कादंबरी - जिवलगा .. भाग-१९ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा .. भाग-१९

कादंबरी- जिवलगा

भाग – १९ वा

-----------------------------------------------------------------------------------------

टीम म्हटले की “व्यक्ती तितक्या प्रकृती “, आपल्या स्वभावाचे कुणी मिळाले तर या वातावरणात

रहाणे सुसह्य होऊन जाते.

नेहाच्या सुदैवाने .. सोनिया आणि अनिता .या दोघींशी तिचे सूर लगेच जुळले . आणि तिघींनाही

जाणवले ..आपण एकमेकीला सांभाळून घेत रहाणे आपल्या हिताचे आहे”,

नेहा म्हणाली ..सोनिया – तू आणि अनिता या टीम मध्ये मला सिनियर आहेत , पण, मी तुमच्यापेक्षा

ज्युनियर असून ..हे पेमेंट सेक्शन मला कसे काय दिले ? काही कळले नाही बघ मला .

अनिता म्हणाली ..नेहा ..हे सगळ आपल्या मेन बोसचे फंडे ..त्यांना नवे नवे प्रयोग सुचत असतात ,

तू इथे जॉईन झाल्यापासून त्यांनी तुझ्या वागण्या-बोलण्याची खूप स्टडी केली असणार , तू ज्या

टीम मधून आली आहेस ना ..

ते टीम लीडर सर ..ते अगोदर या टीमचे लीडर होते..ते नेहमीच सगळ्यांच्या बद्दल छान सांगणार

सगळ्यांशी छान बोलणार , छान वागणार ,एकदम जंटलमन आहेत हे.

त्यांनीच तुझ्याबद्दल मेन बॉसला सांगितला असेल मग काय ,ऑफिसच्या सगळ्या वर्कची सगळ्यांना

माहिती असायलाच हवी असे मोठ्या सरांची अपेक्षा असते , मग ..तुमची डिग्री ते बाजूला ठेवून देतात ,

ऑफिसच्या सोयीचे जे असेल ते यांच्यासाठी महत्वाचे ",

मग असे प्रयोग केले जातात आपल्या ऑफिसमध्ये .आम्ही सुधा सगळीकडे फिरून परत इथे आलेलो आहोत ,

तू शिकून घे हे सगळे काम .

आमचे सिनियर फ्रेंड झाले होते खूप रिझनेबल माणूस आहे,

ते म्हणतात ..

काही कामे न करता , कामाचा देखावा करीत फक्त पुढे पुढे करणारी माणसे –डोळ्यात भरतात ,

पण, ती मनात कधी भरत नसतात “

त्यांच्या एक लक्षात कसे येत नाही की-

पहाणार्या सगळ्यांना मूर्ख बनवणे सोपे नसते तरी यांच्या ढोंगीपणाच्या वागण्यात फरक पडत नाही.

अशा लोकांच्या निष्ठा ,त्या देखील कायम बदलणार्या असतात ,

“प्रामाणिकपणा ,कामाप्रती निष्ठा “ अशा गोष्टींची यांच्याकडून कधी अपेक्षा करू नये

त्यामुळे ..चांगल्या कामाला पर्याय नाही ..हे नेहमी लक्षात ठेवा ..!

गुड -वर्कर “,कामसू कर्मचारी “खरा आधारस्तंभ असतो संस्थेचा .

दुर्दैव असे की अशाच लोकांच्या कार्याचे चीज उशिरा होत असते हे खरे !

त्यांचा बहुमान होण्यास फार विलंब होत असतो ..

पण जेव्हा असा गौरव होतो , ते कौतुक चार दिवसांचे नसते तर

हा बहुमान कायम टिकणारा असतो .

त्यामुळे “फक्त चमको “असणार्यापासून दूर राहण्यात आपले भले असते “.

अशा लोकांचे ग्रुप,त्यांची मौज मजा पाहून आपल्याला असेच वागण्याचा मोह होणे चुकीचे नाही”,

पण, आपण असे मोह टाळावे “,हे अनुभवाने तुम्हीच शिकाल .

नेहा म्हणाली ..हो ,सोनिया , मी सुद्धा या सरांची विद्यार्थिनी आहे ,

म्हणूनच की काय ,आपण तिघी जणी किती पटकन एकमेकीच्या मैत्रिणी झालोत .

अनिता , सोनिया , तुमच्या मदतीची , सूचनांची

या नव्या सेक्शनच्या कामात मला खूप महत्वाची मदत होईल ,

म्हणून तुम्ही तुमचे लक्ष माझ्याकडे ,

माझ्या कामाकडे असू द्या बरे का .

सोनिया आणि अनिता म्हणाल्या ..

नेहा –तू अजिबात काही काळजी करू नको, टेन्शन तर मुळीच घायचे नाही.

तुझ्या पाठीशी आहोत आम्ही , पण, हे इतर कुणाच्या लक्षात येणार नाही याची काळजी घेत कामे

करू या . कारण, आमच्या कामाच्या पद्धतीने आमच्या वर नाराज झालेली मंडळी इथे आहेतच ,

त्यांनी तुला काही बोलू नये , तुझ्याशी वाद घालू नये “म्हणून ..

असे करत राहावे लागणार आहे या पुढे.

अनिता आणि सोनिया म्हणाल्या –

नेहा – आम्ही जे सांगतोय त्याचा कधी राग येऊ देऊ नको , वाईट वाटून घायचे नाही.

म्हणजे .आपल्यात गैरसमज व्हायला नकोत .

तुला लगेच जाणवेल ..की ..आपण तिघी एकमेकींना सांभाळून घेत कामे करतो ,तर ,ही माणसे

आपल्यातच फुट पाडण्याचा प्रयत्न नक्की करतील

आम्ही जुन्या आहोत ,त्यांना ओळखून आहोत , हे त्यांना माहिती आहे.

पण ,तू नवी ,अनुभव नसलेली आहेस.. सो, ते तुला सोफ्टटार्गेट करतील ..

म्हणून..तू या पुढे एकच करायचे , शांतपणे

कामापुरते बोलायचे ,बाकी काही बोलायचे नाही ..मग ठीक होईल .

आणि आपल्या समोर आलेले काम ..ऑफिस गाईड –लाईन प्रमाणेच करीत राहायचे .

काम बाजूला आणि समोरच्याला फक्त नियम समजावीत बसलीस तर अवघड होईल .

.तसे नको करू ..

सगळेच लोकस काही बदमाशी करून फसवत नसतात ऑफिसला ..

एक खुणगाठ मनाशी बांधून ठेव आणि काम करीत रहा –

की पैश्याच्या मोहापायी ..जे मिळेल ,जसे मिळेल ,जितके मिळेल ,त्यासाठी

थोडी हुशारी , थोडी बदमाशी , थोडी लाचारी करणारे सगळीकडेच आहेत

स्वतःच्या खिशाला चाट न बसता ,वर वर मजा करण्यासाठी आपल्याच ऑफिसचा पैसा

अशा लोकांना हवा असतो ,

हे दिसत आपल्याला , कळत आपल्याला , पण , या लोकांच्या काही खुब्या असतात ,

काही फंडे –काही फार्म्युले असतात , आणि यांच्याकडे त्यांचे उपद्रव –मूल्य पण असते ..

त्यांच्या या अशा सगळ्यां गुणांचा आपल्या साहेबलोकांना त्यांच्या अडचणीच्या वेळी उपयोग होत असतो.

असे हे स्पेशल लोक , ते कोण आहेत ,? कसे आहेत ? कळेल तुला ..

त्या शिवाय अशा लोकांचे ..काही खास माणसे ओफिसभर पेरून ठेवल्यासारखी असतात ,

या खास माणसांना वाटत असते .मी व्हीआयपीचा माणूस आहे ,

मग .माझे पण काम लगेच झाले पाहिजे ,

म्हणून गधे–घोडे सब एक बराबर “असे नाही करायचे कधी आपण .

नेहा म्हणाली – बाप रे ..काम राहिले बाजूला , इतर ठिकाणीच जास्त डोके लावण्याची वेळ

आहे म्हणायची .

बुद्धीबळ खेळावे लागणार म्हण की ..एकेक चाल दिमाग लडा के ..

नेहाला ..सोनिया आणि अनिताची मैत्रीची सोबत खूप धीर देत होती..

नेहाने मनातल्या मनात ..आई-बाबांचे स्मरण केले , देवाला नमस्कार केला आणि

ती नव्या सेक्शनच्या तिच्या “नव्या जबाबदारीच्या खुर्चीवर बसली.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात –

भाग – २० वा लवकरच येतो आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी - जिवलगा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

9850177342

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------