kadambari jivalagaa - 21 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी - जिवलगा .. भाग- २१

कादंबरी – जिवलगा ..

भाग – २१ –वा

----------------------------------------------------------------------

नेहाने मग सोनियाला विचारले – ठीक आहे ,

आज कधी येणार आहेत हे श्रीमान –जगदीशसेठ ?

सोनिया म्हणाली –

त्याची येण्याची वेळ पक्की आणि ठरलेली असते ..आपला लंच –टाईम दुपारी दीड वाजता असतो ,

हा बरोबर १२.३० वाजता येईल , ओफिशियाल व्हिजीट म्हणून सांगेन सगळ्यांना ,,

मग काय .

सगळा स्टाफ हात जोडून पुढे उभा राहणार .

एकेकाला केबिन मध्ये बोलावून घेणार .. त्याच्या मर्जीतल्या स्टाफशी छान बोलणार , आणि ज्यांच्या

बरोबर त्याचे कधी तरी वाजलेले आहे, अशांना ..विनाकारण काहीही सुनावणार , दुसर्या किरकोळ

सेक्शनला पाठवतो ..बघाच तुम्ही “, अश्या धमक्या देऊन घाबरवून टाकणार .

वर्षातून एक-दोन वेळा ..हा कार्यक्रम तो मोठ्या आवडीने करीत असतो.

हे सगळ ऐकून घेत नेहा म्हणाली –

खूप वेळ आहे अजून ...येऊ तर दे, त्या वेळी बघू प्रत्यक्ष्य त्या वेळी काय नि कसे होते ते .

ऑफिस –हॉल..जो तो आपल्या टेबलावरच्या कॉम्पुटर मध्ये डोके खुपसून बसलेला ,

समोर आलेल्याचे काम झाले की तो माणूस लगेच निघून जाणार . सकाळी ऑफिस सुरु झाले की पहिला

तास –दीड तास खूप घाई-गडबडीचा , प्रत्येकासमोर कुणी तरी काम घेऊन आलेला ,

एकदा हा लोड कमी झाला की मग हॉल मध्ये काही आवाज नाही की मोठ्याने बोलणे नाही ,एकूण

परीक्षा हॉल वाटावा असेच वातावरण असते . लंच-टाईम कधी होतो ? घड्याळाकडे पहात काम करीत

बसायचे . आजपण असेच वातावरण , आणि अचानक ..सगळे जण अलर्ट झाले , असे नेहाला दिसले .

सिक्युरिटीने आत येऊन मोठ्या आवाजात सगळ्यांना सांगितले ..

“जगदीशबाबू –साब अकेले ही आये है ..और कोई नाही है..

पी.ए तो होता ही है साथ मे हमेशा .

हॉलमध्ये रुबाबदार दिसणारे जगदीशबाबु आले , नजरेत मोठी जरब , चेहऱ्यावर म्हटले तर स्मित ,

म्हटले तर मौन ते ही ..कठोर आणि रुक्ष वाटणारे ..

असा चेहेरा पाहून समोरच्या माणसाचा गोंधळ उडाला पाहिजे .

फ्लोअरवरच्या टीम-लीडरला मोठ्या आवाजात ते म्हणाले ..

आज खूप घाईत आहे मी , फार वेळ देऊ शकणार नाही मी तुम्हाला . पी.ए. ला पाठवतो तुमच्याकडे

सगळी बिल, ते सगळे पैसे लगेच द्या त्याच्या जवळ . उगीच घोळ घातलेला मला आवडत नाही ,

हे इथे माहिती आहे ना सर्वांना .

चला ,चालू ठेवा आपापली कामे .

एकाच ऑर्डर मध्ये सर्वांना सूचक सुचना देत जगदीशबाबू केबिन मध्ये जाऊन बसले .

थोड्याच वेळात ..त्यांचा पी.ए. मनोहर हातात ब्रीफकेस घेऊन आला आणि नेहाच्या सेक्शन –

बॉस समोर बसत म्हणाला ..

साहेब – ही मोठी बिले तुमच्या मंजुरीसाठी , पहा आणि लगेच सही करून टाका , मी कॅश घेतो .

आणि ,ही छोटी बीले ,ती कुणाकडे देऊ ?

नेहमीच्या अनिता मैडम दिसत नाहीत आज , सोनियामैडमला देऊ का ?

त्या मला ओळखतात चांगल्या . हो ना हो सोनिया मैडम ?

सेक्शन –बॉस म्हणाले – नाही ,आता हे काम सोनिया आणि अनिता मैडमकडे नाहीये .

या नेहामैडम – नव्या आल्या आहेत या सेक्शनला , त्यांच्याकडे असेल ही छोटी –छोटी

पेमेंट करण्याची जबाबदारी .

मनोहर – नेहामैडम स्वतंत्रपणे हे काम करणार्या आहेत .त्यामुळे यापुढे त्यांच्या कामात मी

लक्ष घालू शकणार नाही हे लक्षात असू द्या तुमच्या.

चतुर मनोहरच्या हा बदल लगेच लक्षात आला . कुणाशी कसे बोलायचे असते ,

हे सगळे अनुभव मनोहर कोळून प्यालेला माणूस .

नेहाच्या टेबलाजवळ येत रिकाम्या खुर्चीवर बसत तो म्हणाला –

नमस्कार – नेहा मैडम – मी तुम्हाला वरच्या फ्लोअरवर काम करतांना पाहिलंय .

तुम्ही इकडे ट्रान्स्फर होऊन आलात म्हणजे ..

बिग-बोस ला तुमच्या काम करण्याची

सिस्टीम नक्कीच आवडली असणार , त्याशिवाय असे नवखे या सेक्शनला येत नाहीत ,

थोडक्यात तुम्ही बिग-बॉसच्या गुड-बुक्स मधल्या “,

म्हणजे आता या पुढे आम्हाला घाबरून राहावे लागणार .

नेहामैडम – तुम्ही नव्या असल्या तरी ..आमच्या जगदीशबाबूबद्दल तर

तुम्हाला तुमच्या फ्रेंडनी

म्हणजे – या सोनिया मैडम , आज नसलेल्या अनितामैडम यांनी सांगितले असणार ,

मला माहिती आहे नेहा मैडम ..या दोघी तुमच्या फास्टेस्ट-फ्रेंड झाल्या आहेत इथे आल्यावर.

काही न बोलता ..नेहा ..मनोहरचे बोलणे ऐकत राहिली ..

मनोहरच्या सफाईदार बोलण्याचे तिला मनातून कौतुकच वाटत होते . त्याच्यातील हजरजबाबीपणा

म्हणजे ..तो त्याच्या जगदीश बाबूंशी किती लॉयल आहे “ हेच दाखवणारा आहे .

नेहा मैडम – हे बघा –

आमचे बॉस- जगदीशबाबू , ते जे म्हणतील तसे आम्ही करणार , त्यांचा हुकुम ,त्यांची ऑर्डर

आमच्यासाठी फायनल .

त्यांचे काम झालेच पाहिजे ,कारण लेट झालेला त्यांना अजिबात चालत नाही .

मग,माझी अशी धावपळ होते . काय करणार ना ..साहेबलोक ,नोकर-माणसांच्या अडचणी थोड्याच

समजून घेणार ? त्यांना त्यांचे काम होण्याशी मतलब .

गेल्या दोन महिन्यात जगदीशबाबू इकडे आलेच नाहीत , कंपनीची इतकी कामे त्यांच्या मागे आहेत

की ..त्या घाईत ..कंपनीसाठी ..त्यांच्या खिशातून कधी आणि किती पैसा खर्च होत असतो ?

ते कधी पहात नाहीत ..खूप दिलदार आहेत आपले जगदीशबाबू.

कंपनीच्या कामानिमित ,मार्केट मध्ये अनेक क्लायंटला भेटावे लागते , अशावेळी गिफ्ट पण द्य्व्या लागतात “

या सगळ्या गोष्टी जगदीशबाबू लक्षात ठेवून करतात .म्हणून सगळीकडे ते पोपुलर आहेत .

त्यांचा पी.ए. म्हणून हा मनोहर या सगळ्या गोष्टी जबाबदारीने करीत असतो , असे नाही केले तर

जगदीशबाबू इतके संतापून जातात की ..त्यांच्या वाऱ्याला मी पण उभा राहत नाही ,

मग, इतरांची काय कथा ?

हे डिटेल यासाठी सांगून टाकले की ..त्यांनी तुमच्यावर संतापून जाण्याची वेळ येऊ नये “

कारण असे काही तरी होणार , सगळ्या ऑफिसमध्ये चर्चा होणार , मग उगीच दुसर्या कोणत्यातरी

कोपर्यातल्या सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन बसणार .

हे असे काही कधीच होऊ नये “ असे मला वाटते नेहामैडम .

मनोहर बोलण्याचे थांबला हे पाहून – नेहा म्हणाली –

खूप खूप थांक्यू मनोहर ,

आपला अजिबात परिचय नसतांना ,तुम्हाला माझ्या सारख्या नवख्या

व्यक्तीशी इतके सांगावे वाटले ,

तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे.. कारण तुम्ही अत्यंत प्रामाणिक असे स्वामिनिष्ठ सेवक आहात .

तुम्ही तुमच्या बॉसबद्दल कौतुकाने सांगितले ..शिवाय ..किती हुशारीने मी काम कसे करायचे ,

याबद्दल धमकीवजा सुचना पण देऊन टाकल्या .

मनोहर मनात म्हणत होता -- वाटते तितकी साधी-भोळी .नवखी नाहीये ही मैडम ..

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढच्या भागात –

भाग-२२ वा लवकर येतो आहे.

कादंबरी – जिवलगा ..

ले-अरुण वि.देशपांडे –पुणे

9850177342

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED