Prem he - 16 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 16

............हॉर्नस् च्या आवाजाने ती भानावर आली... ग्रीन सिग्नल पडला होता... तिनेही स्कूटी सरळ तिला जायच्या असलेल्या दिशेने पुढे घेतली.... विहान left साईड ने कधीच निघून गेला होता...!!

विहान गेला त्या दिशेने तिने दोन तीन वेळा वळून बघितलं... तो कधीच पार पोहोचला होता..... तिचं मन अचानक उदास झालं.... 😞 कशीबशी ती घरी आली... रुम मध्ये येऊन बसली.... शरीरातील सर्व त्राण निघून गेल्यासारखं वाटत होतं तिला.... 😑 तिला तिच्या डोळ्यासमोर सारखी विहान च्या मागे बसलेली ती मुलगी दिसत होती... कोण असेल ती?? एवढी सुंदर!... Super hot कॅटेगरी मध्ये येणारी...!!😨.. अगदी विहान सारखीच!!!
पण मी का तिला विहान सोबत compare करतेय 🤔.. असेल त्याची कुणीतरी फ्रेंड!... फ्रेंड की गर्लफ्रेंड??? 😓 निहिरा..... काहीतरीच काय... तू चक्क विहान वर संशय घेत आहेस!.... संशय... 😏 का नको घेऊ... ती मुलगी किती चिकटून बसली होती त्याला... 😐 अगदी कानाला लागून बोलत होती त्याच्या... 😑.. खरं तर.. विहान ला शोभेल अशीच होती 😓😔.... काहीतरीच काय निहिरा.....हो.. खरंच आहे ते...!... सोनियाही त्याची खूप क्लोज फ्रेंड आहे.. नेहमी त्याच्यासोबत त्याच्या बाईक वर फिरते.. पण तिला कधी विहान ला एवढं चिकटलेलं पाहिलं नाही... 🙄... निहिरा चं स्वत:च्या मना सोबत द्वंद्व चालू होतं.....! आणि.... तिच्या हातात.... ते.. ब्रेसलेट..! 'होणार्‍या बायको शिवाय दुसर्‍या कोणाच्याही हातात मला ते घालायचं नाहीये..!!'... विहान चे शब्द तिच्या कानामध्ये घुमले.... तिने दोन्ही हात आपल्या कानांवर गच्च दाबून धरले... 🙉.. आणि ती रडायला लागली😭.... 'नाही.... माझा विहान माझ्यासोबत असं वागणार नाही....😢' ती स्वतःलाच समजावत होती... काय करूया... बोलुया का विहान सोबत याबद्दल....☹️ बोलावंच लागेल... त्याशिवाय खरं खोटं कळणार नाही.... आजचा दिवस जाऊ दे फक्त... उगीच आमच्यामुळे इतर कुणाच्या आनंदावर विरजण नको लागायला... तिने मनाशीच ठरवलं आणि शांत झाली...

तिच्या घशाखाली जेवणाचा एक घासही उतरत नव्हता.. पण आईला काय सांगणार म्हणून कसे बसे दोन तीन घास तिने पोटात ढकलले...आणि तयार होण्यासाठी रूम मध्ये गेली... सकाळपर्यंत किती खुश होती ती.... विहान सोबत वेळ घालवायला मिळेल म्हणून...! पण आत्ता... आता तिचा जायचाही मूड नव्हता....पण ती जो विचार करतेय खरंच तसं काही नसेल तर.. असा विचार करून ती तयार झाली...

सोनिया ने बाकी सर्वांना चार ची वेळ दिली होती.. फक्त निहिरा ला आणि त्यामुळे अर्थातच तिच्या तिन्ही फ्रेंड्स ना तीन ची वेळ दिली होती... हे सर्व ती विहान साठी करत होती... निहिरा च्या मनात काय उलथापालथ झालीय याची तिला काहीही कल्पना नव्हती...!

- - - - - - - - XOX - - - - - - - -

ठरल्याप्रमाणे निहिरा आणि तिच्या फ्रेंड्स सोबतच निघाल्या... निहिरा ने लाईट ब्लू जीन्स आणि नेव्ही ब्लू टॉप घातला होता.. तिच्या गोर्‍या रंगावर तो खुलून दिसत होता..! गळ्यात stole अडकवला होता.. केस मोकळेच सोडले होते...गळ्यात अजूनही विहान ने दिलेली चेन होती... पण आज तिच्या चेहर्‍यावरचे हसू कुठेतरी मावळले होते.... 😞

थोड्याच वेळात चौघीही फार्म हाऊस वर पोहोचल्या... सोनिया आणि विहान आधीच तिथे पोहोचले होते... बाहेर गार्डन मध्ये पार्क केलेली त्याची कार हेच सांगत होती..! त्याला कसं फेस करायचं निहिरा ला कळत नव्हतं... जड पावलांनी ती आत गेली...

समोरच विहान म्युझिक सिस्टीम चेक करत होता... त्याची दरवाजाकडे पाठ होती... त्याने ब्लॅक कलर ची हूडेड t-shirt घातली होती आणि लाईट ब्लू जीन्स....! त्याला समोर बघून निहिरा ला भरून आलं.. पण कुणी बघायच्या आत तिने stole ने आपली आसवे टिपली...इतक्यात सोनिया आतल्या रूम मधून बाहेर आली...आणि तिने हसून त्यांचं स्वागत केलं... एकमेकींना hug केलं... त्याबरोबर विहान ने पट्कन मागे वळून पाहिलं...समोर निहिरा ला बघून तो खूप खुश झाला.. तिच्याकडे बघून त्याने गोड smile दिली... निहिरा हरवल्यागत त्याच्याकडे बघतच राहिली...

सोनिया अवनी ला म्हणाली.. "माझ्यासोबत चल जरा जवळच्या शाॅप मधून दोन तीन वस्तू आणायच्या आहेत.."

आणि त्या बाहेर पडल्या..

त्यांच्या पाठोपाठ रीतू आणि अदिती ही बाहेर पडल्या...
निहिरा ने एकदा त्यांच्याकडे बघितलं... तिला लगेच लक्षात आलं.. सोनिया हे सर्व त्या दोघांसाठीच करतेय... 😓 इतर वेळी ती किती खुश झाली असती विहान सोबत बोलायला एकांत मिळतोय म्हणून पण आज तिला तो एकांत खायला उठला होता!! 😑

त्या चौघी बाहेर गेल्या तसं विहान ने म्युझिक सिस्टीम मध्ये रोमँटिक songs ची सीडी टाकली आणि song प्ले केलं..

❤️🎵

दो दिल मिल रहे हैं
मगर चुपके चुपके..
सबको हो रही है,
खबर चुपके चुपके....

आणि तो हळू हळू चालत निहिरा च्या जवळ आला.. निहिरा ने आवंढा गिळला.. 😦 त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले.. आणि तिला जवळ ओढलं... त्याची नजर तिच्या नजरेला भिडली!.. ती ही भेदरल्यासारखी त्याच्या डोळ्यांत बघू लागली.. 🙁 तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा तिचा विहान आज तिला परका वाटत होता.. 😐 ती विहान सोबत कशीबशी हसली.. आणि त्याला दूर करून ती तिची बॅग घेऊन आतल्या रूम मध्ये गेली... त्याला थोडं आश्चर्य वाटलं... 'हिला काय झालं.. 🤔' तो मनातच म्हणाला.... तोही तिच्या मागोमाग आतल्या रूम मध्ये गेला... ती काहीच बोलली नाही.. तिने तिचा लॅपटॉप सोबत आणला होता.. तो तिने बॅग मधून काढून बेड वर ठेवला.. तितक्यात विहान मागून गेला आणि तिला मिठी मारली...!! ❤️ तिने स्वतःला त्याच्या मिठीमधून सोडवून घेतलं... त्याच्याकडे बघून हसल्यासारखं केलं... आणि त्याला म्हणाली...

"विहान प्लीज...सर्व सामान नीट ठेवायचंय... मला जाऊ दे... 🙂"

त्याच्या उत्तराची वाट ही न बघता ती हॉल मध्ये आली... सोनिया ने आणलेल्या वस्तू ती एक एक करून व्यवस्थित ठेवत होती.. विहान ही तिथे आला... त्याने तिचा हात धरला आणि तिला स्वतः कडे वळवलं...

"निहिरा काय झालंय? Are you ignoring me??😦"

त्याच्या त्या प्रश्नाने ती दचकलीच!
"कुठे काय विहान.. प्लीज आवरू दे ना मला... ☺️" ती चेहर्‍यावर smile आणत म्हणाली.... तसा तो गुपचूप जाऊन सोफ्यावर बसला...

तिने खाण्याचे पदार्थ किचन मध्ये नेऊन ठेवले... आणि ती परत हॉल मध्ये आली..सर्व वस्तू ठेवल्या की नाही ते बघितलं.. विहान तिच्यावर रागावला होता.. सोफ्यावर बसुन तो तिच्याचकडे बघत होता... तिने डोळ्याच्या कोपऱ्यातून ते पाहिलं.. पण काही न बोलता ती आतल्या रूम मध्ये निघून आली... तिला कसंतरीच वाटलं... विहान सोबत असं वागायचं नव्हतं तिला.... 😑 पण तिच्याही नकळत ती तशी वागत होती... सकाळी विहान ला त्या मुलीसोबत बघितल्या पासून तिच्या डोक्यात तेच तेच येत होतं.. आणि नकळत ती विहान चा राग करत होती...!.. विहान ला मात्र याची जराही कल्पना नव्हती... तो विचारात पडला होता की अचानक काय झालं निहिरा ला.. ती अशी का वागतेय माझ्यासोबत... 😐.. तो तसाच मोबाईल हातात घेऊन सोफ्यावर बसून राहिला...

निहिरा ने लॅपटॉप चालू केला आणि त्यावर ती प्रोजेक्ट चं काम करू लागली... हे सर्व ती विहान ला टाळण्यासाठी करत होती... जोपर्यंत खरं काय ते कळणार नाही तोपर्यंत तिचा राग जाणार नव्हता...

बाहेर सुंदर वारा सुटला होता🍃... हॉल मध्ये विहान ने लावलेली रोमँटिक गाणी अजूनही चालू होती🎶💕... वार्‍याने आतल्या रूम च्या खिडकीचे पडदे उडत होते... आणि तोच वारा आता निहिरा च्या अल्लड बटांसोबत खेळू लागला होता...!! ती हळूच उठली आणि खिडकीत येऊन उभी राहिली... समोर खूप सुंदर नजारा होता.... 😍 दूरवर लांबच लांब डोंगररांगा दिसत होत्या.. ⛰️⛰️🏞️🏞️ थोड्याच अंतरावर हिरवीगार शेतं डोलत होती.. त्या शेतांमध्ये अधेमध्ये बाई माणसे काम करताना दिसत होती... उंचच्या उंच हिरवीगार झाडे!! 🌴🌴🌲🌲त्या सुंदर नजाऱ्यामध्ये निहिरा हरवून गेली... 😊😊 बाहेर हॉल मधून गाण्याचा आवाज तिच्या कानावर पडत होता....

🎶❤️
सांसों को सांसों में ढलने दो जरा..
धीमी सी धड़कन को बढ़ने दो ज़रा..
लम्हों की गुज़ारिश है ये पास आ जाए
हम.. हम तुम, तुम.. हम तुम❤️

आँखों में हमको उतरने दो ज़रा..
बाहों में हमको पिघलने दो ज़रा..
लम्हों की गुज़ारिश है ये पास आ जाए
हम.. हम तुम, तुम.. हम तुम❤️

विहान कधी तिच्या मागे येऊन उभा राहिला तिला समजलं पण नाही...! त्याने मागून हळूच तिचे केस बाजूला सारले आणि तिच्या मानेवर किस केलं..😚 त्याच्या त्या स्पर्शाने ती शहारली.. आणि पट्कन मागे वळली... विहान तिच्या एवढया जवळ उभा होता की ती थेट त्याच्या मिठीतच आली... त्याने दोन्ही हातांनी तिला जवळ ओढलं... दोघांच्या श्वासांचा वेग वाढला होता.... दोघे एकमेकांच्या डोळ्यांमधे बघत उभे होते.. याक्षणी निहिरा च्या विहान वरील प्रेमाने तिच्या रागावर मात केली होती...!! ती त्याला अजूनच बिलगली...!क्षणात दोघांचे ओठ एकमेकांच्या ओठांना भिडले...❣️ तेवढ्यात आतल्या रूमच्या दरवाज्याचा आवाज आला आणि दोघांनी दरवाजाकडे पाहिले... कुणीही नव्हतं... पण बाहेरून कुणीतरी येत असल्याची चाहूल लागली.. तशी निहिरा विहान पासून दूर होत लॅपटॉप समोर जाऊन बसली... विहान ही नाईलाजाने बाहेर निघून गेला...

- - - - - - - XOX - - - - - - -

हळू हळू सर्वजण आले...निहिरा ही बाहेर आली... सर्वजण एकमेकांना भेटले... बर्‍याच दिवसांनी सर्व असे भेटत होते त्यामुळे सगळेच खुश होते..! आल्या आल्याच सर्वांची मस्ती सुरू झाली... कुणाची चिडवाचिडवी.. कुणाची खोटी भांडणे.. तर कुणी गप्पांमध्ये दंग झाले...😅अशातच तास दीड तास निघून गेला.. पिझ्झा, वेफर्स, कोल्ड ड्रिंक्स वर एकत्र बसून तुटून पडले...! पार्टी म्युझिक सुरूच होतं... मग सर्वांना नाचायची लहर आली.. एक एक करत सर्वजण dance मध्ये दंग झाले... 💃👯 नाचता नाचता मस्ती चालू होती.. हसणं खिदळणं चालूच होतं... निहिरा ही थोड्या वेळासाठी सर्व विसरली होती.. आणि तीही एन्जॉय करत होती.. आतल्या रूम मध्ये लॅपटॉप वर प्रोजेक्ट डेटा डाऊनलोड करत ठेऊन ती हॉल मध्ये येऊन सर्वांसोबत नाचायला लागली.... विहान सोबत ही तिने डान्स केला... 😍... नाचता नाचता कोल्ड ड्रिंक्स संपले म्हणून मेधा तिला विचारायला आली.. बाकीचे कोल्ड ड्रिंक्स कुठे ठेवलेस म्हणून... निहिरा ने खाली पसारा नको म्हणून काही वस्तू वरच्या रूम मध्ये ठेवल्या होत्या... ती कोल्ड ड्रिंक्स च्या बॉटल आणायला वर गेली... आणि दोन तीन बॉटलस् घेऊन आली... आणि मघाशी तिने लॅपटॉप वर प्रोजेक्ट चा डेटा डाऊनलोड करत ठेवला होता तो डाऊनलोड झाला की नाही म्हणून एकदा चेक करण्यासाठी आतल्या रूम मध्ये गेली.. ती आतल्या रूम मध्ये जायला आणि विहान ने त्याच रूम मधून बाहेर यायला एकच गाठ पडली...! त्यामुळे ती विहान ला धडकली.. ती पडणार तोच विहान ने तिला आपल्या हातावर झेललं.... तिने विहान च्या t-shirt ला घट्ट पकडून ठेवलं.. आणि ती सावरली.. तिने विहान कडे बघितलं.. पण थोड्या वेळा पूर्वी सर्व विसरून एन्जॉय करणार्‍या निहिरा च्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळेच भाव विहान ला जाणवले.... तो गोंधळून तिच्याचकडे बघत होता.. ती तशीच आत गेली... विहान जाऊन हॉल मधल्या सोफ्यावर बसला...

थोड्याच वेळात निहिरा तावातावाने बाहेर आली... आणि विहान समोर येऊन उभी राहिली..."विहाssssssन😡" म्हणून ती जोरात त्याच्या अंगावर ओरडली..... 😡तिच्या डोळ्यांत अंगार फुलले होते...😡😠😠 विहान उठून उभा राहिला... आणि तिला असं बघून तो आणखीनच गोंधळला......😧

कुणीतरी म्युझिक बंद केलं... सर्वजण त्यांच्या बाजूला गोळा झाले.. काय झालंय कुणालाच काही कळेना... 😓 क्षणापुर्वी दंगामस्तीत गुंग झालेला फार्म हाऊस... एकाएकी शांत झाला... एक भयाण शांतता तिथे पसरली......

To be continued...
🙏
#प्रीत

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED