प्रेम हे..! - 25 प्रीत द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेम हे..! - 25

........ एवढा रागावलाय का विहान आपल्यावर😧😖 त्याच्यासाठी एवढ्या लांबून आलो पण तो मुद्दामच आज आला नाही... का केलंस विहान तू असं😫😫😭 म्हणून ती रडायला लागली....

त्याला तरी कशी दोष देऊ... आपण ही हेच केलं होतं त्याच्यासोबत!! 😭😭😭

आता त्याच्या घरी जावं तर पंधरा मिनिटे जायला लागतील... त्यातही तो घरी सुद्धा नसेल तर.... जाऊन तसंच परत यावं लागेल.... आणि मग कालच्या सारखा उशीर होईल आणि अंधार पडल्यावर जिवात जीव राहणार नाही... 😔 सोनिया ला ही विचारू शकत नाही.. आपल्यामुळे तिच्या सोबतही तो बोलत नाहीये😖.. त्यापेक्षा मी उद्याच परत येईन... असं स्वतःशीच ठरवून ती पाणावलेल्या डोळ्यांनी मागे फिरली...

रूम वर पोहोचल्यावर तिने सोनिया ला कॉल केला..
आणि विहान आज ऑफिसलाच आला नसल्याचं सांगितलं... सोनियालाही तिच्यासाठी वाईट वाटलं... पण विहान चा राग ही तिला कळत होता... निहिरा ने तिला आपण उद्या परत तिथे जाणार असल्याचं सांगितलं...

- - - - - - - XOX - - - - - - -

गुरुवार.. निहिरा सकाळी ऑफिस मध्ये ट्रेनिंग साठी पोहोचली... तिथे गेल्यावर तिला कळलं की आज इथे साजरा केला जाणारा लोकल ग्राउंडनट फेस्टिव्हल असल्यामुळे त्यांना आज आणि उद्या दुपारी तीन वाजता सोडण्यात येणार आहे... ती खूप खुश झाली.. आज लवकरच विहान कडे जायला मिळेल म्हणून मनोमन तिने देवाचे आभार मानले 🙏..

तीन वाजता ती ऑफिस मधून बाहेर पडली.... मैत्रिणींना तिने आपले अंकल आँटी याच शहरात रहात असल्याचं खोटंच सांगितलं होतं... 😐 आणि ती त्यांनाच भेटायला जाते असं तिने सांगितलं होतं...

चालत चालत ती स्टॉप पर्यंत आली.... पण आज फेस्टिवल असल्याने तिला ऑटो मिळणं मुश्किल झालं होतं... ज्या येत होत्या त्यात आधीच पॅसेंजर बसलेले होते.. जवळ जवळ अर्ध्या तासाने तिला ऑटो मिळाली... ती त्यात बसून विहान च्या ऑफिस कडे निघाली.... पाऊण तासाने ती पोहोचली...
गेट जवळच्या वॉचमन ने नियमानुसार तिची एंट्री करून घेतली... ती आत रिसेप्शन पर्यंत गेली... रिया ने आजही तिचं हसून स्वागत केलं... निहिरा ने तिला विहान ला भेटायचं असल्याचं सांगितलं.. पण यावेळी मात्र तिने स्वतःचंच नाव तिला सांगितलं... तिने थोडं गोंधळून तिच्याकडे बघितलं आणि विहान ला कॉल केला..

"हॅलो सर... मिस निहिरा वॉन्टस् टू मीट यू..."

"टेल हर आय अॅम बिझी नाऊ... आय कान्ट मीट... शी मे लिव्ह...." आणि विहान ने फोन ठेवला...

रिया ने विहान चा मेसेज निहिरा ला कळवला... निहिरा ला खूप वाईट वाटलं... 😖 पण ती काहीही न बोलता बाहेर पडली... आजही ती परत त्या समोरच्या बेंचवर जाऊन बसली.. तिने विहान ची वाट बघत बसायचं ठरवलं..

इकडे निहिरा आजही आल्याचं कळल्यानंतर विहान चं कशातच लक्ष लागेना... पण त्याचा अजूनही राग होता तिच्यावर... पंधरा मिनिटांनी त्याने रिया ला कॉल करुन निहिरा गेली का ते विचारलं.... रियानेही ती गेल्याचं सांगितलं.... निहिरा ऑफिसबाहेर बसलीय हे तिलाही माहीत नव्हतं...!

विहान चं कामात लक्ष लागत नव्हतं त्यामुळे आज लवकर घरी जायचं त्याने ठरवलं... आणखी पंधरा मिनिटांनी तो ऑफिस मधून निघाला...
निहिरा ने विहान ची कार बाहेर पडताना बघितलं.. आणि ती उठून उभी राहिली😓.... विहान ने तिला तिथे बघितलं पण त्याने आजही तिला इग्नोर केलं.. आणि त्याची गाडी तिच्या पुढ्यातून निघून गेली... तिने "विहाssन" म्हणून त्याला हाक मारली पण तो पुढे निघून गेला... ती त्याच्या दिशेनेच बघत होती.. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले होते...😫

पण तिने बघितलं तर विहान ने पुढे जाऊन कार एका बाजूला थांबवली आणि तो तिच्या दिशेने चालत आला... निहिरा ला आनंद झाला.. ती अनिमिष नजरेने त्याच्याचकडे बघत उभी होती.... तो तिच्या अगदी समोर येऊन उभा राहिला.. तिच्या हृदयाची धडधड वाढली... तिला वाटलं त्याच्या मिठीत शिरून खूप खूप रडावं.. त्याला सांगावं की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय... 😢😢 पण..... त्याच्या डोळ्यांत तिला कालचाच राग दिसत होता...! ती घाबरली...

"काय प्रूव्ह करायचंय तुला हे सर्व करून? तुला काय वाटतं तू हे अशी रोज इथे येऊन बसलीस तर मला तुझी दया येईल?? का करतेयस तू हे?😡 " तिच्या दोन्ही दंडाना पकडून तिला गदागदा हलवून त्याने विचारलं...

ती अजून बावरल्यासारखी त्याच्याकडे बघत होती...

"बोल.... मिस.. निहिरा.. जोशी...! "तो प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला... त्याच्या बोलण्यातली खोच तिच्या लक्षात आली.. तिनेच त्याला आपल्याला निहू बोलण्यावरून टोकलं होतं... म्हणूनच तो आज असं बोलत होता....

" विहान... मी चुकले... मला माफ कर... 😫🙏 खूप काही बोलले मी तुला.. खूप त्रास दिला... मला खरं कळलंय.. अंकित आणि मेधा ने सर्व जाणुन बुजून केलं होतं... आणि तुला त्यात गुंतवलं त्यांनी... मला खरच माफ कर विहान..."
ती रडत रडतच बोलली...

"अच्छा???? लवकरच कळलं म्हणायचं तुला....खरं कळालं म्हणून इथपर्यंत आलीस... जर नसतं कळालं तर.... तर आली असतीस???? 😡 नाही ना.... मलाच दोषी ठरवलं असतंस ना...? आणि एवढ्या दिवसांत मला भेटावसं ही नाही वाटलं का तुला??? 😡😓 मी कोणत्या अवस्थेत होतो याचा विचार तरी केलास का कधी...?? लावारिस असल्यासारखा रात्रभर त्या बीच वर भटकत होतो..... वेड लागलेल्या मजनू सारखा हॉस्पिटल च्या बेड वर पडून होतो...! इथे आल्यावर सुद्धा किती वेळ गेला मला सावरायला.. तुला थोडी तरी कल्पना आहे का?? एक एक क्षण मरत होतो तुझ्यासाठी... तेव्हा नाही आठवण आली तुला माझी... मग आता हे सर्व कशासाठी????? " विहान तिच्या अंगावर ओरडून बोलत होता...

" विहान मी बर्‍याचदा तुला कॉल करायचा प्रयत्न केला रे.. पण तुझा फोन बंद होता... मी सुद्धा खूप मिस केलं तुला... प्लीज विहान... आय अॅम सॉरी 🙏 😭😭" निहिरा भान हरपून रडत होती...

" आता ही कारणं नको सांगू उगीच.... आणि सोडून दे इथे येणं.... आपल्या दोघांचा रस्ता वेगळा आहे.... " विहान रागातच जायला निघाला.. निहिरा ने पटकन त्याच्या हाताला पकडलं..

" विहान प्लीज नको जाऊ ना... प्लीज मला माफ कर..... 😭😭😭" ती ओक्साबोक्शी रडत होती... येणा जाणारे त्यांच्याकडे बघत होते...

विहान ने तिचा हात झटकला... आणि तो त्याच्या कार च्या दिशेने चालत गेला...

आता सर्वच संपलं म्हणून निहिरा आणखी जोरजोरात रडू लागली... रडता रडताच ती चालू लागली....
कार मध्ये बसायच्या आधी विहान ने एकदा मागे वळून पाहिलं.... आणि निहिरा च्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार त्याला दिसली... निहिरा चं तिकडे लक्ष नव्हतं... ती तिच्याच तंद्रीत रस्त्यावरून चालत होती.. तिची नजर शून्यात हरवली होती....

"निहिराsssss😨😨" तो जोरात ओरडला आणि तिच्या दिशेने धावला.... पण निहिरा च्या मेंदूपर्यंत त्याचा आवाज पोहोचलाच नाही... ती तशीच चालत होती... 😔😔

"निहूsss प्लीज थांब...😨" विहान धावता धावता परत ओरडला.... आता तो तिच्या बर्‍यापैकी जवळ आला होता..

विहान ची 'निहू' ही हाक मात्र तिने ऐकली आणि तिने आनंदून त्याच्या दिशेने बघितलं... आणि तेवढ्यात त्याने तिला आपल्या दिशेने ओढलं... पुढच्याच क्षणी ती त्याच्या मिठीत होती... झुssपकन् काहीतरी तिच्या जवळून गेल्याचं तिला जाणवलं... तिने आवाजाच्या दिशेने बघितलं.. तेव्हा कुठे तिच्या लक्षात आलं की काय होणार होतं आणि काय झालं...!! 😨 तीही भेदरून विहान ला बिलगली... विहान च्या हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती... तिच्यापेक्षा जास्त तोच घाबरला होता...!

"लक्ष कुठे होतं तुझं....😧 तुला काय झालं असतं तर.. " विहान तिच्या भोवतीची मिठी आणखी घट्ट करत म्हणाला... त्याच्या डोळ्यांत अश्रू होते...

"माझ्या कर्माचे फळ म्हणून भोगले असते मी ते ही... तुझ्याशिवाय जगून तरी काय करणार होते.... 😫😫" निहिरा रडत रडत बोलत होती...

विहान ने तिला अजूनच जवळ ओढलं...

आजूबाजूला थोड्या अंतरावर बरेच लोक गोळा झाले होते... त्यात विहान चा ऑफिस स्टाफ ही होता... विहान ने तिच्या भोवतीची मिठी सैल केली आणि तो सरळ चालायला लागला... सरळ जाऊन कार मध्ये बसला आणि निघून गेला... निहिरा मात्र गोंधळून त्याच्याच कडे बघत राहिली...!!

🎶🎵🎶🎵
पेटलं आभाळ सारं पेटला हा प्राण रे..
उठला हा जाळ आतून करपलं रान रे..
उजळताना जळून गेलो राहीलं ना भान
डोळ्यातल्या पाण्याने ही भिजेना तहान...

दूर दूर चालली आज माझी सावली......
कशी.. सांज ही उरी गोठली
उरलो.. हरलो.. दुखः झाले सोबती ......

काय मी बोलून गेलो..श्वास माझा थांबला..
मी इथे अन् तो तिथे हा खेळ आता संपला..
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा...
आपुलाच तो रस्ता जुना...मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती .......

ना भरोसा.. ना दिलासा..कोणता केला गुन्हा
जिंकुनी ही खेळ सारा हारते मी का पुन्हा....
त्रास लाखो.. भास लाखो कोणते मानू खरे
कोरड्या त्या पावसाचे ह्या मनावर का चरे...
समजावतो मी या मना.... तरी आसवे का वाहती
उरलो... हरलो... दुखः झाले सोबती ............😫😫😫

To be continued..
🙏
#प्रीत