दिवाळी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो दिवाळी फराळ, फटाके, आणि सगळीकडे आनंदी वातावरण.
दिवाळी म्हणजे आठवणी... त्यातलीच एक म्हणजे.....
तेव्हा मी तिसरी-चौथीला असेल. साल २००३-०४ मधला काळ. खुप वर्ष नाही झाली पण ती दिवाळी आणि आताची दिवाळी वेगळी आहे.. असो.
तर झालं असं की, मी आणि माझ्या बहिणी असे मिळून आम्ही दिवाळीतला फराळ करू... शाळेला सुट्ट्या लागल्या की, आधी साफसफाई आणि नंतर फराळ हे दरवर्षी ठरलेल्या प्रमाणे आम्ही पार पाडु.
चार बहिणी मग काय मज्जाच यायची... सगळ्या मिळून फराळ बनवु.. सॉलिड मज्जा यायची तेव्हा.. स्वतःच्या हाताने चकल्या, करंजा, शंकरपाळ्या हे ठरलेलं असायचं. बाकी लाडु आणि चिवडा बनवायचा तो फक्त आणि फक्त आईनेच...
हे सगळं झालं की, पहिली पहाट.. सकाळी लवकर उठुन उठन लावुन अंघोळ, त्यानंतर कारटं फोडुन थोड कडु जिभेला लावुन मी तर घरात पळुन जाई आणि आईने केलेले दडपे पोहे(गोड पोहे) तोंडात घाली.
त्यानंतर फटाके लावणं चालु... थोडे फटाके लावून आम्ही बाकीचे रात्रीसाठी राखुन ठेवु.. त्यात मध्यमवर्गीय म्हटलं की कुठे एवढं परवडायचे खुप फटाके.. पण त्यातल्या त्यात दिवाळीमध्ये फटाके लावु आणि जपून जपून अगदी दिवाळी संपेपर्यंत फटाके लावू.
"रांगोळी.... रंगांनी भरलेली अशी ही रांगोळी. आयुष्यात ही असेच रंग भरत जावेत.., जसे त्या रांगोळीत आपण रंग भरतो.." मी मात्र स्वतःची छोटी रांगोळी बाजूला काढे.
तेव्हा ना "चंपक" नावाच गोष्टीच पुस्तक खुप फेमस होत.. आणि माझ्या आवडीचं ही. तेव्हा त्यातील एखाद्या गोष्टी मधल्या चित्रांची मी रांगोळी काढत असे. छान मज्जा यायची ते रंगलेले हात बघायला..
खोट्या पिस्तुलची सर कोणत्याच खेळण्याला नाही.. मी आणि माझी मोठी बहीण आम्ही.. चोर-पोलीस खेळायचो..
उगाचच काहीतरी कल्पना करून आम्ही खेळत बसायचो..
कधी लपाछपी, डोंगरका-पाणी. नाही तर वेगवेगळे मैदानी खेळ असायचे... त्यानंतर बॅटमिनटन ठरलेला खेळ. रात्र रात्रभर बॅटमिनटनचे खेळ रंगायचे.
सुट्ट्या म्हटल्या की अभ्यास कमी आणि मज्जाच जास्त.. मग काय चित्र काढणं, नाही तर काहीतरी टाकाऊ पासुन टिकावू बनवणं.. खेळ तर काय दिवसभर खेळायचो.. दिवस कमी पडायचे. ते दिवस आता फक्त आठवणी म्हणुन राहिल्या. उगाच नाही म्हणत लहानपण देगदेवा..
उगवचाच फटाके लावण्याची ऍक्टटिंग करून आम्ही पळुन जायचो.. त्यामुळे रस्त्यावर ये जा करणारे लोकं मात्र विचार पडत आणि ते बघून गम्मत ही वाटायची.. पण खरे फटाके लावताना मात्र खुप काळजी घ्यायचो हा स्वतःची आणि इतरांची ही..
आज काल हे काही दिसत नाही... उगाचच भरमसाठ फटाके लावण्याचा ट्रेंड आला आहे. कोण कोणापेक्षा जास्त फटाके आणि कोणत्या स्टाईलने लावतात यावर लोकांचं लक्ष.. फराळ बाहेरून जास्त मागवला जातो. स्वतःच्या हाताने फळाल बनवण्याची मज्जाच वेगळी. आजकाल सण साजरे कमी आणि दाखवणं जास्त झालय. सण एकत्र साजरे आधी सारखे होत नाहीत. हे माझं मत आहे. सर्वांनी एकत्र यावं म्हणुन हे सण साजरे केले जातात. पण आजकाल मात्र त्याचा व्यवसाय केला जातो. आधी आनंद एकत्र येऊन घालवलेल्या वेळात मिळायचा. आपल्या माणसासोबत आपण आनंद साजरा करायचो. पण आता फक्त महागडे गिफ्ट्स देऊन साजरे केले जातात हे सण. असो.
पण तरीही आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.. कारण प्रेमाने केलेल्या गोष्टीचा मोल मोजता येत नाही..
सहज म्हणुन लिहिल आहे कोणाला दुखावण्याचा हेतू नाही... दिवाळीतल्या आठवणी तर खुप आहेत..
बाकी कसे आहात.. प्लीज रागावू नका. कथेचा पार्ट लवकरच येईल. आज दिवाळी.., म्हणून माझ्या सर्व फॅमिली अर्थातच तुम्हा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदाच आणि भरभराटीचा जावो हीच त्या श्री चरणी पार्थना.
"रांगोळीच्या रंगासारखेच आनंदाचे क्षण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात यावेत हीच पार्थना..."