Addiction - 2 - 32 books and stories free download online pdf in Marathi

एडिक्शन - पर्व दुसरे - भाग 32

अजिंक्य गेल्यानंतर मृणालचा चेहरा आज पहिल्यांदाच एवढा खुलला होता ..अजिंक्य ज्या प्रेमासाठी सर्वांशी भांडला होता ते प्रेम शेवटी जिंकलच ,..पुन्हा एक अजिंक्य त्यांच्याच घरी जन्माला आला होता ..जो पुन्हा आपल्या प्रेमासाठी जगाशी भांडणार होता ..हा विचार तिच्या मनात येताच अंगात सरसरी निर्माण झाली ..पण एक खंत मात्र मागे राहिली ती आईबाबांना शेवटच भेंटण्याची ..सुरज घरी जायला निघणार तेवढ्यात मृणाल त्याला म्हणाली , " सुरज दोन मिनिटं थांबशील ..मी पण येते ..मला आजची रात्र तिथेच घालवायची आहे .." सुरजने होकार दिला आणि ती साडी चेंज करायला आत गेली ..

काही क्षणातच ते सुरजच्या गाडीने घराकडे निघाले ..जास्त काही अंधार झाला नव्हता ..सुरज आपल्या प्रेयसीबद्दल मृणालला भरभरून सांगत होता पण मृणाल मात्र आताही त्या पत्रातच हरवली होती ..ती त्याच सर्व एकत आहे असं भासवत होति पण आताही तिच्या मनात एक वादळ होत जे तिला शांत बसू देत नव्हतं ..काही क्षणातच घर आलं ..सुरजने तिला चावी हातात आणून दिली आणि ती दार उघडू लागली ..सुरज आपल्या घरी परतला होता ..तर मृणाल एकटीच आतमध्ये जाऊ लागली ..मृणालने घरात पाय टाकला आणि ती काही जुन्या आठवणीत नकळत शिरली ..बाबा सोफ्यावर बसून चहा घेत होते आणि तिला येताना पाहून त्यांनी तिला बसण्याची विनंती केली ..त्यांच्या चेहऱ्यावर फार फार हसू होत आणि त्यामुळे तीही आपसूकच हसू लागली ..मृणाल सोफ्यावर बसण्याऐवजी किचनला गेली आणि आईने तिच्या हातात चहाचा कप दिला ..मृणालही आईकडे टक लावून पाहू लागली आणि आईचा तो नेहमी हसरा चेहरा तिला जवळून न्याहाळता येत होता ..आई असली की तिला साधं कामसुद्धा करावं लागतं नसे आणि आज पण तशीच स्थिती होती ...आईचा तो दिलखुलास स्वभाव अगदी तिच्यासमोर उभा राहिला आणि नकळत ती त्यातच हरवली ..काही क्षणात ती बेडरूमला पोहोचली ..बेडरूममध्ये अजिंक्य छोट्या प्रज्ञा सोबत खेळत होता आणि मृणालला पाहून म्हणाला , " या राणीसरकार ..बघा ना आपली मुलगी फार खोडकर झाली आहे आपलं काही ऐकतच नाही ..हिला न तुम्हीच चढवून ठेवलं आहे शेवटी तुमचीच परछायी ना ती !!.." अजिंक्य अस बोलतच होता की प्रज्ञा त्याच्या अंगावर खेळू लागली आणि तो जोरा जोराने हसू लागला .तीच्या पापण्या क्षणासाठी बंद व्हाव्या आणि समोरच चित्र गायब झाल ..मृणाल किचनमध्ये पोहोचली परंतु तिथे आई नव्हती आणि हॉलमध्ये बाबा नव्हते ..ते घर आता तिच्यासाठी भूत बंगला झाला ..ती इतक एकट फिल करू लागली की क्षणभरही तिला तिथे राहन शक्य होत नव्हतं ..तिने त्या घरात घालवलेला प्रत्येक प्रसंग तिला आठवू लागला पण प्रत्यक्षात समोर कुणीच नसल्याने ती बेचैन झाली ..ती तशीच बाहेर पडली ..रात्रीचे 11 वाजले होते ..सुरजने बाहेर पडताना तिला पाहिले आणि ती बाहेर गार हवेत एकटीच जात असल्याच सांगत होती..सुरजने तिला जाण्यास मनाई तर केली नाही पण त्याने शाल दिल्याशिवाय जाऊसुद्धा दिले नाही ..

ती रस्त्याने एकटीच चालत होती ..रस्त्यावरून एक दोन गाड्या आताही जात होत्या..पण मृणाल तिघांच्याही आठवणीत इतकी हरवली होती की तिला बाकी कसलच भान नव्हतं ..आनंदात आठवणी हव्याहव्याशा वाटतात पण दुःखात मात्र त्या अधिकच सतावतात हे मृणाललाही समजत होत ..तिला अजिंक्यचा तो विरह इतका त्रास देत होता की आपोआपच एक गीत तिच्या मणी येत होतं ..आणि तो प्रत्येक शब्द तिच्या मनावर घाव करत होता ..

तुम बिन क्या है जिना
क्या है जिना
तुम बिन क्या है जिना

तुम बिन जिया जाये कैसे
कैसे जिया जाये तुम बिन
सदियो से लंबी है राते
सदियो से लंबे हुये दिन
आ जाओ लौट कर तुम
ये दिल केह रहा है ..

फिर शाम इ तन्हाई जागी
फिर याद तुम आ रहे हो
फिर जा निकलने लगी है
फिर मुझको तडपा रहे हो
इस दिल मे यादो के मेले है
तुम बिन हम तो अकेले है
आ जाओ लौट कर तुम
ये दिल केह रहा है

क्या क्या ना सोचा था हमने
क्या क्या ना सपणे सजाये
क्या क्या ना चाहा था दिलने
क्या क्या ना अरमा सजाये
इस दिल से तुफा गुजरते है
तुम बिन तो जितें ना मरते है
आ जाओ लौट कर तुम
ये दिल केह रहा है ..

आ जाओ लौट कर तुम
ये दिल केह रहा है ..

ये दिल केह रहा है ..

आजची ही रात्र मृणालना काढणं अगदीच अशक्य झाल होत ..तिच्या डोक्यात सतत तेच विचार येत होते आणि ती समोर जाऊन एका जागी निवांत बसली ..ही तीच जागा होती जेव्हा अजिंक्यने तिच्या गालावर आपल्या ओठांचे निशाण उमटवले होते आणि त्याचा तो अल्लड स्वभाव तिला अगदी सुखावून गेला ..किती नटखट होता ना तो ? माझ्यासाठी काय काय करायचा हे सर्व तिला जेव्हा आठवू लागलं तेव्हा ती काही आनंदी क्षणात हरवून गेली आणि बेचैनीची जागा आनंदाने घेतली ..तो प्रत्येक क्षण तिला सुखावून जात होता आणि ती त्यात हरवून गेली ...काही वेळ तरी ती त्याचाच विचार करत तिथे बसली आणि शेवटी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर येऊन ती घरी पोहोचली ..आज तिची ह्या शहरात शेवटची रात्र असल्याने तिने संपूर्ण घर डोळ्याखालुन काढल आणि झोपी गेली..
दुसरा दिवस उजाळला ..मृणालच आपलं म्हणावं अस आता या शहरात काहीच उरलं नव्हतं ...त्यामुळे तिने आजच मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला ..सकाळ झाली आणि तिने एकदा घरातला कोपरा नि कोपरा डोळ्याखालून घातला ..तीच मन आताही घर सोडून जायला तयार नव्हत ..पण हृदयावर दगड ठेवत तिने तिथून पाय काढला ..तिने जणू ठरवलच होत की यानंतर ती कधीही इथे येणार नाही त्यामुळे घराच्या किल्ल्या सुरजला सोपवून ती निघाली ..जातानाही तिची नजर आताही घराकडेच होती ..अजिंक्यसोबतचे सुंदर क्षण तिने या घरातच काढले होते त्यामुळे त्यापासून दुरावतना तिला फारच त्रास होत होता तरीही ती निघाली एका सुंदर प्रवासासाठी .अशक्यप्राय वाटणार काम म्हणजे .....एक अजिंक्य न शोधताच तिला सापडला होता पण आता तिला बऱ्याच अजिंक्यना तयार करायच होत आणि ती त्यासाठी सज्ज झाली ..तिथून निघतानाच तिने रियाला फोन करून घरी बोलवून घेतले होते ..मृणालने आपले कपडे काही वस्तू आणि अजिंक्यचा फोटो बॅग मध्ये भरून घेतले ...तोपर्यंत रियाही घरी पोहोचली होती ..नागपूरहुन फ्लाइट पकडायला उशीर होईल म्हणून रिया तिला घाई करत होती तर मृणालचा पाय मात्र घरातून निघत नव्हता ..दोघीही फार भावुक झाल्या होत्या तरीही दोघांनी एकमेकांना कसतरी सावरुन धरलं..आता अश्रू हे आयुष्यभरासाठीच होते ..त्यामुळे ते गाळून तिला स्वतःला कमजोर करून घ्यायच नव्हतं ..अखेर मृणाल आपल्या जुन्या आठवणी घेऊन स्वप्न नगरीसाठी निघाली ..नागपूरला जायला आणखी 3 तास लागणार होते..रिया कार चालवत होती आणि मृणाल मागे पडणाऱ्या प्रत्येक झाडासोबत आठवणीत हरवत गेली ..गाडी चालवताना भयानक शांतता होती ..रियाने ती शांतता मोडीत काढण्यासाठी गाडीत गाणे लावण्याचा प्रयत्न केला पण मृणालच्या भेदक नजरेने तिला तीच उत्तर दिलं ..मृणालला आज फक्त शांत राहायचं होत ..आईने अस का केलं असेल याबाबत ती विचार करत होती ..विचार करता करता तिला समजलं की जस आपण म्हणत होतो की आपल्यामुळे अजिंक्य हे जग सोडून गेला आहे तसच त्यांनाही वाटलं असेल म्हणूनच कदाचित त्यांनी हा पर्याय निवडला ..मीही तर विचार केला होता की आत्महत्या करावी पण माझ्यासोबत अजिंक्यचे विचार होते त्यांच्यासोबत कोण होत जे त्यांना सांगू शकेल की काहीही झालं असल तरी मी तुमच्यासोबत आहे...शिवाय आपला मुलगा आपल्यामुळेच मरण पावला हे कुणाला सहन होणार असे कितीतरी प्रश्न त्यांना पडले असेल म्हणून कदाचित ते हे जग सोडून गेले असतील ..संपूर्ण 3 तास तिच्या डोक्यात तेच ते विचार सुरू होते ..आणि तिला त्यातून बाहेर येन कठीण जात होतं ..शेवटी रियाने गाडी पार्क केली आणि तिच्या लक्षात आलं की आपण एअरपोर्टवर आहोत आणि ती शांतपणे तिकीट घ्यायला समोर जाऊ लागली ..तिकिट घेऊन झालं होतं आणि आता काही क्षणात मृणाल पुन्हा मुंबईला जाणार होती ..ती कायमचीच ..बऱ्याच वेळ शांत बसलेल्या रियाला फार भरून आलं होतं आणि ती अलगद मृणालला मिठी मारत म्हणाली , " तू अशा स्थितीत आम्हाला सोडून जाशील अस कधीच वाटलं नव्हतं ..खर सांगू तर फार भरून आलंय मला त्यामुळे स्वतःच्या भावना व्यक्तही करता येईना ..मला माहित आहे मृणाल तू खंबीर आहेस तेव्हा तुला कुणाची गरज भासणार नाही पण कधी गरज पडली तर विसरू नको मी आहे आणि जर कधी वाटलंच की तू एकटी आहेस तर स्वतःचे डोळे बंद कर ..तुझ्या मनात , विचारात तो सदैव आहे हे विसरू नको ..तुझं प्रत्येक उत्तर फक्त तोच आहे ..असो मी असच बोलत बसले तर तुला जाऊ देणार नाही सो लवकर निघ .." मृणाल रडण्याऐवजी तिच्याकडे हसून पाहत होती..एक एक पाऊल टाकत मृणाल समोर जात होती आणि रियाच्या डोळ्यातून नकळत अश्रू बाहेर येत होते ..जाताना मृणालने समाधानाची एक स्माईल दिली आणि रियाच्या चेहऱ्यावर आनंदाचे संमिश्र भाव झळकू लागले आणि दोघीही एकमेकांना बाय करून आपापल्या वाटेला निघाल्या ..


************
मृणालची फ्लाइट मुंबई एअरपोर्ट वर लँड झाली होती ..ती मुंबईला आली तर होती पण काकूंना काय उत्तर द्यावे याबद्दल तिच्या मनात सतत विचार सुरू होते..काकूंना मृणालच्या मनातलं अगदीच चोख कळत होतं त्यामुळे हे सर्व सांगू की नको असे बरेच प्रश्न तिच्या मनात होते ..टॅक्सीमधून जातानाही तिच्या डोक्यात हेच विचार सुरू होते.." दीदी आश्रम आ गया है " , या शब्दांनि तिची तंद्री भंग झाली आणि टॅक्सी वाल्याला पैसे देऊन ती खाली उतरली..काकूंपासून काही लपवायच नाही हा विचार तिने मनात पक्का केला आणि अगदी खंबीर मनाने ती आत जाऊ लागली ..ती आता पोहोचली तरी तिला कुणीच दिसलं नव्हतं ...अस फार कमी वेळ व्हायचं की काकू समोर बसली नसायची ..समोरून स्मिता काकू येत होती ..स्मिता काकूंना मृणाल दिसताच ती आनंदाने मृणालकडे धावत आली ..तिने मृणालच्या हातून तिची बॅग घेतली आणि समोर चालू लागली ..मृणालला राहवलं नाही आणि तिने विचारलं , " स्मिता काकू कुमुद काकू कुठे गेल्या ? एव्हाना त्या तर इथेच बसून असतात .." आणि काकू उतरल्या , " मृणाल माफ कर ..ताईची बऱ्याच दिवसापासून तब्येत खराब आहे ..वय झालं आहे न त्यांचं म्हणून आता झोपूनच असतात मी म्हणाले त्यांना की मृणाल - अजिंक्यला सांगू पण तुम्हाला त्रास नको म्हणून त्यांनी सांगायला नकार दिला ...बिचारच वय झालं आहे ना तर आता झटके सहन होणार नाहीत म्हणून आतच झोपून असते .." तिचे शब्द ऐकावे आणि मृणाल जाग्यावरच उभी झाली ..एव्हाना स्मिता काकू बॅग घेऊन बेडरूमला पोहोचल्या होत्या ..मृणालला कळून चुकलं होत की आता त्याना अजिंक्यबद्दल काहीच सांगू नये ..उलट त्यांची जास्तीत जास्त सेवा करावी ..आज त्या पण निघून गेल्या की मला बाकीच कोण राहणार म्हणून तिने शांत राहायचं ठरवलं .काकूंच्या रूममध्ये जाण्यापुर्वी तिने स्वतःची अवस्था ठीक केली आणि आत पोहोचली ..काकू निवांत पडून होत्या ..अंगावर चादर ओढलेल्या त्या वृद्धापकाळाने फारच खचल्या होत्या ..मृणाल त्यांच्या पायाजवळ जाऊन त्यांचे पाय चेपू लागली आणि नेमकं त्याच वेळी काकू उठल्या ..समोर मृणालला बघून त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही आणि त्यांनी तिला बघताच मिठीत घेतले ..मृणालनेही आपली मिठी सैल केली ..काकूना काय झालं माहिती नाही पण आज खूप दिवसांनी त्या इतक्या भावुक झाल्या होत्या ..तर मृणालच्या डोळ्यातही अश्रू होते..काही वेळ मृणालला मिठीत ठेवल्यावर काकू म्हणाल्या , " का ग एकटीच आली आहेस माझ्या नातीला आणि मुलाला सोबत आणलं नाहीस ? " काकूंच्या प्रश्नाने तिची अवस्था पाहण्याजोगी झाली ..तिचा चेहरा बरच काही सांगत होता ..काकूंना काही कळू नये म्हणून तिने चेहऱ्यावरचे भाव बदलले ..आणि हसत म्हणाली , " काय आई तुझा लेक आणि नात फार व्यस्त असतात त्यामुळे मलाच पाठवलं त्यांनी ..म्हणाले जा आणि माझ्या आइची काळजी घे ..मीही संधी शोधत होतेच आणि आले लगेच निघून ..शेवटी आईला भेटायचं होत न मला .." मृणालच्या अशा गमतीशीर स्वभावासमोर ती हसणार नाही असं होऊच शकत नाही ..मृणालने बोलता - बोलता अजिंक्यचा विषय वळविला आणि काकुशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारू लागली ..आज कितीतरी दिवसांनी काकू इतकं मनमोकळं हसल्या होत्या ..तिच्या येण्याने वातावरण कस प्रफुल्लित झालं होतं ..अगदी आजूबाजूचे सर्व गप्पात सामील झाले होते आणि मृणाल सर्वाना हसवू लागली ...मृणाल इथे सर्व काम पाहायला आली आहे म्हटल्यावर काकूंच्या आनंदाला सीमा नव्हती ..आज कितीतरी दिवसांनी आश्रम पुन्हा खुलुन निघालं होत आणि काकूंच्या चेहऱ्यावरचा तो थकवाही नाहीसा झाला ..त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळ चालल्या ..एव्हाना सायंकाळची रात्र झाली ..डॉक्टरांनी काकूंना आराम करायला सांगितलं असल्याने मृणालने त्याना औषध देऊन झोपायला सांगितले आणि शहाण्या बाळासारखं ती झोपीही गेली ..
रात्रीचे साडे अकरा वाजले होते ..मृणाल दिवसभर थकली होती तरी तिला झोप काही येईना ...दुपारी तिने काही खाल्लं पण नव्हतं ..कदाचित तिला काकूंशी बोलूनच समाधान मिळालं होतं पण आता मात्र तिला झोपच येत नव्हती ..तिच्या डोक्यात काय आल माहिती नाही पण तिने आपली पर्स घेतली आणि सरळ निघाली ..समोर चौकात गेल्यावर तिने टॅक्सी घेतली आणि कुठला तरी पत्ता तिने चालकाला सांगितला..चालकाने होकार दिल्यावर ती आतमध्ये बसली आणि टॅक्सी समोर समोर जाऊ लागली ..आज खूप दिवसांनी ती इतक्या रात्री मुंबईत फिरत होती ..तिला कधी या शहरात भीती तर वाटलीच नव्हती पण आज फिरताना उत्साहसुद्धा नव्हता ..ती आपल्याच विचारात गुंग होती ..कधीतरी नशा करून रात्रभर बाहेर फिरणारी ती आज इतकी बदलेल अस कुणाला स्वप्नातसुद्धा वाटलं नसत ..एक वैश्या प्रेम करू शकते का ? कुणावर जीव लावू शकते का ? संसार करू शकते का ? असे बरेच प्रश्न सर्वाना पडत होते पण तिने ते सर्व सिद्ध करून दाखवलं होत..मृणालच्या जागी दुसरी कुणीही असती तर इतकी सहनशील असती का हाही विचार करण्यासारखाच प्रश्न होता ..मृणाल आपल्या विचारातून बाहेर आली तेव्हा ती कुठेतरी उतरली होती ...समोर भव्यदिव्य असा महाल होता ..ती समोर पोहोचली तेव्हा तिला गार्डने थांबविले पण अजिंक्यची पत्नी सांगितल्यावर मात्र त्याने तिला रोखले नाही ..मृणाल प्रवास करून पोहोचेपर्यंत साडे बारा वाजले होते ..मृणाल दाराजवळ जाऊन बेल बाजवू लागली ..पण आतून कुणीच उत्तर दिलं नाही ..काही क्षण थांबून पुन्हा तिने बेल वाजवली आणि आतून एक मुलगी आली ..ती होती निशा ..मृणालला समोर पाहताच निशा म्हणाली , " मृणाल तू इथे आणि ते पण यावेळी ? " मृणाल उत्तर देण्याऐवजी फक्त हसली ..निशाला तिचा हा स्वभाव समजला नाही पण आपण मृणालला आत घेतलं नाही हे लक्षात येताच तिने आधी मृणालला आत मध्ये घेतलं ..मृणालच्या चेहऱ्यावरून हे तरी नक्कीच लक्षात आलं होतं की काहीतरी नक्की झालंय पण सरळ विचारणं तिला पटलं नाही आणि वेळ मारून नेण्यासाठी ती म्हणाली , " घरी कुणीच नाही आहे ना म्हणून मी लवकर जेवून घेतलं तू सांगितलं असत तर मी थांबले असते की तुझ्यासाठी..हरकत नाही ..मी वाढते थांब तुला .." निशा समोर जाणारच तेवढ्यात मृणाल म्हणाली , " जेवण नको पण कॉफी घेऊन ये आपण तुझ्या रूम ला बसू ..चालेल ना ? " ..निशा मृणालला आश्चर्याने पाहत होती ..निशाच आताच जेवण झालं असल्याने तिला कॉफी घ्यायची इच्छा नव्हती पण फक्त मृणालसाठी ती कॉफी घ्यायला तयार झाली होती ..मृणाल निशाच्या रूममध्ये बसून होती आणि निशा कॉफी घेऊन वर बेडरूमला आली ..मृणाल त्यावेळी विचारात हरवली होती त्यामुळे निशा जवळ आली तरी तिला काहीच भान नव्हतं ..निशाने तिला हात लावला तेव्हा ती भानावर आली .." मृणालने कॉफीचे एक दोन सिप घेतले असतीलच तेव्हाच निशा म्हणाली , " आता बोल ..मला माहित आहे काहीतरी सिरीयस झाल आहे त्याशिवाय तू यावेळी येणार नाहीस फक्त काय आहे ते तू सांग ? "

निशाचे शब्द पूर्ण होणार नाहीत तेवढ्यातच मृणाल लगबगीने म्हणाली , " अजिंक्य हे जग सोडून गेला .." निशाला काय बोलाव तेच कळत नव्हतं ..तिने कॉफीचा कप खाली ठेवला आणि स्वतःला सावरत म्हणाली , " मस्त गंमत करतेस तू !!आज एप्रिल फुल आहे का ? आणि मीच भेटले तुला बनवायला ? " ..निशाने शब्द बोलावे आणि मृणालच्या डोळ्यातून पाणी वाहू लागल ..तिचे अश्रू पाहून निशाला पटलं की ती खरच बोलते आहे ..तिच्याही डोळ्यात नकळत अश्रू आले आणि ती घाईघाईने म्हणाली , " कस काय घडलं हे आणि केव्हा ? मला कुणी काही सांगितलं कस नाही ?..प्लिज बोल ना मृणाल .." मृणालने स्वतःला सावरत डोळ्यातले अश्रू पुसले ..तिला हुंदके आवरत नव्हते तरीही ती बोलू लागली तर निशा सर्व कान देऊन एकत होती ..मृणाल तिला समीर आल्यापासून सर्व सांगू लागली आणि निशाचे डोळे आणखीच पाणावले ..मृणाल आपल्या वेदना लपवत घडलेलं सर्व व्यक्त करीत होती आणि निशा तिच्या प्रत्येक शब्दात गुंतत गेली ..शेवटी मृणाल ने अजिंक्यच्या अपघाताबद्दल सांगितले तेव्हा मात्र निशाला राहवलं नाही ..आतापर्यंत स्वतःला सावरुन बसलेली निशा आता मात्र जोरा जोराने रडू लागली ..मृणालला तिला अस बघून फार वाईट वाटत होत पण तिने थांबविण्याचा प्रयत्न केला नाही ..साडे बाराचे तीन वाजले होते पण तिचा आक्रोश काही कमी झाला नाही ..शेवटी मृणालने तिला सावरलं आणि मृणालने उरलेला सर्व प्रवास व्यक्त केला ..निशाचे अश्रू होते की थांबायच नाव घेत नव्हते ..आणि पुढे मृणाल म्हणाली , " सॉरी निशा सर्व काही अचानक घडलं की तुला सांगता आलंच नाही ..माझीच अशी स्थिती होती की मी कुणाला काहीच सांगू शकले नाही ..आणि नंतर जाणवलं तेव्हा हिम्मत गोळा करू शकले नाही पण आता तुला सांगण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून निघून आले ..मला माहिती आहे तुला हा धक्का पचणार नाही पण हे सत्य आहे की तो आता सोबत नाही। ..." निशाचे अश्रू आताही थांबले नव्हते ..तिला अजिंक्य आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नव्हता त्यामुळे ती काहीच बोलली नाही ..तिला अस पाहून मृणाल म्हणाली , " निशा सर्वांनी मलाच चुकीचं ठरवलं ..तुलाही वाटत का ग मी चुकीची आहे असं आणि तुलाही मी वैश्या असल्याने फरक पडत असेल तर मी पुन्हा इथे कधीच येणार नाही .."

तिच्या अशा शब्दांनी निशाच्या मनावर घाला घातला आणि आतापर्यंत शांत असलेली निशा म्हणाली , " बिलकुल नाही उलट अभिमान वाटतो आहे तुमचा ..मला कधी वाटलं नव्हतं की अजिंक्य प्रेमासाठी इतकं काही करू शकेल ..मान गये बॉस आपको ..खर सांगू मला न अभिमान आहे तुमचा ..काय वैश्या आणि काय आपण ..स्त्री ही स्त्रीच असते ..ती स्वतःहून तर शरीर विकत नाही ..आणि मला न हसू येत या समाजावर ..जेव्हा एक पुरुष आपली भूक भागविण्यासाठी वैश्येकडे जातो तेव्हा तो प्रतिष्ठा जपतो आणि जेव्हा एक स्त्री परिस्थितीनुसार वैश्या बनते तेव्हा हाच समाज तिला नाव बोट ठेवतो ..मग मला हा प्रश्न पडतो की त्या पुरुषाला या समाजात प्रतिष्ठा आहे तर तुझ्यासारख्या मुली जर सर्व काही सोडून संसार करू शकत असतील तर हेच लोक का आपल्यावर बंधन घालतात ..ते खरच दुधाने धुतले आहेत का ? अजिंक्यचा निर्णय मला फार आवडला ..आणि मृणाल आज जर तो इथे असता ना तर तुझ्यासमोर मी त्याला मिठी दिली असती ..प्रेम कराव तर अस ..सो हे गिल्ट काढून टाक तो तुझ्यामुळे जग सोडून गेलाय ..चल आता हस नाही तर अजिंक्य वरून म्हणेल या बायकांना फक्त रडण्याच कारणच हवं असत ..भेटलं कारण की झाल्या सुरू .." निशाच्या अशा बोलण्याने दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आलं ..जिकडे समाजाचा एक भाग त्यांना विरोध करत होता तिथेच एक भाग त्यांना सपोर्ट करतोय हे पाहून तिला जीवन जगण्याची नव्याने आशा निर्माण झाली फक्त ती निशाला यातलं काही सांगू शकली नव्हती ..पहाट व्हायला आली आणि बोलता बोलता दोघी केव्हा झोपल्या ते कळलंच नाही ..

अगदी दुसऱ्या दिवसापासूनच मृणाल जोमाने आपल्या कामाला लागली ..काकूंनी तिला काय काय करायचं असत ते सर्व समजावून सांगितलं आणि ती रात्रंदिवस त्या मुलांच्या भविष्यासाठी झटू लागली ..काकू मृणालला अजिंक्यबद्दल विचारायची पण तो बाहेर गेला आहे असं सांगून ती बोलणं टाळत असे ..काकू वारंवार तिला हाच प्रश्न विचारत असल्याने तिने आश्रमात लवकर परत येन टाळलं होत ..मृणाल इतक्या तत्परतेने काम पाहत आहे म्हणून काकुही फार खुश झाल्या शिवाय तिला वेळ मिळेल तेव्हा ती काकूंची काळजी घ्यायची ..अगदी औषधापासून जेवणापर्यंत सर्व काही तीच बघायची ..काकू तिला ओरडली तरी ती मात्र काकुंच एकत नव्हती ..काकूंना मृणालच प्रेम लाभलं आणि ती पुन्हा एकदा सुधारू लागली ..आता ती कमीत कमी उठून बसू लागली होती ..मृणाल सतत कामात व्यस्त असल्याने तिला जुन्या गोष्टींचा विचार करायला वेळ मिळतच नव्हता आणि तिच्या डोळ्यातले अश्रू जणू हरवले ते कायमचे ..

अनाथ आश्रमात काम करीत असताना तो वेळ तर देऊ शकत होती पण पैसे मात्र अपुरे पडायचे ..मुलांचं शिक्षण पाहता यावं म्हणून तिने आपला मुंबईचा फ्लॅट विकून काढला त्यामुळे शिक्षणाची सोय तर आटोपली ..पण त्यांना सोयीसुविधा देताना मात्र पैशाची कमी पडत होती ..यावर उपाय म्हणून निशा समोर आली ..निशा स्वतः तर पैसे पुरवत होती पण त्यासोबतच तिने आपल्या बाबांच्या काही मित्रांशी भेटून पैशाबद्दल बोलणी केली होती आणि ते पण तयार झाले ..निशाही घरी बसून कंटाळली असे अशा वेळी तिला मृणालची मदत करताना फार आनंद होत होता ..फिल्ड मध्ये काम करत असताना पून्हा त्यांना एका प्रश्नाने हैराण केलं की वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना काम मिळत नाही म्हणून निशाने स्वतः आपल्या कंपनीत त्यांना जॉबसाठी काही राखीव सीट्स ठेवल्या आणि त्यांना अगदी समजण्याच्या वयापासून ऑफिसच्या गोष्टी शिकविल्या जात होत्या ..फक्त काही दिवसातच मृणाल निशाने आश्रमाचा कायापालट केला होता ..जेव्हा तरुण पिढी आपलं पूर्ण एफर्ट्स या कामात देते तेव्हा काय काय करू शकते हे काकू फार जवळून पाहत होत्या ..

मृणाल सुरुवातीला आल्यावर फार उदास राहत होती पण अलीकडे मात्र तिला स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता ..काकुही आश्रमाचे काम बसल्या बसलीच पाहू लागली आणि मृणालच टेन्शन थोडं कमी झालं ..मृणालला एखाद बाळ फेकून दिल्याची माहिती मिळाली की ती वेळ न बघता कार घेऊन तिथे जात असे आणि त्या लहान लहान मुलांची आपल्या जीवापेक्षाही जास्त काळजी घेत असे ..इतकं सर्व घडत असताना मृणाल प्रज्ञा - अजिंक्यबद्दल एक शब्द देखील काढत नाही याचं काकुला आश्चर्य वाटत होतं आणि तिने न राहवुन विचारलं ..काकूंची तब्येत बऱ्यापैकी सुधारली होती आणि आता मृणालला सर्व सांगण्यावाचून पर्याय नव्हता त्यामुळे तिने काळजावर दगड ठेवून तिला घडलेलं सर्व सांगितलं ..काकुला हा धक्का अगदी पचनार की नाही याबाबत मृणाल सांशक होती ..पण ही सर्व हकीकत सांगताना मृणालच्या डोळ्यात एकही अश्रू नाही हे पाहून काकूने स्वतःला सावरलं ..नक्कीच आपला मुलगा आपल्याला सोडून गेला म्हणून त्या पुन्हा आजारी पडल्या पण जिचा जीव या जगातून जाऊनसुद्धा ती इतक्या हिमतीने दररोज लोकांसाठी जगते हे पाहून काकूने स्वतःला सावरलं ..सुरुवातीला मृणालवर नाराज असलेल्या काकू तिच्या छोट्यात छोट्या कामात मदत करू लागल्या ..या सर्व काळात मृणाल आपला भूतकाळ जणू विसरूनच गेली होती .अजिंक्य आठवणीत होता आणि तो सदैवच राहणार होता ..पण आपल्याला एक मुलगीही आहे हे मृणाल अगदी विसरूनच गेली होती..आपल्याला समाजात आणखी अजिंक्य घडवायचे आहे या जिद्दीने ती पेटली होती आणि ती आता कधीच विझणार नव्हती त्यासाठी ती रात्रंदिवस झटत होती ..या सर्व काळात ती इतकी खंबीर झाली की दुखानी सुद्धा तिच्या आयुष्यात येण्यास नकार दिला होता ..अजिंक्य जाऊन आता दीड वर्ष झाले होते ..

आज सकाळपासूनच आश्रमात टेलिफोन वाजत होता आणि त्यावर मृणाल आहे का हा एकच प्रश्न विचारल्या जात होता पण ती फोनवर काही आली नव्हती ..सकाळची रात्र झाली तरीही स्थिती तीच होती ..शेवटी रात्री 9 वाजता फोन पुन्हा एकदा लावल्या गेला आणि तो फोन मृणालने उचलला आणि ती म्हणाली , " सॉरी मी बाहेर होते ..काकूंनी सांगितलं की तुम्ही सकाळपासून फोन करत आहात ? काही काम होत का ? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं नाव काय ? ", तर समोरून मुलगी म्हणाली , " अग मृणाल मी रिया ..तुझा सेल बंद आहे म्हणून मी इथे कॉल लावला तर तू होतीच नाहीस .." आणि मृणाल डोक्याला हात म्हणाली , " सॉरी सॉरी अग मोबाइल डेड झाला होता म्हणून व्हय ते ..बोल ना तू इतके फोन का केलेस मला ? सर्व काही ठीक आहे ना ? " आणि रिया लांब श्वास घेत म्हणाली , " मृणाल मला आधी वचन दे की मी फोन कट केल्याशिवाय तू फोन ठेवणार नाहीस ..दे वचन !! " मृणाल तिच्यावर हसत म्हणाली , "लहान आहोत का अस वागायला ? .. बर बाई दिल वचन आता तरी बोला .."

आणि रिया बोलू लागली , " मृणाल तुला माहिती नाही पण अजिंक्यने जाण्यापूर्वी माझ्याकडून एक वचन घेतलं होतं की तो गेल्यानंतर मी तुझी आणि प्रज्ञाची काळजी घेईल ..तू तर आता ठीक आहेस पण प्रज्ञाबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे ..अजिंक्य गेल्यानंतर काही दिवसानंतर प्रज्ञा तुमच्या घरी गेली होती .बहुतेक ती तुला भेटायला आली होती पण तू नव्हतीस म्हणून ती परत आली ..त्यानंतर खरी कथा सुरू झाली ..सलीलच्या घरच्यांनी प्रज्ञाला प्रेमाने नाही तर स्वार्थाने स्वीकारलं होत ..सुरवातीला ते छान वागले तिच्याशी पण नंतर सर्व काही बदलत गेल ..सलीलच्या बाबांना आपल्या मुलाचं लग्न त्याच्या मित्राच्या मुलीशी लावून द्यायचं होत ..त्यामुळे त्यांनी दोघांनाही घरी बोलाविल ..त्यांना प्रज्ञाला घरातून काढायचं होतच आणि त्याच वेळी ती वैश्येची मुलगी आहे असं त्यांना समजलं ..संधीच्या शोधात असलेल्या त्यांनी याचा फायदा उचलला ..सलील प्रज्ञावर प्रेम करीत होता ..पण काम धंदा मात्र करीत नव्हता तेव्हा ते दोघेही त्यांच्या घरच्यांवर अवलंबून राहिले ..पण त्याच्या घरच्यांनी वेळ बघून प्रज्ञाला खर्चासाठी पैसे देणे बंद केले आणि आपल्या मुलाचा हट्ट मात्र पूर्ण करीत राहिले ..प्रज्ञाला जगण्यासाठी पैसे मिळत नसल्याने ती सलीलला ओरडू लागली आणि त्यांच्यात भांडण सुरू झाली ..याचा फायदा घरच्यांनी घेऊन त्याला चढवायला सुरुवात केली ..त्याचा परिणाम असा झाला की दोघात वाद विकोपाला गेले ..नेमकं त्याच वेळी त्यांनी सलीलला मित्राच्या मुलीशी लग्न करायला सांगितले ..सलीलने सुरुवातीला नकार दिला पण प्रज्ञाच्या कटकटीसमोर त्याने घरच्यांचं म्हणणं एकल आणि लग्न केलं..दुसरं लग्न केल्यावर सलील मात्र तिला रोज मारू लागला ..आणि त्याची दुसरी बायकोही तिला त्रास देऊ लागली ..त्यांना आता घरात प्रज्ञा नको होती म्हणून सलीलला चढवून त्यांनी तिला घरातून बाहेर फेकून दिल ..ती फक्त एकटीच बाहेर गेली नाही तर तिला 2 महिन्याची मुलगी आहे ..मी त्यांना बरंच शोधण्याचा प्रयत्न केला मृणाल पण ती नाही सापडली .."

रिया पटापट सर्व काही बोलून गेली होती आणि आता मृणालच्या उत्तराची वाट पाहू लागली ..मृणाल उसासा घेत म्हणाली , " झालं तुझं बोलून ठेवू मी फोन .." रियाला मात्र आता तिचा राग आला नि ती म्हणाली , " तू अस कस वागू शकतेस मृणाल आई आहेस न तू ? " , आणि आतापर्यंत शांत असलेली मृणाल जोर्याने ओरडत म्हणाली , " तिने माझ्या नवऱ्याला खाल्लं हे मी कस विसरू रिया ..आज फक्त तिच्यामुळे तो माझ्या आयुष्यात नाही आहे आणि तू मला विचारते आहेस ? ..तिला तिची शिक्षा मिळाली आहे ..आता ती जगू दे की मरू दे मला काहीच फरक पडत नाही आणि पुन्हा कधी फोन करशील तर मला प्रज्ञाच नाव पण ऐकायचं नाही हे लक्षत घे ..तीच तोंड पण बघायची माझी इच्छा नाही .."

मृणाल इतकी रागात होती की तिने रियाच बोलणं एकन्यापूर्वीच फोन जोरानी आपटून ठेवून दिला..
मृणाल इतक्या जोराने ओरडली होती की तिला सर्व पाहत होते हे तिच्या लक्षात आलं नाही ..आज खूप दिवसांनी पून्हा जुने घाव ताजे झाले होते ..आणि तिला ते सर्व असह्य झालं ..तिने लगेच बेडरूमच दार लावून घेतलं आणि आतमध्ये एकटीच रडत बसली ..आज रियाने पुन्हा अजिंकच्या आठवणी काढून तिला त्रास दिला होता ...तिने या काळात प्रज्ञाच नाव पण काढलं नव्हतं आणि तीच नाव एकूण मृणालचा मूडच खराब झाला होता ..त्यामुळे आज ती फार रडत होती ..सुमारे एक तास तिने दार उघडलं नव्हतं ..तिचे रडून रडून डोळेही सुजले होते..बऱ्याच वेळाने ती बाहेर आली ..काकूंना औषध द्यायचं असल्याने ती सरळ त्यांच्या रूममध्ये गेली ..काकुही तिला बरच काही विचारत होत्या पण तिने उत्तर देणं टाळलं होत ..आज तिच्याकडे सर्व शंकेच्या नजरेने पाहत होते त्यामुळे ती कुणाशीच नजर मिळवू शकली नाही ..त्यामुळे आज जेवण न करताच ती झोपायला गेली ..हळुहळु अंधार वाढू लागला होता ..मृणालने स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलं आणि आजूबाजूला अंधार करून निवांत बसली ..प्रज्ञाबद्दल एकूण तिला फार वाईट वाटलं होतं ..एक आई म्हणून तीच मन तिला सांगत होत की प्रज्ञाला माफ करावं पण जेव्हा अजिंक्यबद्दल विचार आला तेव्हा मात्र ती तो राग विसरू शकली नाही ..आज तिच्यामुळेच अजिंक्य तिला सोडून गेला होता ..अजिंक्यला शेवटच रडताना तिनेच एकल होत आणि तो त्यावेळी फार तुटला होता त्यामुळे प्रज्ञाला माफ करण्याचा विचार तिच्या मनात सुदधा नव्हता ..पण आज विचारांनी जणू गोंधळ घालायला सुरुवात केली ..तीच मन काहीतरी वेगळं सांगत होत आणि डोक काहीतरी वेगळंच सांगत होत ...अजिंक्यचे शेवटचे शब्द तिला फार त्रास देते होते ..सकाळ पासून फार टाकल्याने तिला केव्हा झोप लागली तिलाच कळले नाही ..पहाटेचे 5 वाजले होते .. एक आवाज मृणालच्या कानावर आला .." मृणाल तू चुकीची आहेस अस मला अजीबात म्हणायचं नाही पण तुला नाही वाटत माझ्या आईबाबांनी जी चूक केली तीच चूक तुही करते आहेस ? ..माझा अपघात होन आणि तीच मला बोलणं यात काहीही संबंध नाही ..भला कभी कौवे के श्राप से आदमी भी मरता है ..हा फक्त योगोयोग आहे ..तुला कदाचित लक्षात आलं नसेल पण यात सर्वात मोठी चूक आपलीच आहे ..आपणच जर सर्वाना विश्वासाने सांगितलं असत तर ही वेळ आलीच नसती ..शिवाय प्रज्ञा वागली त्याला मी सपोर्ट करणार नाही पण मी तिला चुकीचं पण म्हणणार नाही ..कारण ज्या वयात ती गोंधळली होती त्या वयात तिला कुणीतरी विश्वासात घेऊन सांगणं गरजेचं होतं ..दुर्दैवाने तिला चांगलं संगणात कुणी भेटलं नाही आणि ती चुकीच्या वाटेवर गेली .अगदी त्याच वेळी सलील आयुष्यात आला आणि त्याला गमावण्याची भीती तिला वाटू लागली ..साहजिकच आज तू माझ्यासाठी तिचा राग करते आहेस ..मागे तिने सलीलसाठी आपला राग केला ..मृणाल इगो दाखवून क्षणात नात संपवन खरच सोपी आहे पण त्याग करून ते नात स्वीकारणं यातच मोठेपण असत ..तिला त्या वयात कळत नव्हतं म्हणून ती तशी वागली पण आपण तर समजदार आहोत ना मग आपण पण असच वागायचं ? मग काय फरक आहे तिच्यात आणि आपल्यात ? ..हे मान्य की तिने जगातल्या सर्व आईवडिलांना दुखावलं पण तू तिला नाकारून एक नाही दोन जीवांना त्रास देते आहेस .प्रज्ञाच्या मुलीची यात काय चूक ? मृणाल आज तू प्रज्ञाला नाकारलस तर तुला कुणीच चुकीचं समजणार नाही पण तुझ्या निर्णयामुळे पुन्हा दोन मृणाल जन्माला येतील आणि त्याच्या माध्यमातुन आणखी किती येतील याचा अंदाज नाही आणि आज तू मोठेपण दाखवून स्वीकारलंस तर दुसरी मृणाल कधीच जन्माला येणार नाही ..प्रत्येक वेळी पुरुषाने स्त्रियांना वाचवन गरजेचं नाही..एक स्त्री सुद्धा स्त्रीला वाचवू शकते ..बघ मृणाल आता सर्व तुझ्यावर आहे तू सांग की तुला आणखी मृणाल जन्माला घालायच्या आहेत की आपला हट्ट बाजूला सोडून एका मृणालला नव्याने जगायला शिकवायचं आहे ..मी तुला वचन दिल होत की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही ..आणि हे वचन मी नक्कीच पूर्ण करेन ..तुझा निर्णय काहीही असला तरीही .." मृणाल आवाज ऐकून पटकन झोपेतून उठली ..तिला लक्षात आलं की आपल्याला स्वप्न पडलं होतं आणि अजिंक्यचा प्रत्येक शब्द तिच्या कानात घुमू लागला ..आता ती काय करणार यावरच सर्वांच आयुष्य अवलंबून आहे ..

क्रमशः ..

( आपण ज्याची वाट पाहत होतो तो क्षण शेवटी आला ..पुढचा भाग हा शेवटचा भाग असेल ..आतापार्यंत आपल्याला वाटत होतं की ही कथा आईवडील आणि मुले यांच्या संबंधावर आहे पण ही कथा त्या विषयावर कधीच नव्हती ..यांकथेचा मुख्य विषय वेगळा आहे आणि तो पुढच्या भागात आहे ..मी नक्कीच सांगू शकतो की तुम्ही विचार करत आहात तो शेवट नक्कीच आहे ..उलट तुम्ही त्याची कल्पनासुद्धा केली नसेल ..त्यामुळे थोडा सांशक आहे की शेवट आवडेल की नाही ..मी ते तुमच्यावर सोडतो ..पण मी कथा संपल्यावर लेखक विचार अस शीर्षक खाली देऊन त्यात काही विचार मांडणार आहे ..त्या विचाराशिवाय कथा पूर्णच होऊ शकत नाही ..तेव्हा ते विचार आधी वाचा आणि मग काय ते ठरवा आणि प्रेम श्रेयसी या जागी मृणाल अजिंक्य हे नाव का ठेवलं याच उत्तर पण शेवटच्या भागात नक्कीच मिळेल ..तो विषय कोणता हे जाणून घेण्यासाठी नक्कीच शेवटचा भाग वाचा ..आणि लेखकाचे विचार पण वाचा ..)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED