एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 24 Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 24

डोळ्यात अश्रू आणि मनात यातना ..प्रज्ञाच्या तोंडून " वैश्या " हा शब्द एकूण जणू कुणी गालावर चपराक लावली अस तिला जाणवू लागल ..अशी चपराक जिने गालावर वळ तर आले नव्हते पण हृदयात मात्र ती खोलवर शिरली होती ..मृणालच्या अश्रूंनी देखील आता तिची साथ सोडायला सुरुवात केली ..दररोज डोळ्याबाहेर येऊन ते देखील कंटाळले होते ..आणि मृणाल मूर्तीसारखी सोफ्यावर बसली ..तिच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता ..

इशक की बाजी का भी
बडा अजीब असर है
हम आये थे सब को सवारने
पर हमीने सब को उजाडा है

मृणाल अशा जागी होती जिथे तिला समजून घेण्याऐवजी सर्वच तिला आणखीच दुखावू लागले होते आणि ती सर्वांचच एकूण घेऊ लागली ..

आजही अजिंक्य नेहमीप्रमाणे थोडा उशिराच आला होता ..अजिंक्यने दारावर बघितले पण आज मृणाल त्याची वाट पाहत नव्हती ..हॉलमध्ये बघितलं तरी तिचा काहीच पत्ता नव्हता . त्यामुळे बॅग हॉलमध्येच ठेवुन बेडरूमकडे जाऊ लागला ..बेडरूमच दार लोटत तो आत पोहोचला ..आज कधी नव्हे तो बेडरूमचा लाइट बंद होता ..अजिंक्यने बेडरूमचे लाइट्स सुरू केले आणि त्याला समोर मृणाल दिसली ..मृणाल अंधार करून बेडवर पडून होती आणि अजिंक्य काळजीने म्हणाला , " काय ग मृणाल ? अशी एकटीच का बसली आहेस ? आणि मलाही बाहेरच जेवण करायला सांगितलंस ..तब्येत तर ठीक आहे न तुझी ? " आणि मृणाल हलक्या स्वरात म्हणाली , " काही नाही रे !! डोकं दुखत होत ना तर हा प्रकाश नकोसा झाला होता म्हणून अंधारातच बसले होते ..तू जा आधी फ्रेश हो मग निवांत पड .." अजिंक्यला नेहमीच तिच्या मनातलं कळत होतं आणि हे मृणाललाही चांगल्याने माहिती असल्याने तिने शक्यतो कमी शब्दात आपलं बोलणं पूर्ण केलं आणि शक्य तितका भावनांवर ताबा ठेवला ..मनात यातना असताना चेहऱ्यावर हसू आणण कितपत कठीण असत हे तिला जाणवू लागल ..आज तिच्या मनावर असा आघात झाला झाला होता की ती अजिंक्यलाही काहीच सांगू शकत नव्हती आणि म्हणूनच तिने स्वतःला कसतरी आवरून घेतलं ..अजिंक्य फ्रेश होत बेडवर येऊन पडला आणि मृणालला स्वतःच्या भावना सांभाळणं कठीण होऊन बसलं ...तिला रडायचं होत पण अश्रूंनी साथ सोडली होती त्यामुळे तिने अजिंक्यला अलगद मिठी मारली ..अश्रू नक्कीच होते फक्त तिने ते डोळ्यांत येऊ दिले नव्हते...अजिंक्यनेही आपली मिठी सैल केली आणि अजिंक्य तिला कवटाळून झोपी गेला ..तर मृणाल आयुष्यातल्या सर्वात कटू आठवणी घेऊन रात्रभर जागत होती ..स्वतःची चुकी नसताना इतरांच्या नजरेत पडणं तिने मंजूर केल होत पण ती आज स्वतःच्याच परछाईच्या ( प्रज्ञाच्या ) नजरेत पडल्याने तिला हे जीवन नकोस वाटू लागलं ..पण समोर जीवापाड प्रेम करणाऱ्या साथीदाराला जेव्हा ती न्याहाळू लागली तेव्हा मात्र तिने आपला विचार बदलला..हो पण प्रज्ञाने म्हटलेला " वैश्या " हा शब्द सदैव तिच्या स्मरणात राहून तिला त्रास देणार होता ..

दुसरा दिवस उजाळला ..मृणाल जणू काही झालंच नाही असं मानून दोघांसाठीही स्वयंपाक बनवू लागली होती ..प्रज्ञा घरी परतली आणि शाळेला जाण्याची तयारी करू लागली ..अजिंक्यशी बोलताना प्रज्ञा फारच खुश होती आणि हसून हसून दोघेही बोलत होते ..आपली मुलगी आता छान आहे म्हणून तिलाही मनातून बर वाटल ..अजिंक्य प्रज्ञा दोघेही तयारी करून नाश्ता करायला बसले आणि मृणाल त्यांना वाढू लागली ..मृणालला वाटत होतं तसा प्रज्ञाचा राग गेला नव्हता ..तिने वाढायला घेतलं तेव्हा अजिंक्य समोर होता आणि त्याला सर्व कळू नये म्हणून ती शांत बसली होती पण प्रज्ञाच मृणालकडे लक्ष दिलं आणि प्रज्ञाची ती नजर मात्र मृणालला सर्व काही सांगून गेली होती ..नाश्ता आटोपला आणि दोघेही आपले टिफिन घेऊन बाहेर निघाले ..अजिंक्य आज तिला शाळेला सोडणार असल्याने ती कारकडे वळाली ..तरं मृणाल दारावर उभी राहून तिच्या एका स्माईलची वाट पाहू लागली ..प्रज्ञाची मृणालशी नजर भेटली आणि जणू आपण काही पाहिलंच नाही या वेशात ती वडिलांसोबत शाळेला निघाली ..ते दोघेही गेले होते तर मृणाल आताही दारावरच होती ...बाहेरच आई - बाबा उभे होते आणि मृणालची त्यांच्याशी नजर मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर खूप सुंदर हसू आलं ..मृणालला कळून चुकलं की प्रज्ञाने त्यांना सर्व काही सांगितलं होतं आणि म्हणूनच ते आपल्यावर हसत आहेत ..तिनेही खिन्न मनाने आपल्या ओठांवर हसू आनल आणि घरात पोहोचली ..मृणालच्या यातना इथेही कुणीच समजू शकल नाही आणि आता तर तिने त्या समजावण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही ..ती कालच्या प्रसंगाने हलून गेली होती आणि स्वतःला दगड बनवून घेऊ लागली ..जिला काहीही बोला ती फक्त ऐकणार होती ..तिने ना कुणाला उत्तर द्यायचं होत ना नजर मिळवायची होती फक्त सर्व काही मुकाट्याने सहन करायचं होतं ..मृणालला हाही प्रसंग कधी फेस करावा लागेल अस वाटल नव्हतं पण जिथे समजदार लोकांनीच आपल्या समजदारीचा पुरावा दिला होता त्यात प्रज्ञाने अस वागणं तिने समजून घेतलं फक्त या सर्वात सर्वच विसरून गेले की मृणाललाही भावना आहेत आणि तिला शिक्षा कशाची मिळते आहे ..प्रेम करण्याची इतकी मोठी शिक्षा ?

प्रज्ञा शाळेत पोहोचली तेव्हाही तिचा मूड फारच ऑफ होता ..सलील तिला भेटायला लवकर आल्यावरही तिने त्याच्याकडे लक्ष दिलं नव्हतं ..तर आपल्याच विचारात ती हरवली होती..एवढंच काय तिने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नव्हतं..सलीलला काय समजायचं समजलं आणि तो स्वतःच समोर जाऊन तिच्यासाठी गाणं म्हणू लागलं ..सलीलच गाणं म्हणजे प्रज्ञाचा जीव की प्राण ..आणि त्यानी गायला तोंड उघडल की त्याच्यात हरवून जायची आणि आजही तसच झालं ..त्याने गायला सुरुवात करताच तो शोधत असलेली ती स्माईल त्याला सापडली ..गाणं संपताच प्रज्ञा पैंजनाचा छन - छन आवाज करीत त्याच्यासमोरून बाहेर निघाली ..तोही काही मिनिट तिथेच थांबून तिच्या मागे - मागे कँटीनला पोहोचला ..प्रज्ञा एका कोपऱ्यात निवांत बसली होती आणि सलील तिच्याजवळ जात म्हणाला , " आज मूड का खराब होता तुझा ? मला तुला अस पाहणं अजिबात आवडत नाही ..तुला माहिती आहे न ? " आणि प्रज्ञा हसत म्हणाली , " काही नाही रे आईशी थोडं भांडण झाल आणि तस पण तू आहेस की मला सावरायला , हसवायला ..तू असताना मला कसली काळजी ..शेवटी सर्वात सुंदर मुलाची प्रेयसी आहे मी .." तिच्या अशा बोलण्यावर दोघेही हसू लागले ..त्यांच्या नजरा एकमेकांना येऊन भेटल्या आणि नकळत पुन्हा प्रेमाची ते उत्तुंग क्षण ते जगू लागले..दोघेही एकमेकात हरवले असताना शाळेची बेल वाजली आणि स्वतावरच हसत ते पुन्हा वर्गात पोहोचले..तिला त्याने अस सावरन , तिची काळजी घेणं हे तिला फारच आवडलं होत आणि वर्ग सुरू असतानाही ती त्याच्याकडेच पाहू लागली ..इतकं की क्षणा क्षणाला तिला त्याचाच चेहरा पाहावसा वाटत होता ..
प्रज्ञाच आयुष्य आता वेगळ्याच वळणावर पोहोचलं होत ..सलील तीच सर्वस्व बनत गेला ..तो आनंदात असला की प्रज्ञाचा चेहराही प्रफुल्लित राहायचा आणि तो नाराज असला की मात्र तिच्या डोळ्यात नकळत अश्रू यायचे ..प्रेमही फार सुंदर भावना असते ..जगातले स्वार्थी लोकही प्रेमाचे क्षण जगताना स्वतःला बदलून घेतात ..त्यात प्रज्ञाला सलीलच्या रूपाने एक मित्र , प्रियकर सर्वच सापडलं होत त्यामुळे ती त्याच्याबद्दल पजेसीव होऊ लागली ...तिला त्याच्यावर हक्क गाजवण्यात देखील मज्जा येऊ लागली ..सलील मुलींच्या घोडक्यात असला की मग मात्र तिचा राग पाहण्यासारखा असायचा आणि त्यावेळी त्यालाही तिला समजावण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागायचे ..मृणालच्या आयुष्यात जी जागा अजिंक्यने घेतली होती तीच जागा सलील प्रज्ञाच्या आयुष्यात घेऊ लागला होता फक्त अजिंक्यसारख वागणं त्याला जमत का हे वेळच सांगणार होती ..

तर इकडे मृणालच आयुष्यही वेगळ्या वळणावर होत ..ती स्वतःलाच दोषी मानू लागली ..प्रज्ञाने मृणालला रागात बरच काही सुनावलं होत आणि त्यानंतर तर मृणालशी फटकूनच वागत असे ..एवढंच काय तर मागील काही दिवसात तिच्याशी बोलली सुद्धा नव्हती ..शाळेतून परत आली की सरळ आजीकडे गेल्यावर प्रज्ञा झोपायच्या वेळेलाच घरी यायची त्यामुळे ती अजिंक्यशीच संवाद साधत असे ..हे सर्व अजिंक्यला दिसत होतं पण तो काहीच बोलला नाही ..मृणालची चूक नसतानाही प्रज्ञा तिला बरच काही बोलली होती परंतु मृणालने ते मनात ठेवलं नव्हतं आणि ती स्वतःहून प्रज्ञाशी बोलण्याचा प्रयत्न करीत असे..पण व्हायचं अगदी उलट ..प्रज्ञा मृणालशी न बोलताच निघून जाई आणि मृणालचे घाव उफाळून वर येऊ लागले ..मृणाल तरीही शांतच राहत होती ..जणू तिच्या सहनशक्तीला कुठेच अंत नव्हता ..ती या सर्वात स्वतःलाच दोषी मानत असल्याने प्रज्ञा कसही वागली तरी अपमानाचे घोट पिऊन ती पून्हा एकदा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागायची पण परिस्थिती कुठेच बदलली नव्हती .

तर दुसरीकडे प्रज्ञाच जीवन फार सुंदर चाललं होतं ..सलील तिला एक दिवस तरी फिरायला बाहेर घेऊन जात असे आणि ती मनमोकळेपणाने वागू लागली ..हे बघून तिची आजी फारच खुश राहू लागली पण तिने कधीच प्रज्ञाला याच कारण विचारलं नव्हतं ..प्रज्ञा एका स्वप्नमय जीवनाचा भाग झाली ..अस स्वप्न जे तिच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नव्हत ..मृणाल आणि प्रज्ञाचे वाद सुरूच होते पण मृणालचे प्रामाणिक प्रयत्न पाहून तिच्या मनालाही पाझर फुटायला सुरवात झाली आणि ती हळूहळू मृणालला समजून घेण्याचा प्रयत्न करू लागली ..मागील काही दिवस शब्दही न बोलणारी ती आता थोडं फार बोलू लागली ..अगदी मोजकेच शब्द होते पण ती बोलू लागल्याने मृणाललाही थोडा आनंद होऊ लागला ..शिवाय मृणालने सलीलला तिच्यासोबत पाहिल्याने ती याबद्दल अजिंक्यला सांगण्याची दाट शक्यता होती कदाचित म्हणून का असेना ती थोडंफार तिच्याशी बोलू लागली होती ..पण प्रज्ञाच्या मनातील भीतीने मात्र तिची साथ सोडली नव्हती ..

आतापर्यंत तरी सर्व काही ठीक होत पण नियती आपला खेळ खेळल्याशिवाय थांबणार नव्हती ..मृणालमुळे जसा तिच्या आयुष्यावर परिणाम घडून आला होता तसाच परिणाम तिच्या प्रेमावर पडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आणि इकडे सलील प्रज्ञाचा जीव बनत चालला होता आणि ती त्याबद्दल सदैव जागरूक राहत होती ..पण जेव्हा सलीलला मृणालच सत्य समजेल आणि तो फक्त मृणालमुळे तिच्या आयुष्यातून दूर झाला तर मात्र काय होऊ शकत याची कुणी कल्पनासुद्धा करणं शक्य नव्हतं आणि हा विचार प्रज्ञाला मनातून तोडू लागला ..ती प्रेमात वेडी झाली होती आणि सलीलला गमवायचही नव्हतं तेव्हा या स्थितीत ती काय वागणार होती हे फक्त आणि फक्त नियतीने ठरवायचं होत..सलील जर अजिंक्य सारख वागला असता तर कदाचित हे सर्व इथे थांबलं असत आणि प्रत्येकाच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली असती आणि तसा तो वागला नसता तर ? त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त वेळच देणार होती ..


क्रमशः .....