एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 33 - अंतिम भाग Siddharth द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 33 - अंतिम भाग

( कथेचा आजचा भाग मोठा आहे त्यामुळे कंटाळून शब्द सोडून देऊ नका ..मी कालपासून इतकं टाइप केलं आहे याचं भान नक्की राखा ..आणि मी आनंदाने सांगेल की या भागाच्या प्रत्येक शब्दात तुम्हाला काहीतरी नक्कीच मिळेल तेव्हा आज कंटाळा बाजूला ठेवा आणि मनमोकळं वाचा ..)

मृणाल खडबडून जागी झाली आणि अजिंक्यच्या शब्दाने तीच डोकं जड होऊ लागलं ...आतापर्यंत तिच्या डोक्यात बराच गोंधळ निर्माण झाला होता पण अजिंक्यच्या शब्दांनी तिचा सर्व गोंधळ दूर केला आणि ती पोहोचली नकळत तिच्याच भूतकाळात .....ती मनातच विचार करू लागली की माझी काहीही चूक नसताना जेव्हा मला माझी आई सोडून गेली तेव्हा बाबांनी माझ्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मला वैश्या बनाव लागलं आणि जर हीच वेळ माझ्या मुलीवर आणि तीच्या मुलीवर आली तर ? ..नाही नाही...मी असं नाही होऊ देणार.... जगात सर्वात सुंदर नात म्हणजे आई ..ती त्यागमूर्ती ..जर मुलांना तीच स्वीकारणार नाही तर ती हिम्मत दुसरं दाखवणार तरी कोण ? अजिंक्य निर्माण नक्कीच होतील पण अजिंक्य घडवायचे असेल तर आधी मृणालनेही समाजाशी लढण्याची हिम्मत दाखवावी लागेल ..अजिंक्यच्या शब्दांनी मृणालला स्वतःची चूक लक्षात आली आणि तिला आपण केव्हा प्रज्ञाकडे जातो अस झालं ..ती वाट पाहू लागली सूर्यप्रकाशाची ..कारण आजचा हा सूर्यप्रकाश नव्याने सर्वांच्या जीवनात आनंद आणणार होता ..मग सोबत असणारे आणि देवा घरी जाणारे सर्वच या एका निर्णयाने जोडले जाणार होते ..त्यामुळे वाट होती ती नवचैतन्य देणाऱ्या त्या सूर्यप्रकाशाची ...

मृणाल सूर्य उगवताच एअरपोर्टवर पोहोचली ..तिथे गेल्यावर तिला कळलं की सकाळी 9 ची फ्लाइट आहे .ती तिकीट काढून तिथेच बसून राहिली ...एक एक फ्लाइटचा पुकारा होऊ लागला आणि तिच्या मनात धडकी भरू लागली ..तिला आता एक क्षण देखील तिथे थांबायचं नव्हतं आणि वेळ होती की तिची परीक्षा घेतल्याशिवाय सोडणार नव्हती ...शेवटी नागपूर फ्लाइटचा पुकारा झाला आणि ती विमानात जाऊन बसली ... नागपूरला पोहचायला अजून कमीत कमी दीड तास तिला वाट पाहावी लागणार होती....फ्लाईट मध्ये बसल्यावर एक एक क्षण तिला युगासारखा भासत होता...तोही प्रवास तिने सर केला आणि नागपूरला पोहोचली .. नागपूरला फोहोचली असली तरीही गावाला जाण्यासाठी आणखी 3 तास लागणार होते त्यामुळे आता तिला बसचा प्रवासही करावा लागणार होता....तिला राहून राहून एकच प्रश्न पडत होता ..आपण फार उशीर तर केला नाही ना ? ..एकीकडे भीती होती तर दुसरीकडे आशा पण भीती आशेवर सतत मात करित होती ..भीतीने डोकं वर काढायला सुरुवात केली की ती स्वतालाच समजवायची की नाही नाही असं काहीच झालं नसेल ..आता हे तीन तास देखिल तिला वर्षासारखे वाटू लागले होते ..ती आपल्या सर्व भावनांवर आवर घालून प्रवास करत होती...प्रज्ञाच काही बर वाईट तर झाल नसेल ना या विचारनेच तिचे हात-पाय थरथर कापत होते.... कुणाला कळू नये म्हणून तिने ते साडीत लपवून घेतले.... ती प्रवासात स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिला मनातल्या भीतीला आवर घालणं शक्य होत नव्हतं ..रियाला फोन करून मृणालने सलीलच्या घराचा पत्ता आधीच काढला होता आणि सुरजलाही बस स्टॉप वर यायला सांगितले होते...... रिया ऑफिसला असल्याने ती त्यांना सायंकाळी भेटणार होती ..तीन तासाचा लांबलचक प्रवास करून मृणाल शेवटी पोहोचलीच ..बस स्टॉप वर सुरज तिची वाट पाहतच होता ..सुरजला पाहताच ती सरळ त्याच्या गाडीवर जाऊन बसली आणि सुरज भरवेगाणे गाडी चालवू लागला ..तिने सुरजला सलीलचा पत्ता सांगितला आणि सुरजही लवकरात लवकर तिथे पोहचण्यासाठी आतुर झाला होता...त्यात ट्राफिकही त्यांना त्रास देत होती ..शेवटी कसेतरी ते सलीलच्या घरासमोर पोहोचले ..सुरज गाडी बाजूला लावणारच तेवढ्यात मृणाल गाडीवरून उतरून त्याच्या दारासमोर पोहोचली होती आणि जोराजोराने दार वाजवू लागली ..दार उघडल्या गेलं तेव्हा सलील समोर होता .सुदैवाने आज सलील घरीच होता ..त्याला पाहताच तिला स्वतःला आवरण कठीण झालं आणि ती म्हणाली , " सलील प्रज्ञाला कुठे हाकलल तू ? " त्याने मृणालला कधी बघितलं नव्हतं त्यामुळे तो तिला उलट विचारू लागला , " त्याच्याशी आपला काय संबंध ? आपण आहात तरी कोण ? " आणि मृणाल म्हणाली , " मी मृणाल ....प्रज्ञाची आई ? " आणि सलीलच्या तोंडून एकच शब्द निघाला , " ओ वैश्या !!! "

सलीलच्या तोंडून हा अप्रिय शब्द बाहेर येताच बाजूला असलेल्या सुरजचा पारा अधिकच चढला आणि तो त्याच्यावर हात उचलण्यासाठी समोर झाला पण मृणालने स्थिती सावरुन घेतली आणि सुरज शांत झाला .... मृणाल पुन्हा नम्रतेने म्हणाली , " हो वैश्याच !! मला आधी सांग माझी मुलगी कुठे आहे ? " आणि सलील हसत उत्तरला , " वैश्येची मुलगी ना गेली असेल धंदा करायला .." आता मात्र स्वतः मृणालनेच त्याच्या कानाखाली आवाज काढला ..सलील तिच्यावर हात उचलणार आणि सुरजने मधात पडून त्याचा हात रोखला ..तो आणखी त्याला मारणार होता पण मृणालने नकार दिल्याने तो शांत बसला ..त्यांना कळून चुकलं की ह्याला काहीच माहिती नाही म्हणून ते परत निघाले ..सलीलच्या कानफटावर बसल्याने तो जोरा जोराने ओरडू लागला , " साली तू ही वैश्या आणि तुझी मुलगीही वैश्या ..जस तू आपल्या नवऱ्याला आईबाबापासून तोडलं तसच ती मलाही तोडू पाहत होती पण मी थोडीच ऐकणार होतो.... तिच्या बापाने एका वैश्यासाठी सगळ्यांना सोडून जी चुक केली ती मी करणार नाही...म्हणून दिल सालीला घराबाहेर फेकून...."

त्याचे शब्द मृणालच्या कानावर पडले आणि ती रागाने पुन्हा सलीलच्या जवळ जाऊ लागली.... त्याला काही कळण्याच्या आतच पुन्हा त्याच्या कानाखाली जाळ काढला... आणि अतिशय रागाने म्हणाली, "खबरदार.. माझ्या नवऱ्याबद्दल आणि आता माझ्या मुलीबद्दल एक ही वाईट शब्द तुझ्या तोंडातून निघाला तर तू लक्षात ठेव...तुझा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही मी ....तू होतोस कोण तिच्या वडिलांनी चुक केलं की बरोबर हे ठरवणारा... .तू जज करणार तिच्या वडिलांना.... तुझी लायकी तरी आहे का रे....अजिक्यच्या पायाची धूळसुद्धा नाहीस तू....मला आणि माझ्या मुलीला वैश्या म्हणालास ना, जा जरा आरशात स्वतःला जाऊन बघ.....तू तर आमच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहेस....जिच्यावर प्रेम करत होतास, जिच्या सोबत लग्न झाल..जी तुझ्या मुलीची आई आहे... तिलाच घराच्या बाहेर काढलस.....तू एक चांगला नवराही बनू शकला नाहीस आणि चांगला बापही तुला बनता आलं नाही.... माझ्या प्रज्ञाच काही बर वाईट झालं ना तर बघच ही वैश्या तुझं काय करेल ते...." सलील गाल चोळत तीच ऐकत होता.... मृणालचे डोळे रागाने लाल झाले होते... सुरज तीच ते रूप पाहून अवाक होता....ती पुन्हा गाडीत येऊन बसली आणि दोघेही तिथून निघाले....

प्रज्ञाला शोधण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने त्यांना आधी पोलीस तक्रार करावी लागणार होती आणि म्हणूनच ते सरळ पोलीस स्टेंशनला गेले ..तिथे तक्रार नोंदविल्यावरही मृणाल शांत बसली नाही ..आपल्या परीने होईल तितके ती प्रयत्न करणार होती ..तिने तिच्या सर्व मित्राना फोन करून विचारले होते पण तिच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नव्हती ..सुरज मृणाल प्रत्येक चौकात , गल्लीत तिला शोधत होते पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही ..मृणाल इतकी घाबरली होती की रस्ता न रस्ता ती खणून काढू लागली ..रस्त्यावरएखादी मुलगी छोट्या मुलीला घेऊन दिसली की मृणाल धावतच तिच्याकडे जायची पण पाहिल्यावर जाणवायचं की समोर ती नसायचीच ..पुन्हा निराश होऊन ती आपल्या कामाला लागायची..मृणाल आज स्वतःला हतबल समजू लागली होती ..तिचे अथक प्रयत्नही आज तिला आपल्या मुलीजवळ नेण्यास कामी पडत नव्हते ..दुपारची सायंकाळ झाली होती ...रियाही सायंकाळी सोबत आली होती पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही ..शेवटी रात्र होऊ लागली आणि सुरजने मृणालला घरी चलण्याची विनंती केली ..तीच मन तर मानत नव्हतं पण तिलाही त्याला नकार देता आला नाही ...ते दोघेही रात्री घरी पोहोचले तेव्हा सुरजने तिच्यासमोर जेवणाच ताट धरलं ..पण मृणालची मात्र काहीही खायची इच्छा नव्हती ...सुरजने तिला धीर दिला आणि तिने कसेतरी दोन घास पोटात ढकलले..जेवण झाल्यावर मृणाल सुरजला म्हणाली , " सुरज प्रज्ञा इथे कधी आली होती ? " आणि सुरज उत्तरला , " हो वहिनी आली होती पण त्यावेळी घरी कुणीच नव्हते ..मला काही दिवसाने मित्राकडून कळलं की ती इथे आली होती आणि घराच्या दारासमोर बसून रडत होती ..बहुतेक दादासाठी रडत होती .." सुरजने उत्तर दिलं आणि मृणाल शांत झाली ..सुरजने पाण्याची बॉटल जवळ दिली आणि तो झोपायला निघाला पण मृणाल आज काही झोपणार नव्हती .तिच्या डोक्यात सतत प्रश्न पडत होते ..मी खूप मोठी शिक्षा तर दिली नाही ना प्रज्ञाला ? मुलगी म्हणून ती चुकली असेलही पण आई म्हणून माझं काहीच कर्तव्य नव्हतं का ? माझ्यामुळे तर तिने हे सर्व भोगलं होत आणि तोच राग तिने आमच्यावर काढला ...मला अजिंक्य भेटल्यावर जशी मी स्वार्थी झाले आणि मुंबई सोडून आले तसच प्रज्ञाला सलील भेटला आणि ती पण स्वार्थी झाली मग आमच्यात नेमकं बरोबर कोण ? ...देवा मी हे काय करायला निघाले होते ..आणि तिला काही झालं तर मी काय करू? प्लिज देवा तिला काहीच नको होऊ देऊ ..मृणाल कितीतरी वेळ विचारात हरवली होती आणि पहाटे पहाटे तिला झोप लागली ..सकाळी सुरज तिला उठवायला आल्यावर तिला जाग आली आणि अंगावर पाणी घेऊन ते दोघेही पुन्हा तिच्या शोधात निघाले ..काल सोडलेले सर्व ठिकाण आज ते पुन्हा डोळ्याखालून काढू लागले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही .परिस्थिती जैसेथेच होती ...एक पर्याय म्हणून ती पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेली पण तिथूनही नकारच आला होता ..मृणाल भर उन्हात अनवाणी पायाने फिरत होती ना तिला होश होता ना कुणाचं भान ..ती फक्त चालत होती आणि आपल्या मुलीसमोर तिला दुसरं काहीच सुचत नव्हतं ...ती कधीतरी चालता चालता दमायची आणि दमली की रस्त्याच्या बाजूला कोपरा पाहून बसायची.. पुन्हा प्रज्ञाचा विचार मनात आला की मग मात्र चालु लागायची ....सकाळची सायंकाळ झाली होती पण तिचा काहीच पत्ता लागला नव्हता ..आणि मृणालची भीती आणखीच डोकं वर काढू लागली ..ती शोधून शोधून त्रासली होती आणि आता तिच्याकडे एकच पर्याय उरला तो म्हणजे देव ..ती क्षणाचाही विलंब न करता जवळच असलेल्या मंदिरात पोहोचली ..तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि खाली गुडघ्यावर टेकत ती म्हणाली , " देवा मी चुकले पण माझी शिक्षा तिला नको देऊस..तिच्याविना आहे तरी रे कोण माझं या जगात ? ..मी आजपर्यंत माझ्यासाठी तुला काहीच मागितलं नाही पण आज मागते आहे मला फक्त माझी मुलगी दे ..त्यावर उभ्या आयुष्यात मी तुला काहीच मागणार नाही ..प्लिज देवा मला फक्त तिला एकदा भेटवून दे .." सायंकाळची वेळ असल्याने मंदिराबाहेर भिकार्याची बरीच गर्दी जमली होती ..मृणाल अश्रू भरलेले डोळे घेऊन बाहेर परतली ..सुरजनेही नारळ फोडून मृणालच्या हातात वाटायला दिले आणि मृणाल शुद्ध अंतःकरणाने ती सर्वाना वाटू लागली ..प्रसाद वाटता वाटता ती समोर पोहोचली ..तिथे एक मुलगी खाली बसून आपल्या छोट्याश्या मुलीशी बोलत होती ..आपली छोटीशी मुलगी रडते आहे हे पाहून तिला फार त्रास होत होता आणि आपल्यालाही कुणीतरी काही खायला देईल अस ती आपल्या मुलीला समजावत होती ..त्या मुलीच मृणालकडे लक्ष नव्हते आणि ती तिच्या विरुद्ध बाजूने चेहरा करून उभी होती ..पण मृणालच मात्र तिच्याकडे लक्ष होत..त्या मुलीचा सलवार फाटला असल्याने आजूबाजूला उभे असणारे सर्व पुरुष मंडळी तिच्याकडेच पाहत होती..तर मृणाल त्यांच्या मधात येऊन उभी राहिली.. त्या मुलीची अशी अवस्था पाहून मृणालला तिची फार कीव आली आणि 500 ची नोट काढून ती तिला देऊ लागली..नेमकी त्याच वेळी तिची आणि मृणालची नजरानजर झाली ..आणि दोघीही एकमेकीकडे बघत राहिल्या ..ती दुसरी तिसरी कुणी नाही तर प्रज्ञाच होती ..आपल्या आईला समोर बघून तिला राहवलं नाही आणि सरळ तिने मृणालला मिठी मारली ..मिठी मारताच मृणालच्या हातातली प्रसादाची थाळ खाली पडली .मृणालनेही तिला अगदी मिठीत घट्ट घेतले ..दोघीही एकमेकांकडे बघून अश्रू गाळत होत्या ... प्रसादाच्या थाळीच्या आवाजाणे सुरज तिथे येऊन पोहोचला होता ..सुरजला प्रज्ञाला अस पाहुन अश्रू आवरता आले नाही आणि डोळे पुसतच स्वतःच्या अंगावरच जॅकेट काढून त्याने तिच्या अंगावर चढवला ...मृणालने आपल्या नातीला हातात घेतले .. पहिल्यादाच ती आपल्या नातीला पाहत होती .अगदी घरदार डोळे आणि तिच्यासारखीच दिसत असल्याने मृणाल क्षणभर तिच्याकडे पाहतच होती ..पण बिचारीला बरेच दिवस हवं तितकं दूध न मिळाल्याने फारच कोमेजली होती .. त्याच वेळी मृणालला पाहून तिने अगदी गोड हसू दिल आणि मृणालचे अश्रू अगदी हवेत विरून गेले ..प्रज्ञाला पाहून अस जाणवत होतं की तीने बऱ्याच दिवसांपासून जेवण केलं नव्हतं... म्हणूनच मृणाल आधी त्यांना हॉटेलला घेऊन गेली ..प्रज्ञा अगदी जेवणावर तुटून पडली आहे हे लक्षात येताच तिला आपले दिवस आठवले कदाचित त्यावेळी मृणाललाही आसरा मिळाला असता तर तिला वैश्या बनाव लागलं नसत हे तिच्या लक्षात आलं नि आपसूकच डोळ्यातून अश्रू बाहेर आले ..तिला अजिंक्यचे पून्हा शब्द आठवले आणि त्याच म्हणणं पटलं की एखाद्या स्त्रीला वाचविण्यासाठी प्रत्येकदा अजिंक्यचीच गरज नसते तर कधीकधी मृणाल देखील दुसऱ्या मृणालचा जीव वाचवू शकते ..त्यामुळे आज कुणाचा तरी जीव वाचविल्याच समाधान तिच्या चेहऱ्यावर जाणवत होतं ..प्रज्ञाचा अवतार फार ठीक नसल्याने आधी मृणालने तिला कपडे घेऊन दिले ..इथल्या लोकांनी त्या दोघांनाही बराच त्रास दिला होता आणि आता तो त्रास तिला क्षणभरही आपल्या मुलीला होऊ द्यायचा नव्हता त्यामुळ ेतिने सुरजचे आभार मानून त्याच रात्री गाव नेहमीसाठी सोडले ..आणि वसली पुन्हा मुंबई शहरात ..जिथे प्रत्येक व्यक्तीच स्वप्न पूर्ण होत ..आणि याच आशेने की ईथे तरी स्त्रीला स्त्री समजल्या जाईल ...

आज हा किस्सा घडून सात - आठ वर्षे झाले आहेत ...सुरवातीला प्रज्ञावर सर्व नाराज होते पण मृणालने सर्वांची समजूत काढल्यामुळे त्या सर्वांनी तिला माफ केले ..सुरुवातीला अवघडलेली प्रज्ञा आता मोकळेपणाने वागू लागली आहे ..अजिंक्य जाण्याच ब्लेम ती नाकारू शकत नाही पण मृणालच्या कामात मदत करून आज ती कितीतरी अजिंक्यला उभं करू पाहत आहे आणि हाच कदाचित योग्य न्याय आहे ..शिक्षा ही प्रत्येक वेळेला योग्य नसते कधी कधी एक योग्य संधीही माणसाला जीवनाचा खरा अर्थ शिकवून जाते ..हीच संधी कधीतरी अजिंक्यने मृणालला दिली होती आणि आता मृणालने प्रज्ञाला दिली ..कदाचित म्हणूनच म्हणतात " सब कुछ हारकर जितने वाले को ही बाजीगर केहते है .."

सायंकाळची वेळ होती ..प्रज्ञाची मुलगी विदिशा आपल्या आजोबांच्या फोटोकडे पाहत बोबड्या शब्दात म्हणाली , " आजी , आजोबा किती मस्त दिसतात ना !!..मला पण असाच एक अजिंक्य हवाय ..तो येईल न ग माझ्या आयुष्यात ? ", आणि मृणाल उत्तरली , " जेव्हा जेव्हा एखादी मृणाल त्रासात असेल तेव्हा नक्कीच अजिंक्य आपल्यात येईल ..येईल तुझ्याही आयुष्यात प्रेमाचा अर्थ शिकवायला ..आयुष्य नकोस असलेल्या मुलीला जीवन जगण शिकवायला ..येईल तो फक्त वाट बघ .."

विदिशा उड्या मारत आपल्या आईकडे गेली आणि मृणाल अजिंक्यच्या फोटो हातात घेत टेरिसवर पोहोचली .तिचे डोळे पणावले होतेे आणि फोटो हृदयाला लावत ती म्हणाली , " खरच अजिंक्य पुन्हा परत ये आपल्या नातीच्या आयुष्यात !! ..आज तुझ्यासारख्या लोकांची या समाजाला फारच गरज आहे तेव्हा लवकर ये ..तुझ्याविना मीही अपूर्णच आहे ..या आयुष्यात तर आता आपली भेट होणार नाही पण पुढच्या जन्मी नक्की भेटू ..मी वाट पाहीन हा !! तेव्हा जास्त उशीर नको करू ...

संगती निळे आकाश
बेभान झाला हा वारा
वाहतो दिशा दिशात
एकवटून प्राण सारा

कुठून येतो हा वारा
बोचतो का हा जीवाला
मुक्या हृदयाचे मुके बोल हे
का टोचते हृदयास ?

हृदयाला ?
कळत नाही कसे
जवळचे होतात दूर
जुने शब्दच सुने होऊन
होतात कसे बेसूर ?

तुझ्याच हृदयाला
हाल माझे कळतात
का तरी सावल्या वेड्या
मनाला माझ्या छडतात ?

तुझविन करूणा ही
कोण जानणार माझी
रात्रंदिवस सख्या रे
मी वाट पाहिलं तुझी
वाट पाहिलं तुझी ..


अजिंक्य प्लिज ये ना एकदा परत ..फक्त माझ्यासाठी ..प्लिज ये ना !! प्लिज ..आता नाही राहवत रे तुझ्याविना !!!



************


कथा वाचून झाली आणि माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते ..असे बरेच प्रश्न होते ज्यांनी मनात गोंधळ घालायला सुरूवात केली . मृणाल , अजिंक्य , प्रज्ञा अस प्रत्येक पात्र अगदि समोर असल्याचं भासत होत ...दार लावून एकटीच पुस्तक वाचत असल्याने ती रूमदेखील आता मला खायला उठली होती आणि रूममधील शांतता नकोशी होऊ लागली ..मी ( स्नेहा ) पुस्तक पुन्हा जपून ड्रॉवरमध्ये ठेवून , डोळ्यातील अश्रू पुसत बाहेर जाण्यासाठी धडपडू लागले.. दार उघडलंच असेल की मला समोर आई( श्रेयसी ) दिसली...मला माझ्याच भावनांना आवर घालणं शक्य झालं नाही आणि अगदी धावतच तिला मिठी मारली ..आई काहीच बोलत नव्हती ..ती फक्त माझ्या केसांवरून हात फिरवत होती आणि स्वतःला सावरत मीच म्हणाले , " आई , बाबा कुठे आहे ग ? मला त्यांना भेटायचं आहे , याचक्षणी ? " आईने एक शब्दही न बोलता समोर बोट दाखवलं ..समोर पाहत होते तर बाबा (प्रेम )लहान मुलांसोबत खेळत होते ...त्यांना बघताच मी त्यांच्याकडे धावत गेले आणि अगदी मिठी मारत म्हणाले , " बाबा आय लव्ह यु ..खूप खूप मिस केलं मी तुम्हाला ..!! पण तुम्ही केव्हा आलात मला काही सांगितलं नाही ? " आणि बाबा मला म्हणाले , " लव्ह यु टू पिल्लू !!! खूप वेळ झाला येऊन पण तू पुस्तक वाचण्यात व्यस्त होती ना म्हणून त्रास दिला नाही .तोपर्यंत बसलो खेळत यांच्यासोबत ..म्हटलं बघूया तरी नवीन प्रेम कसा दिसतो ..? " बाबांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत मी त्यांचा आणि आईचा हात धरून त्यांना रूममध्ये खेचून आणलं ..आम्हाला कुणीच त्रास देऊ नये म्हणून आतून दार लावत म्हणाले , " बाबा मी तुम्हाला नेहमीच एक प्रश्न विचारत आले आहे पण तुम्ही नेहमी म्हणाला की तू पुस्तक लिहिल्यावर सांगेल .सो आता ती वेळ आली आहे ..मला सांगा आपल्या तिघांनाही माहीत आहें की ही खरी कथा नाही ..मग इतका भन्नाट विषय तुम्हाला सुचला तरी कसा ? प्लिज सांगा न मला राहवत नाही आहे ..प्रत्येकाचं काळीज हेलावून टाकणारी ही कथा तुम्हाला सुचली तरी कशी ? "

बाबा ( प्रेम ) आणि आई ( श्रेयसी ) आताही माझ्याकडे बघून हसत होते ..आणि मला कुशीत घेत ते म्हणाले , " हो हो जरा धीर धर ..नक्कीच आता वेळ आली आहे तुला याबद्दल सर्व काही सांगण्याची ..तुला आठवतंय आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि त्यादिवशी तुझा समीर काकाही आला होता ..त्यादिवशीची ही गोष्ट . श्रेयसी त्यादिवशी फार खुश होती आणि सर्वाना वाटलं की ती समाधानाने झोपी गेली त्यामुळे आम्ही निवांत झोपलो ..पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठली तेव्हा मात्र ती अशांत होती .. प्रेम परत ये, प्रेम परत ये ..तुज्याविना मी जगू शकत नाही असा गोषवारा तिच्या तोंडून ऐकू येत होता ...निशा नि आई बाहेर गेले होते त्यामुळे तिचा आवाज ऐकताच मी धावतच तिच्या बेडरूमध्ये पोहोचलो ...समोर पाहिलं तर तीने ब्लॅंकेटला घट्ट पकडून ठेवलं होतं आणि प्रेम परत ये असा नारा देत होती ..मला त्याक्षणी खूप भीती वाटू लागली ..मी तिला कितीतरी वेळ आवाज देह होतो पण माझ्या आवाजाने ती काही जागी झाली नाही ..तिच्या शरीराला मी हात लावला तेव्हा जाणवलं की तीच शरीर फारच तापलं होत ..तिला त्या अवस्थेत पाहणं मला अगदीच अशक्य झालं होतं ..पण समोरच्याच क्षणी तिला हलवून मी उठायला लावलं ..ती उठली आणि माझ्याकडे अस पाहू लागली जणू तिने भूतच पाहिलं होतं ..तिचे डोळे अगदीच लाल झाले होते आणि हार्ट बिट पण खूपच गतीने सुरू होत्या ..भीतीने तर संपूर्ण चेहराच व्यापला होता ..मी काही रिऍक्ट करणार त्याआधीच तिने मला मिठी मारली आणि ती मिठी इतकी घट्ट होती की मला श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ लागला ..मी तिला पहिल्यांदाच अस बघितलं होत त्यामुळे काय बोलू नि काय नको असं झालं ..तिने वीस मिनिटे मला तरी सोडलं नव्हतं .मी तिच्या केसांवरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो ..तिला नेमक काय झालं आहे याची मला प्रचिती येत नव्हती ..आणि तापही बराच चढला होता त्यामुळे आता तिला काहीही विचारणं योग्य नव्हतं ..काही वेळ मी तिला तसच राहू दिल ..ती शांत झाली आणि त्यानंतर दुपारी तयारी करून मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलों ..

डॉक्टर साहेब कामात होते पण श्रेयसीची अवस्था बघून त्यांनी आम्हाला लगेच बोलवून घेतलं ..डॉक्टरने चेकअप केलं आणि त्यांच्या डोक्यावर चिंतेची रेषा उमटली .त्यांच्या चेऱ्यावरचे ते भाव माझ्याही नजरेने अचूक हेरले पण मी शांत होतो ...त्यांनी नर्सला बोलवून श्रेयसीला बाहेर घेऊन जायला सांगितलं आणि आम्ही दोघे तिथेच थांबलो ..आता डॉक्टर काय बोलतात याकडे अगदी श्वास रोखून मी पाहू लागलो ..डॉक्टरांनीही चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलायला सुरुवात केली ..ते म्हणाले की प्रेम मला वाटत असलेली भीती सार्थक झाली ..मी तुला मागे म्हणालो होतो न की श्रेयसीच्या मनात अस काहीतरी आहे जे तिला कुणाला सांगता येत नाही आहे ..ती भीती तिच्या मनात इतकी फोफावली आहे की ती कुणाशी काहीच व्यक्त करू शकत नाही आहे ...मानसिक तणावामध्ये बऱ्याचदा अस होत की त्यांना वाटत आपल्याला कुणीच समजून घेणार नाही आणि म्हणून ते स्वतःला एकट समजू लागतात ..आणि त्याची परिणीती म्हणजे त्यांचं स्वतःच एक वेगळं विश्व तयार होत ..ते समोरच्या गोष्टी पाहून आपल्या मनात सामावून घेतात आणि आनंदी होऊ लागतात तर कधी कधी समोरच दृश्य बघून त्यांच्या मनात भीती तयार होते आणि ते त्या भीतीखाली प्रत्येक क्षण जगू लागतात .मग कधी अस्तित्त्वात नसणाऱ्या गोष्टीही त्यांना अस्तित्त्वात आहेत असं वाटू लागतं ...श्रेयसीच पण असच काही झालं आहे ..तिने तिची एक वेगळी दुनिया निर्माण केली आहे आणि त्यात ती फक्त एकटीच जगत असते ..मानसिक तणाव असा एक रोग आहे जो वरून दिसत नाही आणि आपल्याला वाटत की ती व्यक्ती अगदी सुदृढ आहे ... पण मुळात तस नसत... आज 15 ते 80 वर्षांपर्यंतच्या वयोगटामध्ये जवळजवळ 80 ते 90 % लोकांना हा आजार आहे ...फक्त काहींचा प्रभाव जास्त आहेत नि काहींचा कमी ..श्रेयसिने आज ती सीमा गाठली आहे ..जर काही दिवस तिने मनातलं व्यक्त केलं नाही तर माझा अंदाज आहे की ती वेडी तरी होईल किंवा मग स्वतःच आत्महत्या तरी करेल .प्रेम एक डॉक्टर म्हणून नाही तर मित्र म्हणून सांगतोय .ती हा त्रास आज एकटीच सहन करत आहे तिने तिच्या मनात काय चालू आहे हे व्यक्त करायला हवं...जेव्हा ती मनातलं व्यक्त करेल तेव्हा त्याचे परिणाम काहीही झाले तरी तू तिच्यासोबत असशीलच आणि तुम्ही मिळून लढू शकता किंवा यावर काहीतरी मार्ग काढू शकता याची मला पूर्ण खात्री आहे....मानसिक तनावामध्ये असताना व्यक्तीला वाटत की त्यांना कुनीच समजून घेणार नाहीत आणि म्हणूनच ते व्यक्त होत नाही ..पण तू अशी चूक नको करू ..तिच्या मनात काहीही असलं तरी तिला समजून घे आणि साथ दे.. ती जर अशीच राहिली तर ती वेडी होईल हे मात्र नक्कीच आणि तू तिला कायमच गमावून बसशील ..तेव्हा बघ विचार कर की तुला काय करायचं आहे ? .." त्यांचं बोलून झालं होतं आणि मी त्यांचे आभार मानून समोर जाऊ लागलो तेव्हा पुन्हा मला ते थांबवत म्हणाले , " प्रेम, खूप सोपं असत जगाशी लढणं पण खूपच कठीण असत स्वतःच स्वतःशी झगडन ..हा त्रास फक्त ती आणि तीच समजू शकते..मला वाटत तुला कळलं असेल मला काय म्हणायच आहे तर .." ..मी मान हलवून हॉस्पिटल सोडलं ...

मी हॉस्पिटलमधून तिला घेऊन तर आलो होतो पण तिच्या मनात नेमकं काय चालू आहे ते मला अजूनही कळत नव्हतं . माझ्याही डोक्यात बरेच प्रश्न तेव्हा उभे राहिले होते पण या स्थितीत मी तिच्याशी काहीच बोलू शकत नव्हतो त्यामुळे शांत राहनच मला योग्य वाटलं...घरी पोहोचुन श्रेयसीला औषध देऊन झोपायला सांगितलं आणि मी माझ्या विचारात हरवलो .डॉक्टरांचे शब्द मला सतत त्रास देत होते पण मला आधी श्रेयसीची स्थिती जाणून घ्यायची होती आणि त्यानंतरच मी पुढचं ठरवणार होतो ..त्यामुळे मला वाट होती ती रात्रीची .. सायंकाळी तेव्हा तिचा ताप उतरला होता आणि ती नॉर्मल वाटत होती ..थोड्या वेळ गप्पा मारून झाल्या आणि ती छान फील करू लागली ..रात्रीच जेवण तयार झालं होतं..जेवण करून ती झोपायला गेली पण मी तिला आधीच सांगितलं होतं की निशा झोपल्यावर लगेच टेरिसला ये .मी तर वेळेपूर्वीच टेरिसला पोहोचलो होतो आणि तिची वाट पाहू लागलो ..ती सुमारे अर्ध्या तासाने वर टेरिसला आली ..तीला तब्येतीची काळजी विचारल्यावर मी सरळ प्रश्न केला की तू सकाळी प्रेम परत ये ..परत ये अस का म्हणत होतीस ? ..प्रश्न ऐकल्यावर ती शांत झाली ..तिच्या डोळ्यात आपोआप अश्रू आले आणि माझ्या मिठीत येत तिने समिरपासून सुरू झालेला किस्सा विदिशापर्यंत एका एका शब्दात व्यक्त केला ..तिचे डोळे तर पाणावले होते आणि आता माझीही काहीशी अशीच स्थिती झाली ..मी विचारांच्या गर्द रानात एकटाच उभा झालो आणि मला डॉक्टरांचे शब्द आठवले ..तिने व्यक्त होन किती गरजेचं आहे नाही तर ? ..भीतीने माझेही हातपाय थरथरू लागले ..तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता आणि बोलत होते ते फक्त डोळे ..अश्रूद्वारे ..तेव्हा मला डॉक्टरांचं बोलणंं पटलं की मृणालच्या डोक्यात भीतीने इतकं घर केलं की तीच एक वेगळं विश्व तयार झालं आणि मला ते तिने कधीच कळू दिल नव्हतं ..त्या विश्वास ती एकटीच राहू लागली .तिला होणाऱ्या वेदना मी त्याक्षणी स्वतः अनुभवू लागलो ....मग माझ्या लक्षात प्रत्येक गोष्ट येऊ लागली ..मंगळसूत्राचा किस्सा असो की सुरजच्या ताईने पळून केलेलं लग्न त्यावेळी घरच्यांच्या विचारांनी नकळतच ती खचत गेली आणि आम्हाला तिची ही अवस्था कधी कळलीसुद्धा नाही ..आम्ही आपल्या जगात सर्व जेव्हा खुश होतो तेव्हा ती स्वतःशीच झगडा करत होती ...तिच्या सांगण्यावरून एक गोष्ट आणखी लक्षात आली की आपलं सत्य बाहेर येईल तेव्हा काय होईल याभीतीने तिने स्वतःच मनात एक कथा तयार केली होती...आता फक्त वाट होती ती एका खलनायकाची आणि समीरच्या भेदक नजरेने तो खलनायक तिला सापडला आणि मग तिच्या त्या विचारांनी रात्री तिला रात्रभर छडल ..मी हा विचार करतच होतो की तिने मला हात लावल्याने विचाराची तंद्री भंग झाली...मला कळून चुकलं की डॉक्टरांनी सांगितलेलं आता तिला सर्व सांगावं लागेल आणि पुढच्या क्षणात मी ते सर्व तिला सांगितलं ..ते सर्व एकूण तिला शॉक बसला होता ..दोघांनाही काय बोलावं ते कळतच नव्हतं त्यामुळे काही वेळ आम्ही शांतच होतो ..मला श्रेयसीला कधीच गमवायच नव्हतं त्यामुळे मी आमचा भूतकाळ सर्वाना सांगायचं ठरवलं ..श्रेयसी हे ऐकून थोडी घाबरली होती पण जेव्हा तिला कळलं की आम्ही तिचा भूतकाळ आता सर्वाना नाही सांगितला तर कदाचित तीने पाहिलेलं स्वप्न सत्यात येईल तेव्हा तिनेही घरच्यांना सांगायला होकार दिला ..पण मनातल्या भीतीने मात्र आमचा पिच्छा काही सोडला नव्हता .."

मी(स्नेहा ) मधातच बाबांना थांबवत म्हणाले , " मग समोर काय झालं बाबा ? "

ते माझ्या केसांवरून हात फेरत म्हणाले , " दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वच घरात होते ...मी श्रेयसीला बाजूला उभं करून घरच्यांशी बोलायचा निर्णय घेतला ..खूप महत्त्वाचं सांगायचं असल्याने ते सर्व शांतचित्ताने ऐकत होते ..तर श्रेयसी भीतीने थरथर कापत होती..तिच्या भावना मला कळत होत्या पण आज हे सर्व सांगणं गरजेचं होतं म्हणून मी पुढाकार घ्यायचं ठरवलं ..मी निशाला तिच्या बाजूला उभं ठेवून घरच्यांना तिचा सर्व भूतकाळ सांगितला ..माझ्या एका एका शब्दाला सर्व गंभीर होत होते ..जेव्हा मी तिचा सर्व भूतकाळ सांगितला तेव्हा घरात शांततेच वातावरण होत .तर मृणालच्या डोळ्यात सतत अश्रू होते ..निशाने कसतरी तिला आवरून धरलं होत...माझं बोलन ऐकून बाबा घराच्या बाहेर निघाले आणि वातावरणात आणखीच गांभीर्य आलं ..आई तिथेच होती त्यामुळे आई काय बोलणार यावर आमच्या दोघांचंही लक्ष लागून होत आणि ती म्हणाली की बेटा आज किती वाईट परिस्थिती आली आहे न की लोकांना सांगावं लागत की माझ्यावर विश्वास ठेवा नाही तर एक दिवस होता की लोक स्वतःहून एकमेकांवर न सांगताच विश्वास ठेवायचे ..तू जे काही बोलला आहेस त्यावर मी काय रिऍक्ट करू खरच माहिती नाही.... पण खूप खूप आनंद आहे की तू हे सर्व आम्हाला आज सांगितलंस .आज हे सत्य मला दुसरीकडून कळलं असत तर कदाचित मी खूप तुटले असते...मला खूप वाईट वाटलं असत.. पण मला आनंद आहे की तू हे सर्व स्वतः आम्हाला सांगितलंस ..आपण जगताना ना नेहमीच एक चूक करतो ..आपल्याला नेहमी वाटत की समोरच्याने आपल्यावर विश्वास ठेवावा पण कितीजणांना वाटत की मी स्वःताहून विश्वासाने समोरच्याला सर्व काही सांगावं ..हीच तर नात्यांची परीक्षा आहे ..आज विश्वास कुठेतरी हरवला आहे म्हणून नाती क्षणात तुटत आहेत ..विश्वासच तर प्रत्येक नात्यांचा पाया आहे आणि आपणच तो क्षणाक्षणाला तोडतो ..मग समोरच्याकडून अपेक्षा तरी कशी करायची ..? हे मान्य की विश्वास कमी होत चालला आहे पण म्हणूनच तर त्याचे महत्त्व आणखीच वाढते आहे .. विश्वास आणि प्रेम हे फक्त शब्द आहेत पण जेव्हा माणूस त्यांना शुद्द अंतकरनाने स्वीकारतो तेव्हा हेच शब्द जीवन म्हणून ओळखल्या जातात ..बेटा श्रेयसी मला तुमचा खूप अभिमान आहे आणि विशेष म्हणजे माझ्या मुलाचा ..तुम्ही दोघांनी एकत्र जगण्याचा निर्णय घेतला तर आम्ही थांबवनारे कोण आहोत .? मी नक्की नाही सांगू शकत की आता माझ्या डोक्यात काय सुरू आहे पण हे नक्की सांगू शकते की या सत्याने माझी तुझ्याबद्दलची विचारसरणी अजिबात बदलली नाही ..तू जशी होतीस तशीच आजही आहेस अगदी पवित्र ..तुम्ही दोघे आजही तेवढेच खास आहात माझ्यासाठी जेवढे आधी होता.." आणि अस म्हणून तिने श्रेयसीला मिठीत घेतले ..निशाही त्यांच्यात सामील झाली ..बाबा जुन्या विचारांचे होते त्यामुळे त्यांना हे सत्य पचवणं अवघड होतं त्यामुळे सुरुवातीला ते नमले नाहीत .त्यांना जमेल तितका तिरस्कार ते करीत होते .पण एखाद्याच मन जिंकायचं असेल तर कठीण परिश्रम घ्यावे लागतात हे आईने तुझ्या आईला समजावून सांगितलं आणि बाबांचा तिरस्कार सहन करून तुझी आई माझ्या बाबाचा राग घालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागली..बाबा जवळपास 3 वर्षे श्रेयसीशी बोलले नाही पण शेवटी त्यांनाही तीच महत्त्व पटलं आणि आनंदाने त्यांनी तिला स्वीकारलं ..तेव्हा आम्हाला पटलं एकट्या विश्वास या शब्दात किती ताकद आहे ..एका विश्वासाने आम्ही समोरच्या सर्व अप्रिय गोष्टी टाळू शकलो ..विश्वास जीवनाचा पाया आहे हे मला तेव्हाच कळलं आणि त्याच्याविना नातेसंबंध कधीच टिकू शकत नाही .. समोरच्याला दुखावू म्हणून आपण जेव्हा एखाद सत्य लपवून ठेवतो आणि जेव्हा तेच सत्य बाहेरून कळत तेव्हा मात्र विध्वंस पक्का असतो ..विचार करा सत्य किती दिवस लपणार आहे ? ..विश्वास हा एक शब्द असला तरी त्यात किती ताकद आहे हे ह्या प्रसंगावरून तरी मला पटलं आणि आम्ही आनंदात राहू लागलो ..." विश्वास ? काय कोड आहे न हे !! .. अगदी एकच शब्द पण त्याने शिकविला प्रेमाचा खरा अर्थ ..

" बाबा म्हणजे हे फक्त स्वप्न होत का ? " , मी म्हणाले आणि बाबा उत्तरले , " फक्त स्वप्न नाही स्नेहा ..तुझी आई हे सर्व स्वप्नात जगली आणि मी अर्ध्या तासात ..जेव्हा तिने ते सर्व माझ्याशी व्यक्त केलं ..ती सर्व काही सांगत असताना मला अस वाटत होतं की हे सर्व समोर घडत आहे आणि डोळ्यातून फक्त अश्रू येत होते ..त्यातच खूप काही आलं ..अगदी तुला माहिती आहे की ही खरी कथा नाही तरीही वाचताना तुझ्या डोळ्यात पाणी आलंच ना मग ? आम्ही तर ही कथा त्याक्षणी जगलो...मानसिक त्रास लोकांना आतून किती तोडू शकतो हे मला त्याक्षणी कळल .नाही तर मीही त्याच लोकांमध्ये होतो जे विचार करतात की टेन्शन कुणाला असत नाही ? टेन्शन असत बेटा पण जीव जाईल इतकंही असू नये ..तुझ्या आईने ते प्रत्येक क्षणी जगल आहे आणि तरीही ती खचली नाही याचा मला फार अभिमान वाटतो ...ती जगली ती कथा स्वतःच्या स्वप्नात आणि मी तिच्या शब्दात , तिला असह्य होणाऱ्या अश्रुत ..विचार कर आमची स्थिती काय झाली असेल ते ? शिवाय त्यामुळेच तर आम्हाला विश्वासाची महती कळाली आणि आम्ही एक नवीन आयुष्य उभारू शकलो ..त्यानंतर श्रेयसी आमच्याशी अगदी छोट्यात छोटी गोष्ट व्यक्त करू लागली आणि मानसिक तणाव कुठेतरी दूर पळून गेला .मुक्त संवाद साधल्याने कितीतरी प्रश्न जागीच सुटतात हे तिला बघून मी नक्कीच सांगू शकतो त्यानंतर कधीच श्रेयसीला स्वतःच वेगळं मानसिक आयुष्य उभं करावं लागलं नाही ..ती सर्व काही आम्हाला सांगत गेली....आमच्यासमोर कुठलीच भीती मनात न बाळगता व्यक्त होऊ लागली... आणि फक्त संवादामुळे तिने मानसिक आजार दूर लोटला..जो कधीतरी तिला घायाळ करून सोडत होता...तिला सतत त्रास देत होता....आणि बघ श्रेयसी - प्रेम सर्व समस्यांना हरवून शेवटी जिंकलच ..प्रेम कधीच हरत नाही ..हे आता तरी सर्वाना नक्कीच पटेल ..


सर्वांचे चेहरे समाधानाने बहरलेे होते आणि मी मधातच बोलू लागले .." हो बाबा विश्वास नात्यात खरच महत्त्वाचा असतो ..मी एकदा पाहिलं होतं की एका मुलीच एका मुलावर प्रेम होतं.... पण दुर्दैवाने तिला दुसर्यासोबत लग्न कराव लागलं अस असतानाही ती आपल्या प्रियकराला विसरून नवऱ्यासोबत सुखी जीवन जगत होती... तिचा नवराही तिच्यावर खूप प्रेम करत होता आणि तीही त्याच्यावर.... ती आनंदाने आपला संसार करू लागली आणि तेव्हाच तीच पहिल प्रेम तिच्या आयुष्यात पुन्हा आलं ..तो तिला मिळविण्यासाठी ब्लॅकमेल करीत होता पण तिने त्याला नकार दिला आणि तो त्याला पचवता आला नाही... तो तिला त्रास देऊ लागला..तिला हे सर्व आपल्या नवऱ्याला सांगायचं होत पण त्याला गमावण्याच्या भीतीमुळे ती काहीच सांगू शकली नाही...व्हायचं तेच झालं... नवऱ्याला तिच्या भूतकाळाबद्दल बाहेरून कळलं ..तेव्हा ज्या यातना त्याला झाल्या त्या कुणीच शब्दात मांडू शकत नाही...ती चुकीची नव्हती पण फक्त सत्य न सांगितल्याने तिला विश्वासघाती म्हणवून घ्यावं लागलं ..पुढे त्यांच्यात खूप वाद झाले आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली फक्त त्यांना मुलगा असल्याने त्याने तिला समजून घेतलं आणि सर्व काही ठीक झालं .आणि सर्व ठीक नसत झालं तर ? म्हणून विश्वास खूप मोलाचा आहे ..

बाबा मी लहान होते ना तेव्हापासूनच तुम्ही माझ्यावर इतके सुंदर संस्कार रुजवले की मला कधी ही गोष्ट वाईट आहे असं वाटलंच नाही ..नाण्याच्या दुसऱ्या बाजूनेही विचार करायला तुम्ही शिकवलं... वेळ पडली तेव्हा स्वातंत्र्य दिल आणि बाकी वेळ समजावून सांगितलं की हे चुकीचं आहे म्हणूनच की काय जेव्हा तुम्ही मला आईच सत्य सांगितलं तेव्हा मी नाराज होण्याऐवजी मला तुमचा अभिमान वाटला ..सभ्य समजल्या जाणाऱ्या समाजामध्ये कित्येक मुलांना आईवडील रस्त्यावर फेकून देतात आणि वैश्या गणली जाणारी मुलगी एका मुलीला जन्मच नाही तर समाजात हवा तो दर्जा देऊन गेली हे पाहताना अगदि उर भरून येतो .. तेव्हा मला समजलंं की तुमचं प्रेम नक्की काय आहे !! ..तुम्ही शिकविला मला प्रेमाचा खरा अर्थ म्हणूनच की काय मी या वयात आश्रमाला आपलेपणा देऊ शकले ..तुम्हाला पाहून वाटत संघर्ष असा असावा प्रेमाचा की त्यासमोर दुखानिसुद्धा हार मानावी ..काय प्रेम केलंत तुम्ही ..खरच मानलं पाहिजे ..प्रेम असावं तर अस ..( थोड्या वेळ शांत होत ) पण बाबा मला आणखी एक प्रश्न पुन्हा पडला आहे तो म्हणजे... समीरच खरच असा वागला ..? "

हे ऐकून बाबा आई माझ्या प्रश्नावर हसत होते... आपल हसू आवरत आई पुढे म्हणाली , " याच उत्तर मी देते तुला.. जेव्हा आपल्या मनात शंका निर्माण होते ना तेव्हा आपण सर्वाना शंकेने बघतो तसच काहीस झालं बघ माझ्यासोबत....माझी तब्येत बिघडली आणि दुसऱ्याच दिवशी समीर घरात आला .त्याला आठवलं की त्याने बराचवेळ माझा हात सोडला नव्हता ..आमच्या दोघांसमोर येत तो म्हणाला की सॉरी वहिनी माझ्या लक्षात आलं नाही की काल मी तुमचा हात खूप वेळ सोडला नाही....मी असं मुदामून केलं नाही.. नकळतच झालं माझ्याकडून...माझं असं वागण्यामागेही एक कारण होत ..जुही मला फार आवडते आणि जेव्हाही मी तिच्याकडे पाहतो तेव्हा आजूबाजूच मला भानच राहत नाही... तुमचा हात मी पकडला होता तेव्हा ती तुमचे गिफ्ट कलेक्ट करण्यासाठी खाली बसून होती...माझं संपूर्ण लक्ष फक्त तिच्याकडेच होत नि या नादात मी तुमचा हात धरूनच ठेवला ...एवढच नाही जेव्हा डान्स करताना तुमचा पाय लचकला तेव्हासुदधा तीच तुमच्या बाजूला बसून औषध काढून देत होती तेव्हाही माझ संपूर्ण लक्ष तिच्याकडेच होत "...समीरच माझ्याकडे लक्षच नव्हतं... तो जुहीकडे पाहत होता... पण मी काही वेगळाच अर्थ लावला त्याचा.... बेटा स्नेहा हा मानसिक तणाव फार त्रासदायक असतो आणि तो आपल्याला जगू देत नाही .अगदी तुझे बाबा म्हणाले तसच मी खलनायकाच्या शोधात होते आणि मला समीरच्या रूपाने तो भेटला ..आणि बाकी समोर काय झालं ते तुला माहितीच आहे ..

आणखी एक गोष्ट मला तुला आनंदाने सांगायला आवडेल , " आमचा संसार छान खुलू लागला पण बाबांची तब्येत खराब झाली आणि त्यातच ते वारले ..काही वर्षानंतर आईला लखवा मारला आणि त्यांची शरीराची हालचाल बंद झाली ..त्या काळात त्यांचं सर्व काही मीच बघत होते .अगदी विष्ठा फेकण्यापासून तर सर्व काही ..आई 2 वर्ष तसच जगल्या आणि शेवटच्या क्षणी त्या मला म्हणाल्या .." बेटा आज मी प्रेमसाठी कितीही संस्कारी मुलगी आणली असती तरीही मला नाही वाटत तिने माझी इतकी काळजी घेतली असती ..तू जे केलंस त्यावरून मी नक्की म्हणेन की माझ्या मुलाची पसंद चुकली नाही .आज मी समाधानाने हे जग सोडून जाते आहे कारण मला माहित आहे तू आहेस त्याला सांभाळायला .." त्यांचे ते शब्द आजही माझ्या आठवणीत आहेत .ते माझ्यासाठी अचिवमेंट होत ..जे म्हणतात की एक वैश्या काय संसार करणार त्यांना हे उत्तर आहे ..तेव्हा मी नक्की म्हणेन की संधी दिली तर एक वैश्याही उत्तम प्रकारे आपल्या कुटुंबाला सांभाळू शकते ..शेवटी तिलाच माहिती असत दुःख सर्व काही गमावण्याचं .."

रूममध्ये फारच गंभीर वातावरण झालं होतं ..तिघांच्याही डोळ्यात खूप खूप अश्रू होते ..मला आता माझ्या प्रत्येक प्रश्नच उत्तर सापडलं होत आणि माझ्या चेहऱ्यावर समाधानही होत ..त्याच वेळी बाबांनी आम्हाला बाहेर गार्डनला फिरण्यास विचारलं....मी आणि आईने होकार दिला... काही क्षणातच तिघेही एकमेकांचा हात हातात घेत आम्ही सैरवर निघालो आणि बाबा मला विचारू लागले , " स्नेहा तुला माहिती आहे की ही खरी कथा नाही.. तरीही पुस्तकी रुपात ही कथा मी का लिहायला लावली असेल ? "

आता माझा चेहरा उजळून निघाला होता ..कारण मला हवं असलेलं उत्तर मी बाबांना देऊ शकणार होते आणि मी म्हणाले , " बाबा आज ना काळ बदलला आहे ..मुलांना अस वाटत आहे की आपल्याला कुनीच समजून घेत नाही आणि नंतर ते चुकीच्या लोकांत सामील होतात .. आपले आईवडील आपल्याला काहीच देत नाही असं त्यांना वाटू लागतं..पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी दिलेलं ते सर्व विसरून जातात आणि मला काय नाही भेटलं याचा जास्त विचार करू लागतात ..स्वाभाविकच त्यांना याच काही वाटत नाही .आणि काही मुलं तर घरच्यांवर ओरडतात तेव्हा त्या सर्वाना कळावं की आपण कुठे चुकतो आहे यासाठी ही कथा फारच उपयोगी पडते .आजच्या काळात मूल एकमेकांची तुलना करतात ..ती अशी की माझ्या मित्राकडे कार आहे आणि माझ्याकडे गाडीसुद्धा नाही पण तो हे समजू शकत नाही की आपल्या वडिलांनी गेले कित्येक वर्ष सायकलवर प्रवास केला ..त्याला शाळेत शिकता यावं म्हणून ते कुठून पैसे आणतात आणि स्वतःला एक कपडा न घेता त्याला सतत भरभरून कपडे घेऊन दातात ..या कथेत प्रेम आहे आईवडिलांच जे मूल आज पाहुनसुद्धा लक्ष देत नाहीत ..त्यांना ही कथा शिकविते बेटा आज आई भरवायला आहे उद्या नसेल ..आज एटीएम ( बाबा ) आहे तेव्हा जपून वापर कर ..उद्या ते नसतील तेव्हा फक्त नि फक्त पश्चातताप असेल ..आणि आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही शिवाय कथेत दोन असे क्षण आहेत जे मनाला फार भावले .एक म्हणजे मृणालच प्रज्ञाला स्वीकारणं .तिला माहीत आहे की आपला जीवनसाथी आपल्या मुलींमुळे गेला आहे तरी ती तिला स्वीकारते ..आणि यासाठी फक्त आईवडिलांच काळीजच लागत ही बाब ही कथा स्पष्ट करते आणि दुसरा क्षण म्हणजे, प्रज्ञा मृणालला म्हणते की तुम्हाला माहित होतं की मला हे सर्व सहन कराव तरी मला का जन्म दिला पण जेव्हा तिला मुलगी होते तेव्हा मात्र तिची तडफड तिलाच माहिती होते .आई म्हणजे काय हे आई झाल्याशिवाय कळत नाही हे त्यातून तरी पटत आणि कथेचा शेवट त्याला शब्दच नाहीत ...अजिंक्य जरी या कथेचा आत्मा असला तरी मृणाल शेवटी सांगते की एखाद्याला जीवन जगायला शिकवायला कुठल्या पुरुषांचीच गरज नाही ..निशा , रिया , मृणालसारख्या स्त्रियाही समजात बदल घडवून आणू शकतात ." मी उत्तर दिलं आणि बाबांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली ..त्यांचे डोळे पाण्याने भरले आणि पुढच्याच क्षणी ते म्हणाले , " बर ते असू दे ..मला सांग माझ्या लाडकीच्या आयुष्यात कुणी दुसरा प्रेम आला की नाही ..? " आणि मी हसून म्हणाले , " दुसरा प्रेम/अजिंक्य होणे शक्य नाही .."

तिघेही हातात हात टाकून आपला रस्ता सर करत आहेत .अगदी एकमेकांची सावली बनून जगण्याचा आनंद त्यांना सुखावू लागला आहे आणि आता श्रेयसीच्या आयुष्यात कितीही वादळे आले तरीही तिला साथ देणारा जिवलग तिच्यासोबत आहे.... तिची सावली म्हणजे तिची मुलगी तिच्यासोबत आहे...वादळे किंवा संकटे जणू तिच्या आयुष्यात यायला आता घाबरतात कारण त्यांना माहित आहे, आता ते श्रेयसीच काहीच वाईट करू शकत नाहीत... प्रेम विश्वास जिथे असतो तिथे कुठलंही वादळ तग धरू शकत नाही हे त्यांना पाहून तरी नक्कीच वाटत..

आज त्यांची परिस्थिती पूर्णतः बदलली आहे .त्यांनी जे अनुभवलं ते फक्त स्वतःपुरत मर्यदित ठेवलं नाही तर समाजाची जाण ठेवून त्यांनी आपले विचार समाजात रुजवायला सुरुवात केली ..त्यांना माहिती आहे की बदल फक्त सांगून होणार नाही तर त्यासाठी स्वतःला पुढाकार घ्यावा लागेल .म्हणूनच अगदी उतरत्या वयात श्रेयसि मानसोपचारतज्ञ झाली आणि प्रत्येक व्यक्तीला ती फ्री ट्रीटमेंट देते... तींने जो त्रास तिने कधी सहन केला होता, त्या त्रासातुन इतरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे .... स्नेहा आश्रम चालवते तर निशा वृद्धाश्रम चालवते आणि त्या तिन्ही घरचे पुरुष ( प्रेम , निशाचे बाबा आणि पती ) आपल्या जीवाच रान करून त्यांना मदत करतात.. कधी आर्थिक तर कधी मानसिक.... कारण त्यांना माहिती आहे ..

बहोत आसान है
हाथ फैलाकर बहोत कुछ मांग लेना
लेकीने बहोत मुश्किल है
कुछ ना होते हुये भी दुसरो को बहोत कुछ दे जाना ..

बदल .....

बदल एकाच क्षणी होणार नाहीत पण हळूहळू प्रयत्न केला तर नक्कीच होईल...पण सुरुवात मात्र नक्कीच व्हायला हवी ..कधी प्रयत्न करून तरी बघा... कधीतरी आईवडिलांना सॉरी म्हणून बघा...तर कधी आई वडिलांनी आपल्या मुलांनाही समजून बघा... कधी विश्वासाने आपल्या माणसाला मनातलं सांगून बघा..तर कधी रियासारखे मित्र जोडून बघा आणि कधी प्रेम - श्रेयसीसारख , अजिंक्य - मृणालसारखं प्रेम करून बघा... मग समजेल की खरच प्रेमाचं व्यसन खूप सुंदर आहे ..खूप सुंदर आहे ..खूप सुंदर आहे ..".



........................


विचारपुष्प

मला नाही माहीत की तुम्हाला शेवटचा भाग आवडला की नाही ..आवडला नसेल तर एक गोष्ट नक्की सांगेन कथेमधील चांगल्या गोष्टी घ्या आणि बाकी सोडून द्या ...शेवटी लेखक सुद्धा माणूसच आहे तेव्हा त्याच्याकडून पण चूका होऊ शकतात ..मी ही कथा सुरुवातीला लिहायला घेतली तेव्हा पुस्तक रुपात लिहायला घेतली नव्हती आणि त्या कथेचा शेवट वाट ही कविता संपते तिथेच होता पण त्याच वेळी माझं लक्ष समाजाच्या एका महत्त्वाच्या गोष्टीकडे गेलं तो म्हणजे मानसिक आजार ..आज समाजात 15 ते 80 वयोगटातील साधारणतः 80 % लोकांना हा आजार आहे ..त्याच प्रमाण कमी जास्त असू शकत ..वडिलांना मी कमावून आणेल तर घर चालेल याची काळजी आहे , आईला घर सांभाळण्याची तर मुलाना प्रेमभंग , नौकरी याच टेन्शन आहे .हा आजार आपल्याला दिसून पडत नाही त्यामुळे समोरचा व्यक्ती अगदी ठणठणीत आहे असच वाटून जात पण प्रत्यक्षात मात्र तो आतून फार खचलेला असतो ...त्याला वाटत की आपण या जगात एकटेच आहो आणि आपल्याला कुणीच समजून घेऊ शकत नाही आणि तो त्रास त्याला नेहमीच सतावू लागतो ....हे सर्व होत आहे ते अपूर्ण संवादामुळे ..प्रत्येकाला वाटत की मला कुणीच समजून घेत नाही आणि मी एकटाच आहे ..जर प्रत्येक व्यक्तीला अस वाटत आहे तर मग समोरचा आपल्या मनातील ओळखून घेईल हे कसं शक्य आहे कारण तो सुद्धा तुमच्यासारखच कुठेतरी हरवला आहे . तेव्हा आपण प्रत्येकांनी पुढाकार घेऊन संवाद साधायला हवा ..होऊ शकत एक व्यक्ती तुमचं ऐकणार पण जगातली कुठलीच व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाही हे शक्य नाही ..आपण असेच जगत राहिलो तर पाहता पाहता वेडे होऊ यात मला शंका वाटत नाही ..सो स्वतःहून संवाद साधायला शिका ..कुठलाच लेखक तुमच्या समस्या दूर करू शकत नाही तो फक्त तुम्हाला काही आनंदाचे क्षण देऊ शकतो पण तुम्हाला तुमच पूर्ण आयुष्य आनंदी हवं असेल तर स्वतः प्रयत्न करावे लागेल .संवादाने समस्या सोडविल्या जाणार नाही पण तुमच्या मागे कुणीतरी आहे ही भावना नक्कीच देऊन जाईल आणि आपण उत्साहीपणे कार्य करू शकू .।

ही कथा लिहिताना काही लोकांशी भेटलो त्यावर एकीच म्हणणं होतं की तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला आहे आणि तिला रोज कुणीतरी आपल्या तोंडावर हात ठेवून ते दुष्कर्म करीत आहे असं जाणवत ..दुसरी व्यक्ती म्हणाली की कधी कधी फॅनला लटकून जीव द्यावासा वाटतो तर कुणी म्हणाल की रात्रंदिवस विचार डोक्यात फिरत असतात त्यामुळे झोप लागत नाही ..या सर्वांच कारण एकच ..अपुरा संवाद ..जर मनातून त्याला काढून फेकायच असेल तर संवाद साधावा लागेल हे नक्कीच किंबहुना तोच सर्वात स्वस्त उपाय आहे ...

कथेत काही प्रश्न मला सतत विचारल्या गेले त्याचे उत्तर मी आधी देऊ शकलो नाही पण मला वाटत आता देउ शकतो ..जेव्हा माणसाच्या डोक्यात भीती घर करून बसते तेव्हा तो जास्त नकारात्मक होत जातो आणि त्यावेळी आपल्यासोबत जास्तीत जास्त काय वाईट होत याबद्दल विचार करत असतो ..अगदी मृणालची स्थिती अशीच होती त्यामुळे नकळत तिने अजिंक्यला , त्याच्या आईबाबांना मरताना पाहिल ..हा मानसिक तणावाचा एक भाग होता अस मला वाटत . तेच आपण जास्त आनंदी असलो की जास्तीत जास्त आनंदाचे क्षण आपल्या डोक्यात घर करून जातात ..मी जरी कथेत माझे विचार मांडले असले तरी प्रज्ञा इतकं क्रूर कशी वागली , आईवडील इतके कृर कशे वागले , समीर अस का वागला हे मृणालच्या डोक्यात असलेली भीती होती आणि तीच भीती मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला ..म्हणतात ना डोक्यात शंकेने घर केले की सर्वच चोर दिसतात असच काहीतरी आहे ते ..बाकी सांगण्यासारखं काही नाही ..आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते या मानसिक त्रासाला मी सुद्धा सामोरे गेलो आहे तेव्हा तो त्रास काय असतो हे मी नक्कीच सांगू शकतो ..श्रेयसीच सत्य अजूनही जगासमोर आलं नाही हे शेवटचा भाग वाचून सर्वाना कळलं नसेल तेव्हा कथाही सादर करता यावी आणि सत्यही बाहेर येणार नाही यासाठी मला मृणाल , अजिंक्य , प्रज्ञा ही नवे द्यावी लागली ..आशा आहे सर्वाना उत्तर मिळाली असतील.कथा लिहिताना कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर खूप खूप सॉरी ..


" इमतेहा तो बहोत देणे पडते है जिंदगी मे प्यार पाने के लिये
पर जो हर हद पार कर जाये उस एहसास के लिये , जान उसी को तो मोहब्बत है "


समाप्त


***********