप लागत नाही पण इथे मात्र त्याला आनंदांत झोप लागणार नव्हती ..तो वाट पाहत होता उद्याची ..
दुसराही दिवस उगवला ..साधारणतः दुपारची वेळ होती ..सर्वच आपापल्या कामावर जाऊ लागले होते ..सुरज कॉलेजला गेला आणि समीरचा मार्ग मोकळा झाला ..तो मृणालच्या घरात जात म्हणाला , " मिसेस मृणाल आत येऊ का ? " ..मृणाल दारावर आली ..दुःखात संकटे येतात हे तिला आधीच माहिती होत त्यामुळे तिने हसूनच त्यांचं स्वागत केलं ..तो आत बसत म्हणाला , " चहा मिळेल का तुमच्या हातचा ? " आणि मृणाल आनंदाने त्याला चहा बनवायला आत गेली..तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून त्याचा चेहरा मात्र उतरला ..ती चहा घेऊन आत आली ..तो चहाचा सिप घेत तिच्याकडे पाहू लागला आणि त्याच वेळी त्याच्या जिभेला चटका बसला आणि मृणाल म्हणाली , " अरे आरामशीर पी ..इतकी काय घाई आहे .." आणि समीर थोडा चिडत म्हणाला , " हो मला नको सांगू ..आज तुला कळाल असेल की मला नकार देऊन किती चूक केली आहे ..सुंदरता जास्त दिवस नाही टिकत मृणाल ..बघितलं लोक काय काय बोलतात तुला ..मला नकार दिला म्हणून नशिबाने तुला असे दिवस दिले ... " तो मोठ्याने हसू लागला आणि मृणाल म्हणाली , " समीर तू मर्द आहेस ना ? तुला तर उघडपणे हेही सांगता येत नाही की हे सर्व मी केलंय की देऊ बांगड्या ??.." समीरला राग अनावर झाला ..त्याचे डोळे रागाने लाल झाले आणि तो म्हणाला , " हो छाती ठोकून सांगतो मी केलंय सर्व ..मला गालावर मारलस काय ? बघ मी तुझं पूर्ण आयुष्यच बरबाद केलं ..आता तू घरच्यांनाच तोंड दाखवू शकणार नाहीस ..जिंकलो की नाही मी ? .." त्याच्या बोलण्यावर मृणाल मोठ्या - मोठ्याने हसू लागली ..त्याला काहीच कळत नव्हतं ..मृणालला हसताना ठसका बसला आणि ती शांत होत म्हणाली , " कोण म्हणतं तू जिंकलास ? तुला माहिती नाही हे सर्व मी आधीच जगले आहे ..लोकांच्या शिव्या असो की मग अस छेडन सर्व सहन केलं ..एवढंच काय तर हे सुद्धा कमी आहे ..तू सर्वाना माझ्यापासून तोडल ..ती नाती तुटल्याने मला थोडा फार त्रास झाला ..पण जो मला या क्षणातही घरच्यांच्या विरोधात जाऊन साथ देतो आहे तो कुठे दूर गेलाय ..माझ्यासाठी तर तोच जीवन आहे ..समीर तू सर्व करून देखील हरला आहेस .हरलास रे तू " म्हणत मृणाल मोठ्या मोठ्याने हसू लागली ..समीर तिच्यावरचा सर्व राग कपावर काढत बाहेर निघाला .त्याला तस बघून तिला फार आनंद मिळाला ..मृणालने तात्पुरती बाजी तर जिंकली होती पण समीर काही शांत बसणार नव्हता..आणि मृणालने जरी म्हटलं होतं की फक्त अजिंक्य सोबत आहे तेच खूप आहे पण प्रत्यक्षात जेव्हा तिच्या मुलीवर , अजिंक्यवर या गोष्टीचा प्रभाव पडणार तेव्हा काय होईल याबद्दल तिला चिंता सतावू लागली ..कारण त्यांच्याविना तीच आयुष्य अपूर्णच होत ..मृणाल स्वताला काही झालेलं सहन करू शकत होती पण समीरच्या अशा आडकाठिमुळे जर अजिंक्य , प्रज्ञा तिच्यापासून दूर झाले असते तर ?? ..विचार मनात आला आणि तीच डोकं सुन्न झालं ...
क्रमशः ......