Majhya avayakt bhavna books and stories free download online pdf in Marathi

माझ्या अव्यक्त भावना

आजचा ही दिवस त्याच्या आठवणीत रमून जाण्यात गेला. गाणी लावली की आधी रोमॅंटिक, हॅपी वाटतंयच. पण आज काल तीच गाणी ऐकुन डोळे भरुन येतात.


"प्रेम"....प्रेम हा शब्द दोन, भावना अनेक. ज्याच्याशी दिवस-रात्र बोलायची आज मात्र तो एकदम गप्प झालेला. काही क्षण आपल्या आयुष्यात किती आनंद देऊन जातात नाही.. आणि तेच क्षण डोळ्यात अश्रु आणतात. जेव्हा एकत्र होतो ना तेव्हा प्रत्येक क्षण जगलाय मी. पण आता मात्र त्याची प्रकर्षाने आठवण येतेय.

हातात मोबाईल घेऊन मॅसेज टाईप केला....
वाटत तुला कॉल करावा, पण भीती वाटते घेतलाच नाहीस तर तु.?!....मॅसेज चा रिप्लाय केलाच नाहीस तर...?!
पळत जाऊन मिठी मारावीशी वाटते पण तु आलाच नाही तर...?!"


का तुम्ही बॉईज असे वाजता. आधी खुप प्रेम करतात. जीव लावतात. समोरच्याला काय हवं नको ते बघतात. एवढं प्रेम करतात की नंतर काही दिवसांत ते संपून जातं.


मैत्री.. प्रेमा आधी केली जाते ती मैत्री. मग नात संपलं की, मैत्री का तोडतात...? कारण तु मैत्रिणी सारख नाही वागू शकत हे, कारण देऊन तु मात्र मोकळा झालास. मोकळा झालास की तुझ्या आयुष्यात कोणी आलं आहे म्हणून मला दिलेल कारण.... म्हाहित नाही.


खुप गोष्टी हक्काने सांगाव्याशा वाटत आहेत. पण तो हक्कच आता राहिला नाहीये. कस व्यक्त होऊ तुच सांग...
तुझा विचार करायचा नाही ठरवुन ही हे वेडं मन परत तुझाच विचार करत बसत.


तुझ्या सोबतचे फोटो बघुन आपसूकच डोळ्यातून पाणी कधी गालावर येतं कळत ही नाही. स्वतःला गुंतवून ठेवायचा किती ही प्रयत्न करून तुझेच विचार डोक्यात फिरत राहतात.


का अस अचानक तोडून टाकलस नातं. कंटाळलास एवढ्यात नात्याला की मला..?!
नको ती कारण देऊन समोर भेटुन न बोलता मॅसेजवर मैत्रीही नको, अस सांगुन तू बोलणं बंद केलंस. तुला नसेल रे येत आठवण तुझ्याकडे काय तुझे फ्रेंड्स आहेत. जवळचे आहेत. पण माझ्याकडे मात्र फक्त तू होतास. एकटाच.....
ज्याच्याशी बोलुन मी माझं मन मोकळं करायची. आणि तू ही निघुन गेलास. मला एकटं टाकुन.


कधी कधी राग येतो स्वतःचा कशाला हे प्रेम केलं. जर एकटचं सोडून जायचं होतं, तर आलास तरी कशाला. स्वप्न रंगवुन एकट्यापणात टाकुन तू मात्र पळ काढलास.

स्वतःची प्रॉमिसेस ही तु विसरलास. कधीही न सोडून जाणार आज मात्र एकटा टाकुन निघून गेलास.
पण मी अजून ही वाट बघतेय. कधी वाटत नकोच बघायला, पण आलासच नाहीस तर. पण कधी वाटत थांबावं तू परत आलास तर.. भाबडं मन या दोन समांतर रेषांमध्ये अडकलय. खोटी आशा घेऊन जगतेय मी.


आयुष्यात नेहमी प्रॅक्टीकल विचार करणारी मी आज मात्र इमोशनल झालीये. एकदा यावास आणि मिठीत घ्यावस एवढीच इच्छा आहे. भर- भरून रडु दे तुझ्या मिठीत. मनसोक्त रडायचं आहे. सगळं जग विसरून परत एकदा तुझं व्हायच आहे.

म्हाहित आहे आता तुला नाही माझी काळजी आणि नाही गरज. ती भागवायला तुझ्याकडे तुझी मानस आहेत. पण एक दिवशी नक्की तुला पश्चाताप होईल मला दूर केल्याचा. तू आलास तरी मी नसेल. कारण मी मात्र खुप दूर निघुन गेलेली असेल.


तुझ्या प्रत्येक गोष्टीची सवय लावून जी घेतली होती. खुप त्रास होतोय त्याचा आता, पण ठीक आहे होईल सवय. माणूस म्हटलं की हे अस होतच. पण आपण मात्र पुढे चालत जायचं.


वाईट क्षण नेहमी आपल्याला काही न काही शिकवून जातात. मी ही शिकली आज की, कधी एखाद्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम नाही करायचं. कारण आपण किती ही प्रेम करा ती व्यक्ती आपल्याला सोडूनच जाते.


पण मी समजेल की, देवाने मला अजून एक चान्स दिलाय जगायचा. पण परत प्रेम नाही करणार कोणावर.., काय म्हाहित तो ही निघुन जाईल तुझ्यासारखा.


तु यापुढे कधी कोणावर प्रेम करशील ना परत तर प्लीज तिला सोडून नको जाऊस. कारण म्हाहित नाही कोणा सोबतचं बोलण शेवटचं ठरू शकत.


पण एकदा भेटून सगळं सोल्व्ह केलं असतस, तर आज एवढा त्रास झाला नसता. जाऊदे सुखात रहा तुझ्या आयुष्यात. जिच्याशी लग्न करशील तिच्यासोबत खुश रहा. देवाकडे हेच मागणं आहे. जगातली सर्व सुख तुझ्या दारी येवो.


मी जातेय कायमची दुर. परत कधीही न येण्यासाठी. कारण तुझ्यासाठी मी खरच महत्त्वाची असती ना तर तु मला कधी सोडून गेलाच नसतास. जाऊदे आता जे झालाय त्यावर बोलुन काय फायदा. खुश रहा.


"हम्म.... करू का मॅसेज..??" नको मॅसेज परत बघुन रिप्लाय आलाच नाही तर. बॅक करते. सगळ डिलीट. एक गुड नाईट मॅसेज टाकून बघते.

गुड नाईट.

सेंड.
√√ सीन बाय हिम.

नो रिप्लाय.

हेडफोन वर तेच सॉंग वाजत होत.


तू मिले दिल खिले और जीनेको क्या चाहीये,

ना हो तू उदास तेरे पास पास मे रहुगा जिंदगीभर.

सारे संसार का प्यार मै ने तुझी मे पाया....

नकळत आजही डोळ्यातल पाणी उशीवर येऊन थांबलं.

*********

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED