kadambari jivlagaa - 25 books and stories free download online pdf in Marathi

कादंबरी- जिवलगा ...भाग -२५

कादंबरी – जिवलगा ...

भाग – २५ वा

--------------------------------------------------------------------

मधुरिमाची कहाणी ऐकून नेहा थक्क झाली . माणसे दिसतात ,तशी नसतात ..हेच दीदीच्या

जीवन-कहाणी वरून आपल्याला समजले . मावशीकडे आल्यावर मधुरिमाची ओळख झाली, एकाच

घरात राहण्यामुळे सहवास घडत गेला . पण, तिच्या खाजगी ,पर्सनल गोष्टी बादल बोलण्याची कधीवेळ

आली नव्हती . मावशी आणि काका रो-हाऊसच्या खालच्या भागात ,आणि एकटीच मधुरिमा वरच्या

३ बी एचके- मध्ये राहायची. मावशी-काकाकडे राहणारी पेइंग –गेस्ट असेल असे बरेच दिवस समजत होतो आपण ,

नंतर कळाले वरचा भाग काकांनी माधुरीमाच्या मिस्टरांना दिला आहे..आणि कालच्या

गप्पात कळाले ..रणधीर काकांचा जवळचा नातेवाईक आहे.

नेहाला आश्चर्य वाटत होते की ..मावशी –काका ..मधुरीमाच्याबद्दल ,रणधीरबद्दल .मधुरीमाच्यासमोर ,

किंवा तिच्या माघारी ही कधीच एक शब्द ही बोलत नसायचे . एखादी गोष्ट सिक्रेट कशी ठेवायची : हे मावशी

काकांच्या कडून शिकावी अशी गोष्ट आहे.

सकाळी नेहमीप्रमाणे घाई-घाईने कामे आटोपली .आणि नेहा ऑफिसला निघाली , तेव्हा मधुरिमा म्हणाली

मी दुपारी सिटी मध्ये जाईल ..आणि तुझसाठी लेडीज होस्टेल मध्ये तीन महिन्यासाठी राहण्याची व्यवस्था

आणि त्याला लागणारे पैसे भरून येईन. तसे तर तुला अपडेट देईनच .

चल ..बोलू पुन्हा , मला आज बरीच पेंडिंग कामे निपटून टाकायची आहेत.

रणधीरच्या कार्यकर्त्यांना पैसे पाठवायचे आहेत..त्यासाठी बँकेत बराच वेळ जाणार आहे. वीस

ठिकाणची लीस्ट असते दरवेळी , आता दोन महिन्यांचे पैसे पाठवायचे आहेत.कमी पडायला

नकोत .

ठीक आहे दीदी ..तुझ्या सोयीप्रमाणे कर सगळी कामे ..तुला रविवारी निघायचे आहे, आज,बुधवार

तीनच दिवस राहिलेत की फक्त.

चल, रात्री बोलू निवांत .

बाय करून नेहा ऑफिसला निघाली.

ऑफिसला गेल्यावर ,लगेच ज्याचीत्याची कामे सुरु , मध्येच मिटिंग , कामाचा आढावा

यातच लंच –टाईम झालाय हे सुद्धा लक्षात आले नव्हते .

सोनियाने अनिता आणि नेहाला आवाज देत म्हटले ..

चला ,आज रोजच्या आपल्या पोळी -भाजी डब्बा -लंचला सुट्टी देऊया ,

ऑफिसच्या बाजूला जे मस्त हॉटेल आहे ,आज तिथे जाऊ ,टेस्ट बदल पण होईल .

सोनियाची आयडिया आवडण्यासारखी होती .

तिघी मैत्रिणी .लंच साठी हॉटेल मध्ये बसल्या ,ज्याच्या त्याच्या आवडीच्या पदार्थांची ऑर्डर दिली ,

आता वेटर कधी घेऊन येऊन येतो याचीच वाट पहात बसण्याशिवाय इलाज नव्हता.

नेहाचा फोन वाजला ..स्क्रीनवर मधुरिमाचे नाव दिसले ..

दीदी विचारीत होती -

नेहा ,काय करते आहेस तू ? लंच झालाय का ?

दीदी, आम्ही बाहेरच आलोत लंचला ,

तू येतस का ,छान होईल .!

अनिता आणि सोनिया पण आहेत , तू ओळखतेसच दोघींना ,

ये लगेच. आम्ही थांबतोय तू येईपर्यंत .

अनिता म्हणाली – ओ हो ..मधुरिमा ..येतेय आत्ता , खूप दिवस झाले त्यांची भेट नाहीये .

ऑफिसमध्ये आल्या की आमची नावे लक्षात ठेवून बोलतात आमच्याशी . फिलिंग ग्रेट .

आपले बिग बोस विश्वजीतसर ,मधुरिमा मैडम ,ओल्ड फ्रेंड्स आहेत.

आता आत्ता कमी झालाय , मैडमचे इकडे येणे , आधी खुपदा येत असत ..

नेहा – तुला हा जोब मधुरिमा मैडममुळे मिळालेला आहे, ते सुद्धा नो प्रोसीजर ..सरळ इम्प्लोयी

झालीस ..

हो ना नेहा ..?

हो अनिता , हे खरेच आहे. पण पहा ना ,

माझ्या शिक्षणाचा आणि या जॉबचा काही तरी संबंध आहे का ?

सोनिया म्हणाली

..ए वेडाबाई , ज्यांना नोकरी नाहीये ना त्यांना जाऊन विचार बेकार असणे म्हणजे

काय असते ?

तुला आयती नोकरी मिळाली , चांगला पगार आहे, अजून काय पाहिजे असते ग ?

नेहाला क्षणभर वाटले ..सोनिया असे भडकल्यासारखे का बोलती आहे..

नंतर तिचे तिलाच जाणवले .आपणच काही तरी विनाकरण बोलतो आहोत ,म्हणून ती चिडली असावी.

काही मिनिटातच ..मधुरिमा हॉटेलमध्ये आली ,

त्या तिघीजणी ज्या कोपर्यात बसल्या होत्या तिथे त्यांना

जॉईन होत म्हणाली ..

चला ,जेवण लवकर येऊ द्या ..मला एक तर प्रचंड भूक लागली आहे , बँकेच्या कामात खूप वेळ गेला .

आता जेवण झाले की ..लेडीज होस्टेल कडे पळते .आणि या नेहाचे काम करून टाकले की,झाले

मी तीन महिन्यासाठी परदेसी जाण्यास मोकळी .

अनिता म्हणाली ..

मधु मैडम , काय काम आहे म्हणालात नेहाचे , ते लेडीज होस्टेल वगेरे ?

डिटेल शेअर करा .म्हणजे वी विल अल्सो हेल्प यु ..!

मधुरिमाने सविस्तर सांगितले . ते झाल्यावर .

अनिता आणि सोनिया दोघीही एकाच वेळी म्हणाल्या

मधुरिमा मैदाम ..हे असे काहीच करण्याची गरज नाही आता .

आणि काय ग नेहा ..

तू या बद्दल एकदा ही आमच्याजवळ काही कसे बोलली नाहीस या सगळ्या गोष्टी बद्दल ?

नंबर एकची मूर्ख आणि बावळट मुलगी आहेस तू. दोन फटके दिले पाहिजेत तुला .

सोनिया म्हणाली ..

अहो दीदी ..आम्ही असतांना ,तुमच्या या येडपट नेहाला ..होस्टेल मध्ये जाऊन

राहण्याची वेळ कशी येऊ देऊत आम्ही .

तिला नाही कळत ,तुम्ही तर आता घ्या समजून.

हे बघा .. आमच्या flat मध्ये अगोदर आम्ही पाच –सहाजणी राहायचो .एकेकीचे लग्न जमले ,

त्या चिमण्या गेल्या की भुर्र उडून .

नंतर उरलो आम्ही दोघीच ..आमची रास जुळते ,सूर जुळले ,मने जुळली , मग ,आम्ही आमच्या

दोघीत नवा कुणी तिसरा येउच द्यायचा नाही असे ठरवले

आता एकदम .छान चालली आमचे.

पण, तीन महिन्याची तर गोष्ट आहे ,

ही नेहा राहील आमच्या सोबत . आम्ही असतांना तिने

लेडीज होस्टेल मध्ये राहावे “,

ये बात बिलकुल गलत है...!

आणि ती आमच्या सोबत आहे .हे तुमची काळजी कमी करणारे आहे ना ?

सांगा बरे ?

अनिता आणि सोनिया दोघींनी सुचवलेला पर्याय ऐकून

.मधुरिमा खूपच आनंदित झाली . ती म्हणाली -

वा वा ..क्या बात , फ्रेंड्स ..तुमच्या दोघींच्या प्रस्त्वाला मी नाही म्हणूच शकत नाही .आणि

या नेहाला “होय “ शिवाय गत्यंतर नाहीये.

पण ,मुलींनो ,माझी एक अट आहे ..ती ऐका , आणि कबूल केली तरच

नेहा तुमच्याकडे मी परत येई पर्यंत राहील

जास्त नाही ,तीन महिन्यांचा तर प्रश्न आहे हा .

ओके दीदी ..सांगा तुमची अट काय आहे ते ...

मधुरिमा सांगू लागली ..

नेहाच्या होस्टेलच्या खर्चाची सगळी जबाबदारी ..मावशी-काकांनी माझ्यावर टाकलेली आहे.

नेहाला पगार मिळतो ,तिच्या जवळ पैसे आहेत ..हे सगळे माहिती आहे ..तरी पण त्यांनी

मला बजावले आहे. की तीन महिन्याचे होस्टेल .तिथले मेस चार्गेस आणि इतर जे कशी खर्च

असतील ..ते नेहाला अजिबात भरू द्यायचे नाहीत

.मावशी म्हणाल्यात ..

नेहाला सांगा .तू असा खर्च आम्हाला करू दे , , तुझा पगार शिलकीत असू दे . तुझ्याच लग्नासाठी उपयोगी होईल.

सोनिया आणि अनिता ..आता तुम्हीच बोला ..माझे चूक आहे कि बरोबर ?

म्हणून म्हणते ..

नेहा आता तुम्हाला सोडून कुठे ही जाणार नाहीये . ती तुमच्या सोबत ,तुमच्या

निगराणीखाली राहील .

आणि हो ..इस बच्ची को पुरा बदल डालो ..

तिला एखदा मित्र मिळवून द्या , म्हणजे तुमची थोडा वेळ सुटका होईल हिच्यापासून .

सोनिया म्हणाली .. दीदी ..हे फार महत्वाचे काम दिलात तुम्ही आम्हाला .

तुम्ही येई पर्यंत ..ही नेहा इतकी बदलून गेलेली असेल ,की तुम्ही म्हणाल .आम्हाला ..

अरे ..मेरी वोही नेहा .लौटा दो मुझे ..

मधुरिमा म्हणाली ..अनिता सोनिया ..तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझ्झा , म्हणून तर नेहा तुमच्या

सोबत राहणार “या कल्पनेने खरेच मी एकदम निर्धास्त झाले, निश्चिंत झाले .

दीदीने पर्स मधून एक बंद लिफाफा काढीत सोनियाच्या हातात देत म्हटले

.मी अंदाजाने पन्नास हजार रुपये ठेवलेत यात

. कमी तर पडणार नाहीत हे नक्की ..पण जास्त किती लागू शकतात

याचा अंदाज नाही , होस्टेल , मेस , बचलर लाईफ .सध्याच्या दिवसात कमी खर्चाचे

राहिले नाहीत याची कल्पना आहे ,

पण नेमके किती .अपडेट नाहीये मी या बाबतीत .

पण, जास्त लागले तर हक्काने सांगा , हक्काने मागा ..

नेहा आणि तुम्हा दोघींची मी आतापासून बडी –दीदी “आहे असे समजा आणि तशा नात्याने वागा ,

तरच मला जास्त आनंद होईल.

एव्हढ्या घडामोडीत ..लंच -टाईम संपत आलाय की ..चला आता ..

नेहाने आठवण करून दिली .तसे मधुरिमा घराकडे निघाली ..आणि या तिघी मैत्रिणी ऑफिसकडे .

गाडी चालवतांना मधुरिमा विचार करीत होती ..

साध्या –सरळ नेहाचे नशीब सुद्धा किती चांगले आहे ..मावशी –काकांचे नाते , त्यांच्यामुळे आपल्याशी

जोडले गेलेले आपुलकीचे ,मैत्रीचे नाते .आणि आपल्यामुळे ज्या ठिकाणी तिला नौकरी मिळाली ,तिथे

तिला सोनिया आणि अनिता ..या तिच्यावर माया करणाऱ्या जिवलग मैरिणी मिळाल्या ..

या दोघींच्यामुळे..नेहाचे होस्टेल मध्ये राहायला जाण्याचे टाळले आहे. हे सुद्धा साधी गोष्ट नाहीये .

उलट होस्टेल मधले वातावरण , कुणासोबत पार्टनर म्हणून राहावे लागले असते, त्या अनोळखी

मुलीशी , वा लेडीज पार्टनर बरोबर नेहा adjust होऊ शकली असती का . आणि आजकालचे

तरुण-तरुणी ..त्यांची लाईफ स्टाईल.. त्यांचे स्वभाव ,आवडी-निवडी ..

बाप रे ,नुसत्या कल्पनेने सुद्धा अस्वथ होऊन जायला होत

. सरसकट वाईटच आहे असे नाही , पण, नेहाच्या स्वभावाला

साजेसे मित्र –मैत्रिणी मिळणे अवघड नसले तरी सोपे अजिबात नाही.

सोनिया आणि अनिता ..समंजस आहेत, अनुभवी आहेत ..आणि नेहा त्याची कलीग आहे, यामुळे

त्यांच्यात एक सहजता आहे, जी एकमेकांना सांभाळून घेण्यास मोठी उपयोगाची आहे.

आजच्या भेटीच्या निमित्ताने ..या दोन मुलींची भेट झाली .आणि नेहाच्या राहण्याचा काळजी वाटणारा

प्रश्न अनपेक्षितपणे सहज सुटला .

असे सहज आयुष्य लाभायला हवे प्रत्येकाला ..तरच जगणे सुसह्य होऊन जाईल.

आता आपण आपल्या ठिकाणी निश्चिंत मनाने राहू शकतो असा विस्वास ,अनिता आणि सोनियाच्या

शब्दांनी दिला , या दोन मुलींचे आभार किती मानले तरी ते कमीच आहे.

सोमवार पासून नेहा सोनिया आणि अनिता सोबत असणार ..एक नवे पर्व सुरु होईल ..

छान आणि आनंददायक असेच काही घडणार आहे .असे सारखे वाटते आहे ..

वाट पाहू या ..काय घडणार ..कळेलच की आपल्याला ..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – २६ वा लवकरच येतो आहे..

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – जिवलगा ,,

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED