Prem he - 24 books and stories free download online pdf in Marathi

प्रेम हे..! - 24

............. निहिरा ने घाबरतच त्याच्या डोळ्यांमध्ये बघितलं... 😓 दोघांच्याही डोळ्यांत आसवे जमा झाली😢...काही क्षण दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत तसेच हरवून गेले......

स्काय ब्लू कलर चा प्लेन शर्ट त्यावर नेव्ही ब्लू पट्ट्यांवाली टाय.. नेव्ही ब्लू कलर चा सुट मागे चेअर ला अडकवलेला.. विहान आजही खूप हँडसम दिसत होता...!! ❤️ निहिरा ला त्याच्या डोळ्यांत तिच्याबद्दल चं प्रेम..काळजी..ओढ सर्व दिसत होतं....

पण काही क्षणच.....! विहान लगेच भानावर आला... त्याच्या डोळ्यांतील तिच्या प्रेमाची जागा आता रागाने घेतली होती... 😡 त्याचे रागाने लाल झालेले डोळे बघून निहिरा घाबरली.. 😦 विहान ला पहिल्यांदाच ती एवढं चिडलेलं बघत होती..

" सोनिया चं नाव वापरून तू इथपर्यंत आलीस.. खोटं बोललीस तू.... 😡😡"

"विहान... ते.... मी.... तुझ्यासाठीच.. म्हणजे.....😓".. निहिरा ला काय बोलावं सुचत नव्हतं...

"माझ्यासाठी?? काय माझ्यासाठी??? काय संबंध तुझा माझा...😠" विहान तिच्या अंगावर ओरडत होता... तिच्यावर ओरडण्याच्या नादात आपली सेक्रेटरी शिवानी ही तिथे बसलेली आहे हे तो पूर्णपणे विसरला... शिवानीही काहीही न कळून आळीपाळीने दोघांकडे बघत होती...

"विहान प्लीज... शांत हो..... माझं ऐकून घे.. 😢" निहिरा रडवेल्या चेहर्‍याने बोलत होती.. पण विहान ऐकून घ्यायला तयार नव्हता...

"एक शब्द ही बोलायचा नाहिये मला तुझ्यासोबत समजलीस.. 😡 मला काहीही समजावण्याचा प्रयत्न करू नकोस.... ईज दॅट क्लिअर????" म्हणत विहान ने त्याचे दोन्ही हात जोरात टेबल वर आपटले.. निहिरा दचकलीच..!! 😦😧 तिने एकदा चोरट्या नजरेने शिवानी कडे बघितलं.. तेव्हा कुठे विहान च्या लक्षात आलं की शिवानीही इथे आहे..
शक्य तितका संयम ठेवत पण रागातच तो निहिरा ला बोलला..

" You may go now..!! 😧"

आणि तो मागे वळून खिडकीतून बाहेर बघू लागला.. त्याचा श्वास अजूनही फुललेला होता... डोळ्यांत अंगार होते.. 😡

निहिरा ला शिवानी समोर आणखी तमाशा नको होता.. म्हणून ती खाल मानेने तिथून निघून गेली... तशी विहान ने आपल्या हाताची मूठ जोरात भिंतीवर आपटली...

निहिरा ला बघून.. शिवाय त्या दोघांमध्ये जे झालं त्यावरुन निहिरा आणि विहान मधलं रिलेशन शिवानी च्या लक्षात आलं होतं... त्यामुळे ती थोडी जेलस फील करत होती... आफ्टरऑल विहान वर फिदा असणार्‍या त्यांच्या ऑफिस मधल्या लेडीज स्टाफ पैकी ती ही एक होती... त्यात ती विहान ची सेक्रेटरी होती.. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ ती त्याच्यासोबत असायची..शिवानी दिसायला आणि रहायलाही बोल्ड होती..! विहान ला आपण लवकरच आपल्या जाळ्यात ओढून घेऊ असं तिला वाटायचं.. पण आज अचानक निहिरा च्या येण्याने ती थोडी हर्ट झाली होती.. 😓 पण तरीही त्या दोघांमध्ये ब्रेक अप झालंय आणि आता विहान तिचा राग राग करतोय याचा तिला आनंद झाला होता..निहिरा बाहेर गेल्यावर तिने लगेच विहान ला विचारलं...

"सर.. कोण होती ती??"

"none आॅफ युअर बिझनेस.." विहान अजूनही खिडकीबाहेर बघत उभा होता.. त्याचा राग अजूनही निवळला नव्हता...

त्याचं उत्तर ऐकून शिवानी जायला निघाली... 😑 ती दरवाज्यापर्यंत पोहोचली तोच विहान तिला म्हणाला...
"आय अॅम सॉरी... I didn't mean that... 😒"

"it's ok sir..." म्हणत ती बाहेर निघून गेली..

विहान चा पारा अजूनही चढलेलाच होता... त्याने रागातच सोनिया ला कॉल केला..

"हाय विहान.. बोल... 😊" पलीकडून सोनिया म्हणाली..

"Why you did this to me? 😡 Why you sent her hear...??? You broke the promise 😡😡" विहान चिडूनच बोलला..

"विहान प्लीज.. तिथे येण्याचा निर्णय तिचा स्वतःचा होता.. मी काही केलेलं नाहिये... 😢" सोनिया त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाली..

" तू काहीच केलं नाहियेस?? You gave her my address... त्याशिवाय ती इथे आलीच कशी...😠 " विहान खूपच चिडला होता...

"विहान प्लीज.. माफ कर तिला.. तिला तिची चूक कळलीय.... 😓"

" हे तू सांगतेयस सोनिया...! मी काय काय भोगलंय तिच्यामुळे हे तुझ्यापेक्षा जास्त जवळून कुणीच बघितलं नाहिये.. तरीही तू तिची बाजू घेतेयस???? 😤😤 मला तुझ्याशी ही बोलायचं नाहिये... विश्वासघात केलास तू सुद्धा माझा.... 😡😡"

" विहान ऐक....... "

सोनिया काही बोलायच्या आतच विहान ने फोन कट केला... रागाच्या भरातच त्याने त्याच्या मॉम ला कॉल केला..

" hello mom... "

" हां विहान बेटा बोल... 😊"

" mom..मी सावनी सोबत लग्न करायला तयार आहे...!!"

" काsssय!!!! तू खरच तयार आहेस लग्नासाठी? "

" हो.. "

" थँक यू बेटा... I am so happy!! आम्ही लगेच तयारीला लागतो... चल बाय.. काळजी घे... 😅😅" म्हणत मॉम ने फोन ठेवला..

विहान ने लगेच त्याचा मोबाईल बंद करून ठेवला..
सोनिया त्याला कॉल करण्याचा खूप प्रयत्न करत होती पण फोन switched off येत होता...

- - - - - - - XOX - - - - - - -

इकडे निहिरा विहान च्या वागण्याने हर्ट झाली होती.. 😑 तिने आणि सोनिया ने हे सर्व गृहीतच धरलं होतं...पण विहान पहिल्यांदाच तिच्यासोबत असा वागला होता....त्यामुळे नकळतच तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते.. त्यात त्या शिवानी समोर विहान तिच्या अंगावर ओरडला होता... त्यामुळे तिला जास्त वाईट वाटत होतं.... 😢

ती त्याच्या ऑफिस मधून बाहेर पडली.. जरी विहान ने तिचं काहीही ऐकायला नकार दिला होता.. तरी तिने परत प्रयत्न करायचं ठरवलं... विहान च्या ऑफिसबाहेर रोड च्या पलिकडे एक छोटंसं गार्डन होतं... ती पलीकडे जाऊन रोड ला लागूनच असलेल्या बेंच वर बसून राहिली.... तिला ऑफिस चं गेट समोरच दिसत होतं.. ती विहान बाहेर पडायची वाट बघत होती....

सहालाच विहान चं ऑफिस सुटलं होतं ....एकेक करून ऑफिस चा स्टाफ बाहेर पडत होता... साधारण साडे सहाच्या सुमारास विहान ऑफिस मधून बाहेर पडला.. वॉचमन ने गेट उघडला आणि त्याची कार गेट मधून बाहेर पडली.. निहिरा ने त्याला बघितलं.. आणि ती पट्कन उठून उभी राहिली... विहान ची कार वेगाने तिच्या पुढ्यातून निघून गेली... त्याने निहिरा ला बघूनही न बघितल्यासारखं केलं...
ती.. तो गेला त्या दिशेने बघतच राहिली... 😓

थंडीचे दिवस होते...थंडी बर्‍यापैकी जाणवायलाही लागली होती... निहिरा ने घड्याळात बघितलं... पावणे सात झाले होते... अंधार ही पडायला सुरुवात झाली होती... तिला एकटीलाच परत पाऊण - एक तासाचा प्रवास करून तिच्या रूम वर जायचं होतं ...ती मनातून थोडी घाबरली ही होती.. अनोळखी शहर होतं... त्यात अंधार पडायला लागला होता..
ऑटो ने जाणं सेफ राहील की बस ने जाऊ?... बसनेच जाऊया असा विचार करून ती जवळच्या बस स्टॉप वर गेली.. पंधरा मिनिटे वाट बघूनही बस चा पत्ता नव्हता... शेवटी तिने तिथून ऑटो केली.... मनात भीती तर होतीच पण नाईलाज होता.. तिला आधीच उशीर झाला होता... तिकडे तिच्या मैत्रिणी तिची वाट बघत होत्या.. अनोळखी शहरात ती अशी अंधारल्या वेळी ऑटो ने एकटीच प्रवास करत होती.. त्यात विहान तिच्यासोबत असा वागला होता.. त्यामुळे तिचे डोळे भरून आले होते.. कधी एकदा रूम वर सुखरूप पोहोचते असं झालं होतं तिला..! मनोमन ती देवाचा धावा करत होती... अखेर देवाच्या कृपेने आठच्या सुमारास ती रूम वर पोहोचली... ऑटोतून उतरून ती तिच्या रूम च्या दिशेने चालू लागली आणि तिच्याही नकळत तिला हुंदका दाटून आला ... 😫

- - - - - - - XOX - - - - - - -

त्या रात्री सोनिया ने आज काय झालं ते निहिरा ला विचारून घेतलं.. विहान आपल्यासोबत बोलत नसल्याचंही तिने सांगितलं.. निहिरा ला सोनिया साठी वाईट वाटलं.. शिवाय याला आपणच जबाबदार आहोत असंही तिला वाटून गेलं... 😑😑

तिने परत दुसर्‍या दिवशी ही तिथे जायचं ठरवलं.. तिला काहीही करून विहान ची माफी मागायची होती.. मग नंतर भलेही त्याने आपल्याला अ‍ॅक्सेप्ट न करो... 😑

बुधवारचा दिवस उजाडला... पण आज तिला ट्रेनिंग वरुन लवकर निघता येणार नव्हतं... 😒 कालच ती तब्येतीचं कारण सांगून लवकर निघाली होती.. आज तिला पूर्ण वेळ थांबावंच लागणार होतं...

पाच वाजता ट्रेनिंग संपली तशी ती घाईघाईत निघाली... ऑटो पकडली आणि सरळ विहान च्या ऑफिस चा रस्ता धरला.... पाऊण तासाने ती ऑफिस जवळ पोहोचली... गेट वर कालचाच वॉचमन होता.. त्याने तिला ओळखलं...
काल ती ऑफिस मधून बाहेर पडल्यावर तिच्यावरून बरीच चर्चा ऑफिस मध्ये झाली होती.. स्टाफ मध्ये तिच्याबद्दल कुजबुज सुरू झाली होती...! त्यात शिवानी ने केबिन मध्ये जे बघितलं आणि ऐकलं ते रंगवून रंगवून सर्वांना सांगितलं होतं.... त्यातलं बरंच काही त्या वॉचमन च्या कानावर ही आलं होतं.... पण तो खूप चांगला माणूस होता.. निहिरा बद्दल जे ऑफिस मध्ये चालू होतं ते त्याला बिलकुल आवडलं नव्हतं... त्यामुळे ती गेट जवळ येताच त्याने तिला विहान आज ऑफिस ला आला नसल्याचं सांगितलं...
ते ऐकून निहिरा चे तर हात पाय गळूनच गेले...! एवढा रागावलाय का विहान आपल्यावर😧😖 त्याच्यासाठी एवढ्या लांबून आलो पण तो मुद्दामच आज आला नाही... का केलंस विहान तू असं😫😫😭 म्हणून ती रडायला लागली....

त्याला तरी कशी दोष देऊ... आपण ही हेच केलं होतं त्याच्यासोबत!! 😭😭😭

To be continued..
🙏
#प्रीत


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED