कादंबरी - जिवलगा ... भाग - २४ Arun V Deshpande द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

कादंबरी - जिवलगा ... भाग - २४

कादंबरी –जिवलगा ....

भाग -२४ वा

----------------------------------------------------

मधुरिमाला जाण्यास आता फक्त ५ दिवसच उरलेलेल होते , तसे तर तिचे लगेज

भरणे अशी तयारी रोज थोडी थोडी चालूच होती . ऑफिसमधून आल्यावर रात्री

मदत करण्याच्या निमित्ताने नेहा तिच्यासोबत जागत बसायची. काका आणि मावशी

पदेशी गेल्यापासून , मधुरिमा ,नेहाला सोबत म्हणून खाली येत होती , आता नेहा

तिच्या सोबत बोलत बसे ,मग गप्पा मारण्याच्या नादात वरच्या रूममध्ये झोप लागायची.

ऑफिसमधून येतांना नेहाने दोघींच्यासाठी हॉटेल मधून डिनरपार्सल घेतले आणि

मधुरीमाला फोन करून सांगितले ,

नेहाच्या या निरोपामुळे आता घरी पुन्हा वेगळे काही करण्याची आता गरज नव्हती .

मधुरिमाला खूप हायसे वाटले , किचनड्युटीचा तिला आज कंटाळा आलेला होता. बरे झाले नेहाला

डिनर-पार्सल घेउन येण्याचे सुचले.

नेहा येणाच्या अगोदर थोडी आवरा –आवर करून मधुरिमा खालच्या हॉलमध्ये येऊन बसली.

गेल्या काही महिन्यापूर्वी मावशीकडे आलेल्या नेहाबद्दलच तिच्या मनात विचार येत होते.

चांगल्या मोठ्या-भल्या परिवारातील नेहाला पहिल्यांदा पाहून आपण मनातल्या मनात तिला

हसलो होतो “,हे तिला आठवले . नेहाकडे पाहून वाटले होते की –

कसे होणार इथे या गबाळ्या, बावळट मुलीचे ?

शहरी राहाणीमान कसे असते ? माहितीपण नाहीये . नेहा नावाची मुलगी अशी बिलो -अवरेज

असेल याची कल्पना केली नव्हती. पण, इथे तर सगळंच आनंद दिसतो आहे .

इथल्या स्मार्टआणि चटपटीत पोरींच्या घोळक्यात नेहाला वावरतांना पाहून वाटायचे ..”या निरागस –

-अबोध दिसणार्या भोळ्या कोकराचा कसा निभाव लागावा ?

पण , आता वाटते ,दिसण्यावरून अंदाज बांधण्यात बहुतेक वेळा चुक्तातच माणसे .

आपलेच बघा की –

आपण समजलो तितकी ..नेहा अजिबात बावळट नाहीये , ती होती त्या गावात जसे

साधे ,सरळ वातवरण तिने अनुभवले , तशी तिची जडण-घडण झाली .नाव असलेल्या कोलेजात

भले ही ती शिकली नाहीये , म्हणून ती इंजिनिअर नाहीये असे तर अजिबात नाहीये ना .

तिचे शिक्षण , तिची हुशारी तिच्या कामातून दिसेल , वरवरच्या दिसण्यातून नाही.

मधुरिमाला आठवले – मावशी सोबतच्या एक पार्टीत नेहा गेली होती ,तिला पाहून तिच्या बरोबरीच्या ,

वयाच्या मुली .नेहाला नावे ठेवीत हसल्या होत्या .

पण ,आता याच नेहाकडे पाहून ,तिच्याशी बोलून “ तिला मूर्ख ठरवणे “ हा समोरच्या माणसाचा मूर्खपणा ठरेल ,असे वटते.

अशी ही नेहा मावशीच्या घरी राहून ..नोकरी करते आहे

सुरुवातीला खूप गोंधळून गेलेली नेहा ,आता इथल्या वातावरणात चांगलीच स्थिरावते आहे “,

हे जाणवून .आता आपण निश्चिंतपणे

दोन महिन्यासाठी आपल्या रणधीरकडे जाऊन येऊ शकतो .

त्या अगोदर या दोन दिवसात नेहाला घेऊन लेडीजहोस्टेल मध्ये जाऊन यावे लागणार ,

तिथे नेहाच्या राहण्याची व्यवस्था झाली की , आपण मावशी-काकांच्या शब्दातून मोकळे होऊत.

मनाशी विचार करण्यात मधुरिमा स्वतःतच हरवून गेलेली होती . आणि दारावरची बेल वाजली .

तिने दरवाजा उघडला , हातात पार्सल घेतलेली नेहा उभी होती .

आत आल्यावर ती म्हणाली –

मधुरिमा दीदी – अगोदर खाऊन घेऊ या , जोराची भूक लागली आहे बघ .

जेवणे आटोपून , किचन आवरून , दोघी वरच्या घरात गेल्या .

नेहा म्हणाली , दीदी , एकदा सगळे बघून घे, काही राहायला नको ,नंतर घाई –घाईत महत्वाचे

विसरून जायला नको .

एक काम करू या – तू आठवणीने काय काय घायचे ते सांगत जा..

मी त्याची नोटबुक मध्ये लिस्ट बनवते , त्या प्रमाणे एकेक गोष्ट टिक करीत जाऊ , म्हणजे बरे होईल.

त्या प्रमाणे सगळ्या वस्तू घेतल्या आहेत “,ही मनाची खात्री झाली की , काळजी नाही.

मधुरिमा म्हणाली – नेहा , किती काळजी करतेस ग तू ,

सगळ्या बारीक –सारीक गोष्टी तुला माहिती आहेत,

पण तू कधी दाखवत नाहीस ..तुला माहिती आहेत गोष्टी

आणि आज नवीन नावाने काय बोलते आहेस माझ्याशी ..

मधुरिमा दीदी ..!

फक्त दीदी म्हण ..तशी ही मी खूप मोठी आहेच तुझ्या पेक्षा , आणि आता मला ही तुझ्या सारख्या

या हुशार मुलीकडून ..

ए दीदी “ म्हणवून घेणे खूप आवडेल.

दीदी – तुझ्यापेक्ष मोठी आहेस ,ही काय सांगण्याची गोष्ट थोडीच आहे.

नेहा ,अग- तसे नाही ,

मी तुझ्या पेक्षा चक्क पंधरा वर्षांनी मोठी आहे . पण दिसत दहा वर्षान कमी ,आणि

वागण्या –बोलन्यातून अजून पोरकट वाटते समोरच्या माणसाना .

हे ऐकून नेहा म्हणाली -

बाप रे , तुझ्या-माझ्यात वयाचे इतके अंतर आहे, असे सांगून सुद्धा खरे वाटत नाहीये .

दीदी -तू अजून ही तुझ्या वयाच्या मनाने खूप तरुण दिसतेस, तरुण वाटतेस.

नेहा – पहिल्या पासून मी अशीच आहे. माझ्या वाढत्या वयाच्या खुणा दिसत नाहीत .

पण, म्हणून ,वाढते वय थोडेच आहे तिथे थांबून रहाणार ? नाही ना ,

कधी न कधी तरी ..माझ्या शरीरावर सुरकुत्या पडणार , डोळे खोल जाणार , शरीर सुटले तर ..बेढब दिसणार .

सुरकुत्या पडणार , डोळे खोल जाणार , शरीर सुटले तर ..बेढब दिसणार .

निसर्गा प्रमाणे असे होणे चुकणारे नाही कुणाला .

दीदी – मला इथे येऊन ..आता सहा महिने होत आहेत , मी एकदा ही माझ्या गावी गेले नाहीये ,

माझ्या बाबांना ,आईला सुद्धा , माझे एकटीनेच सारखेसारखे गावाला येणे आवडले नसते , तरी बरे आहे ,

मीच आपणहून जात नाही , रोज फोनवर त्यांच्याशी बोलते , त्यांना बरे वाटते आणि मला ही छान

वाटते .

पण खरे सांगू का , मला खूप आठवण येते त्यांची . शनिवार –रविवार सुट्टी असली की पटकन

बस पकडावी आणि जाऊन यावे वाटते .दोन दिवस आई सोबत राहून आले कि मग इथे मन रमेल “,

पण असे काहीच होत नाही .

माझे बाबांचे बाबा “ माझे आजोबा .म्हणालेत .. नोकरी मन लावून करायची ,

प्रामाणिकपणाने करायची ,आले मनात की निघाले ..असे केलेले अजिबात आम्हाला आवडणार नाही .

आपण ज्या ठिकाणी कामात असोत ..तिथे नाव कमवायचे ..नाव गमवायचे नाही.

असे कधीच काही करायचे नसते “, हे लक्षात असू दे नेहा .!

आता तू सांग दीदी , बाबा आणि आजोबा “यांच्या भावनांचा आदर करीत वागणे ,बोलणे हे माझे कर्तव्य

आहे “

दीदी आमच्या घरात सगळे असेच वागणारे आहेत. मग, मी कशी असेन यापेक्षा वेगळी कशी असेन ?

पण ,मी ठरवलंय ..प्रोबेशन झाले की मी एकदा चार दिवस गावी राहून येणार .

दीदी हे ऐकून म्हणाली –

नेहा ,शाबास ग पोरी , तुझे हे वागणे आजच्या वातावरणातल्या माझ्या सारख्या अनेकांना पचणारे

नाहीये , कारण आम्ही तुझ्याइतके , तुझ्या सारखे नशीबवान नाही आहोत

प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते , जे वाट्याला येईल ..तसे आयुष्य जगत राहायचे .

वरवर तर इथे सगळेच खूप आनंदात ,मजेत आहोत असे दाखवत जगात असतात .

पैसा असणे ,श्रीमंत असणे “, मनाला वाटेल तसे निर्बंध ,बेबंद जगणे “असे जीवन म्हणजे

खरे सुखी जीवन “असे मानून खोटे समाधान मिळवत जगणारे तुला इथे जास्त पहायला मिळतील

नेहा . तुझ्यासारखे मानसिक समाधानाने जगणारे असणारआमच्यासाठी सदा दुर्मिळ आहेत.

हे ऐकून ,

नेहा म्हणाली – असा निराशेचा सूर का बरे लावतेस तू दीदी ?

दीदी – एक विचारू का तुला ? नेहाने विचारले ..

तू तुझ्या पर्सनल लाईफ बद्दल कधीच काही बोलत नाहीस , तुला तुझ्या माणसांची आठवण

कशी काय होत नाही ?

नेहमी तू कामातच असतेस, बरे ,काय काम करतेस ?

हे पण अजून कळाले नाहीये.

तसा मधुरीमाला अंदाज आला , ही मुलगी काय विचारणार आहे ते .

तरी ती म्हणाली ..

बोल ग नेहा , आता पाच-सहा दिवसच राहिले आहेत ,आपण सोबत असण्याचे , मग ,

दोन महिने तरी असे समोर समोर बसून आपण बोलू नाही शकणार .

विचार आज - तुला काय विचारयचे .. आता वेळ आहे , आणि मूड पण आहे बोलण्याचा .

थांब हं दीदी – तुझ्या प्रवासासाठी लागणारे सर्व सामान यादीप्रमाणे भरून ठेवणे झाले आहे .

हे राहीलं ,ते राहिलं ..असे काही बाकी नाही ठेवलं मी . तेव्हा आता

आपण कॉफी -ब्रेक घेऊ या ,

मी मस्त कॉफी करते आपल्यासाठी , कॉफी घेत घेत बोलू या

चालेल न ?

थोड्या वेळातच ,कॉफीने भरलेला थर्मास , आणि कॉफीने भरलेले मोठे कप -मधोमध ठेवत नेहा म्हणाली

दीदी – घे कॉफी , आणि मला तुझ्याबद्दल सगळं काही सांग , मन मोकळे होण्याने तुला पण

खूप हलके –हलके वाटेल.

खूप दिवसापासून तिला दीदीबद्दल जाणून घेण्याची

उत्सुकता मनास लागली होती ,

दीदी बोलू लागली –आणि नेहा लक्षपूर्वक ऐकू लागली

नेहा – तू तुझ्या वयाच्या मनाने खूप जास्त समजदार आहेस , जबाबदारीने वागणे म्हणजे

काय असते “,? हे तुला माहिती आहे.

मी तुझ्या वयाची म्हणजे ..पंचेवीशीत असतांना ..आमची तर ती शुध्द “ गद्धे – पंचविशी “ होती असे म्हणावे लागेल .

आई-बापांच्या पैशावर मौज-मस्ती करणे हे एवढेच आम्हाला काळात होते .

नेहा – वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ,माझे बाबा त्यांच्या लहानपणापासून परदेशात आलेले ,त्यांच्या एका

नातेवाईकाने त्यांना दत्तक –पुत्र म्हणून सांभाळले होते . भारताशी त्यांच्या कधीच काही संबंध आला नाही,

परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातील एका मुलीशी त्यांचा विवाह झाला , या जोडप्याची मी

मुलगी .

आपले खालचे मावशी आणि काका आहेत ना , रणधीर ..या काकांच्या दूरच्या नात्यातील एका बहिणीचा

मुलगा ....

नातेवाईकांकडून अपमानित झालेला , त्याच्या परीस्थितीला हसणार्या लोकांकडून टिंगल सहन करीत

मोठा झालेला रणधीर ,क्रोधाच्या भरात घर सोडून बाहेर पडला ,जाताना त्याने सगळ्यांना ऐकवले .

परदेशात राहूनच मी स्वतःचा उद्योग सुरु करून .श्रीमंत होऊन दाखवील. तुमच्यातल्या अनेकांना

इथे भारतात माझ्यामुळे चार घास मिळतील असे करीन ,तरच नाव सांगेन ..रणधीर .

मगच भारतात येऊन माझे तोंड तुम्हाला दाखवीन “,

नाही तर कधीच तुमच्यासमोर येणार नाही

अशी “भीष्म –प्रतिज्ञा “करून आलेला खूप हुशार ,स्कॉलर ,जिद्दी , आणि महत्वाकांक्षी तरुण

रणधीर योगायोगाने माझ्या बाबांच्या नजरेस पडला , दूरदेशी आलेल्या या तरुण पोरातील

स्पार्क त्यांच्या अनुभवी नजरेने अचूक हेरला आणि पाहता पाहता ..रणधीर ..बाबांच्या बिझनेसचा

अविभाज्य भाग झाला , पुढे काही वर्षात त्याचे स्वतःचे बिझिनेस युनिट्स सुरु होत गेले ,पण,

रणधीरने बाबांची साथ कधीच सोडली नाही. तो त्यांच्याशी एकनिष्ठ राहिला .

एक विशेष म्हणजे बाबा आणि रणधीर यांच्यातल बिझिनेस रिलेशन्स आमच्या घर पर्यंत कधीच आले नाहीत.

त्यामुळे रणधीर आणि माझा परिचय पण नव्हता , आमच्यात मैत्री होणे आम्ही भेटणे , बोलणे

या गोष्टी तर घडल्या नाहीत .

कधी कधी बाबां आईशी बोलायचे त्या गप्पात बरेचदा रणधीर नावाच्या माणसाचा उल्लेख होत

असतो “असे मला वाटे .“,

पण या सगळ्याशी माझा काहीच संबंध नव्हता ,मी माझ्या कोलेज लाइफचा आनंद घेत होते .

आमच्या मित्र-मैत्रीणीत इकडे असते तसे बंधनकारक वातावरण नव्हते . मौज-मजा या शब्दात

सगळे आनंद घेणारे पोरं –पोरी आमच्या ग्रुप मध्ये होते.

दिवस असे मस्त चालेले होते . तारुण्याचे दिवस मस्तीचे , अनेक गोष्टी मनाला जाणवत होत्या ,

लव्ह , लव्ह- रिलेशन , स्त्री –पुरुष आकर्षण , त्यांच्यातील संबंध “ हे आमच्या मनातील सुप्त –

आकर्षणाचे विषय ..तिथल्या वातावरणात नवल वाटावे असे काही नव्हते.

आईबाबांनी अचानक आमच्या जवळच्या नातेवाईक मुलासोबत माझे लग्नच ठरवून टाकले .

आपली एक्कुल्ती एक मुलगी आता करोडोपती घराण्यांची सून होणार “, कर्तबगार घराणे ,

तसाच जावई मिळाला “हा आनंद त्यांच्या स्वप्नपूर्तीचा होता .

हे प्रपोजल मी नाकारावे यासाठी माझ्या जवळ कुठलेच कारण नव्हते , कारण माझा कुणी स्वप्नातला

राजकुमार नव्हता ,आणि मी कुणासाठी “ड्रीम –गर्ल “ नव्हते .

अल्लड वयाची नसले तरी ,काहीच जबाबदारी कधी न घेतलेली मी एक लकी- गो गर्ल होते.

आता आहोत त्या पेक्षा कैक पटींनी श्रीमंत असलेल्या माणसांच्या घरात आपण जाणार आहोत “,

यात आनंद ,आणि सुख दोन्ही वाटत होते.

मनजित “नाव होते माझ्याशी लग्न झालेल्या मुलाचे . अफाट श्रीमंत असलेल्या मनजितच्या

जगण्याच्या कल्पना आणि माझ्या कल्पना ..यात जमीन –अस्माना इतके प्रचंड अंतर होते .

जेमतेम –दीड-दोन वर्ष आमचा सहवास आणि संसार झाला असेल ,

गोड बातमी देण्याची संधी एक नाही तर दोन तीन वेळा लागोपाठ हुकली

कारण गर्भ-टिकत नव्हता , किती काळजी घाय्चो , पण शेवटी झोळी रिकामी .

आम्ही खूप उपाय केले ,

शेवटी आयुष्यभराची निराशा पदरात पडली ..सदोष गर्भाशया मुळे..मी कधीच आई ..बनू शकणार नव्हते .

हे सत्य स्वीकारावे लागले .आणि हे सत्य माझे आयुष्य उध्वस्त करणारे ठरले ..

त्यातच त्याची आजारी आज्जी गेली ....

आणि एक दिवस “त्याने त्याला माझ्या पासून घटस्फोट हवा “असे सगळ्यांना सांगितले ..

त्याला शारीरिक –सुख देण्यास असमर्थ असलेली स्त्री माझ्या गळ्यात बांधून

तुम्ही सगळ्यांनी माझी फसवणूक केली आहे . हे त्याच्या घटस्फोटाचे कारण सांगितले .

आणि एक दिवस .मला एकटीला समोर बसवत तो म्हणाला ..हे बघ -

तुझ्याशी माझी काही दुष्मनी नाहीये ,

मला तू अजिबात आवडत नाहीयेस , आणि तू मला अजिबात माझ्या समोर सुद्धा नकोय

लग्नाच्या बेडीत अडकून राहणारा मी नाहीये .

घरच्यांनी बळजबरी केली ..माझ्या आज्जीची शेवटची इच्छा पूर्ण कर , म्हणून मी तयार झालो .

आणि आता तर तू आई सुद्धा होऊ शकणार नाहीये .

काय करायचे आपण नवरा बायको होऊन. ?

असे असल्यावर सोबत राहण्यात काय अर्थ होता ?

जास्त नाटकं आणि गोंधळ न करता .

.परस्पर संमतीने .कायदेशीर -रित्या .आम्ही वेगळे झालो .

माझ्या बाबांना हा धक्का सहन झाला नाही , त्यना स्ट्रोक आला , धडधाकट बाबा लोळागोळा होऊन

कायमचे घरात पडले .

ध्यानीमनी नसतांना .. एकदिवस रणधीर आमच्या घरी आला , बाबांशी बोलत बसला , त्यादिवशी

पहिल्यांदा मी रणधीरला इतके जवळून पाहिले . त्याच्याशी मैत्री नव्हती आणि खूप बोलावे इतका

परिचय नव्हता . त्यात माझ्यावर कोसळलेले संकट .

अपरिचित असल्या सारखे आम्ही समोरासमोर बसून होतो .

रणधीर मला म्हणाला ..

तुझ्या मम्मीला सांग , प्लीज इथे येऊन बसा ,

त्यांच्याशी म्हत्वाचे बोलायचे आहे मला .

बाबाना काही कळेना , आईशी काय बोलायचे असेल या मुलाला ?

आईसुद्धा गोंधळून गेली होती . पण, लगेच ती बाबांच्या उशाला येऊन बसली .

बाबा , आई, आणि मी .समोरच्या खुर्चीत शांतपणे बसलेल्या रणधीरकडे पाहत होतो .

बाबांचा हात हातात घेत ..रणधीर म्हणाला ..

सर, तुम्ही परवानगी दिलीत

आणि माधुरीमाची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे.

अट एकच आहे माझी –

यापुढे तिला इथे माझ्यासोबत सतत राहता येणार नाहीये . इंडिया मध्ये माझे

दूरचे मामा –मामी राहतात , त्यांच्या रो –हाउस मध्ये पेइंग –गेस्ट म्हणून तिला राहायचे आहे.

आणि इंडिया मध्ये मी जे सामाजिक कार्य सुरु केले आहे ,त्याची संपूर्ण जब्दारी तिची असणार आहे.

तुम्ही सगळे विचार करून , निर्णय सांगा .

मधुरिमा माझी धर्म –पत्नी असेल , तिकडे तिचा नेहमी सन्मान आणि अद्द्रच केला जाईल ,माझ्यावर

विश्वास ठेवा सर .

नेहाबाई ..बघा ,

अशी आहे आमची कहाणी -

रणधीर पत्नी ..मधुरिमा तुझ्यासमोर आहे.

तुला आश्चर्य वाटेल .. तुझे मेन बॉस- विश्वजितसर आणि रणधीर कोलेज पासून मित्र आहेत ,

आता बिझनेस -पार्टनर . रणधीरच्या बिझनेस मध्ये विश्वजीत्चे शेअर्स आहेत ,

आणि विश्वजीत्च्या बिझनेस मध्ये रणधीर आणि माझे शेअर्स आहेत .पण आम्ही कुणीही कंपनी

डायरेक्टर वगेरे होण्याच्या फंदात पडत नाहीत.

विश्वजितसरांनी माझ्या शब्दावर तुला सहज नोकरी दिली याचे कारण ..आमची मैत्री आहे.

असो.

नेहा -

मी कधी ही आई बनू शकणार नाहीये ..हे रणधीरला माहिती आहे , तरी त्याने माझ्याशी लग्न केले ,

त्याने सुरु केलेलेया आदिवासी ,दुर्गम भागात असलेल्या अनेक शाळांत ,अनाथ आश्रमातील निराधार

अशा शेकडो मुलांचे आम्ही दोघे आई-बाप आहोत .

ही मुले माझ्या गळ्यात पडतात ना ..त्यावेळी त्यांच्या स्पर्शाने माझ्यातील आई भरभरून समाधान पावते.

रणधीरचे मामा –मामी खरे देवमाणसे .. पोटच्या पोरीसारखी माया लावली त्यांनी मला .

त्यांची इकडे न येणारी मुले ..मला बहिणच मानतात .

नेहा -, रणधीरची सगळी माणसे ,म्हणजे एक अनमोल खजाना आहे.

आणि मी त्याची राखणदार आहे.

माझ्यासारखी सुखी , माझ्या इतकी नशीबवान आणि भाग्यवान मीच .

दीदी – यु आर ग्रेट .

मी पण लकी , मावशीची भाची असणे माझे छान नशीब .

त्यामुळे तर तू आणि मी भेटलो आहोत

तू बिंधास रणधीर –जीजूंना भेटून ये, माझी काळजी अजिबात नको करू.

तू आपलेपणाने तुझी कहाणी मला सांगितलीस .

थान्क्स दीदी .

नेहा , आपल्या मैत्री-नात्यात कधी ही खंड पडू द्यायचा नाही .

प्रोमीस मी .

होय मधुरिमा दीदी ..पक्का प्रोमीस.

नेहा -उद्या खूप कामे आहेत आपल्याला . झोपू या आता

गुड नाईट ..

नेहा मोठ्या समाधाने झोपी गेली .

------------------------------------------------------------------------------------------------------------------

मित्र हो -बाकी पुढच्या ..भागात ..

भाग -२५ वा लवकरच येतो आहे.

------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा ..

भाग -२४ वा

ले- अरुण वि.देशपांडे -पुणे.

९८५०१७७३४२

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------