एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 23 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 23

अजिंक्यने प्रज्ञाला बंदिस्त करू नको अस नक्कीच सांगितलं होतं पण आईच काळीज काही मानेना आणि तिने गुपचूप आपला तोच प्रवास सुरु ठेवला ..तिला कोणत्याही स्थितीत प्रज्ञाला गमवायचं नव्हतं त्यामुळे ती तिची ढाल बनून प्रज्ञाच्या सभोवती राहू लागली ..प्रज्ञाला कुणी काही बोलल तरी मृणाल त्यांची चांगलीच खबर घेत होती ..प्रज्ञाही आईसोबत फार खुश राहू लागली ..ती याबद्दल सहसा अजिंक्यला काहीच सांगत नसे पण अजिंक्य अचानक तिच्या आधी घरी आला की मग मात्र मृणाल पेचात सापडायची ..ती त्या रात्री अजिंक्यशी बोलणंच टाळत असे आणि अजिंक्य तिला अस पाहून रागवायच्या ऐवजी मनातल्या मनात हसून तिची गंमत घेण्यात समाधान मानायचा ..ती जरी तिची ढाल बनून होती तरी पूर्ण वेळ तिला तिच्यासोबत राहता येत नसे . शाळेच्या आतही काही लोक होते जे तिच्या आईच्या नावाने तिला चिडवायचे पण ती मृणालला त्याबद्दल काहीच बोलत नसे ..वैश्या म्हणजे काय ? नेहमीच हा प्रश्न ती आपल्या आजीआजोबांना विचारत असे आणि ते तिला वैश्या या शब्दाचा अर्थ गंदी व्यक्ती सांगत ..प्रज्ञाने मृणालला या बद्दल काही सांगितलं नसलं तरी आजीआजोबांनी सांगितलेला गंदी हा शब्द तिच्या मनात ठासून भरला आणि ती नकळत मृणालच्या दूर होउ लागली ....

लहान असताना तिला या सर्वांच काही घेणं देणं नव्हत त्यामुळे ती सहसा या वादात पडत नसे तर दुसरीकडे इतर आईवडिलांप्रमाणे अजिंक्य - मृणाल आपली मुलगी लहान आहे म्हणून याबद्दल काहीच वाच्यता करत नव्हते त्यामुळे प्रज्ञा कुठेतरी हरवली जात होती... प्रज्ञा हळूहळू दुसऱ्यांच्या गोष्टी एकूण त्यावर विचार करू लागली होती ..आणि ते ऐकून आल्यावर ती आपल्या आईवडिलांकडे बारीक लक्ष देऊ लागली ..ते दररोज काहीतरी बोलतात पण आपल्याला काहीच सांगत नाही म्हणून तिला त्रास होऊ लागला होता..तिची अशी अवस्था असताना घरच वातावरण पण ठीक नव्हतं ..आजूबाजूलाच असताना आपली आजी आणि आई वेगळे का राहतात असे बरेच प्रश्न सतावू लागले होते तरीही तिला या प्रश्नाचं उत्तर दोन्ही घर द्यायला तयार नव्हती ..त्यांचं ते भांडण तो अबोला तिच्या मनावर परिणाम करू लागला होता ..मृणालला वाटायचं की तीच सत्य दुसर्याकडून प्रज्ञासमोर येऊ नये म्हणून ती बहुतेक वेळा तिला वैश्या या शब्दाचा अर्थ सांगायची पण प्रज्ञा तिला काहीच समजत नाही अस दाखवू लागली की मग मृणालला तिला हे सर्व कस समजवाव तेच कळत नसे आणि या सर्वात ते सत्य सांगणं राहूनच जाई..प्रज्ञाच डोकं म्हणजे सैतानाच घर झालं होतं ..त्यात प्रश्न बरेच होते पण उत्तर मात्र एकही नव्हतं ..तिची अवस्था फारच वाईट झाली होती ..या सर्वांचा परिणाम तिच्या आयुष्यावर होऊ लागला होता आणि तीच तस वागण म्हणजे मोठा गोंधळ होण्याची शक्यता होती ..समजण्याच वय नसताना प्रज्ञाने त्या सर्व गोष्टी फक्त मनातच दाबून ठेवल्या होत्या पण ती जसजशी मोठी होणार होती तसतसा तो त्रास सर्वांच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येणार होता त्यामुळे सर्वाना प्रतीक्षा होती ती प्रज्ञा मोठी होण्याची ..पाहायचं हेच होत की आई वडिलांच्या त्याग , संघर्ष जिंकेल की मग जगाने सांगितलेलं सत्य ?

मागे बराच काळ गेला ..मृणाल आता दहावीला होती ..मृणाल - अजिंक्यला काही फरक पडत नाही म्हणून गावातल्या लोकांनी त्यांना शिव्या देणच बंद केलं होतं तर घरचेही बोलून - बोलून कंटाळले होते ..समिरनेही त्यांच्या नात्याला बघून स्वताची हार स्वीकार केली होती..शेवटी सर्वांनी त्यांना निर्लज्य ठरवून प्रत्येक व्यक्ती आपल्या वाटेला लागला होता ..प्रज्ञा लहान असताना मृणाल तिच्यासोबत बाहेर जायची पण ती आठविला गेली आणि प्रज्ञानेच तिला सोबत येण्यासाठी नकार दिला अर्थातच तिला आपली आई सोबत येते हे ऐकून लाज वाटू लागली होती ..या काळात मृणाल - अजिंक्यने प्रज्ञाला मृणालच सत्य सांगितलं होतं परंतु त्यावेळी ती काहीच बोलली नाही..तिने शांत राहनच पसंद केलं होतं ..तिच्या या चुप्पीचा खरा अर्थ दोघानाही कळाला नव्हता ..कदाचित तिला काय बोलावं समजल नसेल म्हणून नंतर ते दोघेही तिला काहीच बोलले नव्हते पण तिच्या शंटतेवरून प्रज्ञाच्या डोक्यात मात्र काहीतर वेगळंच सुरू होत हे त्यांना जाणवलं ..याच काळात तिने जुनी शाळा बदलून शहरात प्रवेश घेतला ..तिला गावाच्या वातावरणापासून फार म्हणजे फार दूर राहावस वाटत होतं ..आपल्या आईच सत्य कुणाला कळू नये म्हणून ती सहसा कुणासोबत बोलत देखील नसे ..आणि याच कारणाने शाळेत येण्यासाठीही तिने मृणालला मनाई केली होती ..गावात आताही जेव्हा केव्हा ती फिरत असे तेव्हा सर्वांचं टार्गेट तीच बनत चालली होती .त्यामुळे तिच्या मनावर परिणाम होऊ लागला होता ..गावातल्या लोकानीही आपल्या मुलींना प्रज्ञाशी न बोलण्याची ताकीद दिली होती ..त्यामुळे गावातही ती एकटीच होती ..इतरांना फार मित्र आहे आणि आपल्याला नाहीत त्यामुळे ती मनातून खचत चालली होती आणि त्याचा संपूर्ण राग मृणालवर काढून मृणालसोबत थोडी फटकून वागू लागली..मृणालचा राग करत असताना ती आजीच्या फारच जवळची झाली ..पण दोघांचे सतत भांडण होत असल्याने तीच घरात मन अजिबात रमत नव्हतं..तिला अजिंक्यचा सहवास फार आवडायचा पण अजिंक्य मृणालवर फार प्रेम करीत असल्याने तो आपल्या भावना समजून घेणार नाही अस तिला वाटू लागलं आणि तिने शांत राहनच पसंद केलं .जितकी मृणाल अजिंक्यची अवस्था खराब होती त्याहीपेक्षा प्रज्ञाची होऊ लागली ..तिच्या मते तिला समजून घेणार कुणीच उरलं नव्हतं आणि मृणालप्रमाणे तीचही एक वेगळं जग निर्माण झालं ..ज्यात ती एकटीच होती ..तिलाही कुठेतरी तिच्याशी मनाने बोलणारा व्यक्ती हवा होता ..जो तिला समजून घेईल ..आणि याच प्रवासात प्रवेश झाला एका व्यक्तीचा..जो तिला समजून घेणार होता आणि तिला या सर्व स्थितीतून बाहेर काढणार होता ..

त्याच नाव सलील ..त्याच्या वडिलांची प्रज्ञाच्या शहरात बदली झाली त्यामुळे त्याने सरळ दहाविलाच त्यांच्याच शाळेत प्रवेश घेतला ..प्रज्ञा फार तर मुलांकडे लक्ष देत नसे .. बाहेरही तीच एकटीचच जग होत ..नेहमीप्रमाणे ती आजही दुपारच्या सुट्टीत एकटीच बाहेर बसली होती ..बाजूला झाड आणि वारा तिला मनातून सुखावू लागला...पण त्याच वेळी तिचा तो एकांत भंग झाला तो कुठल्यातरी आवाजाने ..तिने पाहिलं की बाजूलाच काही मुलं एका मुलीला त्रास देत होते त्यामुळे प्रज्ञाला राग येऊ लागला ..तिनेही तो त्रास अनुभवला असल्याने ती सरळच त्यांच्या बाजूने जाऊ लागली ..चालता चालता ती अचानक थांबली कारण तिच्या आधीच सलीलने त्याना खडे बोल सूनावून तिची माफी मागायला लावली ..प्रज्ञा त्याच्या अगदीच समोर होती आणि अगदी जवळही .. तरीही तो तिच्याकडे लक्ष न देताच निघून गेला आणि ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी राहिली ...काय होत सलीलमध्ये ? ..एक तर मुस्लिम त्यामुळे दिसायला अगदी गोरा ...उंची मध्यम ..गळ्यात टाय आणि हाताचे स्लिवज वर करून अगदी रुबाबदार जाणवत होता ..आणि त्याला पाहताच प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागलं .नकळतच त्याने प्रज्ञाच्या आयुष्यत प्रवेश घेतला पण तो पुढे तीच आयुष्य होऊन जाईल अस तिला कधीच वाटलं नव्हतं .बेल वाजताच तिची तंद्री भंग झाली तेव्हा तो दिसेनासा झाला होता ..तो क्षण तर गेला पण प्रज्ञा मात्र कुठेतरी हरवली गेली ..अगदी पहिल्यांदाच तिच्यासोबत अस झालं होतं ..

एक एक दिवस समोर जाऊ लागला ..कधी कुणाकडे नजर वर करून न बघणारी ती त्याला वर्गात चोरून चोरून बघू लागली ..त्याच्या नकळतही तिला तो आवडू लागला ..सलील जितका दिसायला सुंदर होता तितकाच हुशारही होता विशेष म्हणजे त्याला गाण्याची फार आवड होती ..तो एकदा गायला लागला की सर्व मुली त्याच्या बाजूला घोळका करून उभ्या राहत होत्या आणि प्रज्ञा आपोआपच त्यांच्यावर ईर्षा करू लागायची ..तिला अचानक काय होऊ लागलं होतं याच भानच नव्हतं ..त्याच्यासाठी ती दररोज लवकर शाळेत यायची आणि फक्त आणि फक्त त्याचा चेहरा बघत बसायची ..तिने त्याचे सोशीअल अकाऊंटसुद्धा शोधून काढले होते ..त्याच्या एखाद्या फोटोवर त्याला कंमेंट आली की ती सर्वात जास्त खुश व्हायची ..तिला त्याच्याशी खूप खूप बोलावसं वाटत होतं पण हिम्मत मात्र करू शकली नाही ..त्यामुळे आपल्या भावना मनात दाबूनच ती दिवस जगू लागली ..

अशाच एका दिवशी तिला नशिबाने साथ दिली ...इंग्लिश मिडीयम शाळा असल्याने युनिट टेस्टला फार महत्त्व होत ..प्रज्ञाच्या कलासलाही युनिट टेस्ट झाली आणि सर्वह विषयात तिला सर्वांत जास्त मार्क्स आले तर अगदी दुसऱ्याच नंबरवर सलील होता ..सर्व शिक्षकांनी ससर्वांसमोर तिची स्तुती केल्याने ती आज फारच खुश होती आणि त्याच वेळी सलीलने तिला स्वतः येऊन अभिनंदन केले ..तो फक्त मिनिटभर तिच्याशी बोलला होता पण प्रज्ञाच मन मात्र कुठेतरी हरवलं होत ..ती दिवसभर त्याचाच विचार करत होती .त्याचा तो पहिला वहिला स्पर्श तिला सुखावून गेला आणि ती ती सतत आपल्या हाताकडेच पाहत होती ..शाळेतून परत आली तेव्हाही त्याच्याबद्दलच विचार येत होता ..तिला काय करू नि काय नको अस झालं होतं आणि मोबाइल उघळून सलीलच फेसबुक बघू लागली..त्याच्या त्या गोऱ्यापान फोटोला पाहून ती अगदीच त्याच्यात हरवून गेली ..तिच्या डोक्यात बरेच विचार चालले होते ..इतके दिवस तिने कसतरी स्वताला सावरलं होत पण तिला आत ते शक्य होत नव्हतं आणि तिने लगेचच त्याला फेसबुकवर रिक्वेस्ट सेंड केली ..सेंड तर केली पण आता तो काय करेल याची भीती तिला वाटू लागली .तो स्वीकारेल की नाही याचं विचारात ती हरवली आणि भीती आनंदाच्या संमिश्र भावना चेहऱ्यावर झळकू लागल्या .. साधारणतः पाच मिनिटं झाले असतील आणि तिला एक मॅसेज आला ..मॅसेज उघडाव आणि समोर सलील नाव दिसावं ..त्याचा मॅसेज पाहून तिची तर विकेटच उडाली ..ती इतकी आनंदी होती की त्याला उत्तर द्यायचे आहे हेसुद्धा विसरून गेली ..आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा स्वतःच्याच डोक्यावर हात मारू लागली ..काय असत ना प्रेम ? ..तिनेही त्याला उत्तर दिलं आणि रात्री बऱ्याच वेळेपर्यंत ते बोलू लागले ..प्रज्ञाला तर त्याने सतत बोलत राहावंसं वाटत होतं पण तो झोपायला गेला आणि प्रज्ञा थोडी नाराज झाली ..शेवटी तिलाही बेडवर पडावं लागलं ..पण आज मात्र तिला झोप येणार नव्हती ..ती त्याच्याच विचारात हरवली होती ..

दुसऱ्या दिवसानंतर मात्र तीच संपूर्ण आयुष्य बदललं ..त्याने मला क्षणभर पाहावं म्हणून ती दररोज त्याच्या समोर यायची ..सलीलही ती दिसली की तिच्याशी बोलू लागला ..रोज असच होऊ लागलं ..सर्व मित्र बाजूला असताना ते तासंतास गप्पा मारत बसायचे..शाळेत एकमेकांना बघणं असो की मग घरी मॅसेज करणं दोघानाही फारच आवडू लागलं होतं ..सलीलही तिच्याकडे आकर्षित झाला होता ..हा काळ त्यांच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ होता ..दोघाणीही तारुण्यात पदार्पण केल होत आणि नकळत एकमेकांकडे ओढले जात होते ..त्यांना कळून चुकलं होत की आता आपण दोघे एकमेकांविना राहू शकत नाही आणि नेमक याच वेळी प्रज्ञाने त्याला आपल्या मनातलं सांगितलं ..सलीललाही तिला स्वीकारायला एक क्षणसुद्धा लागला नाही आणि त्या क्षणापासून ते एकमेकांचा जीव झाले ..तिच्या आयुष्यात आनंद नक्कीच आला होता पण तो आनंदही ती कुणाशी शेअर करू शकत नव्हती ..

त्यांच्या काही दिवसांच्या मैत्रीला रिलेशनशिप अस नाव मिळालं आणि प्रथमताच प्रज्ञा खुश राहू लागली ..पण तिने आपल्या नात्याबद्दल कुणालाच काही सांगितलं नव्हतं ..आपल्या आईबद्दल त्याला काहीच कळू नये म्हणून ती सतर्क होती तर त्याच वेळी सलीलसोबत काही आनंदाचे क्षणही जगत होती ..

आजही नेहमीप्रमाणे शाळा सुटली आणि प्रज्ञा घरी परतली ..ती फार थकली असल्याने मृणालला चहा बनवायला सांगून बेडरूमला गेली आणि फ्रेश होऊन क्षणात हॉलला पोहोचली..प्रज्ञा बाहेर येताच मृणालने चहाचा कप तिच्या हातात दिला आणि ती म्हणाली , " कसा गेला दिवस बाळा ? शाळेत खूप थकली असशील ना आज ? " आणि प्रज्ञा नाखूष होत म्हणाली , " बस गेला ठीक ..काय तो रोजचाच अभ्यास आणि लोकांच चिडवन याव्यतिरिक्त काय आहे आयुष्यात ..तुला तर माहीतच आहे ? आणि दिवसभर मी करतेच काय ? ..साधं दुपारीसुद्धा जेवायला निघत नाही .." मृणालला तिचा रोष कळाला होता ..ती शांत होत म्हणाली , " हो माहिती आहे ..मला वाटलं की छान गेला असेल कारण तू आज मूवी पाहायला गेली होतीस ना एका मित्रासोबत " ..प्रज्ञाला आपली चोरी पकडली गेल्याच समजलं ..त्याची तिला भीती वाटू लागली आणि ती सूर बदलवत म्हणाली , " म्हणजे मी खोट बोलत आहे असं वाटत तुला ?.म्हणाले ना की मी शाळेतच होते ..तू माझ्यावर शंका घेत आहेस का ? .." प्रज्ञा फारच रागात होती ..आपली चोरी सापडली गेल्याने ती मनातून फार घाबरली होती आणि त्याच भीतीत ती वाटेल ते बोलू लागली ..तेव्हांच मृणाल म्हणाली , " नाही ग बाळा !!..पण मला तू खरच दिसली तिथे आणि फार जवळून बघितल मी तुला...तो मुलगा छान गोरा गोरा होता आणि स्वतःची बाईक होती त्याच्याकडे ..मी बोलायला येणारच होते की तुम्ही निघून गेलात आणि तुला मी ओळखणार नाही अस होईल का ? आणि गेले असाल तर सांग की त्यात काय चालत हे सर्व " आणि प्रज्ञा पून्हा रागावत म्हणाली , " म्हणजे तुला आताही वाटत आहे की मी तीच होते ..हो म्हणा तुझ्याकडून आणखी अपेक्षा सुद्धा काय करू शकते ..लोक जसे असतात त्यांना सर्व तसेच दिसतात .." आणि मृणाल स्वर आवरत म्हणाली , " बाळा काय म्हणायचं तुला ? ..तू हल्ली माझ्यासोबत अशी का वागते आहेस ? ..आणि मी जे बघितलं ते सांगितलं ..होऊ शकतो झाला असेल भास ? पण एवढं रागवायला काय झाल? " आणि प्रज्ञा कप खाली फेकत म्हणाली , " हो मीच अशी वागते ..तू न सती सावित्री आहेस ..फक्त माझंच चारित्र्य खराब आहे ..माझ्या डोक्यात न आधी गोंधळ होता पण आता विश्वास बसला आहे आणि आजी पण बरोबरच म्हणते " तीच वाक्य तोडत मृणाल म्हणाली , " काय म्हणते आजी ? " आणि प्रज्ञा रागाच्या भरात बोलून गेली , " आजी म्हणते तू गंदी आहेस ..खूप खूप गंदी !! "

दोघातला वाद वाढतच होता ..मृणाल सर्व शांतपणे एकूण घेत होती तर प्रज्ञा शांत राहण्याच नाव घेत नव्हती ...लोकांमुळे तिला जो त्रास झाला होता ..ते सर्व तिने एवढे दिवस मनात दाबून ठेवलं होतं आणि ते सर्व याक्षणी तिच्या तोंडून बाहेर निघत होत ..तिला याक्षणी स्वतःवर ताबा नव्हता आणि मृणाल म्हणाली , " गंदी म्हणजे ? " आणि पून्हा एकदा प्रज्ञाने शब्द बाहेर काढला .." लोकांचं एकूण मन भरलं नाही का ? बरं मीच सांगते ..वैश्या !!!..आता कळाल मी तुझ्यासोबत अशी का वागते तर ?..मला लाज वाटते तुझी मुलगी आहे हे सांगण्याची ..खूप खूप लाज वाटते .." प्रज्ञा आपल्या मनातली भडास काढून आजीकडे गेली होती ..तर मृणाल तिथेच बसून होती .हृदयात यातना होत्या आणि डोळ्यात अश्रू ..

क्रमशः