कादंबरी - जिवलगा ...भाग -१८ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा ...भाग -१८

कादंबरी जिवलगा

भाग – १८ वा

----------------------------------------------------------

सकाळी नेहमीप्रमाणे घाईघाई –झालीच ,मधुरीमाशी बोलण्यास ,गप्पा करण्यास वेळ मिळाला नाही.,

तिचा निरोप घेतांना नेहा म्हणाली ..

चल बाई, मी निघते आता , आपण बोलू नंतर ..

आता महिना-अखेरची कामे आहेत , गेल्या आठवड्यात माझ्याकडे ऑफिस –स्टाफ आणि ऑफिस

रिलेटेड पेमेंट सेक्शन दिलय , इतक्या मोठ्या ऑफिसात रोज काही ना काही तरी ..पेमेंट असतातच.

उद्यापासून नव्या महिन्याचा पहिला आठवडा तर खूप हेवी वर्कलोड असेल म्हणे माझ्या सेक्शनला ,

दहा हजार रुपये पर्यात्न्चे सगळे किरकोळ –खर्च” त्यांची बिले चेकिंग करायचे ,

मग मंजूर करून कॅशसेक्शन ला द्याचे ,पण खूप व्हाऊचर असतात म्हणे रोज , प्रत्येक खात्यातून ,

सेक्शन मधून बीले येत राहणार ,

ती approve करणे , मग ती sanction केली की ती पेमेंटसाठी मध्ये द्यायची ही माझी नवी जबाबदारी

असणार आहे आता या पुढे.

मधुरिमा म्हणाली ..अरे देवा ..हे काम कसे काय दिले तुला ? द्याला नव्हते पाहिजे ,

ऑफिसमध्ये नेहावर सोपवलेली ही जबाबदारी मोठीच जोखीमभरी आहे , अनेक लोकांची परस्पर

मिली-भगत असते ..या नव्या पोरीला यातले काय समजणार ?

आणि तिच्या नवखेपणाचा , बुजरेपणाचा फायदा घेत , समोर ठेवलेला बील मंजूर करून घेण्याच्या

प्रयत्न -मिठासपणे बोलून करणे अशा कामात मुरलेल्या माणसाना अगदी सोपे आहे.

नेहा -तुझे मोठे साहेब नाहीत का सध्या ऑफिसला ? कुठे टूर वर वगरे आहेत की काय ?

त्यांच्या माघारी तुला अशी जबाबदारी मुद्दाम तर नाही न देण्यात आली ?

तुझे साहेब आले की सांग मा , मी येऊन बोलेल त्याच्याशी एकदा .

नेहा म्हणाली – हो ग हो ,

आमचे मेन बॉस,गेल्या आठवड्यापासून परदेशी गेलेत तीन आठवड्यासाठी

ते गेले आणि लगेच २ दिवसानंतर हे सेक्शन आणि डेस्क- चेंज झालेत.

मधुरिमा तिला म्हणाली -

नेहा – ऑफिस वर्क –ऑर्डर आहे ही , ती रिफ्युज केली तरी ताप ,आणि तू या सेक्शनला काम करणे

म्हणजे तुझ्या डोक्याला आणि मनाला मन:स्ताप ..

सांभाळूनच कर ग बाई सर्व ..!

हे स्टाफ आणि ऑफिसचे मनी –रिलेटेड कामे

म्हणजे डोक्याला आणि मनाला नुसता ताप , मंजूर केले आणि नंतर काही प्रोब्लेम झाला तर?

याची भीती आणि

पेंडिंग ठेवण्याची सोय नाही, हे सगळ .भांडाभांडीला पुरेसे असतात .

तू अगोदरच नवी इम्प्लोयी , तुझ्या समोर आलेल्या बिलातले काय खरे नि काय खोटे ? इतक्या लवकर नाही समजायचे ,

अशा कामात मुरब्बी माणूसच लागतो , स्टाफचे एक ठीक आहे, पण petty-expenses

हे जरा डोकेदुखी प्रकरण असते , या पेमेंटमध्ये कुणाच्या इशाऱ्यावर कोण काम करते ?काही पता लागत नाही.

मधुरिमाचे हे बोलणे ऐकल्यावर नेहा खूपच घाबरून गेली ..

अरे बापरे .. मग , कसे नि काय करू मी आता या नव्या सेक्शन मध्ये ?

अशी घाबरून नको जाऊ लगेच . तुला योग्य ते मार्गदर्शन करतील असे ज्यांच्या बद्दल वाटते ,

त्यांची मदत घेत घेत कामे कर ,

“पाण्यात पडल्यावर आणि पाण्यात ढकलून दिल्यावर ..हात-पाय मारल्याशिवाय त्यातून बाहेर पडणे

शक्य नसते नेहा “..

माधुरीमाचे हे सारे सांगणे -

शांतपणे ऐकून घेत नेहा म्हणाली -

बरे ठीक आहे , मी करेन तू सांगितल्या प्रमाणे ..

आज कधी नव्हे ते टेन्शन आलाय जरा ..!

मधुरिमा तिला म्हणाली – घाबरून जाऊ नको अशी , सांभाळून कर सगळ.काही होणार नाही.

नेहा – बेस्ट लक , नोकरी म्हटल्यावर ..असे कसोटी –प्रसंग तर येणार ..!

बोलण्यावर कंट्रोल ठेव, कोण , कधी कोणत्या शब्दात अडकवून, वाद घालीत बसेल ,सांगता येत नाही ,

त्यात युनियनचे चमचे असतील तर ..बघायलाच नको.

नेहा ऑफिसला आली, आज आपली एक प्रकारे परीक्षाच आहे म्हणायची .

इतके दिवस नवी नवी इम्प्लोयी म्हणून फारसा वर्क लोड नसायचा.

त्या टीमचचे लीडर समजून सांगायचे , त्यामुळे काम करतांना टेन्शन

वगरे कधी आले नाही ,

पण, गेल्या आठवड्यात ..एकदम दुसर्याच टीम बरोबर जॉईन करावे लागले ,

ही टीम सगळ्या ऑफिसमध्ये फेमस होती , सगळ्या स्टाफशी रोज संबंध येत असल्यामुळे ..यांच्या भवती

सतत कुणी न कुणी येऊन बसलेले दिसायचे , आणि या एचआर टीम मध्ये जास्त करून लेडीज –स्टाफ

आहे हे नेहाला जाणवले ..त्यात ही दोन-तीन –वेगवेगळे ग्रुप्स आहेत ,हे जास्त काळजीचे होते .

म्हणजे ..वरवरून मैत्री आहे असे दाखवत ,हसत-खेळत राहतो असे दाखवायचे ,आणि

आतून मात्रएकमेकीवर खुन्नस धरून ..बरोबर आपल्या मनातले साध्यचे ...हे सगळे पाहून ..नेहाला कल्पना

आली आणि तिने ठरवले की – यापुढे इथल्या सगळ्या स्टाफ बरोबर आणि लोकांशी फार मोकळेपणाने राहून, बोलून काही उपयोगाचे नाही.

आपण ही या सर्वासारखे वरवर गोड बोलत वागायचे आणि आपले काम करीत राहायचे .

असेच बरे राहील आपल्यासाठी.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात -

भाग - १९ वा , लवकरच येतो आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी -जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------