महिन्यातला तो वीक Hemangi Sawant द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

महिन्यातला तो वीक

लग्न म्हटल की धावपळ येतेच. आज ही माझ्या मोठ्या ताई च लग्न आहे. मी लहान असल्याचा चांगलाच फायदा घेतलाय मी आणि छान आराम चालू आहे माझा तर.. लग्नाच्या विधी संपल्या. आम्ही ताई च्या सासरी गेलो. सगळ्या विधी, खेळ संपवून आता आई -बाबा निघाले मी मात्र पाठ राखीन म्हणून थांबले. सगळं करून झोपलो कारण दुसऱ्या दिवशी पुजा होती.


मी उठली आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. अचानक पोटात थोडी कळ आल्यासारखी झाली, बघते तर काय....झाली सुरुवात... ताई ला हाक मारून सांगितल की अस अस झालंय. मग तिने हळूच लपवून कपड्याच्या खाली लपवत दिल. काय दिल आणि काय झाल...?
माझे पेरिओड्स आलेत. हो तेच दर महिन्याला येते ती मासिकपाळी. किळस वाटली...! का..? कशाला..?



ती नाही आली ना तर तुम्ही ही या जगात येऊ नाही शकणार. हो काय असत मासिक पाळी, केलाय कधी विचार. विचारल कधी काय असत की फक्त कोणी तरी सांगत अरे ते बायकांचं असत तू नको लक्ष देऊस. का नको...? समजायला नको.
आपल्या या समाजात काही नियम केलेत. बायकांना मासिकपाळी असेल तर देवळात जायचं नाही... का नाही जायचं..? म्हणे देवाला नाही चालत... का नाही चालत देवाला..? जे देवाने दिलंय तेच त्याला नाही चालणार अस कुठे असत.



कदाचित तुम्हाला म्हाहित नसेल, पण आपल्या पूर्वजांनी का बायकांना चार दिवस बाजुला बसवलं आहे. कारण त्याच्या मागे काही कारण आहेत. चला सांगते तुम्हाला. एक तर त्या एका आठवड्यात महिल्यांच्या शरीरातून वाईट रक्त बाहेर जात, म्हणजे नवीन रक्त तय्यार होत. आता वाईट दुर्गंधी येणारच, जर कचऱ्याला आपण टाकून देतो का
कारण तो कुजतो, तसच असत रक्त वाईट असल्या कारणाने त्याला दुर्गंधी येते. अति रक्तस्त्राव होत असल्याने ती महिला कमजोर तर पडणारच. मग मंदिरात तिला अशक्यपणाने चक्कर येऊ नये आणि दुसर म्हणजे त्या काळात मंदिरा बाहेर सुलभ शौचालय नसल्या कारणाने त्यांना पाबंदी होती. देवाला त्रास नाही व्हायचा, तर त्या महिलेला त्रास होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी काही नियम केले होते.




आधीच्या बायका किचनमध्ये सारख्या राबायच्या त्यांना त्या काळात शारीरिक आराम मिळावा म्हणून चार दिवस त्यांना बाजूला बसवले जायचे. पण याचा काही लोकांनी वाईट अर्थ घेऊन महिलांचे मासिकपाळी च्या वेळी हाल केले जातात.


काही पुरुष तर बायकांना नाव ठेवतात, त्यांना बाजूला बसवले जाते. त्यांच्यात घरात त्यांना एका ताटात बाजुला वाढून दिल जात. खुप वाईट अनुभव आहे हा. एकदा घेऊन बघा बाईचा जन्म कळेल तुम्हाला.



मुंबई सारख्या प्रगत आणि झपाट्याने पुढे जाणाऱ्या शहरात ही बाजूला बसवण्याचे नियम लादले जातात. खरच आपण एकविसाव्या शतकात आहोत का..? प्रश्न पडतो मला. गावाकडे तर खुप वाईट आणि विचित्र अटी. काय तर पुढच्या दरवाजाने यायच नाही. त्या काळात लोणच्याच्या बरणीला स्पर्श करायचा नाही का... तर म्हणे खराब होत. म्हणजे काही ही नियम लावायचे.



मी स्वतः अनुभवलय, गावीतर अक्षरशः भांडी वेगळी दिली जातात. एका कोपऱ्यात एक चटई किव्हा एक चादर बस त्यावरच काही ते झोपायचे. कपडे, भांडी सर्वकाही बाजुला ठेवलं जायचं आपण स्पर्श करायचा नाही. चार दिवसाने तुम्हाला घरात घेतल जाईल, पण तुम्हाला किचनमध्ये प्रवेश नाही. देवाला दिवाबत्ती तर दुर, पण त्याच्या जवळही फिरकायचे नाही. म्हणजे एवढे नियम का तर मासिकपाळी. खरच आपण एवढ्या बुरसटलेले विचारांचे आहोत का...? असा स्वतःलाच कधी कधी प्रश्न पडतो.



मी तर म्हणते तुम्ही स्त्रियांना देवळात मनाई करतात ना जेव्हा त्यांना मासिक पाळी असते. मग ते पुरुष कसे काय देवींची पूजा करतात, त्या ही तर महिला आहेत. भले त्या निर्जीव मुर्त्या ही का असोत. आपण एवढ्या भक्तीने त्यांना पुजतो मग त्यांना नसेल येत मासिकपाळी...? असो.



मी एका ठिकाणा बद्दल वाचलं होत. त्या ठिकाणी देवीला चक्क सात दिवस मासिकपाळी येते आणि सात दिवस देऊळ ही बंद असत. अस असून देखील मंदिरात स्त्रियांना परवानगी नाही. पण पुरुषांना आहे. काय बोलणार यावर..!



तर कुठे पहिली मासिकपाळी आल्यावर त्या मुलीला सजवलं जात. घरात गोडधोड केले जाते. तिला साडी नेसवुन, सजवून छान अस सेलिब्रेशन केले जाते. पण काही ठिकाणी तिला असे काही सोकोल्ड नियम लादले जातात. बाजूला बसायचे.



जर मासिकपाळी आलीच नाही ना तर जन्म होणारच नाहीत. जे यावर नियम करत आहेत ते ही त्यांच्या आईला होणाऱ्या मासिकपाळी मुळेच जन्माला आलेत एवढ लक्षात घ्या.



पण माझं आव्हान आहे ते आज कालच्या मुलांना. हो तुम्हीच.... जे कोणी वाचत आहात ना तुम्ही करू शकता काही बदल. जास्त नाही पण तुमच्या घरापासून सुरू करा. तुमच्या बहिणीला, आईला, गर्लफ्रेंडला त्या काळात तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकता. जगाला नाही पण स्वतःच्या घरातुन तर होऊ शकतो ना बदल. भले तो खुप मोठा नाहीये पण होऊ शकतो. त्या सात दिवसात तिला कमी काम करायला सांगा. स्वतःच काम स्वतः करा. घर कामात मदत करा. आराम जास्त गरजेचा असतो.



मानसिक आराम ही तेवढाच गरजेचा आहे. तो तरी तुम्ही नक्कीच देऊ शकता. त्या काळात महिलांना कंबर दुःखी, हात- पाय दुखतात ते तरी निदान दाबून दिले तरी खूप आहे.
त्यांना जवळ घ्या. कधी कधी जास्त नाही, पण आपुलकी ने विचारल तरी सगळ्या वेदना कमी होतील.



खुप अस नाही पण एक कप चहा करून तर देऊच शकता ना...!. खरच खुप बदल होतील. तुम्हाला जे चुकीचं सांगितलं आहे. त्या चुकीच्या परंपरेच्या नावाखाली जो खेळ मांडला आहे तो आपल्यालाच कमी करायचा आहे.



मासिकपाळी च्या काळात महिलांना जपा. आम्हाला ही त्यामुळे नकोशी वाटते ती. ते सात दिवस वेगळे वाटू नका देऊ. सॅनिटरी न्यापकीन ला लाजू नका. जशी सिगारेट चार-चौघांत फुकतो ना, तसच मेडिकल मधून सॅनिटरी न्यापकीन आणायला लाजू नका.



पण मासिकपाळी जर नाही आली, तर नवीन जन्म नाही.. आणि नवीन जन्म नाही तर आपली पिढी नाही. हे लक्षात असू द्या.
एका ठिकाणी त्या माँ देवीला पुजल जात, तर माणसाच्या रूपातल्या देवीला असे नको असलेले अटी, नियम लादून आपण त्यांना त्रासाचं देतोय हे लक्षात घ्या. जग खूप सुंदर आहे. जगा आणि त्या प्रत्येक स्त्रीला जगू द्या.



हा लेख फक्त माहितीसाठी आहे. जनजागृती करता लिहिण्यात आलेला आह. तरी कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही. जर काही गोष्टींचा संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.



आजचा दिवस आपल्या हातात आहे...

*******

समाप्त