कादंबरी - जिवलगा .. भाग - २२ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा .. भाग - २२

कादंबरी – जिवलगा

भाग- २२- वा

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नेहा म्हणाली -

हे बघा मनोहर – आपल्या पहिल्याच भेटीत आपल्यात गैरसमज होणे नकोय , जसे तुम्ही तुमच्या

बॉसच्या ऑर्डरी पाळता ,

तसे मी पण माझ्या बॉसच्या ऑर्डरनुसार काम करण्यास बांधील आहे “

हे इतके सहजपणे कसे विसरून जाताय तुम्ही . असो.

तुम्ही ज्या कामासाठी आलात ते करून टाका ,

तुमचे काम न करता मी लंचला निघून गेले तर , पुन्हा काम होण्यास उशीर लागेल.

मला ते आवडणार नाही.

जगदीशबाबू तुमचे बॉस जसे आहेत .. तसे आमच्यासाठी सुद्धा ते बॉसच असल्यासारखे आहेत.

नेहाचे हे बोलणे ऐकून ..मनोहर इतका खुश झाला की बस ..

वा –क्या बात काही नेहामैडम ,

नव्या इम्प्लोयी मध्ये तुमच्या इतकी समझदारी मी या आधी कुणातच पाहिली नव्हती.

मी तुमची तारीफ जगदीशबाबूंच्या जवळ नक्की करील.

राहू द्या मनोहर , घाईने माझ्यासाठी असे काही करू नका ,

काय सांगावे , माझ्या बद्दलचे तुमचे मत बदलले तर मोठी मुश्कील होईल .

असो.

दाखवा ,तुम्ही काय काय आणले आहे ते ?

मनोहरने , नेहाच्या समोर एक टाईप केलेल्या ..दहा –पंधरा लिस्ट ठेवलीत म्हटले ..

यात डेट-वाईज ..कंपनीच्या कामासाठी जगदीशबाबूंनी केलेल्या खर्चाचे डीटेल्स आहेत..

पेट्रोल बिल्स ..,हॉटेल –बिल्स , गिफ्ट –सेंटर .बिल्स , मिठाई –दुकान बिल्स ,स्टेशनरी –बिल्स

अशा वेगवेगळ्या याद्या आहेत .

लक्षात ठेवून करायचे काम असते बरे का !

,खूप डोकेफोड होते मैडम .पण, पी .ए म्हणून जबाबदारी टाकून मोकळे होतात साहेब लोक

नेहाने सगळ्या लिस्ट ..आणि त्या सोबत लावलेली बिल ..त्यांच्या तारखा आणि आकडे .

पाहून घेतले ..

आणि म्हणाली ..

मनोहर – क्या बात है ..एकदम अचूक ..आणि बिनचूक आहे तुमच्या कामाची पद्धत .

अहो नेहा मैडम – जगदीशबाबूंचा विश्वासू माणूस उगाच झालो का मी .

नेहा म्हणाली –

अगोदर माझे पूर्ण ऐकून तर घ्या ..मग बोला तुम्ही मि.पी.ए . मनोहर !

आता फक्त ..एक काम राहून गेलाय .

.मला वाटते घाईत तुम्हीच विसरला असाल ,म्हणून राहून गेलाय ,

,नाही तर तुमच्या हातून असे काही होऊ शकते , असे मला तरी वाटत नाहीये .

कारण इतका वेळ तुमच्याशी बोलून झाल्यावर .

तुमच्या कामाचा अंदाज थोडाफार येउच शकतो ना मला ?

मनोहर तत्परतेने म्हणाला -

हो हो ..बरोबर आहे तुमचे नेहामैडम ..

सांगा ..काय राहून गेलाय ..घाई गर्दीत माझ्याकडून ?

हे बघा मनोहर ..

यात सारख्याच रकमेची अनेक बिले आहेत , असे असणे चूक आहे ,

असे म्हणयचे नाहीये मला ,

यातल्या काही बिलावर ..बील पाहिल्यावर तुमच्या साहेबांनी केलेल्या इनिशियल

आहेत “ म्हणजे हे त्यांना माहिती आहे.

पण, ही बघा बाकीची बरीच बिले आहेत

जी घाई-घाईत तशीच दिलीत न तुम्ही माझ्याकडे आज पेमेंटला ,

आता तुम्ही पटकन केबिन मध्ये जाऊन ..

तुमच्या बॉसच्या इनिशियल त्यांनी न पाहिलेल्य बिलावर घेऊन या .

नेहाच्या या बोलण्यावर ..मनोहरला काहीच बोलता येईना ,

हो म्हणावे तरी पंचाईत , नाही म्हटले तर ? पंचाईत

नेहा म्हणाली ..थांबा , मनोहर ..

मीच येते तुमच्या मदतीला , आपण दोघे मिळून ..जगदीशबाबूंना

त्यांनी न पाहिलेली ही सगळी बिले दाखवू ..आणि त्यांच्या सह्या घेऊ..

वाटल्यास ..

सह्यांच्या बिलाचे पैसे , आणि बिन-सहीच्या बिलाचे पैसे ..

दोन्ही घेऊन केबिन मध्ये उभी राहते ,

मग मी सांगते तुमच्या बॉसला ..

सर , अहो ,हे जास्तीचे पैसे द्यायचे राहिलेत या बिलाचे ..ज्यावर तुम्ही सही करायचे विसरलात .

चला , लवकर जाऊ केबिनमध्ये ..

लेट झाला तर तुमच्या बरोबर मलापण रागावतील जगदीशबाबू.

नेहा केबिनमध्ये गेली सुद्धा

,हे पाहून मनोहर मुकाटपणे तिच्या पाठोपाठ आत गेला .

नेहाने तिच्या हातल्या लिस्ट आणि सगळी बिले जगदीश बाबूंच्या समोर ठेवीत म्हटले ..

सॉरी सर, हे मनोहर ,तुमचे विश्वासू पी ए , कामाच्या बोझ्याने पार थकून जातात “ हे मला जाणवले ,

बघा ना सर ,

यातल्या किती तरी बिल ते तुम्हाला दाखवयचे विसरले वाटते ,

आणि मग ,तुमच्या सह्या घायच्या राहिली “हे सुद्धा ते विसरले

मला वाटते - सगळी बिले किती असतात हे सांगण्याचे, मनोहर असेच विसरून जात असावेत

झाले ते झाले . पण ,

मला विसरून कसे चालेल या गोष्टी .?

नीट पाहिले नसते म्हणून “

तुम्हीच मला म्हणाले असते नंतर ..

“फुकटचा पगार घेण्यपेक्षा ,लक्षपूर्वक कामे करीत जा .”

सर तुम्ही पटकन करता का यावर सह्या . प्लीज .

हे बघा ..मी पेमेंट पण घेऊन आले आहे .

यांनी मला कितीदा तरी सांगितले की-

तुम्हाला लेट झालेला आवडत नाही.

हे सगळे बोलणार्या नेहाच्या नजरेतील हुशारी आणि चमक , चेहेर्यावरचे हसरे भाव “,

हे पाहून जगदीशबाबूंच्या मनात संतापाचा डोंब उसळून आलेला होता .

पण , नेहाच्या स्मार्टपणाने आज त्यांना मोठ्या पेचात पकडले होते .

काही न बोलता त्यांनी -

जळजळीत नजरेने समोर उभ्या असलेल्या मनोहरकडे पाहिले ..

आणि काही न बोलता नेहाने समोर ठेवलेल्या बीलंवर सह्या करून टाकल्या .

नेहाने टेबलावर कॅश ठेवीत म्हटले ..

सर , थान्क्स सो मच .

येऊ मी , गुड डे !

नेहा केबिनच्या बाहेर येऊन आपल्या सेक्शनला येऊन बसली .

ती बाहेर गेलेली पाहून जगदीशबाबू म्हणाले –

मनोहर –तुला मी कितीदा म्हणालो , जादा हाव बरी नाही .

मला वाटायचे थोडक्यात समाधान होत असेल तुझे , पण, तसे नाही ,

तू तर माझ्या हातात .आवळा देतोस ..आणि स्वतहा मात्र खिसे भरतोय ,

तुझ्या अशा स्वभावाने तू तुझ्याच पायावर धोंडा पाडून घेतलास आज.

बघ , ज्या मुलीला तू नवखी समजलास ,,ती किती हुशार निघाली .

हसत-खेळत ..बोलून वर पुन्हा , आपल्याच गळ्यात आपले तंगडे अडकवले तिने “,

पण, एक शब्द बोलू शकलो नाही.

याला म्हणतात ..जालीम इलाज .

हात जोडीत मनोहर म्हणाला ..

बॉस, आज पहिल्यांदा या मनोहरची कुणी बोलती बंद केली .

उद्या करायची का या अतिहुशार पोरीची बदली ?

आपल्याला नाही परवडणार या नेहाबाई इथे असणे .

जगदीशबाबू म्हणाले – मनोहर ..

बिग-बोसने तिची स्पेशल पोस्टिंग केली आहे , त्यात मला

त्यांच्या माघारी काही करणे ,म्हणजे अजून आपले पाय खोलात जाण्यासारखे आहे “.

हे ऐकून मनोहर म्हणाला -

पण साहेब एक भीती आहे की , ही पोरगी –

तिचा हा परक्रम नक्कीच सगळ्यांना सागत सुटेल ,

मग,माझा तर पार कचराच होईल या ऑफिस मध्ये.

त्याला धीर देत जगदीशबाबू म्हणाले -

घाबरू नको मनोहर – बघ मी काय करतो ते..

जा नेहामैडमला सांग मी अर्जंट बोलावले आहे..

मनोहरने लगेच नेहाला निरोप दिला ,

तसे लगेच केबिनमध्ये नेहा आली.

जगदीशबाबू म्हणाले –

सॉरी- नेहामैडम –

मनोहरच्या चुकीमुळे त्याच्याबद्दल तुमचा गैरसमज झाला असणार

हे मला माहिती आहे.

यापुढे असे काही होणार नाही .माझ्या सहीशिवाय तुम्ही कुठलेच पेमेंट करू नका .

आणि एक रिक्वेस्ट – तुम्ही मनोहरला अद्दल घडवली “ हे बाहेर कुणाला सांगू नका .

असे जर मला जाणवले तर मग मात्र ..तुम्हाला त्रास होईल .

बघा थंड डोक्याने विचार करा ,आणि केबिन बाहेर पडल्यावर आज जे घडले ते विसरून जा.

यातच तुमचे कल्याण असेल. आणि यापुढे तुमच्यावर नेहमी माझे विशेष लक्ष असेल.

या तुम्ही ,

आता लंच करा सावकाश.

बाय.

जगदीश बाबूंच्या केबिन मधून हसर्या चेहेर्याने बाहेर पडणार्या नेहाकडे सगळा स्टाफ

आश्चर्याने पहात होता .. कारण .यापूर्वी जगदीश बाबूंच्या केबिन मधून बाहेर पडणारा

एखादा नवखा ..हिरमुसला ,रडवेल्या चेहेर्याने बाहेर पडलेला सर्वांनी पाहिला होता ..

असा काय चमत्कार झाला असावा हा ?

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी वाचू या पुढील भागात –

भाग- २३ वा लवकरच येतो आहे ..

कादंबरी – जिवलगा ..

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342